Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा पुलिस ने अतिवृष्टि पीड़ितों के लिए एक दिन का वेतन दान किया

MAMILIND ANDE
Oct 14, 2025 09:20:50
Wardha, Maharashtra
राज्यातील अतिवृष्टीग्रस्ताच्या मदतीसाठी धावलेय वर्धा पोलिस. एक हजार आठशे पोलीस करणार मदत. एक दिवसाचा पगार देत करणार सहकार्य. जवळपास पंचवीस लाखाची मदत करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करणार निधी सुपूर्त. अँकर - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचं मोठं नुकसान झालं. या आपातग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्धा पोलीस दल समोर आलंय. एक हजार आठशे पोलिसांनी आपला एक दिवसाचा पगार देण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय संघटना, इतर कार्यालयाचे कर्मचारी आहेत,परंतु पोलीसांनी पुरग्रस्तानच्या मदतीसाठी हात पुढं केला आहे. व्हिओ - शासनाच्या आवाहनाला आम्ही सहकार्य करण्याचं ठरविलं. त्यानुसार स्वइच्छेनुसार पोलीस कर्मचारी वर्गांन मदत करण्याच ठरविल्यामुळे सहकार्य करता येणार असल्याचे समाधान आहे. बाईट - अनुराग जैन,एसपी, वर्धा.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Oct 14, 2025 12:45:36
Nashik, Maharashtra:अँकर राज्यात दुधाची भेसळ मोठ्या प्रमाणात होत आहे. अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याचा खुलासा चक्क अन्न औषध भेसळ कार्यशाळेत केला आहे. त्यांनी गेल्या वेळी रमजान महिन्यात दुधाची मागणी वाढल्याने झिरवाळ यांनी रात्री अचानक दूध टँकर तपासणी सुरू केली. एकूण 90 95 टँकर तपासले असता जवळपास सर्वच दुधामध्ये सोडियम क्लोरिअड सापडल्याचे कबूल केल्याने दुधाचा दर्जा किती खालावतोय हे स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. नरहरी झिरवाळ अन्न औषध मंत्री सण असुदेच्या काळात शंका व्यक्त केली होती आणि त्याचवेळी मी रेड केली होती रात्री दोन ठिकाणी रेड केली होती इतर वेळी एक लिटर दुर लागतो मात्र सणासुदीच्या काळात त्याच घरात तीन ते चार लिटर दूध लागतं मग लगेच गाय कुठून येतात लगेच दूध कुठून आलं अशी शंका घेतली होती त्यावेळी एका रात्री जवळपास 97 ते 98 टँकर तपासले होते त्याचे बऱ्यापैकी रिपोर्ट सोडियम क्लोराइडचेच सगळ्यात जास्त होते जवळपास शंभर टक्के धरा एवढी मोठी भेसळ होते आणि प्रबोधनातून गोष्टी सह शक्य होतात असं मला वाटतं
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 14, 2025 12:06:44
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 14, 2025 11:46:24
Baramati, Maharashtra:दौंडचे भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल शहा राष्ट्रवादीत जाणार.... दौंड चे भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आता 17 ऑक्टोबरला ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांसह स्वप्निल शहा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करणार आहेत. स्वप्निल शहा हे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे माजी अध्यक्ष देखील राहिले आहेत. शहा यांच्या जवळपास तीन पिढ्या भाजप सोबत राहिल्या असल्याने शहा यांचा तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा पक्षप्रवेश होत असल्याने याचा दौंड मध्ये अजित पवार गटाला मोठा फायदा होणार आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 14, 2025 11:46:07
Baramati, Maharashtra:मच्छिमार कुटुंबांना जाधव परिवाराची मदत. स्वतःच्या दीपावलीपूर्वी मच्छीमारांची दीपावली गोड करणारा इंदापूरचा आडता जाधव बंधूंच्या धाडसी निर्णयाच तालुक्यात कौतुक झाला. जाधव बंधूंनी स्वतःची दीपावली गोड करण्यापूर्वी ज्यांच्या जीवावर आपण आडत चालवतो त्या मच्छीमारांची दीपावली गोड केलीय. जाधव बंधूंच्या माध्यमातून आडतीवर मासळी घालणाऱ्या 120 मच्छीमारांना आणि गरजवंत 30 कुटुंबांना अशा 150 कुटुंबांना दीपावलीचा शिधा मोफत देण्यात आलाय. जाधव बंधूंच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत असून हा उपक्रम 21 वर्षांचा आहे. यासाठी जाधव बंधूंना तीन लाखांहून अधिकचा खर्च आला आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 14, 2025 11:45:51
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 14, 2025 11:40:39
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 14, 2025 11:34:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:झोप आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.. मात्र ही झोपच पळाली तर, बरं ही झोप पळवतंय कोण तर ती वस्तू सतत तुमच्यासोबत तुमच्या खिशात असते आणि ती वस्तू म्हणजे तुमच्या खिशातला मोबाईल ..