Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

स्वाभिमानी ने सांगली की साखर मिलों के खिलाफ FRP 3751 रुपये की मांग शुरू की

SMSarfaraj Musa
Nov 01, 2025 01:31:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्वाभिमानीची साखर कारखान्यांवर धडक सुरू... 10 नोव्हेंबर पर्यंत एफआरपी जाहीर करावा यासाठी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर धडक देण्यात येत आहे. 3751 रुपये जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. या मागणीचा निवेदन साखर कारखान्यांना देण्यात येत असून विटा येथील उदगीरी शुगर कारखान्यावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसरात दणाणून सोडला, तसेच ऊसाला प्रति टन 3751 रुपये दर द्यावा अन्यथा धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी उदगिरी कारखान्याला निवेदनाद्वारे दिला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 01, 2025 06:32:59
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... देवणीतील पिसाळलेल्या लांडग्याचा अखेर अंत.... बारा लोकांवर जीवघेणा हल्ला करणारा लांडगा लोकांच्या मारहाणीत पडला मृत्यूमुखी .... AC ::- गेल्या दो दिवसांपासून देवणी परिसरात दहशत माजवणाऱ्या पिसाळलेल्या लांडग्याचा अखेर नागरिकांनी केलेल्या पाठलागानंतर मृत्यू झाला आहे. या लांडग्याने काल संध्याकाळी नऊ आणि आज सकाळी तीन अशा एकूण बारा जणांवर जीवघेणे हल्ले केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर उदगीर येथे उपचार सुरू आहेत. सलग हल्ल्यांमुळे देवणी आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी आणखी तीन नागरिकांवर हल्ला झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी लांडग्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. देवणी शिवारात लांडगा असल्याचे लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी लाठ्या-काठ्यांनी त्याचा पाठलाग करून हल्ला चढवला. सर्व बाजूंनी घेराव घालून झालेल्या प्रखर मारहाणीत लांडग्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त होत असला तरी, वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. नागरिकांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 01, 2025 06:31:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:निवडणुकीच्या काळात अनेक बाबी पुढे येताय त्यात बोगस मतदार यादी विषय पुढं आलाय , आज हा मोर्चा निघतोय, याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, मोर्चाला आमचा विरोध नाही, बोगस याद्या आहेत हे सर्वांना मान्य आहे बोगस नाव थांबली पाहिजे हे सगळ्यांचे मत आहे... आणि त्यांना थोडी स्टंट बाजी तर करावी लागेल हे निवडणूक आयोगाला भेटले होते आधी त्याच काय, मोर्चा च्या माध्यमातून यांचा प्रचार आणि शक्ती प्रदर्शन सुरुय यांनी फक्त मुंबईला वेठीस धरू नये... यादीतील घोळ क्लिअर करा ही आमची ही मागणी आहे यांनी फक्त लोकांना वेठीस धरू नये राज साहेबांची एन्ट्री महाविकासात आघाडीत फूट टाकणारी आहे, काँग्रेस यांच्या सोबत कधीच जाणार नाहीव महाविकास आघाडीत भाकरीचे किती तुकडे पडायचे असा प्रश्न आहे... आणि निवडणूक कधी घ्यायचा निवडणूक आयोगाला तर विचारा नाही घेतल्या तरी म्हणतात , घेतल्या तरी म्हणतात काय करावे... चित भी मेरी पट भी मेरी कसे चालेल बोगस यादी तपासणी साठी आमच्या जिल्ह्यात कमिटी केल्या आहेत, तक्रार आली तर सर्वे करतात आणि आढळले तर नाव कमी करतात... कुणाला तक्रार असेल तर नक्की करावे... निवडणूक आयोग कुणाच्या चालण्या बोलण्यावर चालत नाही.. आरोप होत असतात ते स्वायत्त आहे On अजित पवार अजित दादा थोडं स्पष्ट बोलतात टीका नाही बॅलन्स भूमिका घेतात राज्य पुढं जायला त्यांचे प्रयत्न असतात, त्यांची भूमिका  आणि त्यांच्या बोलण्यात अर्थ असेलही,  आमचे त्यावर  काही मत नाही On चंद्रकांत पाटील... बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना तो आमच्याकडे आहे चंद्रकांत दादा चे मत त्यांचं संशोधन असेल इकडे तिकडे डोकावू नये, विनंतो आहे On येणारी निवडणुक निवडणूक येणार पक्षाने जाणीव आहे, निवडणूक लवकर जाहीर होतील... उद्धव मराठवाडा दौरा।।। उद्धव येताय चांगले आहे , 3 दिवसात किती लोकांसोबत बोलतात पाहू त्यांचा दौरा  कसा असतो आणखी आम्हालाही कळले नाही,   2 मिनिटे शेतकरी 10 मिनिटे कार्यकर्ते असे असते, त्यांनी आलं काय न गेलं काय त्यांचा  पक्ष उरला नाही तर संवाद कुणासोबत साधणार...
