Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410509

सुलतानपुर में बिबटिया पकड़, वन विभाग की बड़ी कामयाबी

HCHEMANT CHAPUDE
Dec 19, 2025 05:18:17
Ambegaon, Maharashtra
मंचर/ पुणे आंबेगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे दहशत माजविलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. गेले काही दिवस या भागात बिबट्याचे नित्य दर्शन होत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता हा बिबट्या पकडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Dec 19, 2025 08:03:38
Shirdi, Maharashtra:आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, देवळाली प्रवरा, नेवासा आणि कोपरगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. काही वेळातच देवळाली प्रवरा येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुरुवात होणार आहे. देवळाली प्रवरा येथे भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी मुख्य लढत नगरपरिषदेतील निवडणुकीत होतेय. कोपरगाव सभेनंतर शिर्डीतील हॉटेल सेंटलॉर्न येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवळाली प्रवरा येथील सभास्थळाहून आढावा घेत शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 19, 2025 07:20:55
Baramati, Maharashtra:जय पाटलांच्या पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जय पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. युगेंद्र पवारांनी केलेला दावा होता की अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचा दावा केला; मोसीन पठाण यांनी हा दावा खरा असल्याची स्पष्टता दिली असून अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोसिन पठाण यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करून मतदारांना अमिष दाखवला जात असल्याची माहिती नागरिकांना दिली जात आहे. या प्रकरणात बारामतीत व्हिडीओ खरा की खोटा याची तपासणी करावी, तसेच जर व्हिडिओ खरा असेल तर पैसे कुठून आले आणि कुठे वापरले गेले याची चौकशी SIT व ACB मार्फत तातडीने व्हावी. मोसीन पठाण यांनी ८ वार्डमध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आले असल्यास त्या वार्डांमध्ये देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 19, 2025 07:17:28
Kalyan, Maharashtra:कल्याणात बड्या नेत्यांच्या आचारसंहिता भंगाकडे निवडणूक अधिकाऱ्यांचे काना डोळा? अधिकाऱ्यांकडून डोळे झाक. 'तेरी भी चूप मेरी भी चूप. सर्वसामान्य नागरिकांनी लावलेल्या बॅनरवर पहिलाची कारवाई. कल्याण निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही कल्याणात बड्या नेत्यांच्या कार्यक्रमांदरम्यान नियमांचा सर्रास भंग होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः माजी नगरसेवक सचिन पोटे यांच्या शिंदे गटात झालेल्या पक्षप्रवेशावेळी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण पूर्वेत काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरात मोठमोठे बॅनर, होर्डिंग्ज आणि झेंडे लावण्यात आले होते. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशी बॅनरबाजी नियमबाह्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातो. सर्व सामान्य नागरिकांच्या बॅनरवर कारवाई केली जाते मात्र सत्ताधारी नेत्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिक करत आहे. बाईट.. नागरिक
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 19, 2025 07:17:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ऑन मुंबई युती जागा.. - कोणत्या जागा आपल्याकडे येतील आणि कोणत्या जागा भाजपकडे जातील याबाबत स्पष्ट नाही. युती होणार आहे, शंका घेण्याचे कारण नाही. काही अडचणी आल्या तर म्हणून ह्या सगळ्या मुलाखती आहेत. महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकेल. अधिकृत ही बातमी नाही, राहिलेल्या 84 जगावर बोलणी बाकी आहे. पुन्हा बोलणी होणार आहे. अडचण येणार नाही - पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांची बैठक होईल. कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्वांची आहे. काही ठिकाणी नाराजीचा सूर पहायला मिळेल हे होणारच... - राजीनामा स्वीकारला पुढे काय होईल पाहू. - काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जमायचे नाही म्हणायचं त्याचा प्रयत्य आलं. ज्यांची पालखी घेऊन ubt जात होत, त्यांनीच यांची साथ सोडली आहे. त्यांचे उंबरठे झिजवणे हेच ubt चे काम होते - महाविकास आघाडीमध्ये सन्मान जनक यांचा अर्थ काय होतो, जागा दिल्या नाही, यादी दिली नाही. सन्मानजनज हे शरद पवार यांचे वाक्य संभ्रमात टाकणारे.. Ubt ची ही शेवटची निवडणूक रावसाहेब दानवे वक्तव्य... - ही निवडणूक शेवटची , आजच्या घडीला त्यांच्या सोबत कोणीही यायला तयारी नाही. त्यांना इतरांच्या बरोबर जाणे हा रस्ता बंद झाले आहे. महायुती जशा ताकतीने लढते तशी ubt ची ताकद नाही. Ubt स्थिती, वंचित आघाडी... - मुंबई त ubt ची परिस्थिती नाही. गरज सरो वैद्य मरो ही भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीची आहे... - राजकारणा मधे संयम राखायचा असते, ते आम्ही राखत आहोत. - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतीलका? 100 टक्के होतील, ते होतील, आम्हाला का असे वाटू नये. - उद्धव ठाकरेंनी 6 सभा घेतल्या त्या खूपच जास्त झाल्या... तूच लढ ही भूमिका त्यांची राहिली आहे. हे इन्कामिंग वाले आहेत. आऊट गोइंग वाले नाही. आता त्यांना कार्यकर्ते मिळणार नाही,अनेकजण सोडून जाताहेत. - जयंत पाटील व्हीडिओ - काही लोकांना काही उद्योग नसल्याने ai च्या माध्यमाने नेत्यांचे पैशासोबतचे व्हिडिओ बनवले जात आहेत. दुष्मानीसाठी देखील असे व्हिडिओ बनविले जात आहेत. - काँग्रेस चा पारंपरिक मतदार ubt कडे जाऊ नये म्हणून हे सर्व आहे, काँग्रेसने नेहमी इंग्रजांची नीती वापरली आहे. Ubt अवस्था वाईट आहे....
