Back
फर्जी कोर्ट के डिजिटल अरेस्ट से लाखों की ठगी, नाशिक में दो घटनाएं सामने
SGSagar Gaikwad
Oct 14, 2025 03:20:22
Nashik, Maharashtra
सरन्यायाधीशांच्या फेक कोर्टात डिजिटल अॅरेस्ट करत लाख उकळले...तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या 6 कोटी रुपये उकळले....
अँकर
नाशिक शहरातील एका सेवानिवृत्त ज्येष्ठाला महिनाभर डिजिटल अरेस्ट करत तुम्हाला सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांच्या सुप्रीम कोर्टात ऑनलाइन हजर करण्यात आले आहे, असा बनाव सायबर गुन्हेगारांनी रचत बनावट कोर्टरूममध्ये न्यायदान मंचावर सरन्यायाधीश विराजमान असल्याचे व्हिडीओ कॉलद्वारे भासवून ७१ लाख रुपये आरटीजीएसद्वारे भरणा करण्यास भाग पाडून गंडविल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आलाय..गंगापूररोड परिसरात सत्तरी ओलांडलेले सेवानिवृत्त दाम्पत्य एका बंगल्यात वास्तव्यास आहेत. ७४ वर्षीय वृद्ध नागरिकाला व्हाट्सअप द्वारे २६ ऑगस्ट रोजी ऑडिओ कॉल आला. या कॉलद्वारे त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती सायबर गुन्हेगारांनी जाणून घेत त्यांच्या नावावर मुंबईत क्रेडिट कार्ड काढले गेले आहेत, असे खोटे सांगितले. या क्रेडिट कार्डाद्वारे बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार झाले असून मनी लॉड्रिंगमध्ये तुमचा सहभाग असण्याची भीती दाखविली गेली. त्यामुळे ते घाबरले. त्यांनी सायबर गुन्हेगाराने जसे सांगितले तशीच कृती करणे सुरू ठेवले दरम्यान, घटनेत दुसऱ्या उच्चशिक्षित वृद्धाला त्यांच्या मोबाइलवरून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहे, असे सांगून 'डिजिटल अॅरेस्ट'ची कारवाई केल्याचे सायबर गुन्हेगारांनी सांगितले. दीड महिना त्यांच्याशी व्हिडीओ, ऑडिओ कॉलवर संपर्क साधून ऑनलाइन कोर्टात हजर करण्याचा बनाव रचून तब्बल ६ कोटी २५ लाख रुपये हडपले. नाशिकमध्ये एकापाठोपाठ या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सायबर क्राइम पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowOct 14, 2025 07:35:570
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 14, 2025 07:31:350
Report
KPKAILAS PURI
FollowOct 14, 2025 07:17:500
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 14, 2025 07:17:350
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 14, 2025 06:47:180
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 14, 2025 06:31:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 14, 2025 06:18:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 14, 2025 06:04:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 14, 2025 06:03:260
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 14, 2025 05:45:550
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 14, 2025 05:36:170
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 14, 2025 05:18:352
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 14, 2025 05:07:250
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 14, 2025 05:03:140
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 14, 2025 04:55:410
Report