Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती में उपोषणकारी महिला की मौत, पुलिस पर शव जबरदस्ती लेने का आरोप

ADANIRUDHA DAWALE
Oct 14, 2025 04:15:18
Amravati, Maharashtra
अमरावतीत उपोषणकर्त्या महिलेचा आंदोलनादरम्यान मृत्यू; पोलिसांनी बलजबरीने मृतदेह घेतला ताब्यातल्याचा आरोप, प्रशासनाने उपोषणाला बेदखल. शांताबाई उकर्डा आणि मुलगी विजया उकर्डा यांच्या उपोषणाच्यानंतर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकर्डा उपचारादरम्यान मृत्यू झाले. रात्री उशिरापर्यंत उपोषण मंडपात तणाव होता. न्याय मिळेपर्यंत मृतदेह आम्ही हलवू देणार नाही असे इशारा नातेवाईकांनी दिला; परंतु पोलिसांनी बलजबरीने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यातून घेतल्याने वाद वाढला. त्यामुळे मृतक नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनाने भेटही दिली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Oct 14, 2025 07:35:57
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 14, 2025 07:31:35
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 14, 2025 07:17:35
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात उमेदच्या वतीने रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचे आयोजन - सोलापुरातील ग्रामीण स्वयंसहाय्यता महिला बचत समूहातील उत्पादित केलेल्या वस्तूंंसाठी प्रदर्शन आणि विक्रीसाठी उमेदचा पुढाकार - सोलापूर जिल्हा परिषदेकडून दोन दिवसीय रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं आयोजन - राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना 33 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. - या स्टॉलवर दिवाळीसाठी लागणारे बुंदीचे लाडू, चिवडा, भडंग यांचे मिलेट पासून तयार केलेले शंकरपाळी, पणत्या, अगरबत्ती, शोभेच्या वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी - ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी उमेद कडून जिल्हा पातळीवर तयार करून देण्यात आलेल्या व्यासपीठ. - महिला बचत गटातील समूहातील महिलांनी रुक्मिणी दिवाळी महोत्सव निमित्ताने व्यक्त केला आनंद..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 14, 2025 06:47:18
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ उत्साहात पार पडणार आहे. १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम साजरा होतो. दीक्षाभूमी परिसर पंचशील ध्वज, रोषणाई आणि विविध संस्थांच्या स्टॉल्सने सजला आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण डॉ. आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे सार्वजनिक दर्शन हे आहे. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता आणि १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य मिरवणुका काढल्या जाणार आहेत. भिक्खूगण, विचारवंत आणि बौद्ध बांधव उपस्थित राहणार असून, उपस्थितीचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 14, 2025 06:31:57
Akola, Maharashtra:बल्हाड़ी गाँव, बल्हाड़ी तालुक, अकोला जिले में क्षारीय पानी के कारण किडनी विकार के मरीज बढ़ रहे हैं. ग्रामीणों के अनुसार मिट्टी के पानी में क्षार का स्तर अत्यधिक बढ़ गया है. गाँव में केवल दो हैंडपंप हैं, उनमें से एक में पानी काफी नहीं आता. परिणामस्वरूप पूरा गाँव एक ही हैंडपंप पर निर्भर है. क्षारयुक्त पानी पीने से किडनी स्टोन और अन्य रोगों का सामना करना पड़ रहा है. गाँव की जनसंख्या लगभग 700 है और अधिकांश नाथजोगी समुदाय के लोग रहते हैं. तीन साल पहले जलजीवन मिशन के अंतर्गत पानी पुरवठा योजना शुरू हुई थी, पर आज भी वह सिर्फ कागज पर है. पानी टंकी बनाने के लिए खोदा गया गड्ढा तीन वर्ष से खाली पड़ा है, जिससे गावकरी दूषित पानी पर ही दिन काट रहे हैं. बल्हाड़ी क्षेत्र के लगभग 70-75 गाँव इस समस्या से त्रस्त हैं. विधायक नितीन देशमुख ने आश्वासन दिया है कि आगामी पांच-छह महीनों में योजना शुरू होगी, पर पिछले तीन वर्ष से योजना रुकी है. बल्हाड़ी गाँव में दूषित पानी से नागरिकों की जीव सुरक्षा खतरे में है; प्रशासन तात्कालिक स्वच्छ पानी की व्यवस्था करे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 14, 2025 06:18:51
