Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

नंदुरबार के शहादा में सराफा व्यापारी का अपहरण, पुलिस खोज में जुटी

PPPRASHANT PARDESHI
Oct 27, 2025 12:10:19
Dhule, Maharashtra
नंदुरबारच्या शहादा येथील एका सराफा व्यापाऱ्याच्या अपहरण झाल्याची घटना घडली आहे. शहादा शहरातून म्हसावद येथील सराफा दुकानाकडे जाण्यास निघालेल्या सोनाराचे रस्त्यातून अपहरण झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. शहादा शहरात राहणारे सोनार रितेश जयप्रकाश पारेख आपल्या घरुन सोने चांदीच्या वस्तू घेवून निघाले होते. म्हसावद येथील दुकानाकडे जात असताना रस्त्यातून ते अचानक बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शहादा पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचे मागणी सरांफानी केली आहे. या प्रकरणी तक्रार ही पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पाडळदा ते बुडीगव्हाण रस्त्यावरुन जात असतांना भगिनीशी मोबाईलवरुन संवाद करत होते. त्याच वेळी ही घटना घडली. त्यानंतर घरी कुटुबीयांना कळवून तपास केला असता संबंधीत सोनार दुकानावर पोहचलाच नसल्याची बाब समोर आली. पोलीस संबंधीत सोनाराचा कसोशीने तपास करीत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Oct 27, 2025 15:08:26
Navi Mumbai, Maharashtra:रोहित पवार यांनी बिवलकर जमीन घोटाळ्या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन बिवलकर आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे . त्याचबरोबर आज राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे पोलीस आयुक्त कार्यालया बाहेर राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात येणार होते. मात्र पोलीस प्रशासनाने आश्वास दिल्या नंतर सदर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे . तर बिवलकर जमीन घोटाळ्या प्रकरणी संबंधित तत्कालीन सिडको संचालक संजय शिरसाट, सिडको आणि नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी असून गुन्हा दाखल नाही केला तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गट व स्थानिक भूकीपुत्रांकडून देण्यात आला आहे .
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 27, 2025 14:47:23
Virar, Maharashtra:Slug- वसई विरार मध्ये छटपूजा उत्साहात साजरी फुलपाडा धरण परिसरात भाविकांची गर्दी अँकर - विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील पापडखिंड धरण परिसरात महापर्व छठपूजेचा उत्सव सोमवारी सायंकाळी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारो महिला व पुरुष श्रद्धाळुओंनी अस्ताला जाणाऱ्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पित करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. छठ व्रतादरम्यान स्वच्छता आणि शुचितेचे पालन करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. मात्र या सर्वात वसई विरार महानगरपालिकेने छटपूजेसाठी बनवलेल्या कृत्रिम तलावांकडे भक्तांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळाली... वसई–विरार महानगरपालिकेकडून धरण परिसरात