Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती में एलपीजी गैस की कमी, ऑटो रिक्शा चालकों की लंबी कतार

ADANIRUDHA DAWALE
Mar 25, 2026 04:03:17
Amravati, Maharashtra
अमरावती शहर में एलपीजी गैसचा तुटवडा; गॅस भरण्यासाठी ऑटो रिक्षांची मोठी रांग अमरावती शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. चपराशी पुरा परिसरातील गो गॅस सेंटरवर गॅस भरण्यासाठी ऑटो रिक्षांची मोठी रांग लागली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत गो गॅसचे दर प्रति किलो सुमारे 15 रुपयांनी कमी असल्याने चालकांनी येथे मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, काही कंपन्यांकडून गॅसचे दर प्रति किलो 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत तर गो गॅस सेंटरवर तोच गॅस सुमारे 84.96 रुपयांना मिळत असल्याने स्वस्त दराचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांची झुंबड उडत आहे. सर्वत्र गॅसचे दर समान ठेवावेत, अशी मागणी ऑटो चालकांकडून केली जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 25, 2026 05:15:41
Ahilyanagar, Maharashtra:अमेरिका, इजरायल और इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या समुद्रामध्ये अनेक जहाजे अडकून पडले आहेत. समुद्रातून पुढे जाण्यास योग्य संदेश येत नाही तोपर्यंत ही जहाजे एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून पुढील संदेश येण्याची वाट पाहत उभे आहेत. अहिल्यानगर येथील नेव्ही कार्गो जहाजा वरील कॅप्टन सय्यद शकील कादर गेल्या वीस दिवसांपासून एकाच ठिकाणी समुद्रात जहाजावर आपल्या भारतीय साथीदारांसह अडकून पडले आहेत. शकील सय्यद यांचे जहाज हार्मोस्ट्रेट जवळ अडकून पडले असून त्यांच्या जहाजाच्या आजूबाजूला आहे अनेक जहाजें याच युद्धाच्या परिस्थितीमुळे उभी असून जहाजावरील प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन सध्या वावरत असून कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे दररोज क्षेपणास्त्रे ड्रोन त्यांना जहाजाच्या वरून जाताना पाहायला मिळत आहे रोजच काही ना काही आवाज त्यांच्या आजूबाजूला येत असून मोठ्या प्रमाणात धूर दिसत आहे. हे जहाज स्पेन येथून दुबई कडे जाण्यास निघाले असल्याची माहिती कॅप्टन शकील सय्यद यांनी दिली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 25, 2026 05:03:18
Ambernath, Maharashtra:अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी आणली कुत्रे पकडण्याची जाळी अंबरनाथ मध्ये नगरसेवकाचे उपहासात्मक आंदोलन भटके कुत्र्यांना पकडत नसल्याने नगरसेवक संतप्त अंबरनाथ मध्ये बच्चा कुत्र्यांचा विद्यार्थिनी वर हल्ला विकास सोमेश्वर यांनी चक्क अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी कुत्रे पकडण्याची जाळी नगरपालिकेत आणत उपहासात्मक आंदोलन केलं, तुम्ही कुत्रे पकडत नसाल तर आम्ही तुम्हाला पकडतो असे सांगत सोमेश्वर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली असल्याचे विकास सोमेश्वर यांनी सांगितले, लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना न केल्या असता अधिकाऱ्यांना प्रेमाची भाषा समजत नसल्यास शहरात एकाही अधिकाऱ्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी दिला आहे,
326
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 25, 2026 05:02:49
Yavatmal, Maharashtra:पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरल्याने काल रात्रीपासून यवतमाळच्या सर्व पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम होऊन इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा यवतमाळ जिल्ह्यात पसरली. नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथून येणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल डिझेल मिळाले नाही त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहने घेऊन नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या. आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेलची मागणी होऊ लागली, वास्तविक पाहता इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी पेट्रोल पंपावर बंदोबस्त लावून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
352
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 25, 2026 04:49:20
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:मिरजेच्या बेडगमध्ये पार पडली अनोखा त्राटकी सोंग मिरवणूक गावातल्या प्रमुख मार्गांवरून हा त्राटकी सोंग मिरवणूक निघाली, ज्यामध्ये रावणाची बहिण शृर्पणखा व तिचे दैत्यसैन्य, तिच्या जिवंत देखावा सादर करण्यात आला. रामायण कथेतील असणारे दंडकारण्याचे क्षेत्र बेडग गावच्या हद्दी पर्यंत होते, ज्या ठिकाणी रावणाची बहिण शृर्पणखाचे राज्य होते, त्यामुळे मरगाई देवीच्या यात्रेनिमित्ताने हा त्राटकीचा दरबार सांगोच्या माध्यमातून आयोजित करण्याची परंपरा आहे. अनोखा पद्धतीचा त्राटकी सोंग पाहण्यासाठी महाराष्ट्र सह कर्नाटक मधील हजारो भाविकांनी बेडग गावात उपस्थिती लावली होती.
