Back
फलटण नगरपालिका चुनाव: निंबाळकर बनाम निंबाळकर की भिड़ंत, किसका भाग्य?
TTTUSHAR TAPASE
Dec 18, 2025 10:46:00
Satara, Maharashtra
सातारा - फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढत पहायला मिळत आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. लोकसभा त्यानंतर विधानसभा आणि आता फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकमेकांचा विरोधात उभे ठाकले आहेत. पाहूया यावरचा हा रिपोर्ट
या फलटण नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर त्यांचा विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. या दोन्ही निंबाळकरांनी आणि पक्षांनी देखील आपली ताकद पणाला लावली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतली आहे. या प्रचारात रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगत कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा त्यावेळी नक्की करू असा दम देखील दिला होता
या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास सुरू आहे मात्र या प्रकरणात राजकारण आणून मुद्दाम टार्गेट केलं जात आहे. या प्रकारात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दूरणावय संबंध नसल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर हे शकुनी मामा ची भूमिका बजावत असल्याची टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.
या व्हिडिओमध्ये एकूणच दुर्दैवाची बाब म्हणजे ही फलटण नगरपालिका निवडणुकीत ही विकासाचा मुद्द्यावर न होता डॉक्टर महिला आत्महत्या खेळली जाते आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 18, 2025 12:45:150
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 18, 2025 12:35:580
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 18, 2025 12:11:470
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 18, 2025 11:36:310
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 18, 2025 11:35:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 18, 2025 11:21:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 18, 2025 11:20:150
Report
SNSWATI NAIK
FollowDec 18, 2025 11:01:590
Report
PNPratap Naik1
FollowDec 18, 2025 10:46:180
Report
PNPratap Naik1
FollowDec 18, 2025 10:33:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 18, 2025 10:21:400
Report
SNSWATI NAIK
FollowDec 18, 2025 10:19:310
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 18, 2025 10:18:400
Report
MAMILIND ANDE
FollowDec 18, 2025 10:06:230
Report