Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय परिसर में अज्ञात शव मिलने से हड़कंप

VKVISHAL KAROLE
Nov 03, 2025 02:31:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी प्राथमिक तपासणी करून ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेने तपास सुरू केला आहे. विद्यापीठ परिसरात सकाळी नऊच्या सुमारास वाजता तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली. त्यांनी विहिरीच्या दिशेने पाहणी केली असता त्यात मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती कळवली. पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Nov 03, 2025 09:34:07
Palghar, Maharashtra:अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं असतानाच पालघर मध्ये सरकारकडून एका शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान फसल पिक योजनेतून या शेतकऱ्याला फक्त दोन रुपये तीस पैसे मिळाले असून यामुळे या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. वाडा तालुक्यातील सिल्लोत्तर येथील मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावर अकरा एकर जागा असून नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून दोन रुपये तीस पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री फसल योजनेतून हे पैसे जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आल्यानंतर रक्कम बघून त्यांना धक्काच बसला. अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची अपेक्षा केली जाते अशातच दोन रुपये मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना व्यक्त करण्यात येतोय.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 03, 2025 09:33:02
Yeola, Maharashtra:नाशिक जिले में प्रमुख कृषि उपज बाजार समिति के रूप में पहचानी जाने वाली कृषि उपज बाजार समिति के सभापति पद पर मंत्री छगन भुजबळ के निकटवर्ती वसंत पवार की निर्बाध निर्विरोध चुना गया है, जबकि उपसभापति के रूप में शिवसेना के रतन बोरणारे की चयन किया गया। मावळते सभापति सविता पवार तथा उपसभापति संध्या पगार ने रोटेशन पद्धति से इस्तीफा दे दिया था, जिसके कारण उक्त पद खाली था... दरम्यान कृषि उपज बाजार यवला स्थित बुलवाए गए विशेष सभेमध्ये सहायक निबंधक विजयसिंह राजपूत, सहकार अधिकारी सुधीर वाघ, आदि की उपस्थिति में यह चयन प्रक्रिया पूरी हुई। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सचिव दिलीप खैरे, मंत्री छगन भुजबळ के निजी सहायक बालासाहेब लोखंडे, पूर्व सभापति सविता पवार, पूर्व संध्या पगार के संचालक उषाताई शिंदे आदि सदस्यों की उपस्थिति थी।
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 09:15:54
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 03, 2025 09:15:43
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) : पाचशे रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी शहरातून तोसिफ मोहम्मद अक्रम या तिसऱ्या संशयितास ताब्यात घेतले आहे..अटकेतील दोघा संशयितांनी त्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या..या नोटा चलनात आणल्याचा पोलिसांना संशय आहे..दरम्यान, यातील मुख्य संशयित मोहंमद जुबेर मोहंमद अश्रफ अन्सारी याच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील घरावर मालेगाव पोलिसांच्या मदतीने तेथील स्थानिक पोलिसांनी रविवारी ( दि.२ ) छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे..छाप्यात पोलिसांच्या हाती काय लागले याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, मालेगाव पोलिसांनी कारवाई केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 09:15:13
Kolhapur, Maharashtra:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी कोल्हापुरातल्या मैत्री संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारी द्यावी अन्यथा तृतीयपंथी समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहे असा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांच राज्य असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच वंचित घटकांच्या पाठीशी उभा राहिलाय त्यामुळे तृतीयपंथी समाजाला समान प्रतिनिधित्व देऊन राजकीय प्रक्रियेत सामील करून घेणे ही काळाची गरज असल्यासही या संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 03, 2025 09:10:06
