Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

गडचिरोली में अजित पवार गट ने जनकल्याण यात्रा का दूसरा चरण शुरू किया; रोड शो से महायुती के सहयोगी डरे

AAASHISH AMBADE
Oct 26, 2025 14:01:43
Chandrapur, Maharashtra
गडचिरोलीत रा. कॉ. अजित पवार गटाने दिवाळी संपताच जनकल्याण यात्रेचा दुसरा टप्पा सुरू केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची ताकद दाखविण्यासाठी माजी मंत्री आणि पक्षाचे माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आयोजित केलेल्या वडसा येथील रोड शो आणि जाहीर सभेने महायुतीचे सहकारी आणि मविआतील पक्षांना देखील धडकी भरविली। गडचिरोली जिल्ह्यातील 2 प्रमुख आदिवासी नेते नंदू नरोटे आणि भानय्या जंगम यांचा धर्मराव आत्राम यांनी पक्षात पक्ष प्रवेश करविला. महायुतीच्या सहकारी पक्षांनी जागावाटप बोलणी करावी असे आवाहन मेळाव्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी केले。
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 04:08:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात सरलेल्या पावसाळ्यात ४४ लाख १७हजार ६३५ शेतकऱ्यांचे खरीप हंगामात हाताशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले. शासनाने नुकसानभरपाईसाठी पहिल्या ४ टप्प्यांत ३१८२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यातील २ हजार ७५ कोटी रुपयांची रक्कम २८ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड केली. त्यातील २१ लाख शेतकऱ्यांना १५६८ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपयांचे अनुदान केवायसीविना पडून आहे. छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांत जून, जुलै व ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांतील नुकसानीची मदत ७१ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांवर वाटप केल्याचा दावा करण्यात येत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानभरपाईसाठी अद्याप शासनाने आदेश जारी केलेला नाही. सोमवारी यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणेला असून जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून अनुदानाचा निर्णय होताच, त्या अपलोड करण्यात येणार आहेत, असेही प्रशासन सांगताय...
2
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 27, 2025 04:06:46
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका स्वबाळावर लढणार शिव सेना शिंदे गट प्रमुख संजय कुंभलकर गोंदिया जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषद तसेच नगर पंचायतीच्या निवडणुका शिवसेना सिंदे गट स्वबळावर लढणार असल्याची माहिती भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी गोंदियात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात दिली आहे. आगामी नगर पंचायत तसेच नगर पंचायतिच्या निवडणुकी पाहता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली असून काही पक्षांनी इच्छुक नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरवात केली आहे. त्यातच गोंदियात देखील शिव सेना शिंदे गटाने इच्छुक उमेदवारांची बैठक घेत मार्गदर्शन करत स्वबाळाचा नारा कार्यकर्त्यांना दिला आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 27, 2025 04:06:19
Niphad, Maharashtra:अँकर - निफाड तालुक्यात गेली दोन दिवस रात्रभर सुरु राहिलेल्या बेमोसमी पावसाने द्राक्ष, कांदा, मका, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे..द्राक्ष पीक रोगांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच चिखल तुडवत फवारणीसाठी लगबग सुरु झाली आहे..निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात शनिवारी व रविवारी रात्रभर बेमोसमी पावसाने हजेरी लावली.या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला आहे. द्राक्षमाल हा अवकाळीच्या तडाख्यात सापडला असून रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच फवारणी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.फवारणीसाठी ट्रॅक्टरला पाणी व चिखलाचा मोठा अडसर ठरत आहे..द्राक्षे फवारणीचा खर्च मोठा असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 27, 2025 03:51:55
Washim, Maharashtra:वाशिम: चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे वाशिम तालुक्यातील हाराळ आणि घोटा गावातील शेतकऱ्यांनी चिखली सब स्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. रब्बी हंगामातील सिंचन ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी रात्री दहाच्या sुमारास सब स्टेशनवरच ठिय्या देत झोप काढत आंदोलन सुरू ठेवलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं हे आंदोलन तब्बल रात्री तीनपर्यंत सुरू होतं. शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे एमएसईबीचे अभियंता अंजनकर हे रात्री दोन वाजता घटनास्थळी पोहोचले आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. तात्काळ फॉल्ट दुरुस्तीचे आदेश देत सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन अंजनकर यांनी दिलं. आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 27, 2025 03:46:46
Jalna, Maharashtra:जालना :समृध्दी साखर कारखान्याचा गळीप हंगाम सुरु जालन्यातील घनसावंगीतील समृद्धी साखर कारखान्याच्या गळीप हंगाम 2025-26 सुरु झाला आहे.समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपचे नेते सतिष घाटगे यांच्या हस्ते गाळप सुरू करण्यात आलं. संत महंत आणि शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात कारखान्याच्या 10 हजार मे.टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट वीज प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.समृद्धी साखर कारखाना यावर्षी 2 हजार 970 रुपये प्रतिटन भाव ऊसाला देणार आहे.यावेळी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे, व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी, बळीराम महाराज राठोड, सुरेश महाराज रामदासी, योगीराज कैलासनाथ महाराज उपस्थित होते.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 03:45:28
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 03:45:15
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 27, 2025 03:37:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज , आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार - सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज , आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार - सध्या आठवड्यातून चार दिवस सुरु आहे सोलापूर ते मुंबई विमानसेवा - मात्र आता सोलापूरकरांची वाढती मागणी लक्षात घेता आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने दररोज सुरू राहणार विमानसेवा - त्यामुळे आता सोलापूरकरांना आणि मुंबईकरांना एक नोव्हेंबर पासून दररोज करता येणार सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रवास - स्टार एअरलाइन्सच्या या निर्णयाचे सोलापूरकरांकडून मोठ्या उत्साहात स्वागत
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 27, 2025 03:35:59
Nashik, Maharashtra:शहरामध्ये ३६ तासांत ३४ मिमी पाऊस नाशिक शहर आणि परिसरात काल दिवसभर हलक्या-मध्यम सरींचा वर्षाव सुरूच होता. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजेपासून पुन्हा पावसाचा जोर सर्वत्र वाढला. शहरात काल सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २९ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद पेठ रोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात करण्यात आलीये, तसेच त्र्यंबक रोडवरील सिंचन भवनातील पर्जन्यमापकात काल दिवसभरात पाच मिमी पाऊस मोजण्यात आला. मागील ३६ तासांत शहरात एकूण ३४ मिमी पाऊस झालाय. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अती तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी शहरात ढगाळ हवामान कायम राहिले आज हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' दर्शविण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत टिकून राहिला होता. काल दुपारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली. मात्र, सायंकाळी पुन्हा मध्यवर्ती भागात जोरदार सरी कोसळल्या...
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 27, 2025 03:32:21
Nashik, Maharashtra:रस्त्यात जबरी लूट करणाऱ्या चोरट्यांना अटक नाशिकच्या पेठरोड, अश्वमेधनगररोडवर कामगाराकडे पैशांची मागणी करून नकार दिल्यावर जबर मारहाण करत मोबाइल आणि रोकड लुटून नेल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत पांडवलेणी येथील एका हॉटेलजवळ या दोघा लुटारूंना ताब्यात घेत अटक करण्यात आलीये... उमेश खनपतें, सूरज पवार अशी या संशयितांची नावे आहेत.युनिट २ च्या कार्यालयात नेऊन चौकशी केली असता पेठरोड येथे जबरी लूट केल्याची त्यांनी कबुली दिली. या संशयीताकडून चार मोबाईल आणि एक दुचाकी असा एक लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 27, 2025 03:19:26
2
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top