Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

Beed: Solanke accuses Dhananjay Munde of meetings at Nathra farm house

MMMahendrakumar Mudholkar
Nov 16, 2025 02:46:32
Beed, Maharashtra
बीड : मला विरोध करण्यासाठी नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका.. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आ.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात त्यांचा विरोध होणार याची कल्पना मी अजित पवारांना दिली.. अँकर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.. माजलगाव मतदार संघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका होत आहेत.. याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले असून याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिलेली आहे.. विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते तेच आता देखील होणार आहे.. असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.. दरम्यान माझ्या मतदारसंघातील धारूर व माजलगाव या नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती.. परंतु भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल दिला आहे.. त्यामुळे आमची राजकीय ताकद वापरून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे.. दरम्यान आता आमदार सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची पक्ष काय दखल घेतो आणि धनंजय मुंडे या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. बाईट : आमदार प्रकाश सोळंके
201
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Nov 16, 2025 05:00:17
Satara, Maharashtra:अँकर-म्हसवड मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या आघाडीचे नगराध्यक्षासह आठ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.शेखर गोरे यांचे बंधू सार्वजनिक बांधकाम मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.असे असताना शेखर गोरे यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने म्हसवड मधील राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे.आत्ताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेखर गोरे यांनी बंधू जयकुमार गोरे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने जयकुमार गोरे यांचा विजय सोपा झाला होता.परंतु आता म्हसवड मध्ये शेखर गोरेंच्या गटाने आपली वेगळी चूल मांडल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 16, 2025 04:47:02
Pune, Maharashtra:Headline -लोणावळ्यात आमदार सुनील शेळके यांनी केली माजीमंत्री बाळा भेगडे यांच्यावर सडकून टीका Anchor: लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीतील आपली ताकद दाखवली. रॅलीदरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पलटूराम म्हणत एकेरी शब्दांत उल्लेख केला तसेच लोणावळ्यातील युतीचा फार्मूला भाजप च्या कोर कमिटीने फेटाळून लावला. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी तळेगांवच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी केली असता, भाजपच्या गोटात भिती बसली आणि अनेक भाजप नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे होते असा खळबळजनक आरोप आमदार शेळकेंनी बाळा भेगडे यांच्यावर नाव न घेता केला. भाजपची राजकीय तळेगांव येथील परिस्थिती पाहता भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युती पॅटर्न करण्यात आलं..यात राष्ट्रवादीला १७ जागा तर भाजपला ११ जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपचा नगराध्यक्ष तळेगांव मध्ये लढण्यास तयार झालाय त्यामुळे तळेगांव जरी युती पॅटर्न असेल तरी लोणावळा आणि वडगांव स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी आणि भाजपने केलीये. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरणं आता नव्या वळणावर गेली आहेत. साऊंड बाईट :सुनील शेळके, आमदार (file no.03)
24
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 16, 2025 04:23:10
Pune, Maharashtra:अहिल्यानगर स्थित भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष निवडीसाठी 24 नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची सभा होणार आहे... अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत उत्सुकता आहे...या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्यांदा अध्यक्ष निवड होणार आहे... यापूर्वी उदय शेळके यांचे निधन झाल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची निवड झाली होती... त्यावेळी कर्डिले झाले होते... संचालक मंडळाची मुदत 22 फेब्रुवारीला संपणार आहे... त्यामुळे आताचे अध्यक्षपद हे केवळ तीन महिन्यांसाठीच असणार आहे... त्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे...जिल्हा बँकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पारडे जड आहे... त्यामुळे राष्ट्रवादी अध्यक्षपदावर दावा करू शकते.
98
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 16, 2025 04:19:27
Bhandara, Maharashtra:सलग दोन दिवस गावात येऊन बिबट्याने केली शेळ्यांची शिकार.... थेट घराच्या वरच्या मजल्यावरून शेळी केली फस्त.. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील न्याहरवाणी येथे सलग दोन दिवस येत बिबट्याने तीन शेळ्यांची शिकार केली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी कुणाच्या पशू धनावर हल्ला होणार हा भीती ग्रामस्थांमध्ये बळावली आहे. रात्री बिबट्याने थेट घराच्या पहिल्या मजल्यावर पायऱ्यांनी चढत शेळी फस्त केली व पसार झाला .त्यामुळे आता घरात बिबट्या घुसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी ग्रामीण भागातील नागरिक पशु पालन करतात व त्या आधारावर उदरनिर्वाह करतात मात्र आता वन्य प्राणी वाघ व बिबट्या यांचा गावात मुक्त संचार होत असल्याने पशु पालन सोडायचे काय असा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे.त्यामुळे वन विभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
110
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 16, 2025 04:18:28
