Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा के तुमसर नगर परिषद क्षेत्र में मतदाता सूची गड़बड़ी, डब्बल मतदाता का आरोप

PTPRAVIN TANDEKAR
Nov 06, 2025 02:18:52
Bhandara, Maharashtra
तुमसर पालिकेच्या प्रारूप मतदार यादीत घोळ .... हजारो मतदारांचे मतदार दुसऱ्या प्रभागात तर काहींचे नाव डब्बल.... Anchor : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेळापत्रक jahiर झाले आहे. तर दुसरीकडे बोगस मतदार मुद्दा दिवसेंदिवस समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद हद्दीत 10 हजारांच्या वर मतदारांचे मतदान स्थानांतर झाले आहे. तर काहींचे मतदार डब्बल आले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने लावण्यात आला आहे. त्यामुळे ज्या प्रभागात वास्तव्यात असलेल्या मतदाराला दुसऱ्या प्रभागात मतदान करावा लागणार आहे त्यामुळे निवडणुका घेण्याआधी निवडणूक विभागाने मतदार यादी दुरूस्त करायला हवी होती असा आरोप माजी आमदार अनिल बावनकर यांनी केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 04:36:53
Dhule, Maharashtra:नंदुरबार राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात इतर पक्षाच्या सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला मंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या उपस्थितीत सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या तरुण माळी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केल्याने निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे तोरणमाळ हा गट राष्ट्रवादीच्या बाल किल्ला होणार असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे तर ज्या पक्षातून आलेले ही कार्यकर्ते होते त्या पक्षांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपलेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसापासून होत असलेली इनकमिंग जिल्हा देखील याच्या परिणाम होणार असून राष्ट्रवादीचे चांगले दिवस येतील असा देखील विश्वास मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केला,
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 04:35:31
Dhule, Maharashtra:नंदुरबार राष्ट्रवादीच्या वतीने तोरणमाळ येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात आला असून शेतकऱ्यांवरील येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कटिबद्ध असून शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवत असून शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यामुळे अनेक लोक येऊन तुम्हाला खोटे आश्वासन देऊन जातील मात्र जनतेच्या खरा विकास फक्त राष्ट्रवादीच करणार आहे त्यामुळे कोणाच्या खोट्या बोलतांना पडू नका योग्य उमेदवारांनाच मत देऊन निवडून द्या असं मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्या मेळाव्यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर मोठ्या संख्येने शेतकरी बांधव देखील उपस्थित होते
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 06, 2025 04:34:55
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे प्रभारी पदी नियुक्ती केलेले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख पदी विजय चौधरी यांना नियुक्त करण्यात आले आहे. एकीकडे रक्षा खडसे यांचे डॉक्टर हिना गावित यांच्याशी चांगले संबंध असताना, दुसरीकडे विजय चौधरीशी गावित कुटुंबासोबत त्यांचा फारसं सौख्य नाही. त्यामुळे गावित परिवाराला या नियुक्त्यांमध्ये संधी न मिळाल्यामुळे उलट उलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. गावित कुटुंबाचे जिल्ह्यात वेगळं स्थान असतांना पक्षाने त्यांचा प्रभारी किंवा निवडणूक प्रमुख म्हणून विचार केला नाही, त्यामुळे भाजपामध्ये गावित कुटुंब ऐवजी आता रक्षा खडसेंना प्रभारी पदी नियुक्त करून पक्षाने गावित कुटुंबाला योग्य तो संदेश दिल्याचे बोलला जात आहे. विजय चौधरींचे मात्र राजकीय वजन या नियुक्तीमुळे जिल्ह्यात वाढणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 04:24:54
Nagpur, Maharashtra:नागपूर त्रिपुरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता रामटेक गड मंदिराच्या कळसावर त्रिपुर जाळण्यात आला. यावेळी हजारो भक्तगणांनी सर्वत्र जय श्रीराम चा जयघोष केला... शरद पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या उत्सवाची त्रिपुर पेटवून सांगता करण्यात आली. हा उत्सव पाहण्याकरता केवळ नागपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारील छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथूनही हजारो भक्त रामटेक गड मंदिर परिसरात पोहोचले होते.. टिपूर पेटवल्यानंतर फटाक्यांची मोठी आतिषबाजी रामटेक शहरात करण्यात आली.. शेकडो वर्षांपासून रामटेक गड मंदिरावर हे टिपूर जाण्याची परंपरा आहे... भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता त्या दिवसाचे स्मरण म्हणून ही यात्रा भरवण्यात येते... यावेळी मंदिर परिसरात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 06, 2025 04:17:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांनाने सांगलीच्या इस्लामपूरचे उरुण-ईश्वरपूर झाले. त्यामुळे मित्र पक्ष व रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके,पेढे,वाद्यांच्या गजरात, फुलांची उधळण करत सदाभाऊ खोत यांचे ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार सदाभाऊ खोतांनी विधान परिषदेत इस्लामपुरचे नाव बदलुन ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नामांतरानाच्या प्रक्रियेला वेग आला होता. आमदार गोपीचंद पडळकर व आ.सदाभाऊ खोत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर इस्लामपुरचे उरुण ईश्वरपूर असे नाव झाले आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाचे कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या नामांतरण झाल्यानंतर उरुण-ईश्वरपूर मध्ये दाखल झालेल्या आमदार सदाभाऊ खोत यांचे जल्लोशात स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 06, 2025 04:17:18
