Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

हमीद भाव खऱीदी में किसानों को ऑनलाइन पंजीकरण में भारी परेशानी

JJJAYESH JAGAD
Nov 01, 2025 05:17:39
Akola, Maharashtra
मोठा गाजावाज्यानंतर शासनाने हमीभावातील शेतमाल खरेदीला सुरुवात केली असली, तरी खरेदी प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्यातच म्हणजे ऑनलाइन नोंदणीत शेतकऱ्यांची प्रचंड परवड होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. खरेदी प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशीही केंद्रांचा कारभार सुरळीत न सुरू झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकोल्यातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत थांबूनही नोंदणी पूर्ण करता आली नाही. शासकीय पोर्टल सतत स्लो असल्याने शेतकरी वैतागले असून, शासनाच्या नियोजनक्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, नोंदणी फक्त खरेदी केंद्रांवर न ठेवता सेतु केंद्रांवरही (CSC / सेतू सुविधा केंद्रे) सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा वेळ आणि त्रास कमी होईल. सरकार म्हणतं शेतकऱ्यांसाठी योजना, पर अंमलबजावणीच नीट नाही तर फायदा कसला? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Nov 01, 2025 09:21:03
Pandharpur, Maharashtra:कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देशी विदेशी फुलांनी सजलं आहे. रविवारी कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपूर मध्ये साजरा होत आहे त्यासाठी जवळपास पाच लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत उद्या पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे आणि या सोहळ्यासाठी विठुरायाच संपूर्ण मंदिर पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी विविध प्रकारच्या 30 फुलं आणि पानांनी सजवलेला आहे जवळपास पाच टन फुलांचा वापर यासाठी करण्यात आलेला आहे त्यामुळे कार्तिकी साठी आलेल्या भाविकांना मंदिराचं पुष्परुप पाहता येणार आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 01, 2025 09:01:22
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेतील ब्रह्मपुरी शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एकाच कार्यक्रमात सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पट्टेवाटप, प्रमाणपत्र वाटप, स्वामीत्व योजना लाभ वितरण, कृषी यांत्रिकीकरण लाभ वितरण असे अनेक लाभ कार्यक्रमात देण्यात आले. महसूलमंत्र्यांनी कार्यक्रमात महत्वपूर्ण घोषणा केल्या. 15-10-2024 च्या पूर्वी घेतलेले सर्व घरं कायदेशीर करणार असल्याचे सांगितले. Deem regularisation योजना राबविणार असल्याचे सांगत यासाठी कायदा आणत असल्याचे म्हटले. दरम्यान: प्रादेशिक आराखड्यात-रिजनल प्लॅन मध्ये दाखवलेल्या रहिवासी क्षेत्रात प्लॉट घ्यायचा असेल तर पुन्हा NA करावे लागते, आता ते संपवत असल्याचे सांगत यासाठी सनद रक्कम लागणार नाही, ती जिल्हा निधीतून देण्याची घोषणा त्यांनी केली.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 01, 2025 09:01:01
Amravati, Maharashtra:आज मुंबईत महाविकास आघाडीचा मतदार सूची विरोधात भव्य मोर्चा निघणार आहे यावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेमध्ये जेव्हा आमचा पराभव झाला तेव्हा तुम्ही म्हणत होती की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभाेत जेव्हा तुमचा पराभव झाला तेव्हा तुम्ही म्हणता की लोकशाहीची हत्या झाली मतांची चोरी झाली. राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यापूर्वी म्हणत होते की मज्जित वरचे भोंगे काढा. हातात भगवा घ्या, हनुमान चालीसा लावा, आता तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसल्यावर इतर समाजाचे लोक आणि आम्ही भाऊ भाऊ आहोत. पहिले तुमचे काय विचार होते? आणि आता काय विचार आहे? फक्त एकच विचार आहे की दुकाने उघडे राहावेत, यासाठी तुम्ही दोघे भाऊ एकत्र आले आहात. भाजप नेत्या नवनीत राणा यांचा ठाकरे बांधूंवर जोरदार हल्ला, आता तुम्ही मत मागण्यासाठी रस्त्यावर आले आहात; एक वेळ अशी येईल की उद्धव ठाकरे प्रत्येक घर जाऊन मत मागतील. ठाकरे यांच्या दुकानदारी चालू राहावी यासाठी हा आजचा मोर्चा आहे, त्यांना लोकांची काही देणं घेणं नाही, फक्त त्यांच्या राजकारणाचं दुकान सुरू राहावं याच्यासाठी आजचा मोर्चा आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 01, 2025 08:49:25