Amravati, Maharashtra:अमरावती के धारणी नगर पंचायत में उद्धव ठाकरे गुट को बड़ा झटका; पूर्व उपनगराध्यक्ष भाजपा में प्रवेश, पक्ष प्रवेश होते ही नगराध्यक्ष की टिकट घोषित. अमरावती के धारणी नगर पंचायत में रात्री चुनाव प्रभारी विधायक संजय कुटे, चुनाव प्रमुख सांसद अनिल बोंडे, पूर्व पालकमंत्री प्रवीण पोटे, विधायक केवलराम काळे के उपस्थित में सुनील चौथमल ने भाजप में पक्ष प्रवेश किया. इससे ठाकरे गुट को बड़ा धक्का लगा है. इसी के साथ भाजप में पक्ष प्रवेश करते ही धारणी नगर पंचायत के नगराध्यक्ष पद की उम्मीदवार की घोषणा की गई है. धारणी नगर पंचायत क्षेत्र में सुनील चौथमल का बड़ा प्रभाव है. चौथमल परिवार का धारणी नगर पंचायत क्षेत्र में बड़ा पावर है. दो दिन पहले चिखलदरा नगरपरिषद से अजित पवार गट के नेता माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी ने भी भाजपा में पक्ष प्रवेश किया था. संपूर्ण अमरावती में भाजपा के लिए चुनावी तैयारी तेज हो रही है।
94
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 03:48:22
Dhule, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्मा संपूर्ण जगभर आहे. इतकच नव्हे तर त्यांनी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडल्याचा अजब दावा मंत्री जयकुमार रावल यांनी केला आहे. संपूर्ण जगामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिष्मा आहे. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते त्यामुळे ते अमेरिकेत फिरले असतील म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीने अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या असल्याचा टोला राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी लगावला आहे. बिहार विधानसभेच्या निकालानंतर बिहार, महाराष्ट्रात लढणे सोडून द्या. अमेरिकेत आता उमेदवार उभे करा. तेथील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवा. तिथेही तुमचा काय दबदबा आहे, तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या, असा खोचक टोला लगावत ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्युत्तर दिला आहे. संपूर्ण जगामध्ये मोदी साहेबांच्या नावाचं वजन असून अमेरिकेमध्ये देखील मोदी साहेबांना मानणारे खूप लोक आहेत. संपूर्ण जगामध्ये फ्रेंड्स ऑफ बीजेपी असून अनेक देश प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींना बोलवतात. चंद्रावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवशक्ती कॉलनी उघडली असल्याचा दावा करत मंत्री जयकुमार रावल यांनी शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.
124
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 16, 2025 03:48:09
Bhandara, Maharashtra:विमुक्त-भटक्या समाजासाठी ४ लाख ५० हजार किमीचा प्रवास! संजय कदम हा ‘विमुक्त-भटक्या समाज जोडो’ अभियान देशभरात गाजवतोय. विमुक्त आणि भटक्या जमातींच्या हक्कांसाठी झटणारा २९ वर्षीय अवलिया संजय कदम देशभरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन, समाजातील दुर्लक्षित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी तो गेल्या सात वर्षांपासून रस्त्यावर आहे. दोन चाकीवर वाहनावर तब्बल ४ लाख ५० हजार किलोमीटरचा प्रवास करून संजय कदम याने एक अद्वितीय अभियान राबवले आहे. ‘विमुक्त-भटक्या समाज जोडो – ऑल इंडिया अभियान’ या नावाने त्याची ही मोहीम देशभरात गाजत आहे. ७ जून २०१७—या दिवशी सुरू झालेलं संजय कदम यांचं अभियान आज देशातील सर्वात मोठ्या सामाजिक उपक्रमांपैकी एक ठरलं आहे. विमुक्त आणि भटक्या जमातींना स्वतःची ओळख, हक्क आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संजय देशाच्या प्रत्येक राज्यातील गावागावात पोहोचत आहे. देशात जवळपास ३० कोटी विमुक्त-भटक्या समाजाची लोकसंख्या आहे. केंद्र आणि राज्य शासन मिळून १५o पेक्षा जास्त योजना या समाजासाठी उपलब्ध आहेत… मात्र भारतातील सुमारे २५ कोटी लोकांकडे जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी नसल्याने त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळू शकत नाहीयाच वेदना, याच संघर्षातून संजय कदम यांनी देशभर फिरत हा समाजाच्या लोकांना प्रत्यक्ष मदत करणे, त्यांना कागदपत्रं मिळवून देणे आणि शासनाच्या दारात न्याय मिळवून देणे…हा ध्यास घेतला आहे. रस्त्यावर राहणाऱ्या, कागदपत्रविहीन कुटुंबांच्या जीवनात बदल घडवण्याचं काम संजय अविरतपणे करत आहेत. गेल्या सात वर्षांत हजारो कुटुंबांना त्यांनी आवश्यक कागदपत्रं मिळवून दिली असून, समाजात जागृती निर्माण करण्यासाठी तो आजही देशभरात भटकंती करत आहेत.
126
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 16, 2025 03:47:55
123
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 16, 2025 03:47:22
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात चिया पिकाच्या लागवडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी केवळ ३ हजार हेक्टरवर चिया पेरणी झाली होती. मात्र, यंदा ही पेरणी तब्बल १० हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पेरणीनंतर चिया पीक उत्तम प्रकारे वाढताना दिसत असून, शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. बाजारात चियाला मिळणारा चांगला भाव, कमी उत्पादन खर्च, तसेच रोग-कीडांचा अत्यल्प त्रास यामुळे चिया पीक शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. पर्यायी पिकांच्या शोधात असलेल्या शेतकऱ्यांसाठी चिया हे उत्तम नफा देणारे, आशादायी रब्बीतील पर्यायी पीक ठरत असल्याचेही कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
210
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 03:46:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बँकेची 25 लाखांची रोकड दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोघांनी लुटले. पेठण शाखेतील कर्मचारी दावरवाडी शाखेसाठी रोख रक्कम घेऊन जात असताना दोन चोरट्यांनी त्यांच्या स्कुटीला कट मारला. एवढंच नाही तर कर्मचाऱ्याला दगडाने मारहाण करत तब्बल पंचवीस लाखांची रोकड लंपास केली. ही घटना पाचोड–पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात घडली. भरदिवसा झालेल्या या दरोड्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गुन्हेगाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे。
148
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 16, 2025 03:46:21
95
comment0
Report
Advertisement
Back to top