Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला नगर परिषद को 75 लाख का पुरस्कार; राज्य स्तर पर 6वां, विभाग में 1वां

SKSudarshan Khillare
Feb 18, 2026 01:15:37
Yeola, Maharashtra
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता और शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येवला शहराने राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक पटकावला असून येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MAMILIND ANDE
Feb 18, 2026 04:47:07
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 8 वर्षीय चिमुकल्याचा बेवारस कुत्र्यांने चावा घेतल्याने मृत्यू? वर्ध्याच्या आर्वी शहरातील धक्कादायक घटना धवल गुल्हाने असं मृत बालकांचे नाव 25 जानेवारीला आर्वीच्या भाकरे ले-आऊट मध्ये चावला होता बेवारस कुत्रा 8 वर्षीय धवल याच्या गालावर आणि हाताचे तोडले होते बेवारस कुत्र्याने लचके आर्वी येथून अमरावती,आणि नागपूर येथे उपचारासाठी आले होते हलविण्यात 16 तारखेला नागपूर मेडिकल मध्ये धवल गुल्हाने याचा मृत्यू झाला. आर्वी शहरात महिन्याभरापासून बेवारस कुत्र्यांची दहशत शहरातील विविध प्रभागमध्ये आतापर्यंत 12 जणांचे बेवारस कुत्र्यांनी तोडले लचके नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांकनडून आहे ओरड
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 04:33:44
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यात जे बाधित आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष घरी जाऊन चर्चा केली जाणार आहे. यामध्ये मिळकतीचा आकार, पुनर्वसनाचेpär्य याबाबत चर्चा होईल. जनतेचा कौल घेऊनच आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूल परिसरातील भूसंपादन करून पार्किंग, म्युझियम, पदपथ या बाबी करता येतील का याचाही विचार केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठी उच्च अधिकार समिती नेमली आहे. या समितीमार्फत अहवाल सादर करण्यात आला आहे. त्याची प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. सध्या मंदिर परिसर विकास आराखड्यात भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी किती जमीन संपादित करावी लागेल याबाबत आढावा घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या शासकीय इमारती देखील ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 18, 2026 04:33:33
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 18, 2026 04:32:23
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 04:31:50
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार येणारा महापूर, नद्यांवरील पूल पाण्याखाली जाणे यामुळे फुलांची स्थिती नेमकी काय आहे, त्याचे वयोमान काय, देखभाल दुरुस्तीची गरज आहे का, पूल कोसळण्याचा काही धोका आहे का ? यासंदर्भात पुलाचे सुरक्षितता मूल्यांकन दाखवणारा पहिला पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि ऑस्ट्रेलियातील यु बी एम एस या संस्थेच्या वतीने हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचा अहवाल महिनाभरात जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे. कोल्हापुर हा नद्यांनी, पाण्याने समृद्ध असणारा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या चहुबाजूनी नद्या बारमाही वाहतात, त्यामुळे पावसाळ्यामध्ये महापुराची स्थिती येते, अतिवृष्टीमुळे अनेक फुल पाण्याखाली जातात. एकदा पूर आला की किमान 15 ते 20 दिवस किंवा महिनाभराचा कालावधीत हा पूल पाण्याखालã असतो. या काळात या पुलाची परिस्थिती काय आहे हे कळत नव्हतं, पण आता मात्र हे कळण्यासाठी जिल्ह्यात पायलेट प्रोजेक्ट राबवला जात आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 04:31:34
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 04:31:07
Kalyan, Maharashtra:कल्याण रेतीबंदर परिसर, मोठा गाव ठाकुर्ली रेतीबंदर परिसर हा रेतीमाफियांमुळे कायमच चर्चेत असतो. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उप विभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विकास गरुड यांच्या पथकाने काल कल्याण रेतीबंदर परिसरात सकाळपासूनच कारवाई मोहीम राबवली. कल्याण रेतीबंदर मधील या कारवाईत 4 अवैध रेती हौद JCB व पोकलेनने जमीनदोस्त झाले. मोठागाव–ठाकुर्ली रेतीबंदर येथे दुसरी मोठी कारवाई करत 18 अवैध साठवण हौद, अंदाजे 48 ब्रास रेती आणि 8 इंजिन पूर्णपणे नष्ट झाले. या कारवाईत रेती माफियांचे अंदाजे 8 ते 9 लाखांचे साहित्य आणि रेती वर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 18, 2026 04:19:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - देशभरातील स्वामी भक्तांसाठी मोठी गुड न्यूज, अक्कलकोट ते कर्नाटक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाला रुंदीकरणासाठी 353 कोटींचा निधी मंजूर - देशभरातून अक्कलकोटला येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी मोठी गुड न्यूज - महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमेवरील 47 किमी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 353.23 कोटींचा भरीव निधी मंजूर - अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागणीला मोठे यश - देशाच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोट नगरीत येणाऱ्या स्वामी भक्तांच्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार - महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने शेतकरी, व्यापारी, उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार असल्याचा आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला विश्वास