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 01, 2025 05:47:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : हिंदकेसरी स्पर्धेच्या तोंडावर महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख याला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वडिलांचा आरोप. महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला पंजाब मध्ये शस्त्र तस्करी प्रकरणी अटक. सिकंदरला जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचा वडिलांचा आरोप. लवकरच हिंदकेसरी स्पर्धा होणार आहे त्यामुळे त्या स्पर्धेत खेळू नये म्हणून सिकंदरला खोट्या गुन्ह्यात अडकवले. सिकंदर किंवा आमच्या कुटुंबावर यापूर्वी कधीही गुन्हा दाखल नाही, आम्ही गरीब माणसं आहोत. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी पंजाब सरकारला याबाबत सांगावे. सिकंदर ने कुस्तीतील सर्व पदक पटकावले आहेत त्याला ऑलम्पिक मध्ये भारताला यश मिळवून द्यायचे आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 01, 2025 05:46:52
Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ बाईट मुद्दे ऑन मोर्चा आजचा मोर्चा हा इंडिया आघाडीचा आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे काय झालं हे पाहिलं आहे सत्याचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला जातो पण ज्या वेळी मतदारांची कच्ची यादी तयार होते त्यावेळी ही बाब निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं पण ती संधी विरोधकांनी गमावली होती सदोष मतदार यादीवरून निवडणुका घेणं याला आमचा देखील विरोध आहे आता निवडणूक घेतली तर विरोधकांना पराभव दिसतो त्यामुळेच निवडणुका पुढे धकलण्याची मागणी केली जाते प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या होत्या त्यावेळी व्हीव्हीपॅट वर शंका नव्हती मनसे मुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कधी जुळणार नाही ऑन अजित पवार शेतकरी कर्जमाफी जे खरोखर अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे मात्र वारंवार कर्जमाफी होऊन देखील अनेकजण पुन्हा कर्ज काढतात आणि परतफेड करत नाही त्यांना कर्जमाफी देऊ नये ज्यांना खरंच गरज आहेत त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे सर्वच शेतकरी सक्षम केले पाहिजेत, त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे ऑन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य त्या ठिकाणी युती होत नाही त्याठिकाणी स्वतंत्र लढणार मात्र एकमेकांवर टीका केली जाणार नाही, महायुतीचा झेंडा फडकवला जाईल ऑन चंद्रकांत दादा पाटील पदवीधर निवडणूक अजून पदवीधरची निवडणूक दीड वर्षे आहेत, त्यावेळी आताच चंद्रकांतदादा चर्चा करतात हे कळत नाही आम्ही शरद लाड कसे पराभूत होणार हे देवेंद्र फडणवीस यांना पटवून देऊ अरुण लाड यांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की पुढच्या वेळी भैया माने यांना उमेदवारी देऊ चंद्रकांतदादा भेटल्यानंतर आम्ही विचारू की आताच उमेदवारी घोषित करण्याचं कारण काय ऑन स्थानिक स्वराज्य निवडणुका वेळापत्रक आम्ही निवडणुकीच्या मूडमध्ये गेलो आहोत ज्या दिवशी निवडणूक आयोग घोषित करेल त्यावेळी पासून प्रकिया सुरू होईल ऑन संजय राऊत आजारपण संजय राऊत हे आजारी पडलेत असं वाचल्यानंतर धक्का बसला ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी देवाकडे प्रार्थना लवकर बरे होऊन रोज सकाळी 9 वाजता भोंगा सुरू व्हावा ऑन सुपेकर गट माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाभुळकर आमच्या पक्षात येण्यासंदर्भातली विनंती केली आहे नंदाताई आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा आम्हाला आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 01, 2025 05:34:48
