Back
अकोला महापालिका चुनाव: भाजपा की ऐतिहासिक जीत, आगे क्या बदलेगा शहर
JJJAYESH JAGAD
Dec 19, 2025 06:22:50
Akola, Maharashtra
अकोला महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपचं कमळ पूर्णपणे फुललं होतं. 80 जागांच्या अकोला महानगरपालिकेत भाजपने तब्बल 48 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता संपादन केली होती. 2001 मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच अकोलेकरांनी कुण्या एका पक्षाला निर्भेळ बहुमत दिलं होतं. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता आणि भाजपचा हा विजय ऐतिहासिक मानला गेला होता.
अकोला महानगरपालिका, भाजप , वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस करिता प्रतिष्ठेची बनली आहे. शहरातील विविध प्रश्न आणि समस्या लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.अकोला शहरात पार्किंगचा प्रश्न, वाढती धूळ, महापालिका शाळांची दुरावस्था, अतिक्रमण, अवैध बांधकाम, नाट्यगृहाची दुरावस्था, लोकल ट्रान्सपोर्टेशनची कमतरता, कचरा व घाण तसेच सार्वजनिक मुतारींची समस्या या प्रमुख मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाऊ शकते. शहराचा विकास केला असल्याचा दावा भाजपने केला असला तरी काँग्रेसने भाजपचाच विकास झाला असून शहराचा नाही असा आरोप केला होता.
2017 च्या निवडणुकीत भाजपने चौफेर कामगिरी करत 8 पैकी 48 जागा जिंकल्या होत्या.भाजपच्या लाटेत काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, सुरेश पाटील, माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी आणि सुनिल मेश्राम यांचा पराभव झाला होता.प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या अजय शर्मा यांनी काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांचा 1137 मतांनी पराभव केला होता, तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे राहुल देशमुख यांनी काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा 2502 मतांनी पराभव केला होता.
प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये प्रथम महापौर भाजपच्या सुमन गावंडे, उपमहापौर विनोद मापारी आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांचा समावेश होता. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. 2012 च्या तुलनेत या दोन्ही पक्षांना एकाही जागेची भर घालता आली नव्हती. भारिप बहुजन महासंघाच्या ( सध्याच्या वंचित बहुजन आघाडी) जागा सातवरून तीनवर घसरल्या होत्या. मात्र काँग्रेसने 13 जागा जिंकत आपली उपस्थिती टिकवून ठेवली होती.
*एक नजर टाकूया अकोला महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल वर.....*
एकूण जागा : 80
भाजप : 48
काँग्रेस : 13
राष्ट्रवादी ( अ. प ) : 5
राष्ट्रवादी ( श. प ) : 0
भारिप - बहूजन महासंघ (सध्याची वंचित बहुजन आघाडी) 3
शिवसेना ( शिंदे ) : 6
शिवसेना ( उबाठा) : 2
अपक्ष :2
एमआयएम : 1
भाजपाने सत्ता स्थापित केली आणि काही अपक्ष सुद्धा भाजपला जुडले. मात्र गेल्या तीन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विभाजनानंतर अनेक घडामोडी महापालिकेत घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर पाच नगरसेवक अजित पवार गटात गेले, तर एका नगरसेविकेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या विभाजनानंतर सहा नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले तर दोन नगरसेवक उबाठामध्ये कायम राहिले. विधानसभेच्या तोंडावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलिमचंदानी आणि यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर काँग्रेसचे जिशान हुसैन यांनी सुद्धा वंचित मध्ये प्रवेश केला.
अशोक ओळंबे, तिसरी आघाडी नेते ( लायनिंग शर्ट )
भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने पाच वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामं सुरू करण्यात आली. अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. नव्या नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम करण्यात आलं.शहरात तीन उड्डाण पूल उभारण्यात आले.महापालिकेत नव्याने समाविष्ट झाल्या 24 गावांतील नागरी सुविधाआणि विकासकामांसाठी राज्य सरकारकडे 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.याशिवाय शहर बससेवा नव्याने सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती. शहरातील आणि नव्याने समाविष्ट गावांमधील रस्त्यांच्या कामांचं आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून भूमिपूजन करण्यात आलं होतं.
नवीन तरण तलाव उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.अशा प्रकारे अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत शहराच्या राजकारणाला नवी दिशा दिली असल्याचा दावा भाजपने केला आहे.
रणधीर सावरकर , भाजप आमदार ( चष्मेवाले )
मात्र या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे भाजपा पासून नाराज असलेल्या आजी-माजी नगर सेवकांच्या तिसऱ्या आघाडीची. तीस वर्षांपासून नगरसेवक असलेले हरीश अलीमचंदानी, डॉक्टर अशोक कोळंबे, आशिष पवित्रकार, गिरीश गोखले यांच्यासह सात आजी-माजी नगरसेवक या आघाडीकामी सामील आहेत.या आघाडीचा मोठा फटका भाजपला बसण्याची चिन्ह आहे. मात्र भाजप या आघाडीला कशाप्रकारे रोखणार हेही पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 19, 2025 08:03:380
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 19, 2025 08:01:490
Report
JMJAVED MULANI
FollowDec 19, 2025 07:21:090
Report
JMJAVED MULANI
FollowDec 19, 2025 07:20:550
Report
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 07:17:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 07:17:130
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 19, 2025 07:05:180
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 07:04:570
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 07:02:560
Report
JMJAVED MULANI
FollowDec 19, 2025 06:49:300
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 19, 2025 06:34:010
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 19, 2025 06:22:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 19, 2025 06:01:250
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 19, 2025 05:18:170
Report