Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

वालुजे में घरफोड़: 2.75 लाख के गहने-नकद चोरी, पुलिस जांच शुरू

NMNITESH MAHAJAN
Feb 20, 2026 02:01:07
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर : वाळूजमध्ये घरफोडी,पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास वाळूज परिसरातील भगतसिंगनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना शेजाऱ्यांमुळे उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक बाहेरगावी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेलेले असताना ही घटना घडल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Feb 20, 2026 03:50:29
Bhandara, Maharashtra:रानडुकरांच्या तस्करीप्रकरणी १२ आरोपींना हत्यार, जाळे व वाहनांसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गस्ती दरम्यान तुमसर वनविभागाने १९ फेब्रुवारी रोजी झंझेरिया बिटात केली. तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी पहाटे ५ वाजता शासकीय वाहनाने गस्त घालत असताना त्यांना झंझेरिया बिटातील वाघसांध्या तलाव परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या. राखीव वनाजवळील तलावकाठावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ४९ बीझेड ७१०४) आढळून आले. पाहणीत वाहनात एक रानडुक्कर सापडले, तर आजूबाजूला १० ते १२ संशयित दिसून आले. चौकशीअंती संशयितांनी कबूल केले की, ते जंगल व शेतात रानडुक्कर पकडतात आणि ते नागपूर किंवा छत्तीसगढ राज्यात विकतात. वन्यजीव कायद्याचे उल्लंघनप्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 20, 2026 03:48:54
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 20, 2026 03:48:38
Chendhare, Maharashtra:चवदार तळे सुशोभिकरण कामासाठी 56 कोटींचा निधी. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. 2027 चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष. विविध कामे हाती घेणार. अँकर - महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सुशोभीकरण कामासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने तब्बल 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. चवदार तळे सत्याग्रहाला 2027 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने चवदार तळे सुशोभीकरण, संरक्षक भिंत तसेच जल शुद्धीकरण अशी कामं लवकरच हाती घेतली जाणार आहेत. यासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील असं मंत्री गोगावले यांनी सांगितलं. बाइट - भरत गोगावले, मंत्री
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 20, 2026 03:48:22
Thane, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे. त्यांच्या पत्राची माहिती राहुल गांधी यांना दिली गेली. यासंदर्भातील चर्चा काँग्रेसमध्ये उफाळून आली आहे. भिवंडी महापालिकेत 90 नगरसेवक आहेत; काँग्रेस 30 आणि राष्ट्रवादी 12, एकूण 42, महापौर पदासाठी चार सदस्यांची आवश्यकता आहे. वाटाघाटीची कोणतीही सूचना मला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली नाहीत. या स्थितीत समाजवादी आमदार रईस शेख यांना हाताशी धरून निवडणुकी आधी काँग्रेसचे एबी फॉर्म वाटले आणि आता शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप भिवंडी शहराध्यक्षांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. भिवंडी मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत येणाऱ्या घटना पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 20, 2026 03:47:44
Bhandara, Maharashtra:गोंदिया से जुड़े डॉक्टर नितेश वाजपेयी ने अडतीच लाखों में नवजात बाळ की विक्री के मामले में भंडारा पुलिस ने मुख्य आरोपी को हिरासत में लिया। लक्ष हॉस्पिटल, भंडारा से छुट्टी मिलते ही पुलिस ने तुरंत कार्रवाई कर गिरफ्तारी की। बालकल्याण विभाग ने इस मामले का पर्दाफाश किया था। पहले दो आरोपी गिरफ्तार हो चुके हैं और चार लोग अब भी फरार हैं। मुख्य आरोपी की गिरफ्त से जांच में तेजी आई है और बाळ विक्री रैकेट के मूल तक पहुंचने का प्रयास हो रहा है। अभी तीन आरोपी पुलिस कस्टडी में हैं। वहीं विधायक नरेंद्र भोंडेकर ने आरोप लगाया है कि अधिकारी मुख्य आरोपी को न पकड़ने के लिए 5 करोड़ की मांग कर रहे थे।
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 20, 2026 03:45:47
Yeola, Maharashtra:महाराष्ट्राचे आराध्य दैवत व युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पात विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या वेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवसृष्टी प्रकल्पातील नयनरम्य कारंजाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युवा शाहीर रामानंद उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्यांमधून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, अद्वितीय शौर्य, रणनिती, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 20, 2026 03:33:21
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 20, 2026 03:33:07
Nagpur, Maharashtra:नागपुर धक्कादायक ४ वर्षीय चिमुकला रात्रभर शाळेत कोंडला गेला... नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील बोरकर लेआऊटमधील अंगणवाडीत घडला प्रकार.. हिमांशू विश्वजित बागडे असं त्या 4 वर्षीय चिमुकल्याच नाव .. खेळता खेळता गेला शाळेच्या मागील बाजूच्या अंगणवाडीच्या खोलीत गेला अन… तिथेच झोप लागल्यानंतर झोपून गेला... शाळा सुट्टी झाल्यानंतर कर्मचाऱ्याने सर्व शाळेतील सर्व खोल्यांची तपासणी न करता लावले कुलूप...दरम्यान sायंकाळपर्यंत हिमांशू दिसला नसल्याने त्याचा शोध सुरू झाला....बेपत्ता झाल्या चर्चेने अपहरणाचा गुन्हा दाखल, आई-वडिलांनी चिंतेने ग्रासले आईने हंबरडा फोडला - खापरखेडा पोलिसानी अपहरण झाल्याचा अनुषंगाने संवेदनशीलपणे तपास सुरू केला.. ७ पथके तयार केले, सीसीटीव्ही तपास, तलाव-नाल्यांत रात्रभर शोध - अखेर रात्रभर मोहिमेत काहीच मिळून न आल्याने पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी सकाळी शाळेत जाऊन पाहण्याचा निंर्णय घेतला. अंगणवाडीचे कुलूप उघडताच हिमांशू तिथे सुखरूप दिसून आला.... आणि पोलिसांचा सगळ्यांना हायसे वाटले दरम्यान या घटनेमुळे शाळांनी कुलूप लावताना काळजी घ्यावी... व संपूर्ण शाळेची तपासणी करावी असे पोलिसांचा आवाहन केलेय