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 19, 2025 07:05:18
Malegaon, Maharashtra:मनमाडला नायलॉन मांजाने महिला डॉक्टर जखमी, चेहऱ्यावर करावी शस्त्रक्रिया... नाशिकच्या मनमाडमध्ये नायलॉन मांजामुळे महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आल्याने नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्त्री रोग तज्ञ असलेल्या डॉक्टर विद्या योगेश मगर नेहमी प्रमाणे दुचाकीवरून क्लिनिकमध्ये जात असताना ईदगाह भागातील पुलावर अचानक नायलॉन मांजा चेहऱ्यावर आल्या त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळा ठोक्यात बचावला तर चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांच्यावर कॉस्मेटिक सर्जरी करून 25 टाके टाकण्यात आले. मानवाच्या जीवितास धोकादायक असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तसेच वापर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 19, 2025 07:04:57
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर महानगरपालिका चुनावी उम्मीदवारों की मुलाकात शुरू करने की तैयारी: कांग्रेस ने भी इच्छुक उम्मेदवारों की मुलाकातें शहर कार्यालय देवड़िया भवन में आज से शुरू कर दीं। एकीकडे आघाडी की चर्चा होते हुए कांग्रेस ने कुल 151 सीटों के लिए मुलाकातें शुरू कर दीं। निरीक्षक रणजित कांबळे, शहराध्यक्ष विधायक विकास ठाकरे, विधायक अभिजित वंजारी के नेतृत्व में इच्छुक उम्मीदवारों की मुलाकातें चलेंगी। आज और कल दो दिन तक कांग्रेस की मुलाकातें चलेंगी। नागपुर में कांग्रेस, ठाकरे की शिवसेना और शरद पवार के राष्ट्रवादी कांग्रेस के साथ चर्चा जारी—क्या आघाड़ी बनेगी? सबकी नजरें। 151 सीटों के लिए एक हजार से अधिक इच्छुक उम्मीदवारों के आवेदन।
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 19, 2025 06:34:01
Washim, Maharashtra:वाशीम नगर परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून, आज EVM मशीन व मतदान साहित्याची तपासणी करून ते पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वाशीम नगर परिषद निवडणुकीत एकूण ७५ हजार ७० मतदार असून, यामध्ये ३६ हजार ५४१ महिला, तर ३८ हजार ५२२ पुरुष मतदार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवार, तर १६ प्रभागांतील सदस्य पदांसाठी १७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १६ प्रभागांसाठी ८१ मतदान केन्द्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी EVM आणि मतदान साहित्याची सखोल तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर हे साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर नेण्यात येत आहे. यासाठी तैनात बंदोबस्तामध्ये १ उपविभागीय पोलीस अधिकारी, २ पोलीस निरीक्षक, १३ सहाय्यक व उपनिरीक्षक, २६ महिला पोलीस, १३० पोलीस कर्मचारी, १०४ पुरुष होमगार्ड, ६ महिला होमगार्ड, SRPF च्या २ तुकड्या आणि १ स्ट्रिकिंग फोर्सचा समावेश आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 06:22:50
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपचं कमळ पूर्णपणे फुललं होतं. 80 जागांच्या अकोला महानगरपालिकेत भाजपने तब्बल 48 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता संपादन केली होती. 2001 मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच अकोलेकरांनी कुण्या एका पक्षाला निर्भेळ बहुमत दिलं होतं. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता आणि भाजपचा हा विजय ऐतिहासिक मानला गेला होता. अकोला महानगरपालिका, भाजप , वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस करिता प्रतिष्ठेची बनली आहे. शहरातील विविध प्रश्न आणि समस्या लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.अकोला शहरात पार्किंगचा प्रश्न, वाढती धूळ, महापालिका शाळांची दुरावस्था, अतिक्रमण, अवैध बांधकाम, नाट्यगृहाची दुरावस्था, लोकल ट्रान्सपोर्टेशनची कमतरता, कचरा व घाण तसेच सार्वजनिक मुतारींची समस्या या प्रमुख मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाऊ शकते. शहराचा विकास केला असल्याचा दावा भाजपने केला असला तरी काँग्रेसने भाजपचाच विकास झाला असून शहराचा नाही असा आरोप केला होता. 2017 च्या निवडणुकीत भाजपने चौफेर कामगिरी करत 8 पैकी 48 जागा जिंकल्या होत्या.भाजपच्या लाटेत काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, सुरेश पाटील, माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी आणि सुनिल मेश्राम यांचा पराभव झाला होता.