Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001

नागपुर-वर्धा रेलवे मार्ग पर GT एक्सप्रेस के डब्बे में आग, यात्रियों को बाहर निकाला गया

AKAMAR KANE
Feb 17, 2026 07:36:32
Nagpur, Maharashtra
नागपूर - वर्धा रेल्वे मार्गांवर सिंधी रेल्वे जवळ जीटी एक्सप्रेसच्या एका डब्याला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग लागल्यानंतर काही वेळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. रेल्वे प्रशासनाने तात्काळ हालचाल करत ट्रेन थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रवाशाला इजा झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी डॉक्टरांची टीम आणि आपत्कालीन पथक दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे. पार्सलचा रेलवे डब्बाला ही आग लागलाच दिसून येतेय...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Feb 17, 2026 10:20:49
Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात आधीच बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत असताना आता रानडुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. सचिन बाबुराव भगुरे हे शेतात काम करत असताना अचानक रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला.. या हल्ल्यात रानडुकरांनी भगुरे यांच्या हात पायाचे lचके तोडून गंभीर जखमी केले असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. माहेगाव परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा उच्छाद वाढला असून कळपाने फिरत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अवघड झाले आहे.. उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत असून नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 17, 2026 10:20:08
Washim, Maharashtra:टो येथील श्री मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने कारवाई करत परीक्षा केंद्रावर कार्यरत 26 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली. भौतिकशास्त्राच्या परीक्षेदरम्यान तपासणी केली असता उत्तरपत्रिकांमध्ये समानता आढळली, याचा प्रस्ताव अमरावती शिक्षण मंडळाकडे पाठवण्यात आला. परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर तात्कालिक प्रशासकीय कारवाई झाली. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 17, 2026 10:18:37
Akola, Maharashtra:अकोला शहरातील अकोट फायल परिसरात घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अवघ्या आठ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या माता-वडिलांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना तीन मुली असून काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र, कौटुंबिक वाद आणि आईचे आरोपी सोहेल खान याच्याशी असलेले कथित संबंध यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला. वडील पत्नीपासून विभक्त राहू लागले, तरीही मुलींच्या भेटीसाठी अधूनमधून घरी येत असत. घटनाच्या दिवशी पाच वर्षीय मुलीने वडिलांना फोन करून मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर वडील तत्काळ घरी पोहोचले असता, आई घरात नसताना आरोपी घरात घुसून आठ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपी हा गुन्हेगारांना स्पर्श करून मारहाण केल्याचे मुलीने वडिलांना सांगितले. या धक्कादायक माहितीनंतर वडिलांनी अकोट फाईल पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,पुढील तपास सुरू आहे. संतापाची लाट,कठोर शिक्षेची मागणी. या घटनेनंतर विविध हिंदू संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “लहान मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटना समाजासाठी घातक ठरत आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली. समाजासाठी चिंतेचा विषय.. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. कौटुंबिक वादांमध्ये मुलांचे संरक्षण कोठे हरवते?आई-वडिलांच्या मतभेदांचा फटका निरपराध मुलांना का बसावा? अशा आरोपींना वेळीच आळा घालण्यासाठी काय यंत्रणा मजबूत करणार? लहानग्यांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंब, समाज आणि प्रशासन या तिन्ही घटकांनी अधिक सजग होण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.पीडित मुलीला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 17, 2026 10:17:33
Yeola, Maharashtra:बांग्लादेश नेपाळ श्रीलंका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची भारतातून निर्यात केली जात होती मात्र केंद्र सरकारच्या कांदा आयात निर्यात धोरणाचा फटका निर्यातीला बसला असून मागणीच्या तुलनेत देशांतर्गत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सरासरी दर गेल्या काही दिवसांपासून एक हजार रुपयांच्या आत 700 ते 900 रुपये दरम्यान मिळत असल्याने यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला एक हजार रुपये अनुदान द्या अन्यथा गांजा लावण्याची परवानगी द्या अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करू लागले आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 17, 2026 10:15:04
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाकडून वनमंत्री गणेश नाईक यांना डीवचणारी बॅनरबाजी करण्यात आलेय. स्मृतिभंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करुन मिळेल असा आशय लिहिलेले बॅनर नवी मुंबईत लावण्यात आलेत. गणेश नाईकांकडून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करेन अश्या प्रकारचे आव्हान देण्यात आले होते. यावर खासदसरा श्रीकांत शिंदे यांनी नाईकांना स्मृतिभंश झक्याची टीका केली होती. यावरूनच शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम यांच्यामार्फत शहरभर स्मृतिभंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करुन मिळेल असा आशय लिहत नाईकांना डीवचणारे बॅनर लावण्यात आलेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 17, 2026 10:11:56
Dhule, Maharashtra:धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. या दरम्यानच आज अतिक्रमण मोहिमेदरम्यान प्रशासन आणि नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडली. धुळ्यात महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमे दरम्यान अतिक्रमण धारक नागरिकांमध्ये व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये हातपाई बघायाला मिळाली. महानगरपालिका अतिक्रमण पथक प्रमुख अधिकारी व जेसीबी चालक यांना स्थानिकांतर्फे धक्काबुक्की करण्यात आली. अतिक्रमण मोहिमेला विरोध केल्यामुळे झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले. ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम गेल्या काही दिवसांपासून वादाचा विषय ठरत आहे. आमदार अनुप अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार फारुक शहा यांच्या प्रतिष्ठेची ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम झालेली आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 17, 2026 10:08:28
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 17, 2026 09:49:32
Latur, Maharashtra:देशभरात “लातूर पॅटर्न”मुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या लातूर शहरात आता गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय समोर duphachhada karta mare ani kevhicya pairat dharodar shastraane vaar kele aahe. या घटनेत तिघेजण जखमी आहेत तर त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. शैक्षणिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात दिवसाढवळ्या घडत असलेल्या अशा प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.... लातूर शहरात अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. खून, मारामाऱ्या आणि हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाले आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रात्री शहरातील वैभव नगर परीसरातील गणेश मंदिराजवळ काही तरुण हातात कोयते घेऊन शिवीगाळ करत फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच विद्यार्थ्यांच्या वादातून हा खून झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक कडक आणि ठोस कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूनच लातूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का? कॉलेज परिसरात पोलिस गस्त पुरेशी आहे का? ... धारदार शस्त्र विक्रीवर नियंत्रण आहे का?‌.. या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. लातूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “लातूर पॅटर्न”ने देशभरात ओळख निर्माण केली… आता लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी “कडक ॲक्शन पॅटर्न”ची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा गंभीर घटना वाढत असल्यामुळे लातूर… शिक्षणाची पंढरी की गुन्हेगारीचं नवं केंद्र ? बनतय... हा सवाल आता प्रत्येक लातूरकराच्या मनात आहे....
