Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

नंदूरबार में नया पालकमंत्री कौन होगा? सत्ता की सियासी उठापटक शुरू

PPPRASHANT PARDESHI
Dec 19, 2025 04:52:00
Dhule, Maharashtra
माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणात शिक्षा ठोठाल्यामुळे राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे आता नंदुरबार जिल्ह्याच पालकत्व देखील गेला आहे. नंदुरबार जिल्हा पालकमंत्री विना झाला असून, जिल्ह्याच्या पालकमंत्री कोण होणार? याची खमंग चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपद राहावं यासाठी माणिकराव कोकाटे यांनी जिल्ह्यातील शनिदेवाला आराधना केली होती मात्र यावेळेस त्यांना देवाच्या आराधना करण्याअधी ही संधी मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हाला पालक नाहो अशी स्थिती झाली आहे. जिल्हात आता कोणाची पालकमंत्री पदावर नियुक्ती होईल? यावरच येणाऱ्या काळात संपन्न होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यश अपयश ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये माणिकराव कोकाटे यांनी पक्षाचे ताकद वाढवण्यासाठी जोर लावलाच दिसून आला होत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालकत्व हरवल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला यांच्या मोठा फटका बसणार आहे. पालकमंत्री नसलल्याने नंदुरबार जिल्हा पोराका झाला आहे. आता नवीन पालकमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सध्या एकही मंत्री नसल्यामुळे इतर जिल्ह्यातील मंत्री कडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, हे स्पष्ट आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Dec 19, 2025 06:01:25
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथे बिबट्या ने घराच्या कंपाऊँड मध्ये प्रवेश करत कुत्र्याची शिकार केलीय,महत्वाच म्हणजे 12.5 HP च्या बंद विद्युत पंपासकट बिबट्या ने या श्वानाला काही फुट ओढत नेलंय त्यामुळे बिबट्या च्या शरिरात किती ताकद असते याचा अंदाज तुम्ही लावू शकता,कुत्रााला ठार केल्यानंतर बिबट्या ने त्याला उचलून नेण्याचा खुप प्रयत्न केला मात्र कुत्रा साखळीने बांधलेला असल्यामुळे त्याला शिकार ठार केल्या नंतर हि घेऊन जाता आली नाही मात्र बिबट्या च्या या दहशती ने परिसरात प्रचंड भिती पसरली असून या बिबट्यांना जेरबंद करण्याच मोठ आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 19, 2025 05:01:11
Shirdi, Maharashtra:साई भक्तांना अब सुवर्ण खिडकीतून साईबाबांचे मुख दर्शन घेता येणार आहे.. दुबई येथील एका साईभक्ताने साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली आहे.शिर्डीच्या साईबाबा संस्थानला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात.. दुबई येथील एका साईभक्ताने साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली आहे.. या खिडकीतून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे दर्शन होत असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुखदर्शनासाठी येतात.. अब साईभक्तांना या सुवर्ण खिडकीतून साईबाबांचे मुख दर्शन घेता येणार आहे.. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 19, 2025 04:51:39
Mira Bhayandar, Maharashtra:भायंदर तलाव रोड परिसरात बिबट्या शिरला. एका कुटुंबावर हल्ला केल्याची माहिती. स्थानिक नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याची दृश्य कैद केली आहे. हा बिबट्या इमारतीमध्ये शिरल्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद. अग्निशमन जवान पोलीस यांना माहिती देण्यात आली आणि प्रशासन सतर्क झाले. मानवी वस्तीत हा बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि वनविभागाला तातडीने कळवण्यात आले असून प्रशासन सतर्क झाले आहे. बिबट्याच्या उपस्थितीमुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू असून, बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनविभागाचे पथक कार्यरत आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 19, 2025 04:34:50