होय तुमचा मोबाईल तुमची झोप पळवतोय, हिरावतोय, नष्ट करतोय ते नक्की कसं पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट... खिशातला मोबाईल झोपेचा वैरी तुमचा मोबाईल तुमची झोप पळवतोय झोपेची कमतरता आजारांना निमंत्रण... मोबाईल हा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभাজ्‍य अंग झालाय, त्या शिवाय दिवस सोडा क्षण ही जात नाही असे अनेकांचं झालाय, मात्र हाच मोबाईल आयुष्याच्या अनेक संकट आणतोय आणि त्यामुळं जीवघेणं म्हणजे झोप.. मोबाईल चा स्क्रीन टायम हा झोपेचा मारक ठरतोय, स्क्रीन टाइम म्हणजे तुम्ही ऍक्टिवली मोबाईल वापरत असलेली वेळ, तुम्ही जितका जास्त वेळ मोबाईल पाहणार तितकी तुमची झोप कमी होणार, मोबाईल मधील निळा प्रकाश झोपेसाठी असणारे महत्वाचं घटक melatonin कमी करते, रात्री उशिरा पर्यंत मोबाईल पाहण्यामुळे डोळ्यावर पडणारा प्रकाश मेंदू पर्यंत जातो आणि मेंदूला उत्तेजित करतो आणि मेंदूला झोप दूर पळते... यामुळं झोपेचे आजार होतात, इनसोमेनिया म्हणजे झोप न येण्याचा today आजार जडतो, हळूहळू मेंदूची क्षमता कमी करतो आणि डिमेनशिया म्हणजे विसरण्याचा आजाराला आमंत्रण देण्याचा मोठा धोका ही उद्भवू शकतो असे तज्ञ सांगताय... झोप नसली तर चिडचिड वाढते, माणूस आक्रमक होतो आणि आयुष्य उध्वस्त होऊ शकते त्यामुळं किमान झोपण्याच्या 2 तास आधी हा मोबाईल स्वतः पासून दूर करा, अगदी टॅब, लॅपटॉप, टीव्ही असले काही काहीच नको... यातील अभ्यासानुसार तुमचा स्क्रीन टाइम मोठ्यां साठी दिवसाला 2 तासांपेक्षा कमी असावा तर चिमुकल्यांना तासापेक्षाही कमी, अन्यथा शरीरावर याचे अनेक परिणाम होतात त्यामुळं तुमचा स्क्रीन टाइम किती हा तुम्हीच ठरवा आणि निरोगी आयुष्य जगा...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 14, 2025 11:15:46
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:जीआरला हात लावा मग दाखवतो — मनोज जरांगे पाटील यांचा ओबीसी नेत्यांना इशारा अँकर: धाराशिव – मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ओबीसी नेत्यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. “जीआरला हात लावा मग दाखवतो” अशा शब्दात त्यांनी ओबीसी नेत्यांना इशारा दिला. हैदराबाद गॅझेट इयरनुसार काढलेला मराठा आरक्षणाचा जीआर रद्द होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. सध्या शेतकरी संकटात असल्याने जीआरनुसार ओबी कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सरकारला आणखी १५ दिवसांचा अवधी दिल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. कळंब तालुक्यातील डिकसळ येथे धार्मिक कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 14, 2025 11:12:29
Nanded, Maharashtra:Anchor - आस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आज नांदेडमध्ये वारकरी संप्रदायातर्फे आधार दिंडी काढण्यात आली. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. पुरामुळे शेती खरडून गेली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्यात. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मानसिक धीर देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानोबा - तुकोबा आधार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकऱ्यांना कोणीही आत्महत्या करू नये अशी शपथ देण्यात आली. वारकऱ्यांनी केलेल्या टाळ मृदुंगाच्या गजरामुळे हा संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. यानंतर गावोगावी अश्या आधार दिंडीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकानी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 14, 2025 10:57:52
Hingoli, Maharashtra:हिंगोली विधानसभेचे १५ वर्षे काँग्रेस कडून आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हिंगोली जिल्ह्यात एकही जागा काँग्रेससाठी सोडून घेतली नव्हती. त्यामुळे निष्ठावंत असलेले भाऊराव पाटील गोरेगावकर नाराज झाले होते. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन विधानसभेची अपक्ष निवडणूक ही लढवली होती. काँग्रेसने माझ्यावरच अन्याय केला तर माझ्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होईल, त्यामुळे आता आपण काँग्रेसला जय महाराष्ट्र करीत असल्याचं भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज मुंबई येथे भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय. हिंगोलीत आजही भाऊराव पाटील गोरेगावकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे काँग्रेसला एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा धक्का मानला जातोय.
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 14, 2025 10:52:24
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 14, 2025 10:47:41
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत मतदार यादीवर एकूण 2516 नागरिकांनी आक्षेप घेत हरकती नोंदविले आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदार यादीतील विसंगती तसेच मृत मतदारांची नावे, एका घरातील अनेक प्रभागातील नोंदी तसेच नव्याने झालेल्या संशयास्पद मतदारवाढीमुळे अनेक मतदारांनी निवडणूक विभागाकडे आक्षेप घेत हरकती नोंदवल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायत कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली पाहायचं मिळत आहे. अक्षय व हरकती नोंदवण्याची मुदत प्रशासनाकडून वाढवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवा अशी देखील आवाहन शिंदखेडा नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top