Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

पिंपरी-चिंचवड़ में कुष्ठ खोज अभियान में 11 रोगी मिले, 2,12,000 घरों की जाँच

KPKAILAS PURI
Dec 06, 2025 03:01:03
Pimpri-Chinchwad, Maharashtra
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शहरात 17 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान कुष्ठरोगी शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरात 11 कुष्ठरोगी असल्याचं समोर आलं आहे. या मोहिमेसाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने एकूण २१२ जनांचे पथक तैनात करण्यात आले होते, ज्यामध्ये तज्ञ डॉक्टर, सूपरवायजर, प्रशिक्षित आशा स्वयंसेविका तसेच परूष स्वयंसेवकांचा समावेश होता. या पथकाने एकूण ७९,१७७ घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि सुमारे ३,६१,८५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ११ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 06, 2025 03:46:52
Satara, Maharashtra:सातारा-‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ हे गीत मनोजराजा गोसावी यांनी लिहिले आहे . ते गीत त्यांनी आणि कडूबाई खरात यांनी गायले आहे. या गाण्याच्या ओळीप्रमाणे भाकरीवर बाबासाहेबांची छबी रेखाटण्याचा प्रयत्न पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची शब्दचित्रे, स्केच, रांगोळी, रंगीबेरंगी कागदाचे तुकडे, संविधान उद्देशिका, पेन्सिल, कलिंगड इत्यादी प्रकारात चित्रे साकारली आहेत. नावीण्यपूर्ण चित्रे तयार करण्याचा डाॅ. डाकवे यांचा हातखंडा आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे. या चित्राची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 06, 2025 03:46:16
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या स्ट्रॉंग रूम परिसरात एस आर बी आणि स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त..... भंडारा नगर परिषदेची निवडणूक पार पडली त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या वैनगंगा सभागृह येथे स्ट्रॉंग रूम तयार करून नगरपरिषद हद्दीतील सर्व ईव्हीएम मशीन तेथे सुरक्षित ठेवण्यात आल्या. या परिसरात एस आर बी आणि स्थानिक पोलीस अशा एकूण 20 पोलिसांचा बंदोबस्त स्ट्रॉंग रूम परिसरात आहे. तर महसूल विभागाच्या माध्यमातूनही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात चहूबाजूंनी एकुण वीस سیसीटीव्ही کॅमेरांची निगराणी बसवण्यात आली आहे. तर दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या सह्या असलेले सील पेपर दरवाजावर लावण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या व लोखंडी जाळीचे सुरक्षा कठडे सुद्धा सभोवताली बसवण्यात आले आहेत. अगदी सुरक्षित व चोख असा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 06, 2025 03:37:54
Latur, Maharashtra:नातेवाईकांना रेल्वेस्टेशनवर सोडून गावाकडे परततांना दोघा युवकांच्या कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील दोघेही जागीच मृत्यू झाले. अहमदपूर बायपास परिसरात मध्यरात्री हा धडकचा थरार CCTV मध्ये कैद झाला. रविकुमार दराडे व सागर ससाने अशी मयत दोघे युवकांची नावे आहेत. ते ते लातूररोड रेल्वेस्टेशनला गेले होते नातेवाईकांना हैदराबादकडे पाठवण्यासाठी. नातेवाईकांना रेल्वेमध्ये बसविल्यानंतर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शिरुर ताजबंद मार्गे परतत होते. त्यांच्या कारच्या पुढे ट्रक होता. त्या वेळी कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि क्षणार्धात कार ट्रकच्या पाठीमागे घुसली. या भीषण अपघातात चालक रविकुमार दराडे व सागर ससाने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
92
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 06, 2025 03:36:29
Nanded, Maharashtra:नांदेड मध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आलेल्या समक्ष ताटे याच्या कुटुंबाला आणि त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिला पोलीस सुरक्षा देण्यात आलीये. सक्षम ताटे याच्या संघसेन नगर येथील निवासस्थानी दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आँचलचे वडील , दोन्हीं भाऊ आणि अन्य तीन आरोपी अटक आहेत. दरम्यान सक्षमच्या कुटुंबांला धोका असुन सुरक्षा देण्याची मागणी आँचलने केली होती. शिवाय विवीध संघटनानी देखील पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. त्यानुसार आंचল आणि सक्षमच्या कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा दिली.
16
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 06, 2025 03:33:02
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची चौकशी करा अन्यथा बेमुदत उपोषण - स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे. अँकर - सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करावी,अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणधिकाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असूनदेखील त्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे,असा आरोपदेखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केला असून शिक्षण विभाग व संबंधित अधिकारी मोहन गायकवाड यांच्या कारभाराची चौकशी सुरू करावी,अन्यथा 8 डिसेंबर पासून कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा देखील यावेळी प्रशांत सदामते यांनी दिला आहे. बाईट - प्रशांत सदामते - अध्यक्ष - स्वाभिमानी स्वराज्य सेना.
92
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 06, 2025 03:30:21
Beed, Maharashtra:परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणं पडले महागात, 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल बीडच्या परळीत 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरच्या रात्री दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यासोबत स्ट्रांग रूम च्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत मोठा गोंधळ केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर, पद्मराज गुट्टे, महादेव गंगणे, मोहन मुंडे यांच्यासह अन्य इतर 15 ते 20 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषद कार्यालयासमोर विनापरवाना गैर कायद्याची मंडळी जमवून जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी फिर्यादी होत हा गुन्हा दाखल केला आहे..
54
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 06, 2025 03:02:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात 91 वर्षांच्या जेष्ठ नागरिकावर अतिजटील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी, सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे मोठे यश सोलापुर जिल्ह्याची ओळख वैद्यकीय हब म्हणून होत असताना सोलापूरातील वैद्यकीय तज्ञांना आणखी एक मोठे यश आले आहे. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एका 91 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर डॉ. सिद्धांत गांधी यांनी " टॅव्ही " ही अतिजटील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली आहे. अत्यन्त किचकट असणारी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आलाय. डॉक्टरांना मिळालेल्या मोठ्या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून कौतुकांचा वर्षाव सुरू आहे.
165
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 03:01:25
184
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 06, 2025 02:48:47
Akola, Maharashtra:राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि रणनीती आखण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी “महानगरपालिकेवर भगवा फडकवणार” असा जोशपूर्ण नारा देत उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे संचार केले. आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती रणनीती राबवायची, कोणते कार्यक्रम आखायचे आणि कोणत्या पद्धतीने प्रचार करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या बैठकीत काही ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. काही दिवसांपासून पक्षाच्या बॅनर्सवर एका ज्येष्ठ नेत्‍याचा फोटो गायब असल्याची चर्चा होती आणि त्यानंतर अनेकांची अनुपस्थिती लक्षात येत असल्याने शिंदे शिवसेनेत दोन गट तयार होत आहेत का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगत आहे. आगामी निवडणूक तोंडावर असताना अशा घडामोडींमुळे शिंदे सेनेची स्पर्धा इतरांशी नसून आपल्याच पक्षात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे..
284
comment0
Report
Advertisement
Back to top