स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली. प्लास्टिक, कचरा किंवा पुजेचे साहित्य पाण्यात न टाकण्याचे आवाहनही पालिकेने नागरिकांना केले होते. काठांवर सजवलेले घाट, पारंपरिक पूजा साहित्य आणि छठी मैयाचे गीत यामुळे वातावरणात भक्तिमय उत्साह अनुभवायला मिळाला. महानगरपालिकेने या तलावांवर सुरक्षा आणि स्वच्छतेची विशेष उपाययोजना केली होती. लाईफगार्ड, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवक सतत तैनात असल्याने भाविकांना कोणताही त्रास झाला नाही. गर्दीचा मोठा ओघ असूनही कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 27, 2025 14:39:09
Nagpur, Maharashtra:नागपूर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूचा आंदोलनास शरद पवार गटाकडून पाठिंबा जाहीर... माजी गृहमंत्री तथा जेष्ठ नेते यांनी केला पाठिंबा जाहीर... शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह, शेतमालाला हमीभाव, अपंग बांधव, मच्छीमार, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलना पाठिंबा... समविचारी पक्ष आणि संघटनांनी उद्या नागपूर शहरात आयोजित केलेल्या ‘महायेळगार आंदोलना’त सहभागी होण्याचे आवाहन... जनसामान्यांचा आवाज निष्क्रिय महायुती सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिंबा...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 27, 2025 14:20:38
Nashik, Maharashtra:टी पॅकेज चहा ही कल्पना चायना मधून आपल्याकडे आली चहा म्हणजे कॅलमेलियालीज लिउज टाकून त्यामध्ये पाणी ओतलं जातं त्या पाण्याचं आयुर्वेदामध्ये फॉन्ट म्हणून अशाप्रकारे जे तयार होतं पानांच्या वरचा जो श्राव तो आपल्याला पाहिजे असतो तो आणि तो ताबडतोब सेवन करावा ही मुळात चहाची संकल्पना चहाची संकल्पना नंतर भारतीय शास्त्रांमध्ये बदलत गेली त्याच्यामध्ये दुधाचा वापर केला गेला चांगलंच आहे दूध हे शरीरासाठी म्हणजे पृथ्वीवरच अमृत म्हटलं जातं यातच कारण चहा मध्ये विविध प्रकार निघाले चहा म्हणजे तल्लन द्यायची अशी एक संकल्पना पुढे मुळात म्हणजे हा गरम चहा हा तुम्हाला पोषक ठरतो तुमच्या शरीरातल्या सगळ्या स्थायूंना उद्योजक ठरतो चहाच्या ऐवजी आता उपाशी पोटी जर तुम्ही सकाळी चहा सकाळचा पहिला प्रहर आहे गरम चहा पिणं आवश्यक आहे गरम चहाने तरतरी येते फक्त ते प्रमाणबद्ध असावं तो प्रमाणापेक्षा जास्त नसावा दुपारचा चहा पिणे पण आपली संकल्पना आहे जेवण पचल्यानंतर जेव्हा मधला काळ आहे त्याच्यामध्ये थोडाफार नाष्टा किंवा ऐवजी दुधाचा चहा घेण्याची संकल्पना भारतामध्ये सुरू झाली इतर ठिकाणी भारताच्या बाहेर जर बघितलं तर उत्तेजक म्हणून चहाचं श्रीलंकेसारखे देश जर बघितले तर विविध वनस्पती त्यामध्ये टाकल्या जातात आणि आपल्याकडे जो आयुर्वेदिक चहा मिळतो त्याच्यामध्ये असंख्य वनस्पतींचा उल्लेख आहे चहाला तुम्ही काढाही म्हणू शकता कशाही म्हणू शकता तुम्ही सेवन केलं त्याचा निश्चित फायदा होतो किंबहुना कस्टमाईज घेतो म्हणजे एखादा रुग्णासाठी समजा हृदयाचा रुग्ण आहे त्याच्यासाठी अर्जुन शारदा एखादं सौंदर्य वाढवण्यासाठी मंजिष्ठा सुगंध वाढवण्यासाठी दौंड नंबरगा