Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

संजयका पाटलाओं के चक्काजाम से किसानों की कर्जमाफी और पंचनामे की मांग तेज

SMSarfaraj Musa
Oct 14, 2025 05:45:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी खासदार संजयकाका पाटलांचे चक्काजाम आंदोलन सुरू शेतकरी कर्जमुक्ती व सरसकट पंचनामे सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव आणि कवठेमहांकाळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, बैलगाडी, शेळ्या मेढ्यांसह तासगावच्या चौकात चक्काजाम सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे त्याचबरोबर जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून भरपाई मिळावी याचा विविध मागण्यांसाठी संजयकाका पाटलांकडुन आंदोलन करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 14, 2025 10:57:52
Hingoli, Maharashtra:हिंगोली विधानसभेचे १५ वर्षे काँग्रेस कडून आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हिंगोली जिल्ह्यात एकही जागा काँग्रेससाठी सोडून घेतली नव्हती. त्यामुळे निष्ठावंत असलेले भाऊराव पाटील गोरेगावकर नाराज झाले होते. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन विधानसभेची अपक्ष निवडणूक ही लढवली होती. काँग्रेसने माझ्यावरच अन्याय केला तर माझ्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होईल, त्यामुळे आता आपण काँग्रेसला जय महाराष्ट्र करीत असल्याचं भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज मुंबई येथे भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय. हिंगोलीत आजही भाऊराव पाटील गोरेगावकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे काँग्रेसला एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा धक्का मानला जातोय.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 14, 2025 10:52:24
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 14, 2025 10:47:41
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत मतदार यादीवर एकूण 2516 नागरिकांनी आक्षेप घेत हरकती नोंदविले आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदार यादीतील विसंगती तसेच मृत मतदारांची नावे, एका घरातील अनेक प्रभागातील नोंदी तसेच नव्याने झालेल्या संशयास्पद मतदारवाढीमुळे अनेक मतदारांनी निवडणूक विभागाकडे आक्षेप घेत हरकती नोंदवल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायत कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली पाहायचं मिळत आहे. अक्षय व हरकती नोंदवण्याची मुदत प्रशासनाकडून वाढवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवा अशी देखील आवाहन शिंदखेडा नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 14, 2025 10:42:17
Dhule, Maharashtra:शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्यावर भाजीविक्रेत्यांमुळे सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांचा अपघात झाला त्यात त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाला मुख्य रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांमुळे मोठी रहदारी होते त्यामुळे अनेक अपघातदेखील होतात. भाजीविक्रेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओटे देण्यात आले आहेत मात्र त्या ठिकाणी कोणीही भाजी विक्री करत नाही आणि मुख्य रस्त्यावर विक्री करतात; पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ मुख्य रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांना हटवावे आणि रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 14, 2025 10:24:23
Vasai-Virar, Maharashtra:कांग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत भाजपवर आक्रमक # ऑन लखनऊ शिवाजी महाराज पुतळा उत्तर प्रदेश मध्ये भाजपची सत्ता आहे...लखनऊ मध्ये भाजपची सत्ता आहे असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यास अटकाव होत आहे याचा मी जाहीर निषेध करतो ... शिवाजी महाराज आदर्श आहेत सांगायचं आणि त्यांच्या विरोधात काम करायचं ही भूमिका भाजप्ची आहे... # ऑन पोषण आहार सरकारच्या तिजोरीत पोषण आहारासाठी ठणठणात आहे... महाराष्ट्रात दुर्दैवी प्रकार घडत आहेत. .. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जात असल्याने हे सरकार दलित विरोधी आहे # ऑन नेहरू सेंटर वरळी येथील नेहरू सेंटर हे देशाला माहित आहे ज्यांनी या देशाला चालना दिली त्या पंतप्रधानांचे नाव तुम्ही बदलत आहात भारतीय जनता पक्षाला त्यांच्या नावाची एलर्जी आहे दिल्लीमधील नेहरू मेमोरियलचे नाव बदलले , अहमदाबाद स्टेडियमचे नाव बदलले त्यांचे हे प्रयत्न सूर्यावर थुंकण्यासारखे आहेत # ऑन उद्धव राज युती... हा भारतीय जनता पक्षाचा सर्व्ह आहे.. भाजपचा पराभव करण्यासाठी जनता तयार आहे..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 14, 2025 09:47:57
