Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Hingoli431513

हिंगोली कृषि मार्केट 25 मार्च से 5 अप्रैल तक लिलाव स्थगित, किसानों को भारी नुकसान

GMGajanan MAchindar
Mar 27, 2026 02:45:29
Hingoli, Maharashtra
अँकर - हिंगोलीत हळदीचं मार्केट पुढील दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीने २५ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान लिलाव प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मुख्य व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, हळदीच्या विक्रीसाठी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना आता खुल्या बाजारात कमी दरात किंवा अव्वाच्या सव्वा दराने हळद विकावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Mar 27, 2026 04:33:25
Beed, Maharashtra:बीड: भगवानगडावरील मंदिरासाठी चार कोटी… सप्ताहासाठी एक कोटी… भक्तांनी देणगीची रक्कम सांगताच पंकजा मुंडे म्हणाल्या राजकारण संपल्यानंतर मी ही होणार; पंकजांचे मिश्किल वक्तव्य..! बीडच्या भायाळा गावामध्ये आयोजित सप्ताहाच्या सांगते प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी भगवानगडावरील मूळी मंदिरासाठी सव्वचार कोटी रुपयांची देणगी दिली, सप्ताहासाठी एक कोटी रुपये वर्गणी जमा केली हे आकडे सांगितले. पंकजा मुंडे यांनी मिश्किलपणे आता राजकारण संपल्यानंतर मीही हभप होणार असे म्हटले... तसेच मोठे कष्ट करून तुम्ही पैसे जमवता परंतु मंदिराला देताना मात्र सरळ हाताने मदत करतात असे कुठेही घडत नसेल असेही पंकजा मुंडे म्हणाल्या...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 27, 2026 04:19:09
Vasai-Virar, Maharashtra:वसईमध्ये ही अशोक खरातची पुनरावृत्ती वसईत धर्मगुरुवर बलात्काराचा गुन्हा दाखल महाडेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार.. वसईच्या धर्मगुरू ऋषिकेष वैद्य विरोधात गुन्हा दाखल मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हे नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात झाली असल्याने हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे senior police निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. ऋषिकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलीना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितले.
923
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 27, 2026 04:02:12
Ahilyanagar, Maharashtra:देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोष साजरा करण्यात आला अहिल्यानगरच्या पाथर्डी येथे रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली हिंदु रक्षा युवा मंच आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्सवाचं आयोजन करण्यात आलं उत्सवामध्ये वेगवेगळ्या राज्यातून कलाकार आमंत्रित करण्यात आले या कलाकारांनी सादर केलेले पथनाट्य आणि देखावे लक्षवेधी ठरले अफजल खान वध, खाटू श्याम दर्शनाची झलक, विष्णूचे दशावतार आणि प्रभु श्रीरामांची पालखी ही प्रमुख आकर्षणे ठरली. ढोल-ताशा पथक आणि महिलांच्या टाळ पथक रामनवमीचा उत्सवामध्ये सहभागी झाले एकूणच पाथर्डीकरांनी एक आगळी वेगळी रामनवमी साजरे केल्याचे चित्र पाहायला मिळाला
1038
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 27, 2026 04:01:34
Amravati, Maharashtra:शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; हमीभावाच्या मागणीसाठी बच्चू कडू करणार एक दिवसाचं लक्षण एक उपोषण, उपोषणा आधी कडूंच्या पोस्टरची जोरदार चर्चा अँकर :- शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून यासंदर्भातील पोस्टर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. जय श्रीराम! कब मिलेगा हिंदू किसान को दाम?” या ठळक घोषवाक्यासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. हे उपोषण आज अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले असून, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटोही झळकत आहेत. या पोस्टरमुळे आंदोलनाबाबत उत्सुकता वाढली असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या उपोषणाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की हे आंदोलन केवळ सरकारविरोधी नसून महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. कर्जमाफीबाबत शासनाचे आभार मानतानाच उर्वरित मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी झालेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, उपोषणात सहभागी झाले, रस्त्यावर उतरून आंदोलन केले, आर्थिक मदत केली किंवा विविध स्वरूपात पाठिंबा दिला अशा सर्व शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्यांचा या उपोषणादरम्यान सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या घोषणेमुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आले असून २७ मार्च रोजी होणाऱ्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
939
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 27, 2026 04:00:57
1052
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 04:00:37
912
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 03:36:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या कासेगाव मध्ये पार पडलेल्या कासेगाव हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीत सर्जा-रोमन जोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. शरद लाहिगडे प्रतिष्ठानच्यावतीने शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. 5 लाखांचे पाहिले बक्षीस आणि हेलिकॉप्टर राईड असे बक्षीस होते. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे सह कर्नाटक राज्यातील सुमारे 300 हुन अधिक बैलगाडी चालक या शर्यतीत सहभागी झाले होते. जनरल ओपन गटामध्ये हे पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या शर्यतीमध्ये पंढरीज सर्जा-रोमन बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत कासेगाव हिंदकेसरी बैलगाडी शर्यतचा बहुमान पटकावलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषक प्रदान करण्यात आलं.
1069
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 27, 2026 03:18:37
1009
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 27, 2026 03:15:25
1060
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 27, 2026 03:04:48
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने नदीपात्रातून सर्रास रेती काढली जात असून महसूल विभाग मात्र कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. नियमानुसार कोणत्याही मशीन चा वापर रेती उत्खननासाठी केला जाऊ शकत नाही मात्र सर्व नियमांची पायमल्ली या ठिकाणी होत असल्याचा दिसून येत आहे. विशेष म्हणजे परिसरातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, तळेगाव पातुर्डा समोरून भरधाव वेगाने रेती वाहतूक होत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरण विभागाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून नदीपात्रात थेट रस्ते तयार करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, शासनाने अटींसह रेती उपसा करण्यास परवानगी दिली असतानाही त्या अटींचे पालन होत नसल्याचा आरोप होत असून याकडे महसूल प्रशासन कधी कारवाई करणार, याकडे अकोला जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.
1023
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 03:04:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा और विदर्भात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. पुढील ४ ते ५ दिवस विशेषतः ३० आणि ३१ मार्च रोजी मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या अधिब झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे त्यात पुन्हा पावसाची शक्यता त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, अनेक ठिकाणी मळणी ची काम उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे...
974
comment0
Report
Advertisement
Back to top