Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

चांदवड किसानों का आमरण उपोषण खत्म, कृषि समिति बनाने की घोषणा

SKSudarshan Khillare
Feb 26, 2026 11:00:48
Yeola, Maharashtra
चांदवड (नाशिक) ब्रेकिंग. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आमरण उपोषण अखेर सुटले. शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव यांची शिष्टाईला यश. कांदा आणि मका या पिकांना कमी दर मिळत आहे म्हणून शेतकरी अडचणीत आला. उपोषणकर्त्यांच्या भावनांशी शासनही सहमत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार माजी आमदार पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची स्थापना. येणाऱ्या चार दिवसाच्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळांच्या मागण्यावर चर्चा घडवून आणणार, त्यातून त्यांचं समाधान होईल.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Feb 26, 2026 12:06:23
Shirur, Maharashtra:*शिक्षकाला मारहाण प्रकरणी १२ जणांवर अखेर गुन्हा दाखल* शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील शिक्षकाला मारहाण प्रकरणी अखेर शिरुर पोलीसांत १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सविंदणे येथील शाळेत आध्यायनाचे कार्य करणा-या नितीन चव्हाण या शिक्षकाला कवठे येथील १२ तरुणांनी घरातुन उचलुन घेऊन जाऊन लाठ्या काठ्या आणि हॉकी स्टिक ने मारहाण केली होती, या मारहाणीचा ग्रामस्थांसह विद्यार्थींनी निषेध व्यक्त करत गावबंद आंदोलन केलं होतं,आता या प्रकरणी शिरुर पोलीसांनी शिक्षक नितीन चव्हाण यांच्या तक्रारीवरुन १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे शिक्षकाच्या मारहाणीचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 26, 2026 11:51:40
Yeola, Maharashtra:मंत्री दादा भुसे on विमान कंपनी ज्या पद्धतीने विमानाच्या कंपनीच्या अपघात... विमान कंपनीचे ऑडिट करण्यात आले त्यामध्ये बरेचसे दोष दिसून आले... आम्ही शिंदे साहेबांना विनंती केली कि आपला भरोसा प्रवास विमानाच्या माध्यमातून असतो... त्यामध्ये काळजी घेणे गरजेचे... अशी विनंती आणि शिंदे साहेबांना केलेली... मंत्री दादा भुसे on रोहित पवार गुन्हा दाखल करण्याची मागणी या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे दुसऱ्या दिवशी आश्वासित केलेले... या संदर्भामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली... या भावना मुख्यमंत्री महोदय यांनी केंद्र शासनाला कळवले आहे... सीबीआय चौकशीच्या माध्यमातून सर्व गोष्टी पुढे येतील... रोहित पवारांच्या ज्या काही बाबी समोर आलेले आहे त्या पद्धतीने त्यांची ती मागणी... या विषयाच्या संदर्भामध्ये सीबीआय कडे चौकशी देण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं... मंत्री दादा भुसे on पाशा पटेल कांद्या संदर्भात समिती माननीय आशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा आत्ताचा विषय... तेही शेतकरी नेते आहे.... शेतीच्या संदर्भातला सर्व कश ज्ञान आहे... शेतकऱ्यांच्या पासून ते अगदी निर्यातीपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधून त्यांनी शासनाला अहवाल द्यायचा.... कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळू शकेल... ग्राहकांनाही वाजवीदरामध्ये कांदा उपलब्ध होईल... शासनाच्या वतीने कांदा चाळीचे प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून... असं काही केलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल... मंत्री दादा भुसे on शासकीय मका खरेदी या संदर्भात मागच्या कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झालेली.... माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात केंद्र सरकारला कळवलेले... कोठा कालावधी वाढवून द्या... यासाठीच्या ज्या काही सुविधा बारदान, गोडाऊन असेल कार्यरत करा.... शेतकऱ्यांचा माल खरेदी करा या सर्व सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले...
