Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422103

नांदूर मधमेश्वर-शिर्डी कालव्याच्या काँक्रीटीकरणच्या विरोधातील farmers का तीव्र विरोध

SKSudarshan Khillare
Oct 26, 2025 01:17:33
Sinnar, Maharashtra
नांदूर मधमेश्वर-शिर्डी उजव्या कालव्याच्या काँक्रीटी अस्तरीकरणाच्या प्रस्तावित कामाला निफाड आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील तारुखेडले, खानगाव, करंजी आणि तामसवाडी, तर सिन्नर तालुक्यातील सोमठाणे, वडांगळी आणि चोंडी-मेंढी येथील शेतकरी एकत्र येत कालव्यात उतरून कामाला विरोध दर्शविला शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याला निवेदन देऊन काँक्रीटी अस्तरीकरण तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, कालव्याचे काँक्रीटीकरण झाल्यास पाण्याची नैसर्गिक गाळण्याची प्रक्रिया थांबेल, परिणामी पाण्यातील गोडवा कमी होऊन खारटपणा वाढेल. या क्षारयुक्त पाण्यामुळे शेतीयोग्य जमीन निकृष्ट होईल तसेच पिण्याच्या पाण्यावरही दुष्परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 26, 2025 04:04:03
Hingoli, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुतीतील आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा दिला असून हिंगोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा इशारा दिल्यानंतर भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केलीय. ईट का जवाब पत्थर से दिया जायेगा असा ईशाराच बांगर यांना आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिलाय, आपल्या भाषणातून दिलाय,आमदारकीचे 11 वर्ष कार्यपूर्तीचा सोहळा आयोजित केला होता,यावेळी भाजप आमदार तानाजी मुटकुळे बोलत होते,आता दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा त्यांचा बोलतांना सूर होता. यावेळी व्यासपीठावर मंत्री मेघना बोर्डीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चआव्हान चव्हाण उपस्थित होते...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 26, 2025 04:03:46
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 26, 2025 04:01:39
Chendhare, Alibag, Maharashtra:गेटवे से मांडवा जलवाहतूक सेवा बंद है। खराब मौसम के कारण मेरीटाइम बोर्ड का निर्णय लिया गया है। मुंबई में लौटने वाले पर्यटकाँ की गैर-सुविधा हो रही है। अँकर - खराब मौसम का फटका जलवाहतूक सेवेला लगा। गेट वे से मांडवा जलवाहतूक सेवा कल संध्याकाल से ही बंद कर दी गई है। हवामान खात्य के इशारे पर रायगड की किनारों पर तीन नंबर का बावटा लगाया गया है। जोरदार हवाओं से लहरों का प्रहार बढ़ गया है। इसलिए यह सेवा बंद रखने का निर्णय मेरी टाइम बोर्ड ने लिया है। इस मार्ग के नियमित यात्रियों को इसका नुकसान हुआ है। अलिबाग मुरूड क्षेत्र में छुट्टियाँ मनाने आए पर्यटक अब वापसी के लिए सड़क मार्ग अपनाने को मजबूर होंगे।
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 26, 2025 03:48:16
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 26, 2025 03:48:00
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये आज शिवसेनेचे 'शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती या शिबिराला राहणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात आयोजित या शिबिरात शिवसेनेतर्फे तयार करण्यात आलेल्या लक्ष्यवेध अँप, धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाबद्दल माहिती देण्यात येईल. शिवाय संघटन बांधणी, राजकारणात महिलांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दोन हजार पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत झाले आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना संघटनात्मक कौशल्य, संवादकौशल्य, समाज माध्यमांचा प्रभावी वापर आणि सामाजिक जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 26, 2025 03:47:33
Nashik, Maharashtra:२७३ बेशिस्त रिक्षा जप्त ,१४७ चालक-मालकांवर गुन्हे : 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला...' या मोहिमेपाठोपाठ रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला खाकीचा दणका हे अभियानदेखील पोलिसांनी हाती घेतलेय..एकीकडे राजाश्रय घेत गुंदगिरी फोफावणाऱ्यांचा 'बंदोबस्त' केला जात आहे, तर दुसरीकडे शहर पोलिसांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक ही शिस्तीत अन् कायद्याच्या चौकटीतच करायला हवी, अन्यथा रिक्षा जप्त अन् गुन्हे दाखल करण्याचा धडाकाही सुरू झाला आहे. पंधरवड्यात पोलिसांनी २७३ रिक्षा जप्त केल्या असून, १४७ बेशिस्त व गैरवर्तन करणाऱ्या चालक-मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक शहर व परिसरातील प्रमुख रस्त्यांवर बहुतांश रिक्षाचालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत गुन्हेगारी प्रवृत्तीची वर्तणूक करीत ग्राहकांसोबत गैरवर्तन केले जात असलेल्या तक्रारी एकापाठोपाठ पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर प्राप्त होत होत्या. वाहतुकीला शिस्त लागावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षачालकांची मुजोरगिरी थांबवावी, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त किरिथिका सी.एम यांना कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस निरीक्षकांनाही त्यांच्या हद्दीत रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा खपवून घेऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले. बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाईला वेग आला आहे. वाहतूक पोलिसांसह 'खाकी' पोलिसांकडूनसुद्धा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 26, 2025 03:46:51
Amravati, Maharashtra:अमरावती–परतवाडा मार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 9 जण गंभीर जखमी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा–अंजनगाव रोडवर आज भीषण अपघात झाला आहे. बस आणि क्रूझर गाडीचा समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहे. अपघात इतका भीषण होता ki दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अजून समजलेले नाही.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 26, 2025 03:46:29
