Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410503

मंचर गैस संकट से होटल प्रभावित, रोजगार खतरे में

HCHEMANT CHAPUDE
Mar 11, 2026 08:02:07
Manchar, Maharashtra
Feed 2C Slug: Manchar No Gas Chul. File'02 Rep: Hemant Chapude(Manchar) Anc: अमेरिका इराण इजरायल महायुद्धाचा परिणाम एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावरती झाला असून व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यवसायिकांना चुलीवरती स्वयंपाक बनवण्याची वेळ आलीय मात्र चुलीवरती सर्वच पदार्थ बनवता येत नसल्याने गॅस उपलब्ध झाला नाही तर उद्या आम्हाला हॉटेला बंद करावं लागेल आणि याचा परिणाम शेकडो कामगारांवरती बेरोजगारीची टांगती तलवार सध्या उभी राहिलीय या सर्व परिस्थितीचा मंचर मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Mar 11, 2026 09:36:13
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 11, 2026 09:30:50
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 11, 2026 09:11:36
Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्यातील वाई शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आणि कामातील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ आज वाई तालुका बंदला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विविध व्यावसायिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. वाई शहर आणि परिसरातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्यात आली असून हॉटेल व्यावसायिकांनी या बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. दरम्यान, संतप्त स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी दक्षिणकाशी वाई–सुरूर मार्गावर तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करत आपला तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजूत काढत रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. मात्र संतप्त नागरिकांनी दीड वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.यावेळी संबंधित ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि सुमारे एक तासानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 11, 2026 09:11:14
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 11, 2026 09:10:58
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 08:46:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विविध पर्यायांचा वापर करत सोलापूर हॉटेल असोसिएशनचा शहरातील हॉटेल्स सुरू ठेवण्याचा निर्धार - कमर्शियल गॅस बंद केल्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांचे मोडले कंबरडे - मात्र अशा परिस्थितीत देखील इलेक्ट्रिक शेगडी, कोळशावरची शेगडी, तंदूर भट्टी अशा विविध पर्यायांचा वापर करत व्यवसाय सुरू ठेवण्याचा हॉटेल असोसिएशनचा निर्धार - सोलापूर जिल्ह्यात तीर्थक्षेत्र पर्यटन मोठ्या प्रमाणात असल्याने वडगावच्या व्यक्तींचे जेवणासाठी हाल होऊ नयेत यासाठी करण्यात येत आहेत प्रयत्न - हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये बदल करत कमी इंधन लागेल अशा पद्धतीच्या पदार्थांना हॉटेल चालकांची पसंती याच विषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 11, 2026 08:16:48
Baramati, Maharashtra:युद्धामुळे गॅसचा तुडवडा... ग्रामीण भागात हॉटेल व्यवसायिक अडचणीत ... आखाती देशातील युद्धाची परिस्थीत असल्याने गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने सध्या हॉटेल व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यवसाय चालवण्यासाठी आता चुलीवरती अन्न शिजवून ग्राहकांना द्यावे लागत आहे. शहराबरोबरच आता ग्रामीण भागात देखील हॉटेल व्यवसायिकांना गॅसच्या तुटवड्याचा मोठा सामना करावा लागत असून वाढते ऊन त्यामध्ये चुलीवरती अन्न शिजवताना होणारा धुराचा त्रास, कामगारांची अडचण यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे या इंदापूर तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांशी संवाद साधत. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी....
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 08:02:36
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | पंचायत समिती निवडणूक, ठाकरे गटाचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यानं मतदानासाठी गैरहजर राहिलो निवडणूकीत गैरहजर राहिलेला उबाठाचा पंचायत समिती सदस्य आला समोर छत्रपती संभाजीनगरच्या पंचायत समिती निवडणुकीत गैरहजर राहिलेले ठाकरे गटाचे पंचायत समिती सदस्य अखेर आज समोर आले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आमचा राग होता, भाजपला देखील आम्हाला मतदान करू नका असे मातोश्रीवरून सुचन्या होत्या. तसेच आमचा ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात नसल्याने आम्ही मतदान प्रक्रियासाठी तीनही सदस्य उपस्थित राहिलो नसल्याचे निवडून आलेले सदस्य दत्तात्रेय वरपे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे सदस्य भाजपने पळवले असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला होता. दत्तात्रेय वरपे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 11, 2026 07:49:14
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 11, 2026 07:45:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:आखाती देशातल्या युद्धाचा परीणाम थेट सांगलीच्या रिक्षा व्यावसायवर देखील झाला आहे. एलपीजी गॅस इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे एलपीजी वाहनधारक हैराण झाले आहेत, याशिवाय गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील वाहनधारकांच्या मध्ये निर्माण झाल्याने एलपीजी गॅस पंपांवर आता वाहनांच्या विशेषता रिक्षाचा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय. 55 रुपया किलो मिळणारा गॅस आता आखाती देशातल्या युद्धाच्या स्थितीमुळे 80 रुपये इतका झाला आहे. तब्बल 25 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाल्याने रिक्षा चालकांसमोर मोठे संकट उभे राहिला आहे त्याशिवाय गॅसचा तुटवडा होण्याची भीती देखील रिक्षाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालक आता गॅस पंपांवर अर्धा -अर्धा तास थांबून गॅस भरत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top