Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में खानापूर वेस में छापेमारी, अवैध पिस्तौल के साथ रोहन अंभोरे गिरफ्तार

JJJAYESH JAGAD
Dec 01, 2025 01:46:50
Akola, Maharashtra
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस अलर्ट मोडवर असून सुरक्षेच्या दृष्टीने कडक कारवाई सुरू आहे. अकोट शहर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध शस्त्रसाहित्यासह एकाला अटक केली आहे. शहरातील खानापूर वेस परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या वेळी रोहन अंभोरे नावाच्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्या ताब्यात कोणतीही परवानगी नसलेली एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ ते साहित्य जप्त केले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोट पोलीस करत आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 02:31:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट शिक्के व खोट्या स्वाक्षऱ्या वापरून ५४ एकर ३० गुंठे जमिनीच्या व्यवहारासाठी बनावट शासकीय आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या नायब तहसीलदारांकडून एक संशयास्पद आदेश व्हॉट्सअॅपवर तपासणीसाठी आल्यानंतर ही फसवणूक समोर आली. बनावट या आदेशावर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व शासकीय शिक्के वापरले होते. ब्रिजवाडी येथील सर्व्हे क्र. १ गट क्रं. ३० मधील ५४ एकर ३० गुंठे मधील जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणात हा बनावट आदेश तयार करण्यात आल्याचा संशय आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 01, 2025 02:31:33
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदनमध्ये दोन वॉर्डातील निवडणूक लांबली, 20 डिसेंबरला होणार मतदान भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 1 मधील अ आणि प्रभाग 9 मधील ब वॉर्डातील निवडणूक स्थगित झाली आहे. या दोन्ही ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. ज्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले होते, त्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारीांनी अपील दाखल केलेल्या उमेदवारांना आपले नामनिर्भरपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारीांनी 26 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर केलेली चिन्ह वाटपची कार्यवाही नियमबाह्य ठरते, असा ठपका ठेवून निवडणूक आयोगाने भोकरदन नगर परिषद निवडणुकीतील दोन वाडाँची निवडणूक पुढे ढकलली आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 01, 2025 02:16:45
Yavatmal, Maharashtra:निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. वणी येथे प्रभाग १४'क', दिग्रस नगरपरिषदेतील प्रभाग २ ब, प्रभाग ५ ब, प्रभाग १० ब आणि पांढरकवडा नगरपरिषदेतील प्रभाग ८ अ व प्रभाग ११ 'ब' या सहा जागांवरील निवडणूक आता 20 डिसेंबर रोजी होणार असून 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. या निर्णयामुळे व प्रशासनाने घातलेल्या गोंधळामुळे अनेक उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. प्रचारासाठी मोठा खर्च या उमेदवारांनी केला, आता वीस डिसेंबर पर्यंत खर्च सुरूच ठेवावा लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड उमेदवारांना बसणार आहे. झालेल्या खर्चाची भरपाई कोण देणार असा संतप्त सवाल या उमेदवारांनी केला.
50
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 02:16:12
Shirur, Maharashtra:शेतशिवारात दिसणारा बिबट आता झाडावर बसुन शेतशिवारातुन टिहाळणी करत असल्याने शेतात काम करणारा शेतकरी धास्तावलाय शिरूर तालुक्यातील शिंगाडवाडी परिसरात शेतकरी शेतात काम करत असताना अचानक झाडावर बसलेल्या बिबट्याची हालचाल दिसली. काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढला असून कालच वनविभागानं एक बिबट्या जेरबंद केला होता. मात्र आज पुन्हा झाडावर बसलेला दुसरा बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट पसरलंय. बिबट्या झाडावरून टिहाळणी करत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं असून वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत परिसरात सापळा लावला आहे. सततच्या बिबट्या दर्शनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ दोघांच्याही चिंता वाढल्या आहेत.
172
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 02:15:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पुढे ढकलण्यात आली. रविवारी राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. सायंकाळपर्यंत आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नव्हत्या. त्यामुळे वरिष्ठांकडून काही अभिप्रायासह विचारणा केल्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्यानुसार काही निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यानुसारच फुलंब्रीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ४ तारखेला नव्याने फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल .. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एकूण सहा नगरपरिषद आणि फुलंब्री नगरपंचायत अशी निवडणूक होती फुलंब्री रद्द झाल्या नंतर आता फक्त सहा नगर परिषद उरले आहेत त्यात गंगापूर नगर परिषदेत 2 जागांची निवडणूक स्थगित झालीय, पैठण मध्ये 4 नगरसेवकांच्या निवडणुकीला स्थगिती आहे तर वैजापूर मध्ये 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली आहे....
128
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 01, 2025 02:15:31
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी - लातूर महामार्गावर भीषण अपघात, अपघातात 5 जण जागीच ठार बार्शी - लातूर महामार्गावर भीषण अपघात,भीषण अपघातात 5 जण जागीच ठार बार्शी तालुक्यातील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर झालेल्या अपघातात कारचा झाला चुराडा नवविवाहित दांपत्याला त tuljapurला देवदर्शनासाठी जातं असताना झाला भीषण अपघात,सुदैवाने या अपघातात नवरा नवरीचा वाचला जीव चार मधील 7 पैकी 5 जणांचा जागीच झाला मृत्यू,सर्व मृत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी गावाचे नागरिक आहेत. या अपघातानंतर जखमीना तात्काळ बार्शीच्या खासगी रुगनालयात हलवण्यात आले आहे. या संदर्भात पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
178
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 01, 2025 01:46:35
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधी भुतडा व इतर सदस्यांच्या प्रचारासाठी माजी WWE चॅम्पियन दलीप सिंग राणा उर्फ ' द ग्रेट खली 'ने रोड शो करून मतदारांना आकर्षित केले. उमरखेड च्या प्रमुख मार्गावरून खलीची धीप्पाड एंट्री बघण्यासाठी उमरखेड वासियांनी प्रचंड गर्दी केली होती. भारताला पुढे नेण्याचे भाजपचे धोरण आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्यासोबतच नगरपरिषदेत देखील भाजपाची सत्ता यावी असे आवाहन त्यांनी केले. खलीची एक झलक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा सर्वसामान्य नागरिकांसह महिला, तरुणी, युवक, जेष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीनेही गर्दी केली होती.
