Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में आज तीन नगर परिषदों के लिए मतदान शुरू; अम्बड़, भोकरदन और परतूर में चुनावी माहौल तेज

NMNITESH MAHAJAN
Dec 02, 2025 02:48:14
Jalna, Maharashtra
जालना : जिल्ह्यात आज 3 नगर परिषदांसाठी मतदान सुरू (वाक थ्रू) अंबड,भोकरदन, परतूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान रावसाहेब दानवे,आमदार बबनराव लोणीकर नारायण कुचे या भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला अंबडमध्ये राजेश टोपेंचीही प्रतिष्ठा पणाला जालना जिल्ह्यात आज 3 नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे.अंबड,भोकरदন, परतूर नगर परिषदेचा यात समावेश आहे.या तिन्हीही नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय.आणि मतदान प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Dec 02, 2025 03:05:23
Palghar, Maharashtra: पालघर जिल्ह्यातील पालघर , जव्हार आणि डहाणू या तीन नगरपरिषदा तर वाडा या नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी today मतदान होणार असून सकाळी सात वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे . four ठिकाणी होत असलेल्या निवडणुकीसाठी एक लाख 16 हजार 660 इतके मतदार मतदान करणार असून यासाठी 125 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत . यामध्ये पालघर नगरपरिषद हद्दीत 56 , डहाणू नगरपरिषद हद्दीत 41 , जव्हार नगर परिषद हद्दीत अकरा , तर वाडा नगरपंचायत हद्दीत 17 मतदान केंद्रांवर सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. चार नगराध्यक्ष पदांसाठी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 94 नगरसेवक पदांसाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं भविष्य आजमावणार आहेत.
10
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 02, 2025 03:03:55
10
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 02, 2025 03:03:32
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात मतदानाला सुरुवात; जिल्ह्यात 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी आज मतदान अमरावती जिल्ह्यात मतदान होऊ घातल्या आहे. यात 11 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 64 उमेदवार रिंगणात आहेत. तर 250 नगरसेवक पदासाठी 1048 उमेदवार रिंगणात आहेत. 11 ठिकाणी भाजप और काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढत आहेत. 11 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये 3 लाख 12 हजार 436 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 56 हजार 92 असून महिलामतदारांची संख्या 1 लाख 56 हजार 332 आहे. एकूण 11 शहरात 366 केंद्रांवर मतदान होणार असून 1500 पोलीस कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही ठिकाणी अजित पवार गट शिंदे गट एकत्र आला असताना काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. या निवडणुकदरम्यान अमरावती जिल्ह्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी धारणी येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार ठिकाणी जाहीर सभा घेतल्या तर नवनीत राणांनी मोठ्या प्रमाणावर रोड शो केला.
7
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 02, 2025 03:00:19
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकेंसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या ठिकाणी चार नगराध्यक्ष पदासाठी वीस उमेदवार तर ११४ नगरसेवक पदासाठी ४७० उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या हक्क बजावण्यासाठी 283 मतदार केंद्र असून जवळपास पंधराशे कर्मचारी हा लोकशाहीचा जागर पार पाडणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्याचे दिग्गज नेते निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. या नगरपालिकेंसाठी आमदार डॉ.विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, आमदार शिरीष नाईक आणि माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्यासाठी या पालिका प्रतिष्ठेच्या आहेत. उमेदवारांच्या बहुतव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. लाडक्या बहिणींना आकर्षित करण्यासाठी नंदुरबार शहरात पिंक बूथ आणि 30 परधान अशी मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदानाच्या टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष उपयोजना राबवण्यात आले आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 02, 2025 02:49:21
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नगरपरिषदेसाठी तर देवरूख, गुहागर आणि लांजा नगरपंचायतीसाठी आज मतदान सात ठिकाणच्या नगराध्यक्षपदासाठी ४३ उमेदवार रिंगणात तपास नगरसेवकांच्या १५१ जागांसाठी ४५३ उमेदवार रिंगणात सात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्रावर आज मतदानाला सुरवात उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शेखर निकम, उद्धव ठाकरे सेना आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला खेड नगरपरिषद, राजापूर आणि देवरूख नगरपंचायत इथं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रत्नागिरी आणि चिपळूण नगरपरिषदेत आघाडीत मोठी बिघाडी लांजा नगरपंचायतीत भाजप बंडखोरी, नगराध्यक्षांसह अपक्ष नगरसेवकांची मोट तर रत्नागिरी आणि गुहागरमध्ये महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीचा स्वतंत्र नगराध्यक्ष उमेदवार रिंगणात चिपळूणमध्ये महावरण आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक रिंगणात भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील विसंवादामुळे चिपळूण मध्ये उद्धव ठाकरे सेनेत उभी फूट. रत्नागिरीतून निवडणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
61
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 02, 2025 02:49:08
Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग - रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू ...... २ लाख ३७ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...... अँकर - रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका विवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या दहा जागांसाठी ३४ आणि नगरसेवक पदाच्या २०९ जागांसाठी ५७५ उमेदवार रिंगणात आहेत. २ लाख ३७ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वच केंद्रांवर संथगतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
53
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 02, 2025 02:48:30
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यामध्ये दोन नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. या तिन्ही ठिकाणी प्रामुख्याने महायुतीतीलच पक्षांमध्ये प्रमुख सामना पाहायला मिळत आहे. शिंदखेडा नगर पंचायत मध्ये मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिष्ठापनाला लागली आहे. तर शिरपूर पालिकेमध्ये आमदार अमरीश पटेल यांनी प्रतिष्ठापनाला लावलेली आहे. पिंपळनेर नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांची प्रतिष्ठा पनाला आहे. या तिन्ही ठикाणी युतीतीलच पक्ष हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकी लढवत आहेत. या निवडणुकींचे कल कोणाच्या बाजूने जातील हे उद्या स्पष्ट होणार आहे. मात्र आज थंडीच वातावरण असतानाही मतदारांमध्ये मोठा उत्साह मतदानासाठी दिसून येत आहे. जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे, पिंपळनेर नगरपरिषद, तसेच शिंदखेडा नगरपंचायती साठी आज मतदान पार पडत आहे. नगरअध्यक्ष पदाच्या 3 जागांसाठी दहा उमेदवार आहेत, तर सदयपदाच्या 67 जागांसाठी 207 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन ही नगर पालिका क्षेत्रातील 1 लाख 8 हजार 816 मतदार मतदान करणार आहेत.
100
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 02, 2025 02:47:55
105
comment0
Report
Advertisement
Back to top