प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या अजय शर्मा यांनी काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांचा 1137 मतांनी पराभव केला होता, तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे राहुल देशमुख यांनी काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा 2502 मतांनी पराभव केला होता. प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये प्रथम महापौर भाजपच्या सुमन गावंडे, उपमहापौर विनोद मापारी आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांचा समावेश होता. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. 2012 च्या तुलनेत या दोन्ही पक्षांना एकाही जागेची भर घालता आली नव्हती. भारिप बहुजन महासंघाच्या ( सध्याच्या वंचित बहुजन आघाडी) जागा सातवरून तीनवर घसरल्या होत्या. मात्र काँग्रेसने 13 जागा जिंकत आपली उपस्थिती टिकवून ठेवली होती. *एक नजर टाकूया अकोला महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल वर.....* एकूण जागा : 80 भाजप : 48 काँग्रेस : 13 राष्ट्रवादी ( अ. प ) : 5 राष्ट्रवादी ( श. प ) : 0 भारिप - बहूजन महासंघ (सध्याची वंचित बहुजन आघाडी) 3 शिवसेना ( शिंदे ) : 6 शिवसेना ( उबाठा) : 2 अपक्ष :2 एमआयएम : 1 भाजपाने सत्ता स्थापित केली आणि काही अपक्ष सुद्धा भाजपला जुडले. मात्र गेल्या तीन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विभाजनानंतर अनेक घडामोडी महापालिकेत घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर पाच नगरसेवक अजित पवार गटात गेले, तर एका नगरसेविकेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या विभाजनानंतर सहा नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले तर दोन नगरसेवक उबाठामध्ये कायम राहिले. विधानसभेच्या तोंडावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलिमचंदानी आणि यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर काँग्रेसचे जिशान हुसैन यांनी सुद्धा वंचित मध्ये प्रवेश केला. अशोक ओळंबे, तिसरी आघाडी नेते ( लायनिंग शर्ट ) भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने पाच वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामं सुरू करण्यात आली. अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. नव्या नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम करण्यात आलं.शहरात तीन उड्डाण पूल उभारण्यात आले.महापालिकेत नव्याने समाविष्ट झाल्या 24 गावांतील नागरी सुविधाआणि विकासकामांसाठी राज्य सरकारकडे 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.याशिवाय शहर बससेवा नव्याने सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती. शहरातील आणि नव्याने समाविष्ट गावांमधील रस्त्यांच्या कामांचं आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून भूमिपूजन करण्यात आलं होतं. नवीन तरण तलाव उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.अशा प्रकारे अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत शहराच्या राजकारणाला नवी दिशा दिली असल्याचा दावा भाजपने केला आहे. रणधीर सावरकर , भाजप आमदार ( चष्मेवाले ) मात्र या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे भाजपा पासून नाराज असलेल्या आजी-माजी नगर सेवकांच्या तिसऱ्या आघाडीची. तीस वर्षांपासून नगरसेवक असलेले हरीश अलीमचंदानी, डॉक्टर अशोक कोळंबे, आशिष पवित्रकार, गिरीश गोखले यांच्यासह सात आजी-माजी नगरसेवक या आघाडीकामी सामील आहेत.या आघाडीचा मोठा फटका भाजपला बसण्याची चिन्ह आहे. मात्र भाजप या आघाडीला कशाप्रकारे रोखणार हेही पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 19, 2025 06:22:20
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 19, 2025 06:01:25
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथे बिबट्या ने घराच्या कंपाऊँड मध्ये प्रवेश करत कुत्र्याची शिकार केलीय,महत्वाच म्हणजे 12.5 HP च्या बंद विद्युत पंपासकट बिबट्या ने या श्वानाला काही फुट ओढत नेलंय त्यामुळे बिबट्या च्या शरिरात किती ताकद असते याचा अंदाज तुम्ही लावू शकता,कुत्रााला ठार केल्यानंतर बिबट्या ने त्याला उचलून नेण्याचा खुप प्रयत्न केला मात्र कुत्रा साखळीने बांधलेला असल्यामुळे त्याला शिकार ठार केल्या नंतर हि घेऊन जाता आली नाही मात्र बिबट्या च्या या दहशती ने परिसरात प्रचंड भिती पसरली असून या बिबट्यांना जेरबंद करण्याच मोठ आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top