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 01, 2025 08:19:57
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 01, 2025 08:19:47
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात छापा टाकत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने तब्बل बारा लाखांचा गांजा जप्त केला आहे. शिरपूर शहर पोलीस यांच्या हद्दीत असलेल्या वाडी सुमन्या पाडा शिवारात शेती पिकांच्या आड मध्ये अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी कापूस व तुर पिकांच्या आड गांज्याची शेती केली जात असल्याच पोलीस कारवाईत समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी मानवी मेंदूला अपायकारक असलेल्या तब्बल सहाशे किलो गांजासह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैधरित्या गांजाची शेती केल्या प्रकरणी जितू शिकाऱ्या पावरा याच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 01, 2025 08:06:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - पदवीधरसाठी चंद्रकांतदादांकडुन शरद लाड यांची उमेदवारी जाहीर,महायुतीत संघर्षाची चिन्हे.. अँकर - पुणे पदवीधर मतदार संघातल्या आगामी निवडणुकीसाठी शरद लाड यांच्या उमेदवाराची अनौपचारिक घोषणा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. पलूस या ठिकाणी पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये चंद्रकांत पाटलांनी पदवीधरचे भावी उमेदवार शरद लाड असा उल्लेख करत ताकाला जाऊन, भांड लपवत नाही,अशी भूमिका स्पष्ट केली आहे.मात्र चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा कुस्ती लागण्याची शक्यता आहे.कारण कोल्हापूर मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे युवानेते भैय्या माने यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत,तसे सूतोवाच देखील मुश्रीफांकडून करण्यात आले होते, अशा परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटलांनी नुकतेच भाजपात प्रवेश केलेले पदवीधरचे विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाडे यांचे पुत्र शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा पदवीधर मतदारसंघावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 01, 2025 08:05:53
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 01, 2025 08:05:30
Solapur, Maharashtra:प्रवीण दरेकर, भाजप नेते, के बयान में कहा गया है कि उनकी पार्टी की स्पष्ट भूमिका है कि यदि यादों में चूक हो तो दुरुस्ती होगी और यह प्रक्रिया जारी रहेगी। परन्तु उनके आरोप हैं कि विपक्षी नेताओं के पीछे भावनाएं मतदार यादी नहीं बल्कि असफलता हैं। मतदान प्रक्रिया और EVM पर भी सवाल उठे हैं, और आत्म-चिंतन की आवश्यकता है। दुश्प्रचार की बजाय काम किया जाना चाहिए; एकता की बात करते हैं पर वास्तविक स्थिति में सभी के विचार भिन्न हैं। कहा गया कि मारकर मिसळकर लाए हुए विरोधी कमजोर हैं। स्थानीय क्षेत्रों में आम जनता प्रतिदिन यात्रा करती है और लोगों की समस्याओं को समझना जरूरी है। सत्य को स्थाई मानना चाहिए, असत्य की समर्थक नहीं करनी चाहिए। भाई जगताप ने भूमिका स्पष्ट की और प्रदेशाध्यक्ष की भूमिका अलग है। विपक्ष अभी भ्रमित स्थिति में है। पुलिस निर्धारित करेंगी आगे क्या होता है, फिर कार्रवाई होगी।
0
comment0
Report
Advertisement
Back to top