Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

पलूस नगर परिषद में कांग्रेस की सत्ता कायम, विश्वजीत कदम की जोरदार जीत

SMSarfaraj Musa
Dec 21, 2025 10:46:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - पलूस नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता कायम, विश्वजीत कदम यांनी राखला गड. संगलीच्या पलूस नगरपरिषदेवर काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे. आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचा दणदणीतत विजय मिळवला आहे. 23 पैकी 15 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून आले आहेत काँग्रेसच्या या दणदणीत विजयानंतर आमदार विश्वजीत कदम हेलिकॅप्टरने पलूस मध्ये दाखल झाले,त्या नंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे, काँग्रेस आघाडी,भाजपा,राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अशी चौरंगी लढत या ठिकाणी झाली होती. ज्यामध्ये काँग्रेसने पलूस नगरपरिषदेवर आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे,तर काँग्रेसचा हा विजय स्वर्गीय आणि पलूसच्या स्थानिक नेतृत्वामुळे मिळाल्याची भावना विश्वजीत कदम यांनी,यावेळी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 21, 2025 12:05:44
Akola, Maharashtra:अकोल्यातील अकोट नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे अकोट नगरपरिषद निवडणुकीत जवळपास सर्वच महिला उमेदवारांना राजकीय वारसा लाभलेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी भाजपचे मित्र पक्ष एकनाथ शिंदे गटाच्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ.प ) उमेदवार सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभी होत्या.या निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोटमध्ये ही निवडणुक आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्यांचे खंदे समर्थक तथा जिल्हाध्यक्ष बद्रुजमा यांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः सभा घेतली होती, मात्र त्यांच्या गटाला केवळ दोन नगरसेवकांपुरतेच समाधान मानावे लागले. दुसरीकडे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र तिन्ही प्रमुख ठिकाणी भाजपने बाजी मारल्याने शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे.अकोटच्या जनतेने भाजपच्या विकासाच्या कामांवर विश्वास टाकला आहे.तर भाजपने हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला समर्पित केला आहे
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 21, 2025 11:35:59
Bhandara, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्यामध्ये राज्य सरकार ज्याचे असतं त्याच्यात अस्तित्व पाहायला मिळतं. तेलंगणाला आम्ही एक साईड आलो आहे. इथे तर त्यांना तितका निकाल घेता आला नाही. तेलंगणात आम्ही यापेक्षा चांगला निकाल घेतला. देशातल्या अनेक ठिकाणी काँग्रेस पुढे आहे इथे यांची सत्ता असल्यामुळे यांचा वर्चस्व राहतोच. मी आधीही म्हणालो होतो की सरकार ज्यांचं असतं त्यांना लहान मोठे प्रलोभना देऊन आम्ही विकास करू शकतो असे सांगतात तशा प्रलोभनात लोक जातात. एखादा मुद्दा ठेवतात पण त्याच्या मागे जी आर्थिक मानसिकता बीजेपी ची आहे. आणि भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशाची उधळपट्टी ज्याप्रमाणे होते. एक एक मत दहा हजार रुपयांनी विकत घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. तरीही लोकांनी एक प्रकारचे त्यांना उत्तर दिलं आहे. आम्ही तुम्हाला असं प्रलोभन देणार नाही. लोकांनी उत्तर दिलं आम्ही याचा आत्मचिंतन करू. नगरपालिकेच्या सदस्यांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी पुढे आहो. नगराध्यक्षांच्या उमेदवारामध्ये आमची पीछेहाट झाली आहे. वोट ऑफ परसेंटेज जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने जास्त आहे. निवडणुकीमध्ये सत्ता आणि सत्तांतून पैसा आणि पैशातून सत्ता हे बीजेपी चे नवीन धोरण आहे त्याच्यामध्ये अनेक लोक हे प्रलोभन घेतात आणि मग पाच वर्ष महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आम्ही आत्मचिंतन करू. गोंदिया मध्ये काँग्रेस चार पैकी तीन जागेवर आली आहे. त्यामुळे जे काही भंडारा- गोंदियाचा निकाल आहे. मी सांगितलं होतं 80 टक्के काँग्रेस येईल. तर आमचे सदस्य जास्त आहेत माझा अंदाज खरा ठरला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 21, 2025 11:31:46