Nagpur, Maharashtra:भंडारा-गोंदिया मध्ये महायुती होणार नाही.. खुल्या वर्गातील 80% जागांवर भाजप ओबीसी उमेदवार देणार... पूर्व विदर्भासाठी भाजपची विशेष रणनीती भाजप राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढण्याच्या मनस्थितीत नाही.. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भाजपने महायुती करण्यापेक्षा स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू केलीय.. भंडारा आणि गोंदिया मध्ये भाजपने नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.. ही कार्यकर्त्यांची निवडणुका असून कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी भाजपने स्वबळाचा निर्णय घेतला असून मित्र पक्षांनीही तो मान्य केल्याची माहिती भाजप आमदार परिणय फुके यांनी दिली आहे... ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून भाजपवर जोरदार हल्ले होत असताना, भाजपने ओबीसी मतांवरील आपला दावा मजबूत करण्यासाठी ही भाजपने विशेष रणनीती आखल्याची माहिती फुके यांनी दिली.. भाजप खुल्या वर्गातील 80% जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याचे फुके म्हणाले... दरम्यान याबाबत बातचीत केली आहे भाजपा आमदार परिणय फुके यांच्याशी
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 26, 2025 03:34:17
Nashik, Maharashtra:नाशिक महापालिका निवडणुकांच्या आता अंतिम प्रभाग रचनेनंतर अपेक्षेनुसार आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. २०११ ज्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या कायम राहणार असून, ते प्रभाग निश्चित असणार आहेत. त्यामुळे ओबीसी आणि महिला आरक्षण काढण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासनाने आदेश निर्गमित केले असून, ते नाशिक महापालिकाला अधिकृत आदेश प्राप्त झाले आहेत. याआदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभाग प्रणालीवर होणार आहेत. त्यासाठी २०११ मध्ये असलेल्या जनगणनेनुसार असलेले प्रमाण विचारात घेऊन आरक्षणाचे चक्र निश्चित करण्यात आले आहे. लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण निश्चित असणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 26, 2025 03:32:18
Nashik, Maharashtra:दिवाळीत फटाक्यांमुळे शहरात गतवर्षीच्या तुलनेत वायू प्रदूषणात दीडपट वाढ अँकर दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे नाशिक शहरातील प्रदूषणात गेल्या वर्षाच्या तुलनेत दीड पटीने तर ध्वनिप्रदूषणात ५ टक्क्याने वाढ झाल्याची नोंद प्रदूषण मंडळाच्या यंत्रणांमधूनझालीये... त्यात इंदिरानगर भागातील पांडवनगरी परिसरातील हवा​चा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल २११ पर्यंत गेल्याने येथील हवा सर्वाधिक प्रदूषित राहिल्याचे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शहरात मागील तीन दिवसांत हवा​चा सरासरी गुणवत्ता निर्देशांक ६६ असल्याचे दिसून आले असून, शहरात चांगल्या दर्जाच्या हवेची नोंद करण्यात आली आहे.शहरात उद्योग भवन, केटीएचएम, सातपूर एमआयडीसी, आरटीओ कॉलनी, मनपा इमारत व पंचवटी भागातून हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजला जातो. या वर्षी सरासरीने १७४ एक्यूआय मोजला गेला. ज्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास, दम लागणे, सर्दी, खोकला, फुप्फुसाचे आजार होतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) केलेल्या नोंदीनुसार पांडवनगरी परिसरात सर्वाधिक प्रदूषण झाले असून, भाऊबीजेपासून शहरात पुन्हा शुद्ध हवा निर्माण झाली आहे. केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नाशिक शहरात गंगापूररोड, हिरावाडी, अंबड एमआयडीसी आणि पाथर्डी भागातील पांडवनगरीत हवा प्रदूषणाची नोंद करण्यात आली. अर्थात, नाशिकची हवा शुद्ध असल्याच्या नोंदी सतत होत असताना दिवाळीत काही प्रमाणात प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे....
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 26, 2025 03:32:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे श्री स्वामी समर्थ नगरी गजबजली, दोन दिवसात तब्बल एक लाख भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी - दोन दिवसात एक लाख भाविकांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन - दिवाळी, पाडवा तसेच शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी - स्वामींच्या दर्शनानंतर महाप्रसाद घेण्यासाठी श्री अन्नछत्र मंडळांमध्ये देखील भक्तांची गर्दी - सुट्ट्यानिमित्त भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी मंदिर समितीची विशेष व्यवस्था
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 26, 2025 03:22:10
1
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 26, 2025 03:20:46
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्याच होतच नव्हतं केलं.... धान पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत.... भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.... भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील शेतकरी धान पीक घेत असतात. आता ऑक्टोबर महिन्यात धान कापणीला आले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीवर धान पीक कापणी करून ठेवली, नंतर मळणी करून धान घरी नेणार होते. पण पावसाने होत्याच नव्हतं केलं.... काल सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली व शेतात कापून ठेवलेलं धान संपूर्ण पाण्याखाली गेल. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून धान पिकांची लागवड केली पण सर्व काही पावसाने हिरवून नेल. आधीच शेतकरी कर्ज काढून कसा बसा सावरण्याचा प्रयत्न करतो पण अस्मानी संकट शेतकऱ्याला उभाच होऊ देत नाही. आता शेतकऱ्यांनी जगाव की मरावं असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top