Satara, Maharashtra:सातारा: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 78 व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडला. आ.महेश शिंदे, आ.शशिकांत शिंदे आ. मनोज घोरपडे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, પૂjaارى आणि विश्वस्त यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचे पूजन करून या रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. या यात्रेत येणाऱ्या भाविक मोठ्या संख्येने रथावर पैसे अर्पण करण्याची परंपरा आहे. लाखो रुपये या रथावर अर्पण झाल्यानंतर हे पैसे विकास कामांसाठी वापरले जातात. या वर्षी भाविकांनी रथावर 87 लाख 40 हजार रुपये अर्पण केले आहेत.दुष्काळी भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख असून या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 19, 2025 04:31:44
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग होणार असल्याची विश्वासनीय माहिती समोर आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा एसआयटी कडेन सीआयडी कडे वर्ग करण्यात येणार आहे. बाबा धीरज सिंग यांच्या हत्या प्रकरणातला तपास हा सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा असा प्रस्ताव देखील स्थानिक पोलिसांकडून पाठवण्यात आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात येईल असं सांगितलं होतं. तर विधानसभेतही बाबा धीरसिंग यांच्या हत्येचा विषय चांगलाच गाजला होता. स्थानिक शिख बांधवांचा रोष लक्षात घेता हा गुन्हा सीआयडी कडे वर्ग करण्यात येणार आहे. या पुण्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शीख बांधवांनी केलेली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 19, 2025 04:21:46
Hingoli, Maharashtra:गजानन देशमुख-हिंगोली- कॉंग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली हा काँग्रेसचा गड बनला होता. मात्र राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये गट तट निर्माण झाले. त्यांनी उभारलेले कार्यकर्त्यांचे संघटन सैल होऊन या गडाला आता तडे गेले आहेत. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील तीन आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केलाय, विशेष बाब म्हणजे गांधी घराण्याशी निष्ठावंत असलेले राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपवाशी झाल्याने आता तरी काँग्रेसच्या वरिष्ठाणी पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज निर्माण झालीय. मोदी लाट असतांना काँग्रेसचे निष्ठावंत आणि ज्यांना गांधी घराण्याच्या किचन पर्यंत प्रवेश होता असे दिवंगत नेते राजीव सातव हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यात हिंगोलीतून राजीव सातव यांचा समावेश होता. राजीव सातव यांनी त्यांचा जनसंपर्क काँग्रेसला दाखवून देत विधानसभेत संतोष टार्फे यांच्या रूपाने एक आमदार, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी पॅटर्न उभारून करून देशपाठळीवर आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली होती. त्यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले होते. गुजरात निवडणुकीवेळी राजीव सातव तेथे प्रभारी होते, त्यांनी तेथे सत्ताधाऱ्यांना घाम फोडत सत्तांतर होईल अशी स्थिती निर्माण केली होती. कोरोना काळात राजीव सातव यांच्या निधन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली ती पोकळी शेवटपर्यंत भरून निघालीच नाही. काँग्रेसने राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषद सदस्य म्हणून संधी दिली. पण याचा पक्षाला काहीच फायदा झाला नाही,या उलट प्रज्ञा सातव यांच्या स्वभावाला कंटाळून माजी आमदार संतोष टार्फे,तीन वेळा आमदार राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर,जिल्हाप्रमुख संजय बोंधारे,दिलीपराव देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकार्यांना काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यामुळे राजीव सातव यांच्या नेतृत्व गुणाची उणीव सातत्याने भासत होती. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी वाढत गेली. प्रत्येक निवडणुकीत ही गटबाजी समोर येत होती. पक्षाच्या वरिष्ठांनाही याबाबी माहीत असाव्यात. पण ही धुसफूस, गटबाजी थांबवण्यात पक्षश्रेष्ठी कमी पडले. त्यांनी या गटबाजीकडे केलेले दुर्लक्ष भोवले आणि पक्षाला लागलेली गळती थांबायचे काय आता नाव घेत नाहीये. आता काँग्रेस पक्षात एक ही मोठा नेता शिल्लक उरला नाहीये,आता येथे फक्त राजीव सातव यांच्या विचारांचे कार्यकर्ते,जे आज ही काँग्रेससाठी राण पेटविण्याची जिद्द बाळगतायेत. त्यांच्या जिद्दीला साथ देण्याची पक्षनेतृत्वाने गरज निर्माण झालीय. प्रज्ञा सातव यांना 2024 मध्ये दुसऱ्यांदा विधान परिषद द्यायची वेळ आली होती,त्यावेळी जिल्ह्यातून आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देण्यास विरोध होत होता,पण काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजीव सातव यांच्या पश्चात सातव यांच्या कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून स्वतः सोनिया गांधींनी प्रज्ञा सातव यांच्या नावाची शिफारस केली होती असे जेष्ठ काँग्रेस नेते सांगतायेत. त्याच प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिलीय. शिवाय काँग्रेस पक्षाचा विरोधीपक्षनेता होऊ म्हणून काँग्रेसचे निष्ठावंत राजीव सातव यांच्या पत्नी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, ज्या पक्षाने सातव घराण्याला पद प्रतिष्ठा मिळवून दिली,सोनि‍या गांधींनी विश्वास टाकला. तेच सातव घराणं काँग्रेसच्या पिछेहाटीसाठी प्रज्ञा सातव यांच्या रूपाने काम करणार असल्याच चित्र निर्माण झालं आहे. राजीव सातव हयात असते तर त्यांना हे खरच पटलं असत का हा खरा प्रश्न आहे, राजीव सातव यांनी हिंगोलीच्या विकासाच बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण भाजपात गेलो असल्याचे प्रज्ञा सातव यांनी सांगितलं. पण हे खरच राजीव सातव यांना कधी पटलं असत का हा खरा प्रश्न आहे. आता जर काँग्रेस नेतृत्वाने पक्षाची पुनर्बांधनी केली नाही तर असे हादरे काँग्रेसला आणखीन सहन करावे लागणार आहेत,पण पक्ष निष्ठा, विचार हे मात्र भारतीय राजकारण्यांनी खुंटीला टांगून ठेवल्याचेच प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशा वरून तरुणी वाटू लागलंय...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 19, 2025 04:16:18
Dharashiv, Maharashtra:तुळजापूरमध्ये अवैध धंद्यांना राजकीय संरक्षण? खासदार ओमराजे निंबाळकरांची आमदार राणा पाटील यांच्यावर टीका तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले आहेत. नाव न घेता भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी लक्षवेधी मांडण्याऐवजी शहराची बदनामी होत असल्याचं म्हणणं म्हणजे अक्कल ठिकाणावर आहे का? असा सवाल ओमराजेंनी केला तुळजापूरमध्ये अवैध धंद्यांना राजकीय संरक्षण दिलं जात आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आपण आमदार कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी यांच्यासह गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचं ओमराजेंनी सांगितलं.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 19, 2025 04:15:38
Bhandara, Maharashtra:अवघ्या १२ तासात दरोड्यातील १२ आरोपींना जेरबंद. कोरंभी उड्डाणपूलावरील घटना. अन्य घटनांचाही घेतला जाणार मागोवा भंडारा येथे ट्रक चालकाला लुटणाऱ्या 12 जणांना अटक. पहाटेच्या sुमारास कोरंभी बायपास उड्डाणपूलावर या तरुणांनी ट्रक क्र. केए १८ सी ४८४५ ला थांबविले. हा ट्रक तांदूळ घेवून रायपूर हून नागपूरकडे जात होता. ट्रकला थांबवून या १२ जणांनी आणलेल्या लाकडी दांड्याने ट्रकच्या काचा फोडल्या तसेच ट्रक चालक पठाण याच्या खिश्यातील १५ हजार रुपये हिसकावून त्यालाही लाकडी दांड्याने मारहाण केले. या घटनेने महामार्गावर एकप्रकारे दहशत निर्माण केली आहे. रात्रीच्या सुमारास एकांत बघूनच या तरुणांनी हल्ला चढविला. पहाटेच्या सुमारास कोरंभी उड्डाणपूलावर ट्रकला अडवून चालकाला मारहाण करीत १५ हजारांची रक्कम हिसकावली ह्या फिल्मी स्टाईल घडलेल्या या थरारक घटनेनंतर भंडारा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवानगतीने फिरवीत अवघ्या १२ तासात या दरोड्यात सहभागी १२ जणांना जेरबंद केले.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 19, 2025 04:01:52
Malegaon, Maharashtra:नाशिक जिले की सटाणा तालुक्यात ब्रह्मणगाव सौंदाणे रस्ता परिसरात अचानक लगी आग से अत्यंत गरीब परिवार का घर पूरी तरह जळून खाक हो गया। साहेबराव देवराम नवरे के घर को बड़ा नुकसान हुआ और कड़क ठंड में पूरा परिवार बेघर हो गया। आग के कारण घर में संग्रहीत धान्य, बाजरी, गहू, मेहनत की कमाई से जोड़े गए पैसे, कपड़े तथा जीवनोपयोगी सामग्री भी जलकर नष्ट हो गई। आग लगते ही परिवार के सदस्यों के पास बाहर निकालने का समय नहीं था। इसके कारण नवरे परिवार पर बड़ा संकट आ गया है और उन्हें विधायक दिलीप बोर्से ने पीड़ित परिवार की स्थिति समझते हुए निजी निधि से तत्काल आर्थिक सहायता दी और परिवार के लिए अस्थायी Shelter की व्यवस्था की।
