Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

उतार-चढ़ाव से भरे चुनाव: नौ तालुकों में 793 जिला परिषद उम्मीदवार, 1343 पंचायत समिति प्रत्याशी

VKVISHAL KAROLE
Jan 22, 2026 03:04:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ६३ जिल्हा परिषद गटांसाठी ७९३, तर १२६ पंचायत समिती गणांसाठी तब्बल १३४३ उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच 'एबी फॉर्म'वरून संघर्ष पाहायला मिळाला, तर निष्ठावंतांनी बंडाचे निशाण फडकवल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 04:49:01
Washim, Maharashtra:अँकर: विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात नांदेड रेल्वे विभागाने मागील वर्षभरात कडक कारवाया करत महसूलात उच्चांक गाठला आहे वाशिम रेल्वेस्थानकाचा समावेश असलेल्या या विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमांतून ११.०६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.ही कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत २०२.२३ टक्क्यांनी अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर नियोजनबद्ध व अचानक तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या.यात ११४ फोर्ट्रेस चेक,१७ मॅसिव्ह चेक,७ मॅjis्ट्रेट चेक तसेच ११ स्पॉट चेक मोहिमांचा समावेश होता.याशिवाय संवेदनशील ठिकाणी अँम्बुश चेकिंग नियमितपणे घेण्यात आले.ही तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून तिकीट काढून प्रवास करण्याचे अहवान करण्यात आले आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 22, 2026 04:48:35
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचे सत्ता स्थापन होणार असली तरी, विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार? याची जास्त चर्चा होत आहे. कारण की भाजप नंतर दहा नगरसेवक असलेल्या एमआयएम ने विरोधी पक्ष नेतेपदी एम आय एमचा नागारसेवक विराजमान होईल असं दावा केला असतांना, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार फारुक शहा यांनी देखील विरोधी पक्षनेते पदाचा दावा केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 आणि शिवसेनेचे पाच नगरसेवक मिळवून सर्वाधिक संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच नगरसेवक विराजमान होईल असा दावा फारुक शहा यांनी केलेला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एमआयएम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा सामना विरोधी पक्षनेते पदासाठी रंगेल असे एकंदरीत दिसून येत आहे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 22, 2026 04:46:39
Dhule, Maharashtra:शहादा तालुक्यात महावितरणचा गंभीर हलगर्जीपणामुळे ऑक्सीजन वर असलेल्या आजोबाची प्रकृती चिंताजनक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वीज बिल भरूनही खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाने 50 किलोमीटर क्षेत्रातून आलेल्या अनेक रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला. वीज पुरवठा खंडित केल्यामुळे रुग्णांना उघड्यावर उपचार देण्याची वेळ आली. वीज पुरवठा नसल्यामुळे ऑक्सिजन वर असलेल्या आजोबाला सुरळीत ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे प्रकृती चिंताजनक झाली होती. दुसऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या ऐवजी रुग्णालयाच्या विद्युत पुरवठा खंडित केला गेल्याची सर्वांना सारवास नंतर करण्यात आली. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क केल्यानंतर देखील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. विद्युत पुरवठा नसल्यामुळे आम्हाला रुग्णांना रस्त्यावर उपचार द्यावा लागला असं डॉ.श्रीराम पाटील यांनी सांगितले. परिसरात एकही शासकीय रुग्णालय नसल्यामुळे रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. सध्या दुसऱ्याकडून वीजपुरवठा घेऊन रुग्णांना उपचार देत आहेत तर, काही रुग्णांना शहादा येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 22, 2026 04:36:17
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 22, 2026 04:18:31
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अर्जांच्या शेवटच्या दिवशी लातूर जिल्ह्यात उमेदवारीचा महापूर... बी-फॉर्म वादातून काँग्रेस–भाजपमध्ये बंडखोरी उफाळली... उमेदवारी कापल्याने दिग्गजांनी भरले अपक्ष अर्ज..... पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक रंगात... १७७ जागांसाठी तब्बल १५५० उमेदवार रिंगणात.... लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी धावपळ पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्जांचा महापूर उसळला. पक्षांतर्गत नाराजी, बी-फॉर्मवरून वाद आणि बंडखोरीमुळे निवडणूक वातावरण तापलं आहे. काँग्रेस आणि भाजपकडून अनेकांची उमेदवारी आधी फायनल असूनही ऐन वेळी कापली गेल्याने दोन्ही पक्षांतील अनेक दिग्गजांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ९५२, तर जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ५९८ असे एकूण १५५० अर्ज दाखल झाले असून, यामुळे निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jan 22, 2026 04:17:45