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : निवडणुकीवेळी घोळ झाल्यास बुथवरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार - शरद कोळी निवडणुकीवेळी बोगस मतदान किंवा मतपेटीचा घोळ झाला तर संबंधित बूथवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींचे वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाने तात्काळ उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या मागण्या मान्य कराव्यात भाजप केवळ मतदार याद्यांचा घोळ करूनच सत्ता में आता है, पर जो मतदान करण्यासाठी बोगस मतदार येईल उनका भी हम हाथ पाँव तोड़ेंगे जो मतदान करके लेने वाला अधिकारी उसका भी हम हाथ पैर तोड़ेंगे शिवसेना ठाकरे गट के उपनेते शरद कोळी के वادग्रस्त विधान बायट : शरद कोळी, उपनेते, ठाकरे गट
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 01, 2025 05:33:31
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा या चार नगर परिषदांसह मालेगाव नगरपंचायत अशा पाच ठिकाणच्या एकूण ६८ प्रभागांमध्ये सदस्य पदासाठी निवडणुका होणार आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुधारित व अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे.यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांवर ४,९३० नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते. हे सर्व आक्षेप निकाली काढल्यानंतर सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे.८ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या.काही मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात दिसत होती, तर काहींची नावे संपूर्णपणे वगळली गेली होती.यामुळे मतदार आणि संभाव्य उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.आता सुधारित व अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे औपचारिक नियोजन वेगाने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.इच्छुक उमेदवार सुद्धा मतदाराच्या गाठीभेटी घेतं आहेत.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 01, 2025 05:18:38
Washim, Maharashtra:वाशिम: अणकर: वाशिम: ४३,७६९ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३२ कोटी १७ लाख ३५ हजार १६३ रुपये जमा झाले आहेत. मात्र आणखी ११,८३० शेतकऱ्यांना मदत मिळणं बाकी असून त्यांचे बँक खाते क्रमांक, संमतीपत्रासह अन्य तपशील अपूर्ण असल्यानं या शेतकऱ्यांना मदत देता आली नाही. या तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जुलै ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने पाठविलेल्या अहवालावरून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मंजूर केली आहे. दरम्यान, मदत न मिळालेल्या ११,८३० शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्याचे तपशिल सादर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेय.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 01, 2025 05:17:58
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 01, 2025 05:17:39
Akola, Maharashtra:मोठा गाजावाज्यानंतर शासनाने हमीभावातील शेतमाल खरेदीला सुरुवात केली असली, तरी खरेदी प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्यातच म्हणजे ऑनलाइन नोंदणीत शेतकऱ्यांची प्रचंड परवड होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. खरेदी प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशीही केंद्रांचा कारभार सुरळीत न सुरू झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकोल्यातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत थांबूनही नोंदणी पूर्ण करता आली नाही. शासकीय पोर्टल सतत स्लो असल्याने शेतकरी वैतागले असून, शासनाच्या नियोजनक्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, नोंदणी फक्त खरेदी केंद्रांवर न ठेवता सेतु केंद्रांवरही (CSC / सेतू सुविधा केंद्रे) सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ आणि त्रास कमी होईल. सरकार म्हणतं शेतकऱ्यांसाठी योजना, पर अंमलबजावणीच नीट नाही तर फायदा कसला? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top