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 19, 2025 04:00:30
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील चिखली सुर्वे गावाच्या शेतशिवारात निसर्गचक्रात झालेल्या बदलाचे अनोखे चित्र पाहायला मिळत आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात आंब्याला बहर येत असतो; मात्र यंदा डिसेंबर महिन्यातच आंब्याच्या झाडांना मोहर फुटल्याने शेतकरी तसेच वाटसरूंचे लक्ष वेधले जात आहे. पिवळ्या व लालसर रंगाच्या मोहोरांनी आंब्याची झाड बहरून गेल्याचे दृश्य सध्या शेतशिवारात दिसून येत आहे. हवामानातील बदल, तापमानातील चढ-उतार व आर्द्रतेतील फरक यामुळे हा बहर वेळेआधी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वेळेआधी आलेला बहर पुढील उत्पादनासाठी फायदेशीर ठरणार की नुकसानकारक, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे. काही शेतकऱ्यांच्या मते, योग्य हवामान साथ दिल्यास चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असली तरी अचानक थंडी,धुके किंवा पावसामुळे या मोहोरावर विपरीत परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. बदलत्या निसर्गचक्रामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचे हे आणखी एक उदाहरण ठरत असून, कृषी तज्ज्ञांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 19, 2025 03:50:30
Malegaon, Maharashtra:लोकसहभागातून रस्त्याची डागडुजी; नाशिकच्या देवळा येथील चिंचवे गावातील तरुणांचा पुढाकार... - मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावाकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात चिखल आणि वाहतुकीस अडथळा अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शाळकरी मुले, शेतकरी, रुग्ण व सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत गावातील तरुणांनी गुरु गोरक्षनाथ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून लोकसहभागातून पुढाकार घेतला. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता, स्वतः श्रमदान व आर्थिक योगदान देत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. तरीही हा तात्पुरता उपाय असून संबंधित विभागाने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आत आहे. गावाच्या हितासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थेचे व तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 19, 2025 03:50:09
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील टोप गावात गुंगीचे औषध फवारून घरफोडी झोपेत असलेल्या चौघा जणांवर गुंगीचे औषध फवारत सव्वातीन लाखाचा ऐवज पळवला. चोरट्यांनी कुत्र्यावरही फवारला मुंगीच्या औषध कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्याटोप टोप गावाजवळ महामार्गाच्या लगत असणाऱ्या वैभव बाळासो पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड़ילי केलीय. चोरट्यांनी घरात झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून ही चोरी केल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांनी सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरी करणारे तिन्ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून शिरोली या चोरांचा शोध सुरू केला आहे. शिरोली पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पुणे बंगळूर महामार्गावर टोप गावच्या पूर्वेला ग्रामपंचायत शेजारी वैभव बाळासो पाटील यांचे घर आहे.गुरुवारी रात्री पाटील यांची आई, भाऊ, आजी सर्व मंडळी झोपी गेले असता चोरट्यांनी घरासमोरील पाळीव कुत्र्यांला गुंगीचे औषध घातले, आणि घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि घरात झोपलेल्या लोकांच्या तोंडावर ही गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन घरातील तिजोरी उघडून तिजोरीतील दोन तोळे सोन्याचे दागीने, चांदीचे दागिने, तीन मोबाईल फोन, रोख ३० हजार रुपये असा ३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यावेळी पाटील यांच्या घराशेजारी असलेले नातेवाईक कृष्णात गायकवाड हे पहाटे ३.३० वाजता लघुशंकेसाठी उठले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडला असल्याचे पाहिले आणि घरात गेलो आणि घरातील लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते गुंगीत होते.
0
comment0
Report
Advertisement
Back to top