Nagpur, Maharashtra:संग्राम जगताप जी जे एका संवैधानिक पदावर आहेत, त्यांना अशा भाषेचा वापर करणे शोभत नाही. आणि हिंदू-मुसलमान हे इतके एकमेकांशी जोडले गेले आहेत की त्यांना कोणी तोडू शकत नाही. इतक्या खोलवर जोडले गेले आहेत की, जर कोणी त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला तर ते तोडू शकणार नाही. त्यामुळे असे विधान करून महाराष्ट्रात तणाव निर्माण करणे अजिबात योग्य नाही. आता गोष्ट आहे हिंदू आणि मुसलमानांची. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जर एखादा शेतकरी, हिंदू शेतकरी शेती करत असेल, तर त्याचे धान्य मुसलमान खरेदी करतो, मुसलमान खातो. उदाहरणार्थ, जर विमानाचा पायलट कोणी मुस्लिम असेल, तर त्यात बरेच हिंदू प्रवासी बसलेले असतात. जर ट्रेनचा चालक मुस्लिम असेल, तर त्यात बरेच हिंदू बसलेले असतात. तर ही आपल्या देशाची एक व्यवस्था आहे, आणि खरे जे सनातनी लोक आहेत, या देशातील जे सर्वात मोठे सनातनी लोक आहेत, ते कधीही अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत नाहीत. ते राष्ट्राला आणि देशाला बनवणारे काम करतात. मुसलमान देखील मोठ्या संख्येने त्यांच्या मुलांसाठी फटाके आणतात. आणि असे बोलणे की हिंदूने मुसलमानांकडून खरेदी करू नये आणि मुसलमानांनी हिंदूंकडून खरेदी करू नये, तर हा सगळ्यांचाच व्यापार आहे. जर मुसलमान फटाके खरेदी करत असेल, तर तो हिंदूच्या दुकानातूनही खरेदी करत आहे. दुकाने मुसलमानांचीच नसतात. बहुतेक फटाक्यांची दुकाने हिंदू समाजाच्या लोकांची देखील असतात. तर हा सगळ्यांचा व्यापार चालतो. नाही, निश्चितच. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आणि जोपर्यंत हे सरकार येथे आहे, तोपर्यंत असे काहीही होणार नाही.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 14, 2025 09:30:29
Pandharpur, Maharashtra:कार्तिकी यात्रा शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण. कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिक Shuddha एकादशी या दिवशी भरते. सन 2025 या वर्षी कार्तिकी यात्रा रविवार, दिनांक 02 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Oct 14, 2025 09:20:50
Wardha, Maharashtra:राज्यातील अतिवृष्टीग्रस्ताच्या मदतीसाठी धावलेय वर्धा पोलिस. एक हजार आठशे पोलीस करणार मदत. एक दिवसाचा पगार देत करणार सहकार्य. जवळपास पंचवीस लाखाची मदत करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करणार निधी सुपूर्त. अँकर - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचं मोठं नुकसान झालं. या आपातग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्धा पोलीस दल समोर आलंय. एक हजार आठशे पोलिसांनी आपला एक दिवसाचा पगार देण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय संघटना, इतर कार्यालयाचे कर्मचारी आहेत,परंतु पोलीसांनी पुरग्रस्तानच्या मदतीसाठी हात पुढं केला आहे. व्हिओ - शासनाच्या आवाहनाला आम्ही सहकार्य करण्याचं ठरविलं. त्यानुसार स्वइच्छेनुसार पोलीस कर्मचारी वर्गांन मदत करण्याच ठरविल्यामुळे सहकार्य करता येणार असल्याचे समाधान आहे. बाईट - अनुराग जैन,एसपी, वर्धा.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 14, 2025 09:20:23
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 14, 2025 09:20:10
Chendhare, Alibag, Maharashtra:अलीबाग येथील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेचा रास्ता रोको प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी आंदोलन १४० प्रकल्प ग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन शेकडो शिवसैनिकांनी अलिबाग रेवस रस्ता रोखून धरला, वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा आरसीएफ प्रकल्प ग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आमदार महेंद्र दळवी यांची जिल्हा प्रशासना बरोबर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आंदोलन सुरू झाले जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह प्रमुख अधिकारीांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली परंतु कुठलाच तोडगा निघाला नाही आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 14, 2025 09:19:57
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 14, 2025 09:19:20
Washim, Maharashtra:वाशीम शहरातील प्रमुख चौकांमधील सिग्नल यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.त्यामुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिग्नल बंद असल्याने चौकांवरील वाहतूक व्यवस्थापनाचे काम पोलिसांना हाताने करावे लागत असून त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे.दरम्यान, येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीवरील ताण आणखी वाढणार आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरळीत करुन नगरपरिषदेने आणि वाहतूक विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top