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 20, 2026 03:32:52
Lasalgaon, Maharashtra:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चार वाजता लता बाबुराव मेणकर या लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचुर येथून नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत असताना, त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अज्ञात महिलेने “एवढे सोने गळ्यात घालू नका, बॅगेत ठेवा. काही दिवसांपूर्वी एका महिलेची पोत चोरीला गेली आहे,” असे सांगितले. या बोलण्यावर विश्वास ठेवून लता मेणकर यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने काढून बॅगेत ठेवले मात्र दुसऱ्या दिवशी बॅग उघडल्यावर दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या तक्रार नोंदवण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्यात गेल्या असता, सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या निरोप व स्वागत समारंभामुळे तीन तासांहून अधिक काळ पोलीस ठाण्यात थांबवण्यात आल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. एवढी गंभीर घटना असतानाही अधिकारी वर्ग कार्यक्रमात व्यस्त असल्याचे कारण देत गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी प्रकरण सातपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 20, 2026 03:04:59
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 20, 2026 03:04:39
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्य मराठी पत्रकार संघ आणि ACS हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 100 पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांची हृदयाशी संबंधित बीपी, शुगर, ईसीजी, 2D इको,स्ट्रेस टेस्ट अशा विविध तपासण्या मोफत स्वरूपात करण्यात आल्या. एकूण चार कार्डिओलॉजिस्टच्या माध्यमातून सर्व तपासण्या करत पत्रकारांना हृदयाची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे याविषयी सखोल माहिती देण्यात आली.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 20, 2026 03:04:23
Nashik, Maharashtra: विवाहितेचा छळ करून दुसऱ्या मुलीसोबत लग्न.... पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल... पहिल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याकडे फारकतीची मागणी करून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणाऱ्या पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला....मुलीसोबत लग्न करण्यासाठी आरोपीने पतीपासून फारकत घ्यावी, या कारणातून विवाहितेला पती, सासू, सासरे, चुलतदीर, नणंद व नंदोई यांनी संगनमत करून मारहाण व शिवीगाळ केली, तसेच नणंद व नंदोई यांनी धमकी देऊन वेळोवेळी चिथावणी देऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने पत्नी हयात असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून घेतले. या छळाला कंटाळून अखेर पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात छळवणुकीची फिर्याद दिली असून, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 20, 2026 03:01:51
Nashik, Maharashtra:नाशिकरोडला घरफोडीमध्ये सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी लंपास.... घटना CCTV मध्ये कैद... हॉलच्या खिडकीचे गज कशाच्या तरी सहाय्याने कापून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी असा १ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना नाशिकरोड येथे घडली. रोहित देवीदास कर्डिले यांच्या राहत्या घराच्या हॉलच्या खिडकीचे गज अज्ञात चोरट्यांनी कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात असलेले ६० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, २० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, १० हजार रुपये किमतीची अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, १३ वजनाच्या सोन्याच्या फिरक्या, तीन हजार रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे तबक, दीड हजार रुपये किमतीच्या दीडशे ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वाट्या, ७०० रुपये किमतीचे १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे निरांजन, समई, दिवा, ४०० रुपये किमतीचे चांदीचे तुपाचे भांडे, १ हजार ७०० रुपये किमतीची चांदीची घंटी व अत्तरदाणी, दीड हजार रुपये किमतीच्या चांदीच्या साखळ्या, तीनशे रुपये किमतीचा ६० ग्रॅम वजनाचा चांदीचा गणपती व कॉईन असा एकूण १ लाख ३२ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 20, 2026 03:00:28
Kolhapur, Maharashtra:Feed:-Live U Anc:- कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जागा खाली करण्याचे पत्र देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामध्ये पूर्वापार अधिकाऱ्यांचा जागा हक्काबाबत वाद आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत चालवण्यात येत होते, राज्यातील 14 जिल्हा शासकीय रुग्णालय 2004 साली वैद्यकीय शिक्षण विभागाकडे चालवण्यात देण्यात आली. यामध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा देखील समावेश होता. तेव्हापासूनच सार्वजनिक आरोग्य विभागाचा या जागेवरील अधिकार संपल्याचे मानले जात होते. पण जिल्हाशल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी तसंच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना उपक्रमांची कार्यालय या इमारतीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या स्वातंत्र जागेवर स्थलांतरित करणे अपेक्षित होते. पण ते घडले नाही. त्यामुळेच आता अधिष्ठातानी इमारतीचे बांधकाम चालू असल्याचे कारण देत जागा खाली करा अशा आशयाचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला दिले आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या अंतर्गत जागेचा वादाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top