Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

मालेगांव में विवाद में बेटे ने पिता पर डंडे से हमला, मौत

YKYOGESH KHARE
Oct 03, 2025 13:50:29
Nashik, Maharashtra
संशयित आरोपी श्रीकांत निकम याने आपल्या जन्मदात्या पिता पंडित कौतिक निकम (वय 70) यांच्यावर लाकडाच्या दांडक्याने जबरदस्त प्रहार केला… डोक्यावर झालेल्या गंभीर जखम पंडित निकम यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांशी सतत दारू, पैशे, किंवा काहीनाकाही कारणावरून श्रीकांत हा भांडण करत असल्याची चर्चा आहे. आणि याच वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी श्रीकांत निकम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज मालेगाव कोर्टात दाखल केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Oct 04, 2025 03:15:14
Kolhapur, Maharashtra:Anc: कोल्हापूर महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या निकृष्ट कामावरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. मक्तेदारांचे किसे भरण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी काम करत आहेत का ? अशा शब्दात या दोघांनी आयुक्तांसमोर अधिकाऱ्यांची कान उघडणे केली आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे असं असताना रस्त्यांसह सर्व कामे निकृष्ट होत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे. त्यामुळेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर महानगरपालिका तातडीने मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. पालकमंत्री आणि शहराचे आमदार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. दरम्यान पत्रकारांची बोलताना पालकमंत्री आबिटकर आणि आमदार क्षीरसागर यांनी निकृष्ट कामे अधिकाऱ्यांनी सुधारणे घेतली नाही तर त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 04, 2025 03:03:14
Pune, Maharashtra:मावळ तालुक्यात उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून त्यामुळे उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. मावळात उसाचे देखील पीक घेतले जाते. मात्र या हंगामात उसावर तांबेरा रोगाचा जोरदार प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पानांवर लालसर ठिपके, पाने कोमेजणे आणि उसाची वाढ खुंटणे असे लक्षणे या रोगामुळे दिसून येत आहेत. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना शेतकऱ्यांच्या शेतांवर ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करणार आहे. या उपक्रमामुळे अल्प वेळात मोठ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे. मावळातील शेतकऱ्यांसाठी तांबेरा रोग ही चिंतेची बाब ठरत असतानाच, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने हाती घेतलेली ही उपाययोजना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आणि कारखान्याचा पुढाकार यामुळे उसाच्या उत्पादनाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
3
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 04, 2025 03:02:44
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 04, 2025 02:46:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कारने दुचाकीला उडविले या अपघातात पैठण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्षसह एकाचा मृत्यू झालाय, भाऊसाहेब पिसे हे पैठणचे माजी उपनगराध्यक्ष तर त्यांच्या सोबत असलेले शिक्षक संभाजी कर्डिले यांचा मृत्यू झालाय.. पैठण - छत्रपती संभाजीनगर रोडवरील पेट्रोल पंप जवळ वळण घेत असताना शेवगाव कडून येणाऱ्या भरधाव कारने या दोघांना चिरडले यात त्यांची दुचाकी जवळ पास पन्नास फुट लांब फरफटत गेलीय, या अपघाता नंतर कार चालक फरार आहे, या घटनेची नोंद पैठण पोलिस ठाण्यात करण्यात आली,पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 04, 2025 02:46:37
Nashik, Maharashtra:नाशिककरांसाठी संध्याकाळी दिल्ली नाशिक विमान सेवा सुरू होणार नाशिककरांसाठी आनंदाची बातमी इंडिगोने दुसरी विमान सेवा येत्या २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केलीये... ही सेवा सायंकाळी असल्याने दिल्लीत सायंकाळपर्यंत संपेल त्यांना नाशिकमध्ये त्याच दिवशी रात्री परतणे शक्य होणार आहे....सध्या सुरू असलेल्या सेवेत सकाळी ६.२५ वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे विमान नाशिकच्या ओझर विमानतळावर सकाळी ८.२० वाजता पोहोचते...त्यानंतर ओझर विमानतळावरून ते सकाळी ९ वाजता रवाना होते.. आणि दिल्ली येथे सकाळी १०.५५ वाजता पोहोचते. परंतु दिवसभर काम झाल्यानंतर नाशिकला पुन्हा परतायचे असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या विमानाची वाट पहावी लागत असे. मात्र असं होणार नाहीये नाशिककरांसाठी रात्री ८.५० ला विमान दिल्लीहून उड्डाण घेईल आणि रात्री १०.३५ नाशिक मध्ये पोहोचेल... यामुळे दिल्लीतील काम एक दिवसात पूर्ण करून नाशिकचे प्रवासी पुन्हा घरी परततील...
