Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

कांग्रेस पर 70 साल से मत चोरी के आरोप पर बीजेपी ने किया बड़ा हमला

PPPRASHANT PARDESHI
Oct 27, 2025 08:47:02
Dhule, Maharashtra
काँग्रेसने देशात सत्तर वर्ष भारतीय मतदारांची बॅलेट पेपरवर मतांची चोरी केली आहे. आणि आज तीच काँग्रेस मत चोरीवर बोलत असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केला, महाराष्ट्र काँग्रेस मत चोरी कशी होती याबाबत चित्रफित दाखवणार असल्याने भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी काँग्रेसला मत चोरीवरून चांगला सुनावलं आहे. जेव्हा हे मतदार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करतात तेव्हा निवडणूक आयोगावर हे टीका करत नाही आणि जेव्हा जनता ने महाराष्ट्रात इतिहासिक असा भाजपाच्या बाजूने मत दिले त्यामुळे काँग्रेस आता निवडणूक आयोग आणि मतांची चोरीच्या विषय पुढे आणला आहे. काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी आहे. काँग्रेसने ७० वर्ष खोटे बोलून जनतेचे मत घेतली, आणि आता मतदारांनी काँग्रेसला धितकारलं त्यामुळे काँग्रेसला मत चोरी बद्दल बोलण्याच्या आता अधिकार राहिला नाही आहे. काँग्रेसने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारलेला असल्याची टीका भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Oct 27, 2025 13:06:50
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी शहरात पहाटेच्या सुमारास खळबळ उडाली आहे. नवीन बसस्थानाकाझवळील सुरज बार समोर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री साडेदहाच्या सुमारास अफसर खा रशीद खा हे सुरज वाइन बारमध्ये दारू पिल्यानंतर बाहेर आले. त्याचवेळी बार मालकाच्या चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले, यात अफसर खा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी बार मालकाला ताब्यात घेतले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे. यावेळी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली या प्रकरणात आता पोलिसांनी बार मालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 27, 2025 13:00:56
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_MudlhedCase Feed on - 2C ---------------------------- Anchor - तहसीदारांची गाडी फावड्याने फोडणाऱ्या शेतक-याला अतीवृष्टी चे अनुदान मिळाल्याचे समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली होती. अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने त्याने गाडी फोडली. गाडी फोडणाऱ्या साईनाथ खानसोळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान साईनाथ खानसोळे यांच्या खात्यात यावर्षीचे 6200 रुपये अनुदान जमा झाले होते. मागच्या वर्षीचे अनुदान देखील त्यांना मिळाले होते असा खुलासा तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी केला. साईनाथ खानसोळे याची चौकशी सूरू असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Byte - आनंद देऊळगावकर, तहसीलदार, मुदखेड
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Oct 27, 2025 12:33:48
Karjat, Maharashtra:रायगड ब्रेकिंग Slug - कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा मला चांगलच माहीत आहे.... सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांना नाव न घेता इशारा Anchor - कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा ते मला चांगलच माहीत आहे असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना नाव न घेता दिला आहे.त्यामुळे रायगड मधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.कर्जत मध्ये आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी कर्जत मध्ये राष्ट्रवादीची सभा पार पडली यावेळी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना हे वाक्य काढलेत त्यामुळे महायुतीतील हा वाद कायम राहण्याची शंका आहे.सध्याच्या परिस्थितीत कोणी कोणावर भाष्य करू नका पक्षाच्या प्रक्रियेद्वारे प्रत्येकाला योग्य वेळी संधी दिली त्यामुळे आपली योग्य भूमिका ठेऊनच भाष्य करा असा सल्ला तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. खोपोली मधील शिवसेनेतून अजित दादांच्या राष्ट्रवादीत आलेले सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील तटकरे यांनी यावेळी केले.त्यामुळे सुनील पाटिल यांना राष्ट्रवादीकडून खोपोली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 27, 2025 12:19:33
1
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 27, 2025 12:12:51
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 27, 2025 12:10:19
Dhule, Maharashtra:नंदुरबारच्या शहादा येथील एका सराफा व्यापाऱ्याच्या अपहरण झाल्याची घटना घडली आहे. शहादा शहरातून म्हसावद येथील सराफा दुकानाकडे जाण्यास निघालेल्या सोनाराचे रस्त्यातून अपहरण झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. शहादा शहरात राहणारे सोनार रितेश जयप्रकाश पारेख आपल्या घरुन सोने चांदीच्या वस्तू घेवून निघाले होते. म्हसावद येथील दुकानाकडे जात असताना रस्त्यातून ते अचानक बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहादा पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचे मागणी सरांफानी केली आहे. या प्रकरणी तक्रार ही पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पाडळदा ते बुडीगव्हाण रस्त्यावरुन जात असतांना भगिनीशी मोबाईलवरुन संवाद करत होते. त्याच वेळी ही घटना घडली. त्यानंतर घरी कुटुबीयांना कळवून तपास केला असता संबंधीत सोनार दुकानावर पोहचलाच नसल्याची बाब समोर आली. पोलीस संबंधीत सोनाराचा कसोशीने तपास करीत आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 27, 2025 12:09:01
Jalna, Maharashtra:जालना :काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन सर्व पर्याय खुले असल्याच्या खोतकरांच्या ईशाऱ्यानंतर गोरंटयाल म्हणाले ज्याला जे करायचंय ते करु द्या ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेत गृहकलह सुरूच अँकर | जालन्यातल्या महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर चांगलंच गगृह कलह पाहायला मिळतोय. निवडणुकीत युती करण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद पेटलाय.काल जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत शिवसेनेसोबत भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती केली नाही तर आपल्या समोर सर्व पर्याय खुले असल्याचा ईशारा माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजप नेते रावसाहेब दानवे यांना दिला होता.खोतकर यांच्या या ईशाऱ्याला माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी उत्तर दिलं आहे. ज्याला जे करायचं ते करू द्या असं म्हणत गोरंटयाल यांनी खोतकरांच्या ईशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आहे. साऊंड बाईट : अर्जुन खोतकर बाईट :कैलास गोरंटयाल,माजी आमदार
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 27, 2025 12:05:55
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 27, 2025 11:30:45
Dhule, Maharashtra:धुळे जिले में अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणल आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जोरदार कोसळलेल्या पावसाने शेतातील मका, कपाशी पिकांचे प्रचड नुकसान झाले, शनिवारी रात्रीच्या पासून जिल्हात पाऊस तळ ठोकून आहे. काही गावांमध्ये पावसाने जोरदार झोडपल्याने अनेक भागांत शेतातील पिके पाण्याखाली गेली. सध्या मका पिकाची कापणी व कापूस वेचणी सुरू असून, पावसाळ्यात कमी-अधिक पाऊस झाल्याने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने अक्षरशः डोळ्यांत पाणी आणले आहे. सध्या मका पिकाची सोंगणीचा हंगाम सुरु असून सोंगणी करून टाकलेल्या मकाचे कणसे शेतात पडून आहे. मका सोंगून पडलेल्या पिकावर पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मजदूरांच्या अभावी तसेच रब्बी पिकांच्या लागवडीमुळे शेतकरी विविध कामात व्यस्त आहेत. ज्यामुळे कपाशी वेचणीची कामे मागे पडली असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला बोडें तशीच असून काल झालेल्या पावसामुळे कपाशीच्या झाडांच्या कापसाच्या वाती झालेल्या दिसून येत आहे.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top