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 26, 2026 11:39:26
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash लाँगमार्चची पालकमंत्र्यांच्या गावाकडे कूच... मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च पालकमंत्री विखे पाटलांच्या गावात धडकणार... आंदोलक संगमनेरहून लोणीच्या दिशेने पायी चालत निघाले... दुपारपर्यंत सरकारच्या निर्णयाची बघितली वाट... मात्र सरकारकडून कुठलाही निरोप न आल्याने लाँगमार्च लोणीच्या दिशेने निघाला... काल आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा... मात्र काही मागण्यांबद्दल अद्यापही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार... हजारो आंदोलक पालकमंत्री विखे पाटलांच्या लोणी गावात देणार ठिय्या... आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राजूर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा लाँगमार्च... लोणी कडे निघालेल्या लॉन्ग मार्च मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 26, 2026 11:33:24
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिका ने जलसंपदा विभाग की पाणीपट्टी थकवली आहे. सात दिवसात साडेसहा कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास पंढरपूरकरांवर जल संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंढरपूर नगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील रहिवाशांना दररोज पाणीपुरवठा केला जातो सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या बंधार्‍यात मुबलक पाणीसाठा आहे मात्र नगरपालिकेने मागील काही महिन्यांपासून जलसंपदा विभागाची सहा कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी भरली नाही. त्यामुळे काल जलसंपदा विभागाकडून पंढरपूर नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे पंपिंग स्टेशन सील करण्याचा प्रयत्न झाला मात्र सात दिवसांची मुदतवाढ मागितल्यामुळे जलसंपदा विभागाने नगरपालिकाेला सात दिवसांची मुदत दिली आहे मात्र सात दिवसांमध्ये जर ही रक्कम भरली नाही तर पंढरपूरकरांना जल संकटाला सामोरे जाण्यात लागण्याची शक्यता आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 26, 2026 11:21:42
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 26, 2026 10:54:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगरात फेरीवाल्यांचा उन्माद वाढला आहे आणि त्यातूनच बुधवारी एका दांपत्याला मारहाण झाली , महापालिकेने तातडीने याची गंभीर दखल घेतली आणि आज सकाळी शहागंज भागात अतिक्रमणांची तोडफोड सुरू केली. फेरीवाल्यांचा उन्माद आता यापुढे सहन करणार नाही असा इशाराच या कारवाईतून महापालिकेने दिला... किरकोळ करणातून फेरीवाल्यांनी बुधवारी शहागंज भागात एक दाम्पत्याला मारहाण केली, कारण फक्त दुचाकी काढण्यासाठी हातगाडी वाल्याला बाजूला व्हायला सांगितले इतकाच त्यातून या फेरीवाल्यांनी घोळका करून दाम्पत्याला मारहाण केली, त्यातील काही मंडळींनी तर थेट चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला तर 5 महिन्यांच्या गर्भवतीला सुद्धा या मंडळींनी सोडले नाही.. या सगळ्याची गंभीर दखल महापालिकेने घेतली, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी फेरीवाल्यांचा उन्माद सहन करणार नाही असा इशारा देत पोलिसांनी दोशींवर कारवाई करावी आणि अतिक्रमनावर महापालिका कडक कारवाई करणार असा इशारा दिला.. राजेंद्र जंजाळ , उपमहापौर लागलीच शहागंज परिसरात आज सकाळी महापालिकेचे पथक धडकलं आणि परिसरातील अतिक्रमण निष्कासित करण्यास त्यांनी सुरुवात केली.. या भागात आता फेरीवाल्यांनाही राहू देणार नाही आणि दुकानांचेही अतिक्रमण ठेवणार नाही असं सांगत थेट अतिक्रमण पाडायला सुरुवात केली. यापुढे असं काहीही सहन करणार नाही आणि जर यात विरोध करायला नगरसेवक आलेत तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी महापालिकेने दिला.. संतोष वाहूळे, अतिरिक्त आयुक्त मनपा गेली काही दिवस शहरातील सर्वच भागात फेरीवाले पाहिजे तिथे गाड्या लावतात आणि व्यवसाय करतात यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतोय.. महापालिकेने अनेक वेळा यावर कारवाई केली आहे मात्र थातूरमातूर कारवाईनंतर ही मंडळी पुन्हा येतात मात्र बुधवारच्या घटनेनंतर आता महापालिका आणि लोकप्रतिनिधी सगळेच आक्रमक झाले आणि इथून पुढे फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरू राहणार असे संकेत महापालिकेने आजच्या कारवाईतून दिले आहे.. विशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 10:45:33
