Back
Ajit Pawar plane crash: Amol Mitkari calls for strict, independent investigation
JJJAYESH JAGAD
Feb 15, 2026 14:31:09
Akola, Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित करत सखोल आणि निपक्ष चौकशीची मागणी केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मेल करून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अजित दादांच्या विमानात स्फोटके होती का ? असा सवाल आता मिटकरींनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला १६ दिवस उलटूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोल यांनी पत्रकार परिषदेत लवकरच डेटा प्रसिद्ध करू असे सांगितले होते. मात्र तो अद्याप समोर न आल्याने संशय अधिकच वाढत असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी यापूर्वीच अमित शहा यांना मेल करून चौकशीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे आपणही मेल करून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले. मिटकरी यांनी पुढील मुद्दे उपस्थित केले आहेत: ब्लॅक बॉक्स डेटा जाहीर करण्यास विलंब का? अपघातस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक का केले जात नाही? सीआयडी चौकशीवरही त्यांनी संशय व्यक्त केला. संबंधित धावपट्टीवर यापूर्वी नऊ वेळा अपघात झाल्याचा दावा. स्फोटाचा संशय ? अपघातानंतर सर्व काही बेचिराख झाल्यानंतरही स्फोट झाल्याचा दावा करत मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच स्फोट झाला होता का? विमानात स्फोटक पदार्थ किंवा जिलेटीन ठेवण्यात आली होती का? त्यापूर्वी बजरंग सोनवणे यांनीही अशाच प्रकारची शंका व्यक्त केली होती. अपघाताचा एक व्हिडिओ १५ दिवसांनी समोर आल्याने आणखी काही व्हिडिओ असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे अपघाताचे गूढ अधिक भयावह असू शकते, असे मिटकरी म्हणाले. “ज्यांना वाटतं हा अपघात आहे, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं,” असे आव्हानही त्यांनी केले आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 12:35:480
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 05, 2026 12:23:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 12:06:200
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 12:00:410
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 11:36:250
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 05, 2026 11:33:520
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 05, 2026 11:33:330
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 11:31:040
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 11:15:57Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिके की स्थायी समिति के सभापति अशोक पाटील और परिवहन समिति के सभापति विकास झंजाड बिनविरोध निर्विरोध चुने गए।
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 05, 2026 11:08:020
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 11:07:380
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 11:07:220
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 11:01:230
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 05, 2026 10:32:460
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 05, 2026 10:30:340
Report