Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

बिबट्याने पांच वर्षीय लड़की को उठाया; 16 घंटे बाद शव मिलने से हड़कम्प

LBLAILESH BARGAJE
Nov 13, 2025 06:18:46
Pune, Maharashtra
अहिल्यानगर शेजारी असलेल्या खारेकार्जुने येथील पाच वर्षीय मुलीला बिबट्याने झडत घालून उचलून नेलं होता. या मुलीचा तब्बल 16 तासानंतर मृतदेह सापडला आहे. घरापासून तीन किलोमीटर अंतरावर, शेतात जवळील एका झाडाच्या मध्ये मुलीचा मृतदेह आढळला आहे. काल रात्री मुलीला बिबट्या घेऊन गेल्यापासून वनविभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ मुलीचा शोध घेत होते. अखेर मुलीचा शोध लागला आहे. मात्र बिबट्याने तिच्यावर झालेल्या आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 10, 2026 08:54:12
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीच्यावाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा 39 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून अनेकजण शीतपेयांचा आधार घेताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, बाहेर पडताना रुमाल, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उषणेामुळे थकवा, चक्कर, मळमळ किंवा उलट्यांची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले आहे. बाईट:डॉ.अनिल कावरखे,जिल्हा शल्य चिकित्सक,वाशिम.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 10, 2026 08:53:25
Amravati, Maharashtra:अमरावतीत भाजपच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती अमरावतीत भाजपच्या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली असून अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच हे प्रशिक्षण वर्ग शिबिर सुरू झालं असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती आहे. पश्चिम विदर्भात भाजपच संघटन आणखीन मजबूत व्हावं यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 10, 2026 08:53:05
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 10, 2026 08:37:09
Pandharpur, Maharashtra:अमेरिका इज़राइल और ईरान के युद्ध के कारण ग़ोरगरिबा के विठ्ठराय के अन्नछत्र में भविष्यात गैस सिलिंडर का तुटाव/तुटवडा आ सकता है, जिससे भक्तों को यह प्रसाद मिल पाने में अड़चन हो सकती है. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर के अन्यछत्रों में सुबह और शाम को हर दिन हज़ारों भक्तों को मुफ्त अन्नदान किया जाता है इसके लिए लगभग 150 गैस सिलेंडर प्रतिदिन मंदिर समिती को आवश्यक लगते हैं। वर्तमान में मंदिर समिती के पास पर्याप्त गैस सिलेंडर का स्टॉक उपलब्ध है, इसलिए अभी किसी प्रकार की कठिनाई नहीं है, परन्तु यदि भविष्य में यह युद्ध जारी रहता है तो मंदिर समिती को वैकल्पिक ईंधन का उपयोग कर भक्तों को अन्नछत्र और लाडू प्रसाद की व्यवस्था करनी होगी, यह मंदिर समिती के कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ने कहा है।
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 10, 2026 08:32:54
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून ग्रीन हॉटेल चौक परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांस कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. लाठी-काठ्यांनी पोलीस हवालदार विकास वैराळ यांच्यावर बेदम मारहाण करत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांसह 11 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बुरुडगाव येथील उपसरपंचासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 07:51:33
Jalna, Maharashtra:जालना | ब्रेकिंग | इराण आणि अमेरिका-इस्त्रायल देशांच्या युद्धाचा जालना स्टील उद्योगावर परिणाम झाला असं दिसून येतंय. गल्फ देशांमधून आयात होणारे स्क्रॅब थांबले, स्टील 3000 हजार रुपयांनी महागले. कोळशाच्याही भाव वाढीवर झाला परिणाम. अँकर- इराण आणि अमेरिका इस्त्रायल देशांच्या युद्धामुळे जालना स्टील उद्योगावर परिणाम झाल्याचं बघायला मिळालंय.. गल्फ देशांमधून भारतात स्क्रॅब आयात केलं जातं.. युद्धामुळे ते सध्या थांबलेलं आहे. त्याचबरोबर कोळशाचे भावही वाढल्यामुळं स्टील 3000 हजार रुपयांनी महागलं आहे.. त्यामुळं या युद्धाची झळ सर्वसामान्याला आता बसू लागली आहे. बाईट- घनश्याम गोयल,चेअरमन, कालिक स्टील इंडस्ट्रीज,जालना
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 10, 2026 07:32:09