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 04, 2025 02:45:54
Pune, Maharashtra:पाच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत मावळातील परदवडी, धामणे, गोडुब्रे, साळुंब्रे, दारुंब्रे, सांगावडे आणि मुळशी तालुक्यातील नेरे या सहा गावांवरील रिंगरोड आणि टीपी स्कीमच्या संकटाचा मुद्दा शेतकऱ्यांनी जोरदारपणे मांडला. या प्रकल्पामुळे शेतकरी भूमीहीन होऊन देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच संत तुकाराम साखर कारखान्याच्या ऊस उत्पन्नावर याचा थेट परिणाम होणार असल्याने हा कारखान्यासाठीही नुकसानीचा सौदा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शासन दरबारी ठोस विरोधासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी या गावांतील शेतकऱ्यांनी केली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 04, 2025 02:18:09
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या कार्यालयासमोर परसवाडा (दे) ग्रामपंचायतचे उपसरपंच पवन खवास यांनी हलगी वाजवत दंवडी देत अनोखे आंदोलन केले. भंडारा–तुमसर–बालाघाट हा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, वारंवार होणाऱ्या अपघातांस कारणीभूत ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात तसेच सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय भूमिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान खड्डेमय महामार्गावर श्रद्धांजली वाहून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
3
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 04, 2025 02:17:57
Yeola, Maharashtra:दिनांक 3 ऑक्टोबर रात्री दहा वाजेच्या सुमारास एस एस मोबाईल येवला समोर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात येवल्यातील व्यावसायिक पिंटू आहेर यांचे दुःखद निधन झाले या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या नगर - मनमाड महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे धुळे संभाजीनगर महामार्गावर कन्नड घाटातील अवजड वाहतूक येवला मार्गे सुरु असून त्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे यापूर्वीही विंचूर चौफुली या ठिकाणी एका चिमुरडीसह अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे दरम्यान रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे दिशादर्शक फलकांवर होत असलेली जाहिरात बाजी यामुळे अशा अपघातांना आणखी निमंत्रण होत आहे आता येवल्यातील प्रशासन यंत्रणा बायपास मंजुरीसाठी प्रयत्न करणार की आणखी जीव जाण्याची वाट पाहणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला है
4
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 04, 2025 02:00:55
Chendhare, Alibag, Maharashtra:राष्ट्रवादीशी युती नको म्हणणाऱ्या शिवसेना नेत्यांना सुनील तटकरे ने सुनावलं ...... तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा ...... हम कहाँ कह रहे हैं कि युती करनी है इसलिए ? ....... खासदार सुनील तटकरे ने उड़वली खिल्ली ....... जिल्हा परिषद और पंचायत समिति निवडणुकांचे वारे वहायला लागले आहेत तरी रायगड जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आलबेल असल्याचं चित्र नाही. शिवसेना और राष्ट्रवादी काँग्रेस हा दोन्ही पक्ष एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही , असं वारंवार सांगत असतानाच भाजपनेदेखील राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेना नेत्यांची खिल्ली उडवली. कुणाला काय ठरवायचं ते ठरवू दे ,युती करायची आहे असं आम्ही कुठं म्हणतोय असा सवाल तटकरे यांनी केलाय. त्यांनीच बोलायचं, त्यांनीच ऐकायचं आणि त्यांनीच उत्तर द्यायचं असं सध्या सुरू असल्याचं ते म्हणाले. बाईट १ - महेंद्र दळवी, आमदार बाईट २- सुनील तटकरे , खासदार
0
comment0
Report
CFChandrakant Funde
Oct 04, 2025 01:45:23
Pune, Maharashtra:मराठवाड्यात अतिवृष्टी के कारण पुणे में पढ़ रहे गावाकड के विद्यार्थियों की आर्थिक स्थिति गंभीर हो गयी है। उदाहरण के तौर पर नांदेड के महेश पंढरी जाधव, सालवडगाव की हर्षदा भापकर, बीड के महेश मते, जालना के निकिता पंखुले, व शिरूर कासार की आदित्य भोसले आदि की कहानी सुनाई देती है। इन विद्यार्थियों के अनुसार पानी ने शेतात फल-फसलों को बर्बाद कर दिया है और मेस, tuition, किराया आदि खर्चे बढ़ गए हैं। कई छात्रों के पिता गांव से पैसे भेज नहीं पा रहे हैं या वेतन से खर्च नहीं उठा पाते हैं। वे पुणे के SP College, Fergusson College आदि में पढ़ते हैं और अब उनकी पढ़ाई जारी रखने के लिए आर्थिक सहायता जरूरी हो गई