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात उमेदच्या वतीने रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं आयोजन. सोलापुरातील ग्रामीण स्वयंसहाय्यता महिला बचत समूहातील उत्पादित केलेल्या वस्तूंनुसार प्रदर्शन आणि विक्रीसाठी उमेदचा पुढाकार. सोलापूर जिल्हा परिषदेकडून दोन दिवसीय रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं आयोजन. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अख्तर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना 33 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. या स्टॉलवर दिवळीसाठी लागणारे बुंदीचे लाडू, चिवडा, भडंग यांचे मिलेट पासून तयार केलेले शंकरपाळी, पणत्य, अगरबत्ती, शोभेच्या वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी. ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या उत्पादित केलेल्या वस्तूंंसाठी उमेद कडून जिल्हा पातळीवर तयार करून देण्यात आलेल्या व्यासपीठ. महिला बचत गटातील समूहातील महिलांनी रुक्मिणी दिवाळी महोत्सव निमित्ताने व्यक्त केला आनंद.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 14, 2025 06:04:23
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... झी 24 तासच्या बातमीचा दणका... नोटीस आलेल्या शेतकऱ्याला दिलासा... बँकेने नोटीस घेतली मागे... लातूर मध्ये झी 24 तासच्या बातमीचा मोठा दणका पाहायला मिळाला आहे. औसा तालुक्यातील वरवडा येथील शेतकरी विशाल करंडे यांना बँकेकडून कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली होती. पण झी 24 तासने ही बाब उघडकीत आणताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. संबंधित बँकेची कान उघडले केली आहे आणि अखेर बँकेने आपली चूक मान्य करत नोटीस मागे घेतली आहे. बँकेने स्पष्ट केलंय की आता कोणत्याही शेतकऱ्याला अशा नोटीसा पाठवल्या जाणार नाहीत आणि पैशासाठी तगादा लावला जाणार नाही. या निर्णयानंतर शेतकरी विशाल करंडे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी Zee 24 तासचे मनापासून आभार मानले आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 14, 2025 06:03:26
Akola, Maharashtra:एकीकडे भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचा वानवा अजूनही कायम आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील छोट्याशा बल्हाडी गावात किडनीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गावात क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत, आणि अनेकांचा मृत्यूही झाला आहे. नुकताच प्रमिला बाबर या महिलेचा किडनी विकाराने मृत्यू झाल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बल्हाडी गावात दुर्गम गावांमध्ये किडनी विकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमिनीतील पाण्यात क्षाराचं प्रमाण प्रचंड वाढल्याने हे आजार उद्भवत आहेत. गावात फक्त दोनच हातपंप असल्यामुळे एकाच हातपंपावर अवलंबून असलेला संपूर्ण गाव दूषित पाण्यावरच अवलंबून आहे. क्षारयुक्त पाणी पिण्यामुळे गावकऱ्यांना आता किडनीस्टोन आणि इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. गावाची लोकसंख्या फक्त 700 असून, बहुस नाथजोगी समाजाचे लोक येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत येथे पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू झालं होतं, पण आजही ती योजना कागदावरच आहे. पाण्याची टाकी उभी करण्यासाठी खोदलेला खड्डा तीन वर्षांपासून तसाच पडून आहे, त्यामुळे गावकरी आजही दूषित पाण्यावरच दिवस काढत आहेत. बाळापूर मतदारसंघात केवळ बल्हाडि नाही तर या परिसरातील सुमारे 70 ते 75 गावे खाऱ्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. या समस्येची दखल स्वतः बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी घेतली असून, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकोणसत्तर आणि चोवीस खेडी योजनेद्वारे या भागात गोड पाणी पोहोचवण्यासाठी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. आमदार देशमुख यांनी आश्वासन दिलं आहे की येत्या पाच ते सहा महिन्यांत या योजना सुरू होतील. मात्र गेल्या तीन वर्षांपासून थांबलेल्या या योजनांना पुन्हा गती मिळेल का, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. बल्हाडी गावातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने स्वच्छ पाण्याची सोय करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. अन्यथा, किडनी विकारचं संकट आणखी गंभीर होऊ शकतं.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 14, 2025 05:45:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी खासदार संजयकाका पाटलांचे चक्काजाम आंदोलन सुरू शेतकरी कर्जमुक्ती व सरसकट पंचनामे सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव आणि कवठेमहांकाळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, बैलगाडी, शेळ्या मेढ्यांसह तासगावच्या चौकात चक्काजाम सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे त्याचबरोबर जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून भरपाई मिळावी याचा विविध मागण्यांसाठी संजयकाका पाटलांकडुन आंदोलन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 14, 2025 05:36:17