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिकेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. भाजपचे उमेदवार चिंतन पटेल हे तब्बल 16 हजार 959 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आमदार अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली, राज्यात सर्वाधिक मताधिक्याने चिंतन पटेल निवडल्याची माहिती समोर येत आहे. चिंतन पटेल यांनी 16,959 मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकलेली आहे. एकदारीत राज्य सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आले आहेत. त्यांनी या विजयाचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे शिरपूर शहराचा विकास वेगाने सुरू राहील आणि शिरपूर शहराचा लौकिक ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं निर्वाचित नगराध्यक्ष चिंतन पटेल यांनी सांगितला आहे. शिरपूर नगरपालिकेमध्ये 32 पैकी 31 जागांवरती भाजप मेळावा विजय मिळवला आहे तर एका जागेवरती एमआयएम ने विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत रंगेल असा दिसून येत होत. मात्र निकालांमध्ये ही लढत एकतर्फी राहिल्याच दिसून आल आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 21, 2025 11:31:25
Satara, Maharashtra:सातारा - महाराष्ट्राच्या राजकारणात निर्भीड आणि संघर्षशील नेतृत्वाची ओळख असलेल्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री, खासदार आणि आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या पार्थिवावर सातारारोड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा जिल्हा पोलीस दलाने बंदुकीच्या हवेत फेऱ्या झाडून मानवंदना दिली. मुंबईतील माहीम येथे त्यांच्या निधन झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार सातारारोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. सकाळपासून जिल्हा आणि राज्यभरातून आलेल्या मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून निघालेल्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर उसळला होता. पाडळी स्टेशन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. मंत्री, आमदार, खासदार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. “अमर रहे… ताईसाहेब अमर रहे”च्या घोषणांत महाराष्ट्राच्या रणरागिणीला भावपूर्ण अखेरचा निरोप देण्यात आला.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 21, 2025 11:03:57
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले में भाजपा की बड़ी पीछेहट हो गई है; 11 नगरपरिषदों में से कांग्रेस ने 7 जगहों पर जीत हासिल की है, एक जगह निर्दलीय जीता और भद्रावती में शिवसेना SHINDE गट को सफलता मिली। भाजपा मात्र 2 नगरपरिषदों में जीत दर्ज कर संतुष्ट रही। कांग्रेस के शीर्ष नेतृत्व ने स्थानीय नेतृत्व को मजबूत किया, जबकि भाजपा को मंत्रिपद नहीं मिलने से बड़ा नुकसान हुआ। चंद्रपूर जिले की नगरपरिषद-नगरपंचायती के परिणाम क्रमशः बल्लारपूर (कांग्रेसी उम्मीदवार/sao. अल्का वाढई) अग्रणी, वरोरा (कांग्रेस: आर्चना ठाकरे विजयी), मूल नगराध्यक्ष (कांग्रेस), राजुरा (अरुण धोटे, कांग्रेस विजयी), गडचांदूर (निलेश ताजने, अपक्ष विजयी), नागभीड़ (कांग्रेस), भद्रावती (शिंदे गट: प्रफुल चटकी विजयी), घुघूस (कांग्रेस), Chimur (भाजपा: गीता लिंगायत विजयी), ब्रह्मपुरी (कांग्रेस: योगेश मीसार विजयी) और भिसी (भाजपा विजयी, अतुल पारवे) आदि के परिणाम स्पष्ट रूप से सामने आए। इस परिणाम ने राजनैतिक राजनीति के परिदृश्य को बदल दिया है और राज्य-स्तर पर भाजपा की स्थिति को चुनौती दी है। कांग्रेस नेताओं ने सत्ता में सत्त-शक्ति के दुरुपयोग के आरोपों के बीच भी भरोसा जताया कि जनता ने भाजपा को नकार कर कांग्रेस के पक्ष में फैसला किया है।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 21, 2025 11:02:00
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जत नगरपरिषदेमध्ये सत्तांतर, काँग्रेसचा पराभव करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगरपरिषदेवर फडकवला भाजपाचा झेंडा.. सांगलीच्या जत नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह दहा जागांवर विजय मिळवला आहे.भाजपाचे रवींद्र आरळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.काँग्रेस आघाडी,भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट,अशी चौरंगी लढत झाली होती.24 पैकी 10 भाजपाला, 9 काँग्रेसला , राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन आणि अपक्ष एक अश्या जागा मिळाल्या exist.काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखालील असणारी जत नगर परिषदेमधील सत्ता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढून घेतली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 21, 2025 10:50:03