है। फीड में इन विद्यार्थियों के बैंक खाता नंबर, IFSC कोड और मोबाइल पे नंबर साझा किए गए हैं ताकि दर्शक सीधे मदद कर सकें। महेश पंढरी जाधव (बैंक अकाउंट: 60464859241, MAHB0000041, Bank of Maharashtra, Tilak Road, Pune); हर्षदा भापकर (60382866045, MAHB0001104, Bank of Maharashtra, Savitribai Phule College area); महेश रामभाऊ मते (60543703871, MAHB0000158, Bank of Maharashtra, Pune Parvati); निकिता मदन पंखुले (5651317079, CBIN0281019, Central Bank of India); कोमल गजानन करडेल (60215465309, MAH80001079, Bank of Maharashtra, Varud); देवेंद्र अरुण ठाकरे (50100730351780, HDFC0005684, HDFC Bank, Digras); अनिरूद्ध नरोबा काळे (80082619609, MAHG0004213, Maharashtra Rural Bank, Gangajed); आदित्य आत्माराम भोसले (कर्ज संबंधी विवरण); अन्य.stream में भी अतिवृष्टी से प्रभावित परिवारों की कहानियाँ शामिल हैं, ताकि दूरदर्शन/टीवी चैनल के माध्यम से दर्शक सहायता प्रबंध कर सकें।
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 04, 2025 01:16:43
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडात शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली तटकरे यांनी राजीव साबळे यांना पक्षात घेऊन गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव काढायला लावले असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला होता. साबळे यांच्या शैक्षणिक संस्थांना आम्ही देखील मदत केलीय असंही आमदार दळवी म्हणाले. त्याला राष्ट्रवादीचे नेते राजीव साबळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महेंद्र दळवी हे खोटं बोलत आहेत. नाव बदलण्याचा निर्णय हा माझा नव्हे तर शिक्षण संस्थेचा होता. आणि आमच्या शैक्षणिक संस्थेला भरत गोगावले, महेंद्र दळवी किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दमडीचीही मदत केली नाही. जर त्यांनी मदत केल्याचं दाखवून दिलं तर मी राजकारण सोडतो नाहीतर त्यांनी सोडावं असं थेट आव्हानच साबळे यांनी दिलं आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 04, 2025 01:16:27
Akola, Maharashtra:धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात आयोजित बौद्ध महासभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी समाजाचा उल्लेख करताना म्हटलं की, “ओबीसींना सर्वात मोठा विश्वास आरएसएस आणि भाजपवर आहे, मात्र सर्वात मोठा घातही ह्याच दोघांनी केला आहे. त्यामुळे ओबीसींना स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागेल तर ओबीसींना वंचित शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.” असे ते म्हणाले. मोहन भागवत यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले,“ मोहन भागवत कधी शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात गेले आहेत का? आज मी बोललो म्हणून कदाचित पुढच्या आठवड्यात ते जातील.” या वेळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. पाकिस्तानमध्ये बाहेरील शस्त्रसाठा पोहोचत असल्याने भविष्यात पाकिस्तान भारताला गुलाम बनवू शकतो, असा इशारा देत त्यांनी “ही परिस्थिती टाळायची असेल तर नरेंद्र मोदींना बाय बाय करा.” असं आवाहन केलं. मोदी स्वतःचा अहंकार जपण्यासाठी देशाची आहुती देत असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला. तसेच, शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घेणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 03, 2025 15:51:39
Pandharpur, Maharashtra:वाढदिवस साजरा करण्या ऐवजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सीना नदीचा पूर ओसरल्यानंतर केवड व वाकाव गावात ट्रॅक्टर मधून जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने अधिक बाधित गावं आहेत. सीना नदीच्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या गावांना जोडणारे रस्ते चिखলमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली, अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले, असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला. सर्व प्रशासन आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी घरांचे नुकसान, जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता, नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ, गहू, जेवण तसेच जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, शेती पिकाच्या नुकसानबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी ₹10,000 मदत रक्कम जमा केली आहे.
4
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top