1009
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 25, 2026 04:47:17
968
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 25, 2026 04:31:37
Varasoli, Maharashtra:सर्वाहाराच्‍या पाठपुराव्‍याने कुटुंबाची भेट ...... तीन वर्षानंतर झाली कुटुंबाची पुनर्भेट ...... अँकर – कर्नाटकातील कोळसा भटटीवर काम करणारया रायगड जिल्‍हयातील दोन आदिवासी मुलींची तीन वर्षानंतर सुटका करण्‍यात आली. सर्वाहारा जन आंदोलनाच्या पाठपुराव्‍यामुळे तब्‍बल तीन वर्षांनी आई वडील आणि मुलींची भेट झाली. रायगडच्‍या रोहा तालुक्‍यातील वरवटणे आदिवासी वाडीवरील संतोष वाघमारे ,त्यांची पत्नी सुनीता आणि दोन मुली अनिता व पूजा असे कुटुंुब दहा वर्षांपूर्वी अहिल्‍यानगर येथील कोळसा भटटी मालक अनिल चव्हाण यांनी कोळसा भट्टी कामासाठी, कर्नाटकातील रायपूर येथे नेले होते, दहा वर्ष सतत या कुटुंबाने, अनिल चव्हाण यांच्याकडे कोळसा पाडण्याचे काम केले, मात्र या कामाचा मोबदला म्हणून अनिल चव्हाण यांनी काहीही न दिल्याने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून वाघमारे पतीपत्‍नी तीन वर्षांपूर्वी तेथून पळून गेले परंतु दोन मुलीना अनिल चव्हाण यांनी आपल्या ताब्यात घेऊन ठेवल्यामुळे या मुलींना न घेता या दोघांना तिथून निघावे लागले. अनिल चव्हाण यांनी या दोन मुलींना आपल्या ताब्यात ठेवले होते. सर्वहारा जन आंदोलन संस्थेने पाठपुरावा केल्यानंतर वीटभट्टी मालकाने या मुलींना आईवडिलांच्या ताब्यात दिले.
951
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 25, 2026 04:17:56
Shirdi, Maharashtra:रामनवमी उत्सवानिमित्त साई मंदिर परिसरात संस्थानने साकारले आकर्षक देखावे.. लेंडी बागेत वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा विशेष देखावा उभारला.. साईनामाच्या जयघोषात साईनगरी भक्तिमय वातावरणात दुमदूमली... साईबाबांनी लावलेले वृक्ष आजही लेंडी बागेत डौलाने उभे... भाविकांकडून लेंडी बागेला मोठी पसंती , पर्यावरण जपण्याचा देखाव्यातून संदेश... धार्मिक उत्सवासोबत सामाजिक जाणीव जागृतीचा उपक्रम... दर्शनानंतर भाविकांची लेंडी बागेकडे मोठी गर्दी... वृक्षसंवर्धनाचा संदेश भाविकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याची संकल्पना... लेंडी बागेत साकारण्यात आलेल्या देखाव्यांच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
1063
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 25, 2026 04:06:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:घरचा प्लॉट विकण्यावरून पती-पत्नीमध्ये निर्माण झालेला वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्या निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण सिल्लोड तालुका हादरून गेला आह. जेबास तालीब पठाण वय ४६ वर्षे अस खून झाल्या पतीचं नाव तर रशिदाबी जेबास पठाण रा. घटनांद्रा असे आरोपी पत्नीचे नाव आहे.पुतण्याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून पत्नीला ताब्यात घेतले आहे. रात्री पती कामावरून घरी आला त्यावेळेस प्लॉट विक्रीवर पती-पत्नीत जोरदार बाचाबाची झाली त्यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली त्यानंतर त्याच्या डोक्यावर काहीतरी भारी वस्तू मारली आणि गळा सुद्धा आवळला यातून पतीचा जागीच मृत्यू झाला आहे...
1018
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 25, 2026 03:35:37
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... मनपाच्या पंपहाऊसला जलसंपदाने ठोकले कुलूप.... तब्बल ३२ कोटींच्या थकबाकीमुळे विभागाकडून मांजरा प्रकल्पस्थळी कारवाई...... लातूरला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या मांजरा धरणातून उपसा केलेल्या पाणी पट्टी भरण्याकडे महापालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यातून ३२ कोटीची थकबाकी झाली आहे. वारंवार नोटीस देवून देखील महापालिकेकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्याचा परिणाम जलसंपदा विभागाने मांजरा धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा तोडला आहे. सध्या आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. त्यात हा पाणी पुरवठा तोडला गेल्याने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रक कोलमडून जाणार आहे.
1028
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 25, 2026 03:35:25
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणात अटकेत असलेल्या झेडपी सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप नारायण मांडवे याना महाबळेश्वर न्यायालयाने प्रत्येकी ५०,०००/- च्या वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवर पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.. तसेच न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत या प्रकरणाच्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याना ''कारणे दाखवा'' नोटीस बजावण्याचे आदेश दिले.महाबळेश्वर न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती..काल या प्रकरणात ज्यांचे अपहरण झाले होते ते बापूसाहेब शिंदे यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहून माझे अपहरण झाले नसल्याचा जबाब नोंदवला होता.यामुळे आता सातारा पोलीस कारणे दाखवा नोटिसीचे उत्तर नेमकं काय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..
991
comment0
Report
Advertisement
Back to top