Khed, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेवर शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ यांच्या 12 नगरसेवक विजयी झालेत. हि निवडणूक पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी असल्याची भावना अतुल देशमुख यांनी व्यक्त करत जनतेने टाकलेली जबाबदारी पुढील काळात यशस्वीपणे पार पाडणार असल्याचा विश्वास मंगेश गुंडाळ यांनी दिलाय. राजगुरूनगर नगरपरिषद - अंतिम निकाल. नगराध्यक्ष: मंगेश गुंडाळ - शिंदे शिवसेना. नगरसेवक बलाबल: शिंदे शिवसेना - 11, भाजप - 03, अजित पवार राष्ट्रवादी - 05, ठाकरे सेना - 00, काँग्रेस - 00, अपक्ष - 02. एकूण नगरसेवक - 21 + नगराध्यक्ष. प्रतिनिधी Hemant Chapude
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 21, 2025 10:49:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या बार्शी नगरपालिकेवर फुलले कमळ, विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का - सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या बार्शी नगरपालिकेवर फुलले कमळ, विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का - माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी नगरपालिकाेत भाजपाला मोठे यश - विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता मात्र बाजार समिती निवडणूक आणि नगरपालिकाेमध्ये ती कसर आम्ही भरून काढली - या तालुक्यातील आणि शहरातील जनतेचे आम्ही मनापासून आभार मानतो - रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित - सहापैकी सहा जिल्हापरिषद आणि 12 पैकी 12 पंचायत समित्या निवडून आणण्याचे आम्ही संकल्प करत आहोत बाईट - राजेंद्र राऊत ( माजी. आमदार तथा भाजपा नेते )
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 21, 2025 10:49:37
Manchar, Maharashtra:मंचर/पुणे मंचर नगर पंचायतीमध्ये शिंदे शिवसेनेच्या राजश्री गांजाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असून मंचरच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान राजश्री गांजाळे यांनी मिळविला आहे. मंचर मध्ये राष्ट्रवादी-भाजप युती, शिंदे शिवसेना व sp राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेना आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. तर भाजप नाराज गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांनीही येथे चांगली झुंज दिली आहे. नगराध्यक्ष: राजश्री गांजाळे, शिवसेना शिंदे नगरसेवक बलाबल शिंदे शिवसेना - 03 भाजप - 00 अजित पवार राष्ट्रवादी - 09 ठाकरे सेना - 01 शरद पवार राष्ट्रवादी - 01 काँग्रेस - 00 अपक्ष - 03 एकूण नगरसेवक - 17 + नगराध्यक्ष प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 21, 2025 10:49:25
Chakan, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या जुन्नर राजगुरुनगर चाकण नगर परिषदे सह मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला असून या ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाने सर्व ठिकाणी विजय मिळवत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सह भाजपला जोरदार धक्का दिलाय, स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या विचारांनी पुढे जाऊन चाकण शहराचा विकास करू असं चाकण नगरपरिषदच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्षा मनिषा गोरे यांनी म्हटलंय. चाकण नगरपरिषद - अंतिम निकाल: नगराध्यक्ष: श्रीमती मनिषा सुरेश गोरे - शिवसेना धनुष्य (शिंदे शिवसेना उमेदवारास ठाकरे सेना चा पाठिंबा). नगरसेवक बलाबल: शिंदे शिवसेना - 13; भाजप - 00; अजित पवार राष्ट्रवादी - 10; ठाकरे सेना - 1; काँग्रेस - 00; अपक्ष - 1. एकूण नगरसेवक - 25 + नगराध्यक्ष.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 21, 2025 10:49:15
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 21, 2025 10:45:48
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या संगमनेर नगरपालीकेवर पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. आमदार सत्यजित तांबे आणी बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर सेवा समीतीला भरघोस यश मिळाले असून 30 पैकी 27 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विधानसभेनंतर सुरू असलेल्या चुकीच्या कामाविरूद्ध जनतेने हा कौल दिला असून विरोधकांना नाकारलं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी झी 24 तासला प्रतिक्रिया देताना म्हणटलंय. संगमनेर सेवा समीतीला राज्यात सर्वाधिक मतांनी मिळालेला विजय म्हणजे जनतेने बाळासाहेब थोरात आणी आमच्या कुटुंबीयावर दाखवलेला विश्वास असून आत्तापर्यंत केलेल्या विकासापेक्षा संगमनेरचा जास्त विकास आम्ही करून दाखवणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी झी 24 तासशी बोलतांना दिलीये. संगमनेरात महायुतीच्या पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभव सगळ्यांचा होतो, आमचाही झाला, मात्र आम्ही खचणार नाही, असे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत संगमनेर तालुक्यात 70 टक्के जागा महायुतीच्या येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top