अमृता फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर, शहरातील भिवापूर येथे ५५ नद्यांच्या जलाने राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे पूजन अँकर :--- चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस आज चंद्रपूरच्या दौर्यावर येत आहेत. दौऱ्यात चंद्रपूर शहरातील भिवापूर येथील शिवलिंग परिसरात आयोजित विशेष पूजेस सहभागी होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे त्यांच्या हस्ते पूजन होणार असून, एक लाख पंचावन्न बेलपत्रे आणि राज्यातील ५५ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगाचा भव्य जलाभिषेक करण्यात येणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
अँकर:- ' आम्ही हिंदू नसून आमचा धर्म आदिवासी आहे' या आदिवासी सरना धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी तसेच गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासी जिल्ह्यांना एकत्र करून स्वतंत्र भिल्ल प्रदेशची निर्मिती करावी यासह लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला पैसा आदिवासी विकास योजनांवर खर्च करावा, आदिवासी बांधवांचे ख्रिश्चन धर्मामध्ये होत असलेले धर्मांतरण थांबवावे या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शेकडो आदिवासी बांधवां सह येवला प्रांतअधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चेकरी सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी..
Feed slug :- AMT_PRAHAR एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती शहरातील खड्डच्या प्रश्नांवर प्रहार आक्रमक; खड्डयात बेशरमचे झाड लावून केले आंदोलन
अँकर :– अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डयाविरोधात प्रहारचे कार्यकर्तेचे चांगलेच आक्रमक झाले असून खड्ड्यातील पाण्यात बसून आणि बेशरम चे झाड लावून प्रहार कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाचा निषेध केला आहे. बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे न बुजवल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवण्याचा इशारा प्रहारचा कार्यकर्त्यांनी दिला आहे. अमरावती शहरात अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आले.
ब्रेकिंग :-
वेरूळ च्या घृष्णेश्वर मंदिरात सेवेकऱ्याला मारहाण
दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी केली मारहाण
बंद द्वारातून प्रवेश देण्यासाठी केला जात होता आग्रह
नकार दिल्यामुळे मंदिराचया सेवेकऱ्याला केली मारहाण
मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
story slug - नवी मुंबईत श्रावण कावड पदयात्रेचे आयोजन, हजारो भक्तांचा सहभाग.
navi mumbai shravan yatra
FTP slug - nm shravan yatra
byet- raju shinde
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: शिवभक्त कावड प्रतिष्ठान नवी मुंबईतर्फे श्रावण कावड पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वज्रेश्वरी ते वाशी येथील शिवमंदिर पर्यंत ही कावड पदयात्रा काढण्यात आली असून शिवलिंगावर पवित्र जल चढवून या कावड यात्रेचा समारोप करण्यात येतो. व्यसनमुक्तीचा आणि सदगुणांचा संदेश देत ही कावडयात्रा काढण्यात आली असून हजारो शिवभक्त या कावड पदयात्रेत सहभागी झाले होते.
बाईट -: राजू शिंदे
Feed slug :--- 2807ZT_CHP_SHARAD_YATRA_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- 9 ऑगस्ट रोजी रा. कॉ. शरद पवार पक्षाच्या वतीने नागपूर येथून मंडल यात्रेची सुरुवात, शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्याची करणार जनजागृती, अनिल देशमुख यांनी चंद्रपुरात दिली माहिती
अँकर:-- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने मंडल यात्रा काढण्यात येणार असून 9 ऑगस्ट रोजी नागपूर पासून या मंडल यात्रेला सुरुवात होईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज चंद्रपूरात याबाबत माहिती दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे स्वतः नागपूर येथे या मंडल यात्रेला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. शरद पवार यांनी ओबीसींच्या हितासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचा ओबीसी समाजाला कसा फायदा झाला हे ओबीसी समाजात बिंबवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचं भाजपकडे ध्रुवीकरण झाल्याचं आणि यातूनच भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्याचं बोललं जातं, त्यामुळे भाजपचा मुख्य मतदार असलेला ओबीसी समाज आपल्याकडे वळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही मंडल यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यातून विदर्भ लक्ष्य करण्यात आले आहे.
बाईट १) अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_kapleshwar_121
*नाशिकच्या गोदावरी तीरी असलेल्या कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, जगातील एकमेव नंदी नसलेल कपालेश्वर महादेव मंदिर...*
अँकर:
आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस असून नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळत आहे. पंचवटी कारंजा ते कपलेश्वर महादेव मंदिर परिसरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागले आहेत. कपालेश्वर महादेव मंदिर हे जगातील एकमेव नंदी नसलेला महादेव मंदिर असून या मंदिराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि याच कपालेश्वर मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून मंदिर प्रशासनाकडनं देखील भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चोख व्यवस्था केली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड...
