Back
headline
VKVISHAL KAROLE
Dec 13, 2025 08:32:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संभाजी नगरचा लखन सध्या राज्यात गाजतोय. या पठ्ठ्याने सांगलीच्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत मालकाला फॉर्च्यूनर जिंकूवुन दिली. 5 वर्षाच्या या लखन ने गेल्या चार ते पाच वर्षात मालकाला दीड कोटींची कमाई सुद्धा करून दिलीय. दिवसाला 10 लिटर दूध पिणारा हा पैलवान स्पर्धेत उतरला की भल्या भल्याना घाम फोडतो. कोण आहे लखन आणि काय करतो पाहुयात. घोड्याला लाजवणारी गती, वाऱ्याला चिरण्याची हिम्मत, आणि हत्तीची ताकद घेऊन शर्यतीत उतरणारा हा छत्रपती संभाजी नगरचा लखन आहे. नोव्हेंबर महिन्यात सांगली मध्ये झालेली श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत या पठ्ठ्याने बाजी मारली आणि मालकासाठी 35 लाखांची फॉरचुणर गाडी जिंकली. संभाजी नगर जिल्ह्यातील करोडी गावतील चव्हाण कुटुं biographiesचा हा लखन सर्वांचाच लाडका आहे. चव्हाण कुटुंबांनी लखनला दोन वर्षांचा असताना जालन्याच्या गावातून साडेबाराएक लाखात विकत घेतले आणि त्यानंतर सुरू झाला त्याचा बैलगाडा शर्यतीचा प्रवास. तासगाव इथं हिंद केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील 2400 बैल आले होते; त्यात लखन ने बाजी मारली. ही ही काही त्याची पहिली स्पर्धा नव्हती; त्याने या आधी 150 वर स्पर्धा जिंकल्या, एक फॉरचुणर आणि 16 दुचाकी जिंकल्या आहेत; त्यात तीन बुलेटसुद्धा आहेत. स्वतःची वाहतूक करण्यासाठीसुद्धा एक गाडी जिंकली आहे. लखन ने हिंद केसरी स्पर्धा तब्बल 4 वेळा जिंकली आहे. 2024 सातारा जिल्ह्यातील पेडगाव येथे पहिल्यांदा, 2024 मध्ये फलटण दुसऱ्यांदा, 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशेर तिसऱ्यांदा, डिसेंबर 2025 महिन्यात पुणे हवेली तालुक्यातील वडकी येथे झालेल्या स्पर्धेत चौथ्याांदा हिंद केसरी जिंकून सर्वांची मने जिंकली. मालिक मनोहर चव्हाण, लखन चे मालक. लखनचा आहारही तितकाच तगडा आहे; सकाळ-Sanskrit संध्याकाळ त्याला पाच पाच लिटर दूध पाजले जाते, पंधरा प्रकाराचा सुका मेवा वापरून लाडू तयार करून गावरान तुपामध्ये भिजवून खाद्य दिले जाते. दर दोन दिवसाला पळण्याचा सराव देण्यात येतो, काही वेळा पाण्यात पोहण्याचा सराव देऊन शरीर तंदुरुस्त ठेवतात. लखन चा रुबाब इतका असतो की तो खाली बसताना देखील त्याला गादी लागते. लखन ची देखभाल करणाऱ्या साठी 24 तास एक माणूस त्याचा सेवेत असतो; प्रत्येकाचा एक शुभ अंक असतो, तसा लखनचा 1197 हा शुभ अंक आहे. ज्यावेळी या क्रमांकावर तो शर्यतीत उतरला तो अव्वल आला, तेव्हा हा क्रमांक त्याचा शुभ अंक म्हणून ओळखला. प्रत्येक स्पर्धेत हा नंबर घेऊन तो सहभागी झाला आणि जिंकू देखील लागला. लखन ला अनेकांनी दीड कोटी रुपयात मागितले आहे, मात्र चव्हाण कुटुंबाचा हा रांगडा मुलगा त्यांना प्रिय आहे. लखन आता इन्स्टाग्राम वर पण स्टार आहे; अल्पावधीत त्याचे 27 हजार फॉल्लोअर झाले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 10:40:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 13, 2025 10:20:33Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस पालघर प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत... या प्रकरणी लवकरच चौकशी केली जाईल
0
Report
AKAMAR KANE
FollowDec 13, 2025 10:19:430
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 13, 2025 10:16:230
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 13, 2025 10:16:000
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 13, 2025 09:47:510
Report
ABATISH BHOIR
FollowDec 13, 2025 09:38:490
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 13, 2025 09:37:330
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 13, 2025 09:37:180
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 13, 2025 09:36:410
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 13, 2025 09:34:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 13, 2025 09:04:000
Report
KJKunal Jamdade
FollowDec 13, 2025 08:16:120
Report
ABATISH BHOIR
FollowDec 13, 2025 08:00:130
Report