Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

संजय काका पाटील ने किसान को एक लाख का बैल भेट दिया, वीडियो वायरल

SMSarfaraj Musa
Oct 22, 2025 01:05:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - बैलाच्या जोडीला औताला बांधून युवा शेतकरी बैलगाडी घेऊन आंदोलनात सहभागी झाला,मग माजी खासदारांनी थेट लाखाचा बैल भेट म्हणून दिला... अँकर - सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क एक लाखाचा बैल भेट म्हणून दिला आहे. सात दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संजयकाका पाटील यांनी तासगाव मध्ये चक्काजाम आंदोलन घेतलं होतं,या आंदोलनामध्ये संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मग तासगाव तालुक्यातल्या निमणी येथील एका तरुण युवा शेतकरी श्याम राजमाने हा आपल्या एका बैलासह औताला स्वतः बांधून बैलगाडी घेऊन चक्क पाच किलोमीटर अनवाणी पायाने चालत आला होता.त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला,माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या पर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचला,मग आपल्या आंदोलनात युवा शेतकऱ्या़शा पद्धतीने सहभागी झाल्याने भावुक झालेल्या संजयकाका पाटील यांनी,त्या युवा शेतकऱ्याची विचारपूस केली,त्यावेळी त्याच्याकडे एकच बैल असल्याचं समोर आलं,त्यानंतर संजयकाका पाटिलांनी श्याम राजमाने या युवा शेतकऱ्याला थेट एक लाखाचा बैल खरेदी करून बैल भेट म्हणुन दिला आहे.संजयकाका पाटील यांची चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट शाम राजमाने यांच्या दारात नेऊन बैल बांधत दिवाळी निमित्ताने ही भेट दिली आहे.या घटनाचे तालुक्यात सध्या चांगलीचं चर्चा रंगली आहे.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Oct 22, 2025 04:01:54
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याच्या दहशत.... बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू... आठवडाभरातील बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना... शिरूर तालुक्यातील जांबुत येथे 70 वर्षीय महिलेवरती बिबट्याने हल्ला करत केलं ठार... सकाळी सहा वाजता हल्ला करत महिलेला नेल ऊसाच्या शेतात ओढत, भागुबाई जाधव, असं मृत महिलेचं नाव... आठवडाभरपूर्वी याच घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती झाला होता पाच वर्षे चिमुकलीचा बिबट्या च्या हल्ल्यात मृत्यू... हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट... आठवडाभरात याच परिसरात वन विभागाने तीन बिबट्यांना जेरबंद केल्यानंतरही महिलेचा मृत्यूनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट...अद्यापही या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 03:47:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नैऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ दिवस राज्यभरात , मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अवकळी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एक ठार झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात सायंकाळी सरी कोसळल्या. पैठण, कन्नड, सिल्लोड या तालुक्यांत पावसामुळे कपाशी व मका या पिकांना फटका बसण्याची भीती आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 03:45:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऐन दिवाळीच्या सणाच्या दिवशी जुन्या वादातून एका २७ वर्षांच्या तरुणाचा भररस्त्यात दोघांनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना मध्य मुकुंदवाडी परिसरात घडली. विपुल मधुकर चाबुकस्वार असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आशिष गौतम चौथमल सुबोध भास्कर देहाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विपुलने रामनगर येथे फटाक्यांचे दुकान सुरू केले होते. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो दुकान बंद करून मित्र अजय वाघसोबत गप्पा मारत बसला होता. त्यानंतर सिगारेटसाठी मुकुंदवाडीच्या दिशेने निघाल्यावर आरोपी सुबोध आणि आशिष चौथमल तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून विपुल यास चाकूने भोकसकले आणि दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 03:34:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्या तील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकारने ३१७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, आतापर्यंत केवळ ९०० कोटी रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. उर्वरित रक्कम जमा होण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ५ हजारांहून अधिक जनावरे दगावली, 100 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला, हजारो घरांची पडझड झाली, ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंत १७ अध्यादेशांद्वारे सरकारने ३,१७५ कोटींची मदत मंजूर केली. मात्र, वाटपाचा वेग मंद आहे. महसूल विभागानुसार, उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. ई-केवायसीमुळेही वाटपात अडथळा येत आहे. फार्मर आयडी आहे आणि पूर्वी ई-केवायसी केली आहे, अशा शेतकऱ्यांना सूट देण्यात आली आहे...
3
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 22, 2025 03:32:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - भाजपा हा शिस्तीचाच पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करू - भाजपा शहराध्यक्ष काल सोलापूरात आ. सुभाष देशमुख समर्थकांच्या वतीने माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाबाबत मोठे नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळाले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या भाजप हा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली असून मोठ्या नेत्यांचे प्रवेश हे प्रदेश पातळीवर होत असतात तसेच भाजपा हा शिस्तीचाच पक्ष आहे असा आवर्जून उल्लेख त्यांनी केलाय. यासोबतच कार्यकर्त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू असे देखील भाजपा शहराध्यक्षांनी म्हटले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 22, 2025 03:30:18
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 03:21:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्य सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 'उर्वरित निधी लाभार्थी शेतकऱ्यांना सहा आठवड्यांत वितरित करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत... या योजनेत पात्र असूनही निधीअभावी वंचित राहिलेल्या ६ लाख शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिला आहे. शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे यांनी केलेल्या मूळ याचिकेवर आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अॅड. अजित काळे यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने नियोजन व वित्त विभागाने सहा आठवड्यांत निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे ५८९५ कोटी रुपये निधी पात्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करावा लागणार आहे.. त्यामुळं आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य सरकारला आणखी निधी लागणार आहे...
1
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 03:20:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह राज्यात जानेवारी २०२६ अखेरपर्यंत महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून, प्रारूप मतदार याद्या ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रभागनिहाय पथकेही नियुक्त केली आहेत. दिवाळी संपताच पथक कामाला प्रारंभ करू शकतात. शहरात २९ प्रभाग तयार केले आहेत. एका प्रभागातून ४ सदस्य निवडून येतील. प्रभाग क्र. २९ मधून ३ सदस्य विजयी होतील. ११५ नगरसेवकांसाठी ही प्रभाग रचना आहे. महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार याद्या आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 22, 2025 03:19:48
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 22, 2025 03:19:06
Ambernath, Maharashtra:बदलापूरात आढळला अत्यंत दुर्मिळ मलबार पिट वायपर प्रजातीचा साप. सर्पमित्रांनी केली त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका. बदलापूर शहरातील आदर्श विद्यामंदिर शाळेच्या बाहेर मलबार चापडा (मलबार पिट वायपर) प्रजातीचा अत्यंत दुर्मिळ विषारी साप आढळून आला. या प्रजातीच्या सापांचे वास्तव्य फक्त आंबोली घाट परिसरातील उंच डोंगरावर थंड हवेच्या ठिकाणी असते, त्यामुळे हा साप बदलापूर शहरात कसा आला याबाबत वनाधिकारी तपास करीत आहेत. हा दुर्मिळ साप एखाद्या वाहनासोबत आल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. अत्यंत दुर्मिळ आणि वेगळ्या रंगाच्या या सापास सर्पमित्र आणि वनविभाग यांचे मदतीने वाचवण्यात यश आले असून सदर दुर्मिळ सपास त्याच्या मूळ अधिवास असलेल्या आंबोली घाट परिसरात वनाधिकारी आणि सर्पमित्र यांच्या मदतीने सुखरूप सोडण्यात आलेले आहे.
1
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top