Kalyan, Maharashtra:डोंबिवली में रहने वाली 19 वर्षीय निधी तिवारी के बैंक खाते में लगभग अडीच करोड़ की गैरव्यवहार का मामला सामने आया। पुलिस ने संबंधितों पर कार्रवाई न होने पर छात्रा उपोषण पर उतरने का इशारा किया। मनसे नेते अविनाश जाधव से मुलाकात हुई। निधी ने बताया कि मेरे वडील के मित्र की बेटी चांदनी सिंह ने निजी बैंक में काम करते हुए मुझे दस्तावेज मांगे, जिनका गलत इस्तेमाल कर मेरे बैंक खाते से लगभग 2 करोड़ 60 लाख का गैरव्यवहार किया गया। इसके बाद मैंने तीन दिसंबर 2025 को थाने में शिकायत दर्ज कराई, पर पुलिस ने चांदनी को बुलाकर पूछताछ कर छोड़ दिया। मैं कई बार थाने गई, पर कोई कार्रवाई नहीं हुई। अंततः मैं मनसे के अविनाश जाधव के पास गई और उन्होंने पुलिस को जवाब देने में मदद की। पुलिस ने उक्त गैरव्यवहार के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की है। रामनगर पुलिस स्टेशन میں इसकी चौकसी चल रही है।
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 26, 2026 10:40:04
Ambernath, Maharashtra:अंबरथड में वनविभागाच्या जागेत रस्त्याचं काम सुरू वनविभागाची परवानगी न घेताच अनधिकृतपणे काम पालिकेनं ठेकेदाराला अर्ध बिलही दिलं अंबरनाथमें वनविभागाची कोणतीही एनओसी या परवानगी न घेता जावसई ठाकूरपाडा परिसरातील वनविभागाच्या जागेत पालिकेकडून रस्ता बांधण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पूर्ण काम न करताही या ठेकेदाराला पालिकेने रस्त्याच्या कामाचं अर्ध बिल सुद्धा अदा केलंय. त्यामुळे याप्रकरणी संबंधित ठेकेदारांसोबतच अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली जातेय. सुरेश वाघे यांच्या घरापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा विषय मंजूर करण्यात आला होता. Yासाठी एक कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याचा अर्ध्यापेक्षाही जास्त भाग हा वनविभागाच्या जागेत येत असून उर्वरित भाग हा आदिवासी जागेतून जातो. आदिवासी जागेतून जाणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण निवडणुकीपूर्वी करण्यात आलं असून ते देखील अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही. वनविभागाच्या जागेतला उर्वरित रस्ता करण्याचा प्रयत्न मागील वर्षी याच ठेकेदाराने केला असता वनविभागाने अंबरनाथ नगर परिषदेसह संबंधित ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल केला होता. तसंच वनविभागाची जागा जिथून सुरू होते तिथे मार्किंग म्हणून दगडही बसवले होते. मात्र तरीही आता पुन्हा एकदा वनविभागाला अंधारात ठेवून त्यांची कोणतीही एनओसी न घेता परस्पर या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या ठेकेदाराला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ८१ लाख ४२ हजार ६७७ रुपयांचं बिल सुद्धा अंबरनाथ नगरपालिकेने अदा केलं आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या जिल्हा परिषद शाळेपर्यंत हा रस्ता जातो, ती शाळा कल्याण तालुक्यात है. त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करणं अपेक्षित असतानाही जो भाग अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीतच येत नाही, तिथे रस्ता तयार करून ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा आणि अंबरनाथच्या जनतेला चुना लावण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका आता होऊ लागत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 10:35:27
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ते नोटरी करारावातील घर घेतलेल्या मालकांच्या नावे टॅक्स लावून द्या.. महानगरपालिकेचे उत्पन्नात भर पडेल..नगरसेवक दीपेश म्हात्रे डोंबिवलीत नोटरी करारावर विक्री झालेल्या हजारो खोल्यांचा कर नवीन मालकाकडे हस्तांतरित करण्यास परवानगी भाजपा चे नगरसेवक दिपेशक म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्ता कडे केली आहे नोटरी वरील घरे विकल्यानंतर नवी मालकाच्या नावे टॅक्स हस्तांतरण होत नाही नोटरी वरील घराना त्यांच्या नावे टॅक्स हस्तांतरण करा जेणेकरून कोट्यवधीची थकबाकी वसूल होऊन KDMC च्या उत्पन्नात भर पडेल- भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयुक्तांची भेट घेत केली मागणी केडीएमसी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद - दिपेश म्हात्रे यांची माहिती
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 26, 2026 10:17:27