Baramati, Maharashtra:इंदापूरमध्ये शासकीय कारवाईदरम्यान तहसीलदार जीवन बनसोडे यांना मारहाण... तहसीलदारांना मारहाण झाल्याची इंदापूर पोलिसात तक्रार दाखल.... मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा.....घटनेच्या निषेधार्थ महसूल मधील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन Anchor_ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात शासकीय कारवाईदरम्यान तहसीलदारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तशा आशयाची तक्रार इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसात दाखल करण्यात आली आहे..वरकुटे खुर्द येथील संतोष रामदास मोरे याने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोपी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तक्रारीद्वारे केला आहे. निमगाव केतकी ते पिटकेश्वर रोडवर मुरूम वाहतूक करणाऱ्या टिपरची तपासणी सुरू असताना संतोष मोरे तेथे आला. त्याने शासकीय वाहनासमोर मोटारसायकल आडवी लावून कारवाईत अडथळा निर्माण केला. यावेळी संतोष मोरे याने शिवीगाळ करत तहसीलदार जीवन बनसोडे यांचा शर्ट धरून मारहाण केली.शिवाय या प्रकरणात दहा हजार रुपयांची मागणी केली अशा आशयाची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदवला आहे यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना इंदापूर मध्ये घडलेल्या आहेत.तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती 24 मे 2024 रोजी असाच एक हल्ला झाला होता.त्यात पाटील यांना मारहाण झाली होती.त्यानंतर आता तहसीलदार जीवन बनसुडे यांना देखील मारहाण झाली आहे. तहसीलदार बनसुडे यांनी मोरे याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, मोरे याने शिवीगाळ करत ''इंदापूरमध्ये नोकरी कशी करता ते पाहतो'' अशी धमकी दिली. त्याने तहसीलदारांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. तसेच १० हजार रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 10, 2026 06:20:06
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटातील आणखी एका जखमी महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे.. सोमवारी 27 वर्षीय महिला कामगार सीमा धुर्वे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे... स्फोटात त्या सुमारे 70 % भाजल्या होत्या. त्यांच्यावर ऑरेंज सिटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू होते; मात्र सोमवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. दरम्यान, ऑरेंज सिटी रुग्णालयात 12 जखमी कामगार अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 06:17:24
Kolhapur, Maharashtra:इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन तंचाईची भीती व्यक्त केली जात असताना कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. घरगुती गॅस सिलेंडर भडकण्याची किंवा पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील राजारामपुरी इथे असणाऱ्या गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी एजन्सीच्या दारात लांबच लांब रांगा लावल्या. आपल्याला वेळेत गॅस मिळावा यासाठी अनेक जण सिलेंडर घेण्यासाठी घाई करताना दिसले. गॅस एजन्सीच्या दारातून याचा आढावा घेऊन नागरिकांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 05:49:39
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीच्या बोमनवार महाविद्यालयात चॅट जीपीटी च्या माध्यमातून 12 वी परीक्षेत कॉपी प्रकरणी 4 जणांचे निलंबन अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावरील ढिसाळ कारभार आणि कॅापीचा प्रकार आढळल्याने तीन शिक्षक आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. चामोर्शी येथील जा.कृ.बोमनवार विद्यालय या केंद्रावर हा प्रकार घडला. बारावीच्या राज्यशास्राच्या पेपरदरम्यान चॅट जीपीटीवरून उत्तरे शोधून सामूहिक कॅापी करण्याचा प्रयत्न झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालावरून संबंधित चार लोकांवर गुन्हा दाखल करत त्यांनाही निलंबित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला. प्रश्नपत्रिका वर्गात येताच ती वर्गात तैनात शिक्षकाच्या मदतीने बाहेर नेली जायची आणि नंतर चॅट जीपीटीच्या माध्यमातून उत्तरे शोधून वर्गात पुरविली जायची. या हायटेक कॉपीचा मात्र अखेर पर्दाफाश झालाय. बाईट १) नंदकुमार बोडसे , अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ पुण्याहून निलेश खरमरेसह आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
Advertisement
Back to top