Use wkt with byte
वाशिम:
File:2807ZT_WSM_WOMEN_KAVAD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.सार्वजनिक महिला मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रेत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कावड सजवली.त्या येडशी कुंड येथे जाऊन जल भरून आणले आणि शेलुबाजार येथील प्राचीन महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीवर हे पवित्र जल अर्पण केले.‘हर हर महादेव’च्या गजरात ही यात्रा पार पडली.या यात्रेमुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
csn student prtst
feed by live u
ANCHOR : छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत मुक्ती मोर्च्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे.एमपीएससी परीक्षेतील त्रुटी दूर करा, शिक्षणातील खाजगीकरण विरोध आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 1000 क्षमतेंची विद्यार्थी वस्तीग्रह निर्माण झाले पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठ गेट परिसरातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यापर्यंत निघाला आहे. या मोर्चामध्ये भारतीय विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
JAVEDMULANI
SLUG 2807ZT_BARAMATIRASTAROKO
BYTE 1
बारामतीत महात्मा फुले चौकातील भीषण अपघातानंतर नागरिकांचं आंदोलन...... पोलीस खात्याने उपाययोजना करण्यासह गतिरोधक बसवण्याची मागणी
Anchor_ बारामती मधील खंडोबा नगर परिसरातील महात्मा फुले चौकात काल डंपर आणि दुचाकीचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला होता,त्यानंतर आचार्य कुटुंबातील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही या धक्क्यानं मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
यानंतर खंडोबा नगर परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन केलं. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना करावी आणि तात्काळ या चौकात गतिरोधक बसवावेत अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
बाईट_आंदोलक नागरिक
FEED NAME | 2807ZT_JALNA_GORANTYAL(4 FILES)
जालना :ब्रेकिंग
कैलास गोरंट्याल येत्या दोन तीन दिवसात भाजपात करणार प्रवेश
जालना महानगर पालिका स्वंतत्रपणे लढण्याची गोरंट्याल यांची मागणी
गोरंट्याल यांचे आतापर्यंतचे प्रतिस्पर्धी राहिलेत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर
महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार- गोरंट्याल
ॲंकर- जालना महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून नको तर स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली असून दोन तीन दिवसांत गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती गोरंट्याल यांनी दिलीये. आगामी काळात महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. महायुतीमध्ये गोरंट्याल यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आहेत. त्यामुळं महानगरपालिका स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये. मात्र पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल असंही गोरंट्याल यांनी म्हंटलंय. दरम्यान दोन तीन दिवसांत गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार असून भाजप नेते रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, अतुल सावे यांच्या उपस्थिती गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश होणार आहे
बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी गर्दी
उल्हासनगरपर्यंत लागल्या भाविकांच्या रांगा
पोलिसांकडूनही शिवमंदिर परिसरात मोठा बंदोबस्त
Amb Wkt shivmandir
Anchor : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलीये. भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली असून भाविकांची रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेली आहे. श्रावणी सोमवारी अंबरनाथच नव्हे, तर मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातूनही भाविक प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात. पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी
Wkt चंद्रशेखर भुयार
28072025
Slug - PPR_MADHA_MARAHAN
file 02
-----
Anchor - माढ्याच्या चिंचोलीत शेतातील रस्त्याच्या कारणावरुन दोन गटात मारहाण-पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा-घटनेचे व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल
शेतातील रस्त्यावर टाकलेला मुरुम काढण्याच्या कारणावरून माढ्याच्या चिंचोलीत दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली असून परस्पर विरोधी माढा पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने १३ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दोन्ही गटाचे मारहाण केल्याचे समोर आले असून सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.
अँकर :-श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मनमाडच्या नागापूर येथील महादेव नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळी असून द्रविड काळात हे मंदिर उभारण्यात आले होते औरंगजेबाच्या काळात जेव्हा मंदिरे उध्वस्त करण्यात येत होती तेव्हा गावातील लोकांनी हे मंदिर जमिनीत पुरुन टाकले असल्याची आख्यायिका आहे पौराणिक मंदिर असल्यामुळे दर्शनासाठी येथे श्रावण महिण्यात शनिवारी आणि सोमवारी भाविकांची प्रचंड मोठ्या गर्दी होते आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी सकाळ पासून मोठी गर्दी उसळी आहे.दर्शन घेताना भाविक जोरदार पावसासाठी महादेवाला साकडे ही घालत आहे. भाविकासाठी आमदार सुहास कांदे आणि नागपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले
story slug - सायन- पनवेल मार्गावर भाजी चा ट्रक पलटी
सायन - पनवेल मार्ग पर ट्रक अपघात
FTP slug - nm sion - panvel truck accident
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor- पनवेल सायन मार्गावर भाजीचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती, खारघर ते बेलापूर दरम्यान मुंबई च्या लेनवर ट्रक पलटी झाला ,चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला ,मुख्य मार्गावर ट्रक पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती,यावेळी
वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली।ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू
gf -
-------------------------------
स्लग - देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन,555 बैलगाडी शर्यतीत सहभागी..
अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व नागपंचमी निमित्ताने "देवाभाऊ केसरी" बैलगाडा
शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन पार पडले.बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन 555
बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांकाला 5 लाख 55 हजार 555 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाडीच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शौकीनांनी नांगोळीच्या ऐतिहासिक मैदानावर हजेरी लावली आहे.