Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
तंबाकू पर देशभर प्रतिबंध की मांग, कोल्हापुर पानपट्टी संघ ने आक्रामक रुख अपनाया
PNPratap Naik1
Dec 18, 2025 10:33:06
Kolhapur, Maharashtra
देशामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालावी अशी मागणी कोल्हापुरातल्या पानपट्टी असोसिएशन कडून करण्यात आली आहे. देशात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थच बनले नाही तर आम्हाला विकण्याची वेळ येणार नाही अशी आक्रमक भूमिका देखील कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन मांडली आहे. या घातक पदार्थांसाठी नाहक पानपट्टी व्यवसायिकांना प्रशासनाच्या वतीने वेठीस धरण्यात येऊ नये अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 18, 2025 12:11:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश स्लग - अन्यथा,सांगली महापालिका निवडणूक स्वबळावर लढू - राष्ट्रवादी अजित पवार गटाचा इशारा. अँकर - सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता स्वबळाचा नारा दिला आहे.राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात होणारया इन्कमिंगच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीत सन्मानाची वागणूक न मिळाल्यास सांगली महापालिकेची निवडणुकी स्वबळावर लढू, असा इशारा भाजपाला दिला आहे, सांगलीमध्ये उद्या मुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडत असून मिरजेतील 16 आजी-माजी नगरसेवक आणि दोन माजी महापौर पक्ष प्रवेश करणार आहेत,त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडुन 30 जागा ऐवजी आणखी जागा वाढवून मागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय,त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी स्वबळावर लाभेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाईट - इद്രिस नायकवडी - आमदार - राष्ट्रवादी अजित पवार गट. बाईट - पद्माकर जगदाळे - शहर जिल्हाध्यक्ष - राष्ट्रवादी अजित पवार गट.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 11:36:31
Chandrapur, Maharashtra:पुढे ढकलण्यात आलेली चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगरपरिषदच्या निवडणूकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. न्यायालयीन निर्णयांमुळे पुढे ढकलण्यात आलेली चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकेत 22 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष निवडीसाठी सुमारे 32 हजार 488 हजार मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. नगरसेवक पदासाठी 112 उमेदवार रिंगणात आहेत तर नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार लढतीत आहेत. प्रचार अंतिम टप्प्यात पोचला असून विविध प्रभागात रॅली आणि पदयात्रेने वातावरण ढवळून निघाले आहे. कोळसा, सिमेंट, स्पॉंज आयर्न, ऊर्जा निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या घुग्गुस औद्योगिक शहरात नगर परिषद स्थापनेनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. यात भाजप - काँग्रेस यांच्यात टोकाची लढाई होत आहे. रिंगणात बंडखोर काँग्रेस, शिवसेना उबाठा, बसपा यांचेही उमेदवार आहेत. आम्हीच विकास।करू शकतो. विजयी आपणच होऊ असे दावे दोन्ही बाजूने केले जात आहेत. बाईट १) दीप्ती सोनटक्के, नगराध्यक्षपद उमेदवार, काँग्रेस बाईट २) शारदा दुर्गम, नगराध्यक्षपद उमेदवार, भाजप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 18, 2025 11:35:59
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग.. मालेगाव डोंगराळे येथील चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरण, संशयित आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप निश्चित.. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची आज पहिली व्व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणी संशयित आरोपी देखील नासिक रोड जेल मधून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हजर पोलिसांनी केलेल्या तपासावर कोणत्या मुद्द्यांवर केस चालवली जावी याचा मसुदा ठरविण्यात आला.. आरोपीला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी आरोपीच्या वकिलांनी कस्टडी बेकायदेशीर असल्याचा अर्ज दाखल केला त्या अर्जावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जोरदार युक्तिवाद प्रकरणाची सुनावणी सुमारे एक तास चालली
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 18, 2025 11:21:12