227
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Dec 01, 2025 01:15:51
210
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 30, 2025 18:01:23
362
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 30, 2025 18:01:09
Oros, Maharashtra:ऑन महाविकास आघाडी प्रचारात नाही आनंद आहे कोकण आणि शिवसेना हे नात आहे ते बाळासाहेबांपासून नात आहे. याच शिवसेनेचे कोकणाने नऊ पैकी आठ आमदार निवडून दिलेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे लाडक्या बहिणींनी आणि भावांनी शिवसेना ला निवडून देण्याचा निश्चय केलाय. शिवसेना दिलेल्या शब्द पाळते. पैसे वाटप ते झालं त्याची चर्चा झाली मतदान निर्भय वातावरणात झालं पाहिजे कोकणातील कोकणातली माणसं प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहेत त्यांना पैशाने विकत घेता येणार नाही. ते कामाला मतदान करतात कोकणातील माणसाची शिवसेना व श्रद्धा आहे. विधानसभेप्रमाणे या निवडणुकीत देखील शिवसेनेला 100% रिझल्ट मिळेल. रवींद्र चव्हाण मला काही बोलायचं नाही बोलायचं तेव्हा मी नक्की बोलेन युती काल-परवाची नाही. ही युती बाळासाहेब अटलजी आणि आडवाणी यांच्या काळातली आहे. युती सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली नाही. युती फार वेगळी आहे. एन डी ए मध्ये शिवसेना महत्त्वाचा घटक आहे. युतीचं नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत युती झाली नाही.. निवडणुका उद्या परवा वर आले आहेत. युतीसाठी राणे साहेब केसरकर साहेब शिवसेना सकारात्मक होते. युती व्हावी म्हणून शिवसेना सकारात्मक होती काही ठिकाणी झाली काही ठिकाणी युती झाली नाही.. युती का झाली नाही त्याच्यात मला आता जायचं नाही. आता आम्हाला निवडणुका जिंकायचे आहेत. शिवसेना काम करणारी संघटना आहे. त्यामुळे भरपूर यश देण्याचं लोकांनी ठरवलं आहे.
301
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 30, 2025 17:16:14
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याप्रकरणात अपिलाचे निकाल उशिराने लागल्याने रत्नागिरी नगर पालिकेतील प्रभाग 10 ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. ही निवडणूक आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सुधารีत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग दहामध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिंदे व संपदा रसाळ-राणा यांचा उमेदवारी अर्ज हा प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारीांनी अवैध ठरवला होता. त्याविरोधात दोन्ही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केली होती. हे अपिल जिल्हा न्यायालयात 24 नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आले होते. त्यामुळे 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर आलेल्या निकालांमुळे या सदस्यपदांच्या निवडणुका 4 नोव्हेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेऊ नयेत व ही निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रभाग 10साठी नवीन कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख 10 डिसेंबर दु.3 वाजेपर्यत आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देऊन, अंतिम लढवणाऱ्या निवडणूक उमेदवारांची यादी 11 डिसेंबर रोजी प्रसिध्द करायची असून 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30पर्यत मतदान होणार आहे तर मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. करायची आहे. 4 डिसेंबरपासून प्रभागापुरती आचारसंहिता लागू होणार आहे.
97
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 30, 2025 16:31:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:माझ्या मंत्रिमंडळात कोणतीही जागा नाही,पूर्ण मंत्रिमंडळ भरलेला आहे, बाहेरच्याला तर मंत्रीपद करणार नाही,असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावरून होणारया चर्चां बाबत पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर येथे आयोजित प्रचार सभेतून देवेंद्र फडणवीस बोलत होते. ईश्वरपूर नगरपरिषदेसाठी जयंत पाटलांच्या विरोधात महायुती अह निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकंच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेतून देवेंद्र जयंत पाटलांच्या भाजप आणि मंत्री पदाच्या बाबतीत होणाऱ्या चर्चेवरून स्पष्ट भूमिका केली आहे,याठिकाणी मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही,पण कोणताही संभ्रम राहू नये म्हणून मी आलोय,माझ्या मंत्रीमंडळा कोणतीही जागा नाही,येथे उपस्थित असणारयांनी नव्याने मागण्या करू नका,पण जे उपस्थित आमदार आहेत,त्यांना मंत्री करणार नाही.आणि बाहेरच्याला तर मंत्रीपद करणार नाही,त्यामुळे माझ्याकडे जागा नसल्याने कोणाला ही मंत्री पद मिळणार नाही,असे स्पष्ट करत जयंत पाटलांच्या भाजप प्रवेश आणि मंत्रिपदाच्या चर्चेवरून फडणवीस यांनी अप्रत्यक्ष जयंत पाटलांना टोला लागवला आहे.
135
comment0
Report
Advertisement
Back to top