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 17, 2026 09:34:04
Dharashiv, Maharashtra:माजी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का. आमदार तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत भाजप सोबत. भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेले पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत कायम राहणार. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची भेट. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट. भेटीचा फोटो समोर , धनंजय सावंत यांच्यासह चारही अपक्ष उमेदवार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती. धनंजय सावंत यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात बंडखोरी करत लढवली होती जिल्हा परिषद निवडणूक. धनंजय सावंत यांना भाजपाने केले होते पुरस्कृत
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 17, 2026 09:33:23
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे जवळपास तीन महिन्यांचे पगार झालेले नसल्याने कर्मचारी संतप्त झालेत...वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन विनंती करूनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिलाय...पगार झाल्यास 2 मार्च पासून कर्मचारी उपोषण आंदोलन करणार आहेत...शनिशिंगणापूर देवस्थानचे कर्मचाऱ्यांचे कुटुंब हे पगारावरच चालत असल्याने त्यांना कुटुंब चालवणे अवघड झाले आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिलीये...त्यामुळे कामगारांच्या सीटू संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे...तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेत असून त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचा पगार करणं आवश्यक आहे त्यांचे पगार केले जातील...काही कर्मचाऱ्यांची सेवानियमाची निश्चिती नाही , पगाराची निश्चित नाही त्यामुळे काही अडचणी निर्माण झाले होते...या अडचणी दूर करूनच कर्मचाऱ्यांचे पगार केले जातील असं देवस्थानचे उपमुख्यकार्यकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी म्हंटले आहे..
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 17, 2026 09:32:58
Baramati, Maharashtra:बारामतीत ब्लॅकमेलिंगमुळे तरुणाची आत्महत्या; पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल. बारामतीतील रुई बयाजीनगर येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, ब्लॅकमेलिंग व मानसिक त्रास केल्याच्या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. २३ वर्षीय विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (रा. रुई बयाजीनगर, बारामती) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मामा सत्यवान आप्पा इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. सृष्टी विकास मते, श्रृती विकास मते आणि आरोपी तरुणीचे वडील, विकास मते (पुणे पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) यांच्या विरोधात कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे. मृत विक्रम आणि आरोपी सृष्टी मते यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते; सुरुवातीला लग्नाचे आमिष दर्शवून नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण देत लग्न नाकारले गेले. २७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रृती यांनी विक्रमला सतत फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुण्यात बोलावून धमकी देण्यात आली व मोबाईलमधील फोटो व चॅटिंग डिलीट करण्यासाठी दाबा दिला., जीवे मारण्याची धमकीही दिली गेली. सृष्टीचे वडील विकास मते यांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी करण्याचा आरोप आहे. सुसाईड नोटमध्ये छळाचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विक्रमने राहत्या घरी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असे उल्लेख आहेत. पोलिसांनी सुसाईड नोट, कॉल रेकॉर्ड व मोबाईल डेटा तपासण्यासाठी जप्त केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची माहिती संचित झाली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 17, 2026 08:51:16
Satara, Maharashtra:सातारा : साताऱ्यातील माहुली गावातील घरात विनय कुंभारे यांच्या घरात साहित्याची आवरआवर करताना मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडला आहे. ही कागदपत्रे छत्रपती थोरले शाहूमहाराज, महाराणी ताराबाई यांच्यासह पेशवे यांच्या वतीने वेदशास्त्री कुंभारे शास्त्री यांना पाठविली आहेत. यामुळे माहुली गावाबाबत आणखी ऐतिहासिक माहिती समोर आली असल्याची माहिती त्यांचे वंशज विनय कुंभारे, डॉ. संदीप श्रोत्री, इतिहास संशोधक अॅड. सौरभ देशपांडे यांनी दिली.विनय कुंभारे यांना, 'घरात मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडल्यानंतर त्यातील पत्रांमध्ये छत्रपती शाहूमहाराजांचे हस्ताक्षर आणि मुद्रा असणारी पत्रे,महाराणी ताराराणी,औंध पंतप्रतिनिधी,दुसरे बाजीराव पेशवे यांचे दस्तऐवज सापडली आहेत. शाहू महाराजांच्या हस्ताक्षर पत्राच्या शेवटी असून, शेवटी 'जाणिजे लेखनालंकार' असे त्यांच्या हस्ताक्षरात नमूद केले असल्याची माहिती विनय कुंभारे यांनी दिली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top