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाचा हल्ला पुन्हा; शंकरपूर परिसरात आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू. गेल्या दीड महिन्यात शंकरपूरच्या दोन किलोमीटर परिसरात तीन शेतकऱ्यांचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला आहे. काल दुपारी ५२ वर्षीय ईश्वर भरडे हा शंकरपूर-आंबोली रोडवरील ठाणा रिठ परिसरात त्यांच्या शेतात पिकाची पाहणीसाठी गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते परत न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने शोध घेतला आणि शेतातच त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी शंकरपूर-भिसी मार्गावर आंबोली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टरवर मृतदेह ठेवत रात्री रास्ता रोको केला. अखेर प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबाला वनविभागात नोकरी देण्याचं आणि वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि मृतदेह चिमूर येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 06, 2025 04:15:55
Nashik, Maharashtra:आमदार ला मारण्याची सुपारी प्रकरण, अंबादास दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे अंबादास दानवे यांच्या दाव्यावर गिरीश महाजन यांचे उत्तर नाशिक मध्ये गिरीश महाजन यांचे निकटवर्ती एका माजी नगरसेवकांनेच भाजपाच्याच आमदाराला मारण्याची सुपारी दिल्याचे खळबळजनक आरोप अंबादास दानवे यांनी केला होता असं कुठलंही प्रकार झालेला नाही तसेच कुणाची तक्रार देखील आले नाही हे विधान म्हणजे हास्यस्पद गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया या संदर्भात अंबादास दानवे यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावे अंबादास दानवे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात उडाली होती कळवळ अंबादास दानवे पुरावे देतात याकडे लक्ष दरम्यान अंबादास दानवे यांनी काय आरोप केले होते आणि त्याला गिरीश महाजन यांनी काय उत्तर दिले ते आपण पाहूयात
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 06, 2025 04:04:12
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 06, 2025 04:01:00
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला असून आता शिर्डी विमानतळ परिसरात असणाऱ्या एका वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.. बिबट्याच्या हल्ल्यात वस्तीवरील एक कुत्रा ठार झालाय, तर इतर कुत्र्यांनी प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली.. शिर्डी विमानतळाच्या आसपासच्या परिसरात अलीकडच्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.. परिसरात शेती भाग असल्यामुळे पाळीव जनावरे, कुत्री आणि लहान प्राणी बिबट्यांच्या निशाण्यावर येत आहेत.. स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला वारंवार कळवूनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 06, 2025 04:00:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अस्तित्व लायकी नसलेला माणूस आपण आमदार म्हणून निवडून दिलात माजी आ. रमेश कदम. मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांच्यावर माजी आमदार रमेश कदम यांनी सडकून टीका केलीय. मोहोळ मध्ये बुधवारी राष्ट्रवादीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. अस्तित्व लायकी नसलेला माणसाला आपण निवडून दिलात अशी टीका माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार राजू खरे यांचे नाव न घेता केली आहे. आमदारांनी पक्षाच्या ध्येय धोरणासोबत जाणं अपेक्षित असताना तसे होत नसल्याची खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 06, 2025 03:57:45
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 06, 2025 03:57:31
Washim, Maharashtra:अँकर:वाशीम जिल्हा व सत्र न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विजय उर्फ भोलाराम बरखाम या २८ वर्षीय या नराधमाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.ही घटना १ जून २०२४ रोजी घडली होती.आरोपीने गावातील हळदीच्या कार्यक्रमातून अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.या गंभीर गुन्ह्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी जलदगतीने तपास करून आरोपीला अटक केली.केवळ २८ दिवसांत चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली.तपासादरम्यान पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांवर आधारित निर्णय देत न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.या निकालामुळे न्यायव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास दृढ झाला असून पोलिसांच्या तत्पर कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 03:36:06
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यात राज टेक आणि पार्श्विनी येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण चार जणांचा मृत्यू बुडून झाला आहे. पारशिवनी येथे दोन तरुणांचा बुडून मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील पारशीवनी येथील भागीमहारी तलावात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण सह सहा मित्रमंडळींसह भागीमहारी तलावावर सुट्टीचा आनंद घेण्याकरीता आलेले होते. पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे आलेल्या मित्रांपैकी अविनाश आनंद (बिहारचा) पाण्यात पोहण्याकरीता उतरलेला होता. तो पाण्यात गटांगळ्या घेतांनी दिसताच इतर मित्र त्याला वाचविण्याकरीता गेले असता, त्यापैकी संकल्प मालवे (चंद्रपुर) हा पण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तर एका जणाला वाचविण्यात मित्रांना यश आले. या मृतकापैकी अविनाश आनंद हा प्रियदर्शी महाविद्यातील बी.ई तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता तर संकल्प मालवे हा सेंट पाॅल कनिष्ठ विद्यालयातील बारावीचा विद्यार्थी होता. रिल बनवण्याच्या नादात ही घटना घडल्याची चर्चा आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 06, 2025 03:30:18
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्याचा रामटेक तालुक्यातील जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून मामा–भाचीचा मृत्यू.. - हर्षाली विनोद माकडे (१३, रा. भोजापूर-मानापूर) आणि अजय वामन लोहबरे (३३, रा. खात) अशी मृतांची नावे आहेत. - हर्षाली रबरी ट्यूबच्या मदतीने पोहण्याचा सराव करत होती. ट्यूब निसटल्याने ती पाण्यात बुडू लागली. - तिला वाचविण्यासाठी मामाने उडी घेतली, पण खोल पाण्यामुळे दोघेही बुडाले. - या घटनेदरम्यान हर्षालीचे वडील तलावाच्या काठीवरच उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू करून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. - या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेय.. - परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा सूचना फलक नसल्याने तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली.
0
comment0
Report
Advertisement
Back to top