Mumbai, Maharashtra:संजय राऊत चांगली आहे तब्येत लहान सान शरीरामध्ये बदल होत असतात शिष्ट मंडळाला जाण्याची तयारी सुरू आहे लोकसभा आणि विधानसभेत 45 लाख मत वाढली त्याचा हिशोब द्यायला अयोग तयार नाही नाशिक मध्ये साडेतीन लाख ही मत डुबलीकेट आहेत यासंदर्भात निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही असे अनेक विषय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र समोर मांडायचे आहेत एक मत चोरणार असाल तर निवडणुकी आयोगावर विश्वास ठेवणार कसा शिंदे और अजित पवारांच्या पक्षाला आम्ही पक्ष म्हणून मानत नाही कारण ते चोर आहेत राज ठाकरे या शिष्टमंडळात नको हे ठरवणार काँग्रेस पक्ष नाही हा सामुदायिक निर्णय आहे समजा भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता या सिस्टमंडळात आला असता तर त्याला काँग्रेसने विरोध केला असता का नाही नाशिक मध्ये साडेतीन ते चार लाख मते हे डूब्लिकेट आहेत आणि हे लोक मतदान करणार महानगरपालिका मध्ये
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 14, 2025 05:18:35
Beed, Maharashtra:बीड: मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज ठाकरेंची साथ सोडली; शरद पवारांकडून मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांचा पक्षप्रवेश Anc: मागील वीस वर्षांपासून बीड जिल्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षात एकनिष्ठ राहिलेल्या बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी अखेर मनसेची साथ सोडली आहे. मुंबईत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने राजेंद्र मोटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय. मागील वीस वर्षांपासून राजेंद्र मोटे पक्ष वाढी बरोबरच राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ होते. सुरुवातीला गेवराई तालुकाप्रमुख त्यानंतर जिल्हाध्यक्ष अशी पक्षाने मोटे यांना जबाबदारी दिली. मात्र ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेची साथ सोडत मोटे यांचा शरद पवारांनी पक्षप्रवेश करून घेतला आहे.
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 14, 2025 05:03:14
Nashik, Maharashtra:देशाबाहेरील संघटन किंवा व्यक्तींच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मालेगावातील तोशीफ शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तोशीफ शेख सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील काही संघटना व संशयित व्यक्तींशी संपर्कात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. ATS आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तपास गोपनीयतेने सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि मोबाईलमधील डेटा तपासला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे मालेगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस यंत्रणांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही, मात्र या तपासामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 14, 2025 04:55:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - पालकमंत्र्यांच्या हस्ते अत्याधुनिक यांत्रिकी बोटींचा लोकार्पण सोहळा संपन्न.. अँकर - सांगलीच्या औदुंबर गावासाठी महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून यांत्रिक बोटी प्रदान करण्यात आले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बोटांची लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम येथे सह खासदार विशाल पाटील जिल्हाधिकाऱ्यांचा पदाधिकारी उपस्थित होते कृष्णा नदीला येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर औदुंबर गावासाठी संभाव्य खबरदारी म्हणून सहा नव्या अत्याधुनिक बोटी प्रदान करण्यात आल्या असून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या पाठपुराव्यामुळे औदुंबर गावासाठी या यांत्रिक बोटी मिळाली आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top