Satara, Maharashtra:सातारा - बामणोली परिसरातील कथित ड्रग्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांनी जे बेछूट आरोप केलेले आहेत, सध्या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत त्यामुळे त्यात सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न अंधारे असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी दूरान्वयेही कोणताही संबंध नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी असून, केवळ राजकीय हेतूने नाव घेऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ही देसाई यांनी सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी पुणे–नাশिक येथे घडलेल्या ड्रग्स प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांना पाटण न्यायालयात हजर राहावे लागले होते. सुषमा अंधारे यांनी केलेली वक्तव्ये न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम करणारी ठरू शकतात, त्यामुळे अशा विधानांद्वारे न्यायालयाचा अवमान होत नाही ना, याची त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा इशाराही देण्यात आला. जर हे आरोप मागे घेतले गेले नाहीत, तर जसे नाशिक प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते, तसेच या प्रकरणातही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठाम इशारा देसाई यांनी दिला है.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 18, 2025 11:20:15
Akola, Maharashtra:Anchor : विदर्भात आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यात आले असून, दोन ते तीन नगरसेवक प्रत्येक महानगरपालिकेत मनसेचे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले.येत्या महापालिका निवडणुकांमध्ये यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये मनसेसाठी सध्या चांगले वातावरण असून, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे उंबरकर यांनी नमूद केले. अकोल्यात मनसेच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची उबाठे सामोरं आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत बैठका झाल्या असून, एकत्र निवडणूक लढण्याबाबत जवळपास निश्चितता झाल्याचेही त्यांनी सांगितले.उबाठासोबत जागावाटपाबाबत चर्चा करून सक्षम आणि चांगले उमेदवार देण्यात येतील, आणि त्यातून निश्चितच विजय मिळवू, असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 18, 2025 11:01:59
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई कांग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील ने शिवसेना शिंदे गुट में प्रवेश के कारण रिक्त पद पर रामचंद्र दळवी को प्रभारी अध्यक्षपद दे दिया गया है। ऐन चुनावी समय में जिल्हाध्यक्ष के द्वारा ही पार्टी प्रवेश होने से 15 दिनों पहले नए जिल्हाध्यक्ष की नियुक्ति की नामुष्की कांग्रेस पर आ गई है। इसके बावजूद नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी ने आगामी मनपा चुनावों में कांग्रेस पार्टी के मजबूत प्रदर्शन की स्पष्ट बात की है। उन्होंने केंद्र और राज्य सरकार की खोटेपणा के खिलाफ लड़ने वालों को साथ लेने से चुनाव का सामना करने की रणनीति बताई और कहा कि कांग्रेस के बिना Navi Mumbai Manpa का महापौर नहीं बनेगा, ऐसी आश्वासन भी दिया है।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 18, 2025 10:46:18
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता असताना ठाकरे शिवसेना मात्र जागा वाटपावरून आक्रमक झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील दबाव आणत देखेंगे सोचेंगे दिलाएंगे अशी भूमिका घेणार असेल तर शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू असा थेट इशारा दिलाय.. यामुळे कोल्हापुर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अभेद्य राहणार का? हे पहावं लागणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झाली आहे. चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली असून काँग्रेस नेते सतेज पाटील दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी केला आहे. इंगवले यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून जोरदार तिढा निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे. आमदार सतेज पाटील, नेते काँग्रेस महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाईल असं महाविकास आघाडीचे नेत्यांनी स्पष्ट केला है. पण निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाचा तिढा समोर आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना काँग्रेस नेते सतेज पाटील उमेदवारी देणे टाळत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वामध्ये असंतोष वाढला आहे. सतेज पाटील यांनी मात्र शिवसेनेकडून प्रस्ताव आलाय. कशाप्रकारे ऍडजस्टमेंट होते ते पाहून पुढे जाऊ अशी सकारात्मक प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घेत असल्याचा दिसून येत आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 18, 2025 10:46:00
