Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001

नागपुर ग्रामीण परिवहन अधिकारी सहित पाँच के खिलाफ पद का दुरुपयोग और बदनामी की साजिश का मुकदमा दर्ज

AKAMAR KANE
Nov 15, 2025 03:32:14
Nagpur, Maharashtra
नागपूर गुन्हेगारी कट रचून साथीदारांच्या मदतीने पदाचा गैरवापर करीत बदनामी केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. परिवहन खात्यातील आरटीओ पदावरील पदोन्नती आणि पदस्थापना प्रकरणात परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या तक्रारीवरून नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय. भुयार हे 2021 ते 24 दरम्यान नागपूर आरटीओ मध्ये कार्यरत असताना हा प्रकार घडला. 2021 मध्ये एका वर्षासाठी भुयार यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीणचा अतिरिक्त कारभार होता. या कालावधीत चव्हाण हे गडचिरोली येथे कार्यरत होते. त्यांना नागपूरचा कारभार हवा होता. त्यांना नागपूरचा अतिरिक्त कारभार मिळाव यासाठी चव्हाण यांनी पदाचा गैरवापर केला व साथीदारांच्या मदतीने भुयार यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट रचण्यास सुरुवात केली.
126
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Nov 15, 2025 05:08:05
82
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 15, 2025 04:46:07
Beed, Maharashtra:बीड:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटला; पाठीमागे असणाऱ्या कारच्या डॅशकॅम मध्ये अपघाताचे दृश्य कैद Anc:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या अपघाताचे चित्रण पाठी मागे असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या डॅशकॅम मध्ये चित्रीत झाले आहे. बीड जवळील पाली येथे हा तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटला. मांजरसुंबा ते बीड यादरम्यान ट्रकचा हा अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मधील संपूर्ण तांदूळ रस्त्यावर पसरला होता. दरम्यान चालकाचे ट्रक वरून नियंत्रण आधीच सुटल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यानंतर एका मुख्य चौकात हा ट्रक आला असता तो पलटला हा सर्व प्रकार चित्रित झाला है. बाईट: अशोक मोदीराज - पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाणे
79
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 15, 2025 04:36:30
Amravati, Maharashtra:लोकमत और जनाधार नसतांना मशीनचा आधार घेऊन भाजपने बाजू पलटवली; बच्चू कडू यांची बिहार निकालावर प्रतिक्रिया अँकर :– काल बिहारचा निकाल लागला असून यामध्ये भाजपसह मित्र पक्षांना घवघवीत यश मिळाला आहे. यामध्ये बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारचा निकाल हे लोकमत नाही जनाधार नाही तर तो मशीनचा आधार आहे आणि मशीनचा आधार घेऊन भाजपने बाजू पलटवली असल्याचा आरोप बच्चू कडू केला आहे. आधी ईव्हीएमला मोदी विरोध करत होते. आता त्यावर काँग्रेस बोलत आहे. काँग्रेसने लोकशाही संपवायला सुरुवात केली आणि भाजप आता मुळासकट लोकशाही संपवत आहे. लोकशाहीचा खरा आत्मा मतदान हाच गायब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता दिसाला लोकशाही राहील पण पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल असेही कडू म्हणाले आहे. आता मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा भाजपच्या कार्यालयातच मतदान घ्याव असेही बच्चू कडू म्हणाले आहे.
172
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 15, 2025 04:31:12
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा परिषदेत २१ बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, समाज कल्याण विभाग, वित्त विभाग व अन्य विभागांतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणार्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी पडताळणीची मोहीम घेतली. यात ४४७ दिव्यांग प्रमाणपत्रांपैकी ३८२ ऑनलाइन आणि ६५ ऑफलाइन असल्याचे आढळून आले. सीईओ पत्की यांनी ६५ कर्मचाऱ्यांना 'शोकॉज' बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, सरळसेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता आदी बाबींचा लाभ घेतात. मात्र, कर्मचारी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र सादर करू शकले नाही. त्याची गांभीर्याने दखल घेत २१ कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली. यात पंचायत विभागाचे सहा, शिक्षण विभागाचे ११ सहायक शिक्षक व सामान्य प्रशासन विभागाचे चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही शिक्षक न्यायालयात गेल्याने त्यांच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही.
52
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 15, 2025 04:30:34
112
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 04:15:41
143
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 15, 2025 04:09:12
Shirdi, Maharashtra:कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांत इनकमिंग-आउटगोइंग मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कलविंदर सिंग दडीयाल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. कोपरगाव शहरातील भाजप कार्यालयात पार पडला. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे , भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दडीयाल आणि त्यांच्या समर्थकांचे भाजपमध्ये औपचारिक स्वागत केले.
156
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 15, 2025 04:02:21
136
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 15, 2025 04:02:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शरद पवार उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर, मुक्कामी दौऱ्यात महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर - राष्ट्रवादीचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार सोलापुरात - शरद पवारांच्या मुक्कामी दौऱ्यात महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची शक्यता - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांची भेट होण्याची शक्यता - शरद पवार सोलापुरात मुक्कामी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी होण्याची शक्यता - जिल्ह्यातील राजकारणात आणि राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्यानंतर प्रथमच शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर - जिल्ह्यातील थंडावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार यांच्या दौऱ्याने मिळणार नवी ऊर्जा
169
comment0
Report
Advertisement
Back to top