Beed, Maharashtra:बीड: यश ढाका हत्या प्रकरणात सर्व पक्षीय संघटनांचा जन आक्रोश मोर्चा. स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची निर्घुण हत्या झाली होती. या हत्येला महिना उलटलाय. तरीदेखील कट रचणारा मुख्य आरोपी अद्याप फरारच आहे. मुख्य आरोपी राजकीय पक्षाशी निगडित असल्याने बीड पोलीस अटक करण्यास डोळेझाक करतायत असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात यावी. शिवाय आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज विविध पक्ष संघटने कडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा जन आक्रम मोर्चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक होत जिल्हाधिकारी कचेरीवर धडकला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला. त्यामुळे अहिल्यानगर बीड महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तासापर्यंत खोळंबली आहे. आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छोडू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे. बाईट: देवेंद्र ढाका - मृत तरुणाचे वडील
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 03, 2025 09:09:34
Solapur, Maharashtra:सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक - भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आक्रमक - तडीपार गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक - भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची - आम्ही ज्यांच्यासोबत लढलो, ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतले - तर ज्यावेळी आमचे तिकीट कापून आम्ही ज्यांच्यासोबत आयुष्यभर लढलो त्यांनाच तिकीट दिले आणि ते महापौर झाले त्यावेळी कार्यकर्ते कुठे गेले होते असा शहराध्यक्ष तडवळकरांचा सवाल - भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनंतर आमदार विजयकुमार देशमुखांचे कार्यकर्ते आक्रमक
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 03, 2025 09:09:15
Bhandara, Maharashtra:आमच्या भागात मुस्लिम नाहींते...त्यांनी हवेत फेकणे बंद करावे...निवडणूक आयोग बिजेपीचा कार्यकर्ता कसा झाला? त्यांना हेच माहित नाही की आमच्या भागात मुस्लिम नाहीत. म्हणून त्यांनी हवेत फेकणे बंद करावे. मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून या पद्धतीने या बळशाली मतांच्या वापर या लोकशाहीमध्ये होत होता. त्याला कसे यांनी कमजोर केलं. निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचे आहे. भाजपला नाही द्यायचे आहे. म्हणजेच दाल मे कुछ काला आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक प्यारे खान नावाचा माणूस भाजपचा एक मोठा नेता आहे सर्व टोल मुंबईचे त्याला दिले गेले आहेत म्हणजे त्यांची फिर्यादी चालते यांना म्हणजे भाजप मधले असलेले मुसलमान यांना काही संबंध नाही हा जो हिंदू मुसलमानाचा वाद जो निर्माण करून हे लोकशाहीला कमजोर करण्याच्या पाप हे लोक निघालेले आहेत हे थांबवावं ही त्यांना आमची नम्र विनंती आहे मत चोरी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चाललेली आहे ही थांबवण्यासाठी भाजपने सुद्धा एक संघ या मतचोरीमध्ये करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या विरोधात आमच्या महाविकास आघाडी बरोबर यावं नुसतं महाविकास आघाडी नाहीतर लोकशाही लोकशाही वाचवण्यासाठी हा जो प्रयत्न चालू आहे भाजपने याच्या निवडणूक आयोगाच्या जनतेच्या मताच्या बलशालीपणा कायम ठेवण्यासाठी त्यांनी काम करावे अशा पद्धतीने वातावरण दूषित करण्याचे काम भाजपचे करत आहेत त्यांनी थांबवावं...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 08:39:49
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर मंत्री हसन मुश्रीफ बाईट मुद्दे ऑन पंचनामे पैसे शेतकऱ्यांकडून असे पैसे मागितले जात असतील तर ही बाब गंभीर आहे मुख्यमंत्री तात्काळ याची दखल घेतील हे वर्तन योग्य नाही युती सरकार अशा लोकांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ऑन कृषी मंत्री बंगला खर्च एक आठवड्याचं किंवा फार तर दोन आठवड्याचा अधिवेशन असेल यासाठी एवढा खर्च कोण कशासाठी करेल या खर्चाची वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे खरं असेल तर हे चुकीचं आहे बंगला किती, बंगल्याचा स्क्वेअर फुट किती, मी सुद्धा रवीभवनच्या बंगल्यात अनेक वर्ष राहीलो आहे, त्यामुळे एवढा खर्च होणे शक्य नाही वर्षेभर हे बंगले रिकामे असतात, त्यामुळे त्यावर काही खर्च होतो, मात्र इतका खर्च झालेला नसावा ऑन चाकणकर - रूपाली पाटील वाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार आमच्या या दोन्ही बहिणींचा वाद मिटवतील on माहविकास आघाडी मोर्च परवानगी नसताना हा मोर्चा काढलेला होता महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे मुंबईत वाहतुकीची कोंडी झाली अस मी ऐकल लोकांना यामुळे त्रास झाला पण भाजपने आंदोलन केलं, पण ते एका बाजूला मूक मोर्चा होता नागरिकांना त्याचा त्रास झाला नाही असं भाजपचा देखील म्हणणं आहे ऑन उस दर बैठक राज्यात ऊस दरासाठी FRP चा कायदा लागू आहे FRP चे पंधरा दिवसात दिले नाही तर, कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्याचे पैसे द्यायचे असं कायदा सांगतो पण तरीसुद्धा दरवर्षी हे आंदोलन होतं आणि पुन्हा पुन्हा वाहन पेटवली