Satara, Maharashtra:सातारा - फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढत पहायला मिळत आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. लोकसभा त्यानंतर विधानसभा आणि आता फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकमेकांचा विरोधात उभे ठाकले आहेत. पाहूया यावरचा हा रिपोर्ट या फलटण नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर त्यांचा विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. या दोन्ही निंबाळकरांनी आणि पक्षांनी देखील आपली ताकद पणाला लावली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतली आहे. या प्रचारात रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगत कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा त्यावेळी नक्की करू असा दम देखील दिला होता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास सुरू आहे मात्र या प्रकरणात राजकारण आणून मुद्दाम टार्गेट केलं जात आहे. या प्रकारात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दूरणावय संबंध नसल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर हे शकुनी मामा ची भूमिका बजावत असल्याची टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. या व्हिडिओमध्ये एकूणच दुर्दैवाची बाब म्हणजे ही फलटण नगरपालिका निवडणुकीत ही विकासाचा मुद्द्यावर न होता डॉक्टर महिला आत्महत्या खेळली जाते आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 18, 2025 10:21:40
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली होती. संबंधित मेलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी देत दुपारी दोन वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला होता. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ रिकामे करण्यात आले होते तर सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले होता तर आपत्ती व्यवस्थापन विभागासह बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून सखोल तपास करण्यात आला. अखेर पोलिसांनी संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने तपासले. शेवटी कोणतीही आपत्तीजनक वस्तू न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. पोलीस आता सायबर टीमच्या मदतीने ई-मेल करणाऱ्याचा शोध घेत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 18, 2025 10:19:31
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 18, 2025 10:18:40
Jalna, Maharashtra:जालना | ब्रेकिंग जालना महायुतीसाठी बावनकुळेंची मध्यस्थी जालना महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी असे वरिष्ठांकडून स्पष्ट आदेश जालन्यात भाजपचं एक पाऊल मागे आदेशाचे पालन करत भाजपने बोलावली महायुतीची बैठक अर्जुन खोतकरांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन अँकर- जालन्यात महायुती व्हावी यासाठी भाजप नेते मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी मध्यस्थी केलीये. जालना महापालिका निवडणुकीत शिवसेना विरोधात भाजप आमने- सामने आल्याचं चित्र बघायला मिळत होत.. मात्र राज्यात महायुती होत असून जालन्यातही महायुती म्हणून निवडणुका लढवाव्यात असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळं भाजपने जालन्यात एक पाऊस मागे घेत महायुतीची पहिली बैठक बोलावली असून आज सायंकाळी ही बैठक होत आहे..भाजपचे जालना शहर महानगर प्रमुख भास्कर दानवेंच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 18, 2025 10:06:23
Wardha, Maharashtra:- देवळीत लाडकी बायको योजना, कार्यकर्त्यांना सोडून नेत्यांनी घरीच घेतली उमेदवारी - माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रचार सभेत टिका - भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा तडस यांच्यावर टिका - कार्यकर्त्यांना सोडून स्वतःच्या घरीच रामदास तडस यांनी घेतली भाजपाची उमेदवारी, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या ठाकूर यांची टिका - देवळीत आयोजित सभा प्रचारार्थ यशोमती ठाकूर यांनी टीका केली, भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांची लढत थांबवताना मुखपाठकांची बैठक - देवळीत भाजप व काँग्रेसमध्ये लढत असून अपक्ष उमेदवार सुद्धा आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे - निवडणूक ठाकूर यांच्या टीकेची पाळेमुळे चुरशीची ठरणार असं सांगितलं जातं - यशोमती ठाकूर, माजी मंत्री
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 18, 2025 10:04:50
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिका नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात अँकर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. चंद्रपूर मनपासाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आमदार चैनसुख संचेती या मुलाखती घेत आहे. चंद्रपूर शहरातील एका हॉटेलमध्ये या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी जवळजवळ 700 इच्छुक उमेदवार मुलाखती देणार आहेत. प्रत्यक्ष तिकीटवाटप हे निवडून येण्याच्या निकषावर केल्या जाणार असून कुठल्याही गटा-तटाच्या राजकारणात आम्ही पडणार नाही असं म्हणत आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार या पक्षांतर्गत संघर्षाचा मुलाखतींवर परिणाम होणार नाही असा दावा निवडणूक प्रभारी चैनसुख संचेती यांनी केला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top