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 18, 2026 04:16:40
Bhandara, Maharashtra:धान खरेदी केंद्रांची लिमिट संपली....भंडाऱ्यात शेतकरी अडचणीत, लिमिट वाढ करण्याची मागणी....ANCHOR :- भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांची खरेदी मर्यादा पूर्ण झाल्याने सुमारे ७० टक्के धान उत्पादक शेतकरी विक्रीपासून वंचित राहिल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी धान साठून राहिले असून आर्थिक अडचणी वाढत आहेत. तातडीने मोजमाप करून धान खरेदी सुरू करावी आणि केंद्रांची लिमिट वाढवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. उशीर झाल्यास धानाची गुणवत्ता खालावण्याच्या भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 18, 2026 04:05:09
Dharashiv, Maharashtra:उमरगा पंचायत समिती सभापतीपदावरून भाजप-शिवसेना तणाव वाढला, भाजपाच्या सदस्य गेले सहलीवर. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे टेन्शन वाढलं उमरगा तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपदावरून भाजप आणि शिवसेनेतील रस्सीखेच अद्यापही कायम आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे आणि शिवसेनेच्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले हे सभापतीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. भाजपाचे नेते माजी मंत्री व स्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सदस्य शनिवार केली आहे. भाजपाने कैलास शिंदे यांना सभापती करण्यासाठी आग्रह झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचं चांगलंच टेन्शन वाढला आहे. महायुतीमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा असली तरी पहिली संधी कोणाला मिळणार यावरून पेच निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर बैठका सुरू असून वाद पक्षश्रेष्ठीकडे पोहोचल्याची माहिती आहे. दरम्यान, उमरगा पंचायत समितीतील भाजपाचे सात सदस्य मुंबईच्या सहलीवर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 18, 2026 04:04:47
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 18, 2026 03:48:41
Satara, Maharashtra:दुबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती उदयनराजे भोसले यांची निकटवर्तीय रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या माध्यमातून केले जात असून यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात दुबई येथे साजरी करण्यात आली. दुबई येथे 'शिवसृष्टी 2026 या कार्यक्रमातून रक्षक प्रतिष्ठान आणि 'प्रथा' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात मोठ्या संख्येने दुबई येथे वास्तव्यास असणारे महाराष्ट्रातील मराठी शिवप्रेमींसह इतर राज्यातील शिवप्रेमी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तब्बल 2000 हून अधिक शिवप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावून सुशील मोझर यांनी घेतलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य भारताबाहेर प्रथमच सर्वाधिक मर्दानी खेळ सहभागींचे थेट सादरीकरण करण्यात आले, याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरील काही प्रतिकृती देखावे याबरोबरच त्या काळात वापरात येणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते...या शिवजयंती सोहळ्यात मराठमोळ्या कपड्यांमध्ये प्रत्येक जण या ठिकाणी पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वाक्षरी केलेली विशेष प्रशस्तीपत्रे देऊन सर्व खेळाडूंचा सन्मान आला. रक्षक प्रतिष्ठांचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी राबवलेल्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 18, 2026 03:48:20
Beed, Maharashtra:बीड: पाटोदा तालुक्यातील जवळाला गावात धाडसी चोरी; नऊ लाख रुपये आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास..! ANC- विद्युत डी पी मधील फ्यूज काढून गावात घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील जवळाला उघडकीस आला. चोरांनी एकाच रात्रीत दोन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज आणि रोखड लंपास केली आहे. पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरातील नऊ लाख रुपये रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे..या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. माझ्या मुलाने ऊस तोडणी करून मोठा कष्टाने कमवलेले पैसे चोरांनी नेले आहेत, माझे पैसे मला परत द्या अशी मागणी कोठुळे कुटुंबातील महिलांनी केली. बाईट- पीडित महिला..
0
comment0
Report
Advertisement
Back to top