अशाप्रकारे अश्वगंधा ही वापरू शकता मुळात ही संकल्पना भारतीय शास्त्रातली आहे चहा हा नाव दिलं गेलं ज्यावेळेस कशा फॉन्ट पाण्यामध्ये टाकायचं आणि झाकून ठेवायचं ते नंतर घ्यायचं हे उत्तेजक होतं तुम्हाला याच्यामध्येही दूध ही संकल्पना तुमच्या शरीराला पोषक ठरते आता हे किती वेळा घ्यावं सकाळ आणि संध्याकाळ या आपल्याकडे ठरलेला आहे कारण तो काळ आहे पहिला काळ आहे कपाचाय आहे दुसरा काळ हा संधी काळ आहे ज्यावेळेस संध्याकाळी चहा पिण्याची संकल्पना तो संधी काळ आहे जेवणानंतर पिऊ नये किंवा भूक लागलेली असली की चहा पिऊ नये ही संकल्पना बरोबर आहे दुधाचा चहा पोषक ठरतो हे आपल्याला विसरायला नको त्यामुळे चहा एकदा किंवा दोन वेळा झोप न येण्यासाठी चहा पिण्याची प्रथा वाढलेली आहे त्याच्या ऐवजी गरम गरम कुठलाही पदार्थ तुम्ही जर घेतला तुमची झोप उडणारी आहे थंड पदार्थ हा झोप आणणार आहे कुठलाही थंड पदार्थ घ्या शरीराची ऍक्टिव्हिटी कमी करणारी आहे चहा कुठला घ्यावा याच्याकडे लक्ष द्यावं भारतात जो मिळतोय चहा, कस्टमाईज अत्यंत आरोग्यकारक आहे किंबहुना चहाचे विविध प्रकार बुद्धिवर्धक चहा सौंदर्यवर्धक चहा प्रकारे करून तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी ही जी संकल्पना जी आहे काही पानांचा वापर केला जातो कॅल्मिनीचे पान उत्तेजक आहे ग्रीन टी चे पानही औषधी गुणधर्म आहे ग्रीन टी घेताना ब्लॅक टी ही वेगळी पिसेस आहे काळा चहा हा म्हणजे ब्लॅक टी मानलं जातं ज्यांना पचनाचा त्रास आहे लिंबू खूप पिळून पिण्याची प्रथा आहे लिंबू हाडांना ठिसूरता देते लिंबाचा पातळ स्लाईस हा फक्त टीन होणार आहे काश्मीरमध्ये मिळणारा कावा चहा काश्मीर मधील चहा मध्ये दालचिनी आहे दालचिनी उष्णता पण हृदयाच्या रक्तवाहिन्या विस्तार कार्यक आहे म्हणून तिकडचा कावा चहा प्रसिद्ध आहे दुशम देशम बलम देश आणि इतरत्र ही चहाची संकल्पना बदलत गेली
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 27, 2025 14:19:58
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले 45 मोबाईल शोधून त्यांना परत दिले आहेत. या मोहिमेत केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलनं मोलाची भूमिका बजावली असं पोलिसांनी सांगितलंय. अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून, कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान किंवा खरेदीदरम्यान मोबाईल हरवण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांकडे नियमितपणे येत असतात. 2022 ते 2025 या काळात अंबरनाथ शहरात जवळपास 182 मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक उमेश सावंत, पोलीस शिपाई मंगेश सूर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलच्या मदतीने तांत्रिक तपास करत 45 मोबाईल मिळवण्यात यश मिळवलं आहे. या मोबाईलची 9 लाख 45 हजार रुपये इतकी असून आज हे मोबाईल मूळ मालकांच्या हाती सुपूर्त करण्यात आले. मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तत्काळ त्याबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस ठाणी्यावर करावी असं आवाहन देखील या निमित्ताने पोलिसांनी केलं आहे.