Beed, Maharashtra:बीड: जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर, नोटीस नव्हे आता थेट होणार फौजदारी गुन्हा दाखल..! ANC - कधीकाळी पुरोगामी म्हणून घेणारा बीड जिल्हा आता दोन जातीच्या तेढाचा केंद्रबिंदू बनला आहे. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांच्या एकमेकांविरोधी पोस्ट मुळे जातीय संघर्ष टोकाला गेले आहे. सोशल माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर जातीय तेढ निर्माण करणारे पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर आता बीड पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे. आता नोटीस नाही तर थेट फौजदारी कारवाई करण्याचाच बडगा पोलिसांनी उगारला आहे. बीड जिल्ह्यात सध्या दोन जातीच्या समूहातील संघर्ष विकोपाला गेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर विपरीत परिणाम करणारा ठरला. बीडमध्ये याचा सर्वात जास्त प्रचार झाला आणि त्यातूनच मराठा विरुद्ध वंजारी या जातीमध्ये द्वेषाची आग पसरली गेली. यातच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर थेटपणे वंजारी आणि मराठा समाजातील काही समाजकंटकांनी सोशल मिडियाचा वापर करून हा विकोप टोकालाच नेऊन ठेवला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक अस्वस्थता पूर्णपणे बिघडली. जिल्ह्यात सामाजिक समतोल राखला जावा यासाठी सोशल मीडियावर ऑडिओ, व्हिडिओ आणि द्वेष पसरणारे पोस्ट करण्यावर आता बीड पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आता थेट फौजदारी कारवाई करून अटक करण्याचाच बडगा उगारला आहे. बाईट: नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीडमधील जातीपातीच्या भिंती पाडून सामाजिक समतोल राखण्यासाठी बीड पोलिस प्रशासनाने स्वतःच्या नेमप्लेट वरील आडनाव काढून थेट नाव ठेवले होते. मात्र याच पोलिसांना बीडमधील दोन समाजातील जातीय तेढ कमी करता आले नाही. पूर्वी भांडण तंटे मिटवण्यासाठी सर्व समाजातील ज्येष्ठ एकत्रित यायचे, गावात बैठक बसायची आणि सामाजिक दरी कायमची मिटवून जातीय समीकरणातील रथाची चाके पुर्नरत चालायची. मात्र सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. कधीकाळी पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा हा बीड जिल्हा सध्या जातीय संघर्षाचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागलाय. द्वेष निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई झाली पाहिजे असे मत जाणकार व्यक्त करतायेत... बाईट: नामदेवराव चव्हा़ण, ज्येष्ठ समाजसेवक बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष कायम उध्वस्त करण्यासाठी बीड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर प्रतिबंधक कारवाई म्हणून नोटीस देण्यात येत होती. मात्र सामाजिक परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा तीव्र केला आहे. पोलिसांच्या या निर्णयाचे बीडमधून स्वागत होतेय. तर दुसरीकडे कारवाईचा फास आवळण्यासाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा पवित्रा सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. बाईट: डॉ. प्रदीपकुमार उजेगर, सामाजिक कार्यकर्ते बीडची ओळख जातीय संघर्षाची नव्हे, तर पुरोगामी विचारांची आणि सामाजिक ऐक्याची राहिली आहे. तीच ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी प्रशासनाइतकीच सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. द्वेषाला नाही, तर संवादाला होकार देत सामाजिक समतोल राखणे हाच काळाचा संदेश आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 26, 2026 10:05:42
Nanded, Maharashtra:गांव में तात्पूरती शाळा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात सापडले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रामदास पवार तांडा येथील हा प्रकार आहे. हा भाग बंजारा बहुल भाग असून अनेक तांडे या भागात आहेत. या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरु करावी यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यानंतर 2017 साली रामदास पवार तांडा येथे जिल्ह्या परिषदेने तात्पूरती शाळा दिली होती. पवार यांनी दान दिलेल्या जागेत सांभामंडपात ही शाळा सुरु होती. पण काही महिने एक शिक्षक आला. पण सहा महिन्यानंतर ही शाळा बंद पडली. सध्या इथे प्राथमिकचे जवळपास 35 विद्यार्थी आहेत. पण शाळा नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडत आहे. सात ते आठ किलोमीटर दुरावर असलेल्या शाळेत कधी विद्यार्थी जातात कधी नाही. शाळा नसल्याने बहुतांश वेळा विद्यार्थी आपल्या उसतोड आई वडिलांसोबत कामाला जातात.
0
comment0
Report
Advertisement
Back to top