जातात हे योग्य नाही ऑन अनेक जण संपर्कात पवार दावा अशा मोर्चाने आमचं महायुती शासन विचलित होईल अशी परिस्थिती नाही यापेक्षा देखील मोठे मोर्चा आम्ही सुद्धा काढले आहेत ऑन फलटण राजकरण फलटण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन केली आहे त्यातून सत्य बाहेर पडेल असी SIT स्थापन असताना पुन्हा पोलीस स्टेशनला जाणे आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणं कितपत योग्य आहे ऑन भैय्या माने उमेदवारी पुणे पदवीधरच्या निवडणुकीसाठी अजून वर्षभर आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्यानंतर ते सुद्धा आमच्या शब्दावर विश्वास ठेवतील ऑन मार्ड डॉकटर संप मी काल मार्ड लोकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला आहे मुख्यमंत्रीांनी SIT स्थापन केली आहे, त्यामुळे हे आंदोलन करू नका. विनाकारण लोकांचे हाल होतील असे मी त्यांना सांगितलं आहे मात्र मयत भगिनींच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी डॉक्टर हे आंदोलन करत असावेत, आज मी त्यांना पुन्हा आवाहन करणार आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 03, 2025 08:15:49
Manchar, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालया, रोहन बोंबे असं मृत मुलाचं नाव असून मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांची प्रकृती ढासळलीय, वडिलांवरती सध्या मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझ्या डोळ्यासमोर पोटच्या लेकाला बिबट्या ओढून घेऊन जात असताना मी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला असता बिबट्याने माझ्यावरती दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर डोळ्यासोमोर माझ्या मुलाला रक्ताच्या दोनदा उलट्या झाल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अक्षरशः भावना व्यक्त करताना वडील विलास बोंबे यांनी टाहो फोडला. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 03, 2025 08:12:18
Vasai-Virar, Maharashtra:मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या बापाला दोन बहिणींकडून भावनिक सप्राइस दोन बहिणींनी दिली वडीलांना बुलेट गाडी गिफ्ट नायगावमधील दोन मुलींनी वडिलांना दिलेलं अनोखं गिफ्ट सध्या चर्चेत आहे...नायगावमध्ये राहणारे भाऊसाहेब दिघे हे आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत करत होते. त्याच वडिलांना त्यांच्या मुलींनी — रिया आणि मानसी दिघे यांनी — बुलेट गाडी भेट देत भावनिक सप्राईज दिलं आहे. शिक्षणासाठी मिळणाऱ्या पैशातून थोडी थोडी बचत करत या दोघींनी वडिलांसाठी बुलेट घेतली. सुरुवातीला शेजाऱ्यांना “आम्ही स्वतःसाठी गाडी घेतोय” असा भास देत त्यांनी ही योजना गुप्त ठेवली. मात्र गाडीचं ओपनिंग करतानाच जेव्हा भाऊसाहेबांना हे गिफ्ट मिळालं... तेव्हा आनंदाश्रूंनी त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. “आज गाडी घेऊ, उद्या घेऊ असं म्हणत राहिलो... पण मुलींनी माझं स्वप्न पूर्ण केलं,” असं म्हणत भाऊसाहेब दिघेंनी आपला आनंद व्यक्त केला आहे. नायगावमध्ये या कुटुंबाची ही हृदयस्पर्शी कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 07:48:40
Kolhapur, Maharashtra:फलटण मधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT स्थापना करावी अशी मागणी करत राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला. कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील डॉक्टर देखील या संपात सहभागी झाले आहेत. संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी हॉस्पिटल समोर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारने तातडीने डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांवर होणारे विविध प्रकारचे हल्ले तसेच दैनंदिन कामकाजात होत असणारा हस्तक्षेप त्वरित थांबवावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलेली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 07:34:38
Kolhapur, Maharashtra:पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार यावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री यांना पटवून सांगू असं म्हणत लाड यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय. पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून महायुतीत तीव्र मतभेद. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांना उमेदवारी मिळेल असे संकेत देताच मुश्रीफांनी केला तीव्र विरोध. शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचे गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडू असं म्हणत मुश्रीफांनी शरद लाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय. महायुतीमध्ये बेबनाव दर्शवणारी वक्तव्य केल्याने महायुतीतच वादाची किनार असल्याचे समोर.
0
comment0
Report
Advertisement
Back to top