Beed, Maharashtra:माजलगाव तालुक्यातील पवारवाडी परिसरात असलेल्या जय महेश साखर कारखान्यामुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्यातून निर्माण होणारे विषारी केमिकलयुक्त सांडपाणी नियमबाह्य पद्धतीने जवळच्या एका खदानीत सोडण्यात आले. मात्र या सांडपाण्याचा निचरा होऊन ते आजूबाजूच्या शेतजमिनीत आणि विहिरींमध्ये शिरल्याने परिसरातील शेकडो एकर शेती बाधित झाली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विहिरीतील पाणी दूषित झाल्यामुळे पिकांना पाणी देता येईना. अनेक ठिकाणी पिके अक्षरशः जळून गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर या प्रदूषणाचा गंभीर परिणाम झाला आहे. यानंतर, प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित पाणी वापरात आल्याने त्वचारोग, पोटाचे विकार, श्वसनाचे त्रास यासारख्या समस्या वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. लहान मुलते आणि वृद्ध नागरिकांना याचा अधिक फटका बसत असल्याची माहिती समोर येत आहे. या गंभीर प्रकाराविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 26 तारखेला जय महेश साखर कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे आपला जीव धोक्यात आला असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पर्यावरणीय नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यातच हा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारखाना प्रशासनावर तातडीने कारवाई करून प्रदूषण थांबवावे, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावेत, या मागणीसाठी 26 जानेवारी रोजी कारखाना बंद करण्याचा एल्गारच शेतकऱ्यांनी पुकारला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Jan 22, 2026 04:16:42
Nanded, Maharashtra:शिखांचे नववे गुरू श्री गुरू तेग बागदुरजी यांच्या 350 व्या शहिदी समागमा निम्मित नांदेड मध्ये 'हिंद दि चादर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 आणि 25 जानेवारी असे zwei दिवस विविध धर्मांच्या संताच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. नांदेड शहराजवळच्या कौठा भागात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून 52 एकर जागेत हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. यासाठी मंडप उभारणीसह, लंगर, आणि विविध स्टॉल लावण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला 24 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री उपस्थितीत राहणार आहेत. 25 जानेवारी रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थितीत राहणार आहेत. श्री गुरू तेग बहादुरजी यांनी धर्म रक्षणाकरिता बलिदान दिले, त्यांना हिंद दि चादर अर्थात भारताची ढाल असे संबोधले जात होते. त्यांचा इतिहास तरुण पिढी आणि प्रत्येक भारतीयाला कळवा यासाठी हिंद दि चादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिख, शिखलकरी, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव, वारकरी संप्रदायातील भाविक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. दोन दिवसात दहा लाख भाविक या कार्यक्रमात सहभागी होतील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 22, 2026 03:49:37
Latur, Maharashtra:लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका आईने आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या मुलीची हत्या केल्याने संपूर्ण लातूर हादरून गेलं आहे. अश्विनी चौगुले असं आरोपी महिलेचं नाव असून, रागाच्या भरात तिनं नंदिनी नावाच्या चिमुरडीवर चाकूने वार करून तिचा जीव घेतल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. पती उशिरा घरी परतल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्याच वादाचं रूपांतर या भीषण घटनेत झालं. पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ अटक केली आहे केवळ रागातून हे कृत्य केल्याचं आता पोलीस तपासात स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने अश्विनी चौगुले हिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 22, 2026 03:46:21
Pandharpur, Maharashtra:माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचा पुतण्या माढ्यातून भाजपच्या उमेदवारीवर जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या मागील काही दिवसांपासून भाजप पक्षप्रवेशासाठी थांबलेले शिवसेनेचे माजी नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा मुलगा पृथ्वीराज सावंत माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत आणि शिवाजी सावंत यांच्या वादातून सावंत कुटुंबीयचा थांबलेला पक्ष प्रवेश अखेर जिल्हा परिषदेच्या निवडणुकां mouळाला पूर्ण झाला. जिल्हा परिषदेची उमेदवारी गळ्यात पाडून पृथ्वीराज सावंत हे भाजपवासी झाले आहेत
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 22, 2026 03:46:03
0
comment0
Report
Advertisement
Back to top