3
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 27, 2025 13:52:36
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटलमध्ये आज MRI, CT स्कॅन आणि अल्ट्रासोनोग्राफी मशीन उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते पार पडलं. CPR हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांना एका छताखाली उपचार मिळण्याच्या दृष्टीने हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून CPR रुग्णालय अत्याधुनिक करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. याचाच एक भाग म्हणून आज MRI मशीन, CT स्कॅन विभाग, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स आणि अत्याधुनिक ऑडिटोरियम याचं लोकार्पण झालं. यावेळी हसन मुश्रीफ यांनी म्हटलेले होते. On MRI उद्घाटन: आज छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात MRI, सोनोग्राफी, MMI सर्विस एका छत्राखाली आणले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हस्ते याचे उद्घाटन होणे अपेक्षित होते, मात्र काही अडचणींमुळे झाले नाही. जानेवारी महिन्यात त्यांच्या उपस्थित उद्घाटन होईल. शेंडा पार्क मधील रुग्णालयाचे नूतन इमारतीचे काम जोरात सुरू आहे. On नागपूर पार्टी कार्यालय लावणी: नेमकं काय झाले यासंदर्भात मला कल्पना नाही, पण लावणी ही आपली लोककला आहे. On सुप्रिया सुळे रस्ता ट्विट: आम्ही दिल्लीत नितीन गडकरी यांना विनंती केली आहे त्यांना देखील ठेकेदारासोबत राग आहे, त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र तो ठेकेदार न्यायालयात गेल्यानंतर काम थांबेल ही भीती आहे. On स्थानिक स्वराज्य: सर्वच पक्षाने बळाची तयारी करत आहेत. निवडणूक जवळ आल्यानंतरच राष्ट्रवादी समजेल काय तयारी करत होती.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 27, 2025 13:48:06
Akola, Maharashtra:अकोला शहरात आज सकल आदिवासी एकता महासंघ तसेच सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने “बोगस घुसखोरी हटाव जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. आदिवासी समाजाच्या आरक्षण प्रवर्गात इतर समाजघटकांकडून होत असलेल्या घुसखोरीच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात आदिवासी आरक्षण प्रवर्गात इतर समाजातील लोकांची घुसखोरी तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी आणि आदिवासी जमाती कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशा मागण्यांचाही समावेश होता.न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यासाठी या मोर्चात आदिवासी समाजातील महिला, पुरुष तसेच युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 27, 2025 13:06:50
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी शहरात पहाटेच्या सुमारास खळबळ उडाली आहे. नवीन बसस्थानाकाझवळील सुरज बार समोर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री साडेदहाच्या सुमारास अफसर खा रशीद खा हे सुरज वाइन बारमध्ये दारू पिल्यानंतर बाहेर आले. त्याचवेळी बार मालकाच्या चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले, यात अफसर खा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी बार मालकाला ताब्यात घेतले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे. यावेळी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली या प्रकरणात आता पोलिसांनी बार मालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
1
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 27, 2025 13:00:56
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_MudlhedCase Feed on - 2C ---------------------------- Anchor - तहसीदारांची गाडी फावड्याने फोडणाऱ्या शेतक-याला अतीवृष्टी चे अनुदान मिळाल्याचे समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली होती. अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने त्याने गाडी फोडली. गाडी फोडणाऱ्या साईनाथ खानसोळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान साईनाथ खानसोळे यांच्या खात्यात यावर्षीचे 6200 रुपये अनुदान जमा झाले होते. मागच्या वर्षीचे अनुदान देखील त्यांना मिळाले होते असा खुलासा तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी केला. साईनाथ खानसोळे याची चौकशी सूरू असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Byte - आनंद देऊळगावकर, तहसीलदार, मुदखेड
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Oct 27, 2025 12:33:48
Karjat, Maharashtra:रायगड ब्रेकिंग Slug - कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा मला चांगलच माहीत आहे.... सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांना नाव न घेता इशारा Anchor - कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा ते मला चांगलच माहीत आहे असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना नाव न घेता दिला आहे.त्यामुळे रायगड मधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.कर्जत मध्ये आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी कर्जत मध्ये राष्ट्रवादीची सभा पार पडली यावेळी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना हे वाक्य काढलेत त्यामुळे महायुतीतील हा वाद कायम राहण्याची शंका आहे.सध्याच्या परिस्थितीत कोणी कोणावर भाष्य करू नका पक्षाच्या प्रक्रियेद्वारे प्रत्येकाला योग्य वेळी संधी दिली त्यामुळे आपली योग्य भूमिका ठेऊनच भाष्य करा असा सल्ला तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. खोपोली मधील शिवसेनेतून अजित दादांच्या राष्ट्रवादीत आलेले सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील तटकरे यांनी यावेळी केले.त्यामुळे सुनील पाटिल यांना राष्ट्रवादीकडून खोपोली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top