Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

राहाता क्षेत्र में बिबटियों का मुक्त संचार: सीसीटीवी में कैद, दहशत फैल गई

KJKunal Jamdade
Jan 23, 2026 11:36:34
Shirdi, Maharashtra
राहाता तालुक्यात बिबट्यांचा मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद... पिंपळस गावात बिबट्यांचा मुक्त संचार.... दोन बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद... पाळीव कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न फसला... मध्यरात्रीच्या सुमारास सुमित टाक यांच्या वस्तीवर बिबट्यांचा मुक्त संचार... परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण... बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Jan 23, 2026 14:05:42
Baramati, Maharashtra:माझी पत्नी कॉन्ट्रॅक्ट नाही मी आहे ... महिला उमेदवाराच्या पतीचे अजित वारांच्या सवालावर बह़न्नाट उत्तर.. एक तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर का नसेल तर पक्षाचे पदाधिकारी अजित पवारांचा सल्ला... Anchor: उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार ठेकेदारांना एक तर तुम्ही कॉन्टॅक्टर व्हा किंवा पदाधिकारी असा सल्ला देतात त्यातच आज पुण्यातील पुरंदर तालुक्यात पदधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना तालुक्यातील 12 उमेदवारांपैकी किती जण कॉन्ट्रॅक्टर आहेत असा सवाल विचारल्यानंतर एका उमेदवाराने मी मागील 30 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर चे काम करतो माझी पत्नी मात्र कॉन्ट्रॅक्ट नाही असे उत्तर दिल्यानंतर अजित पवारांसह उपस्थितांमध्ये हशा पिकला... यावर अजित पवार म्हणाले एक तर तुम्ही कार्यकर्ते व्हा पदाधिकारी व्हा. नाहीतर पूर्वी जिल्हा परिषदेमध्ये काय व्हायचं तोच सदस्य आणि तोच कॉन्ट्रॅक्टर तो आपल्या पुतण्याला मेहुण्याला काम द्यायचा आणि ते सर्व विस्कळीत व्हायचं बारामतीत देखील मी याला विरोध केलाय असे अजित पवारा नी सांगितलेय... बाईट अजित पवार
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Jan 23, 2026 13:36:53
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी महिला आरक्षण पडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आमचा असल्याचं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं आहे... अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर यांना एमडी ड्रग्स प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले आहे... यावर बोलताना माजी खासदार सुजय विखे म्हणाले... प्रत्येक घटना पारनेर तालुक्याची का जोडले जाते... पोलीस कर्मचारी आठव्या करण्यात आलेला आहे तो यापूर्वी तो कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होता... पोलीस कर्मचारी हा पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होतात त्या काळात देखील त्याच्यावर गुटखा असेल ट्रक संदर्भात तक्रारी दाखल झाल्या होत्या... असं असून देखील या व्यक्तीची बदली नगर एलसीबी मध्ये करण्यात आली... ही बदली कोणाच्या आदेशाने झाली याचे उत्तर पोलीस अधीक्षकांना द्यावे लागेल... एलसीबी कर्मचाऱ्यांची बदली करताना पोलीस अधीक्षकांनी म्हटलं होतं पारदर्शक आणि चारित्र्यसंपन्न अशा इतरांना यामध्ये घेतलं जाईल... ड्रग्ज गायब झाल्यानंतर ते पारनेर तालुक्यात कोणाच्या घरी ठेवण्यात आले होते त्या लोकांची नावे लवकरात लवकर जाहीर करावी... या घटनेत अनेक मोठे मासे आरोपी असून... ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे... आठ दिवसांचा अल्टिमेट अहिल्यानगर पोलीस प्रशासनाला देत असून त्यांनी या प्रकरणाबाबतची सर्वांचे नावे समोर आणावी अन्यथा पत्रकार परिषद घेऊन मी नावानिशी यातील आरोपींची माहिती देईल
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 23, 2026 13:36:25
Shirur, Maharashtra:पुण्याच्या लोणी काळभोर येथील जॉय नेस्ट सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकल्याला भरधाव मोटारीने धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. निष्कर्ष स्वामी (वय ५) असे मृत मुलाचे नाव आहे. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, त्यात सोसायटीच्या आवारात फोर व्हिलर कार भरधाव वेगाने येत असल्याचे स्पष्ट दिसते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त करत सोसायटी परिसरात वाहनांच्या वेगावर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 23, 2026 13:18:21
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्हा परिषद और पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांचे काल अर्ज छाननी झाली. यात वैभववाडीत नाधवडे पंचायत समिती आणि बिडवाडी पंचायत समिती बिनविरोध झाल्या आहेत. काल पासून झालेली आमची विजयाची घोडडौड ७ फेब्रुवारीला देखील दिसेल. महायुतीचा झेंडा खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली फडकेल. कणकवलीत आमच्या मतालाही किंमत द्या अशा बॅनर झळकला. यावर मंत्री नितेश राणेंनी लोकांमध्ये चुकीची माहिती पडलेली आहे. लोकशाहीत पैसे वाटून निवडून आणणे हे लोकशाहीच्या हिताचे नाही. अशा पद्धतीचे बॅनर लावणाऱ्या लोकांनी विचार करावा. विकास आणि भवितव्य घडवण्यासाठी आम्ही सगळ्या निवडणुका लढवतो. पैशाचा दुरपयोग होत असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी अस आवाहन करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये महायुतीत झालेली बंडखोरी रोखण्यासाठी येणाऱ्या काही दिवसांत कार्यकर्त्यांचे समाधान होण्याच्या दृष्टीने पावलं उचलणार आहोत. जिल्ह्यात दोन्ही बाजूंनी एबी फ्रॉम वाटप असो, बंडखोरी, नाराजगी वाढली आहे. याचे मूळ कारण जनतेचा विश्वास महायुती वर आहे. महायुतीची सत्ता येणार त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या असून महायुतीचे तिकीट भेटल्यास निवडून येणार असल्याने नाराजी, बंडखोरी वाढली आहे. बंडखोरी क्षमविण्यासाठी कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य, महामंडळ या ठिकाणी निवड करून बंडखोरी क्षमवण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंब्र्यातील नगरसेविका सहर शेख यांच्या हिरवा मुंब्रा या वक्तव्यावर बोलताना नितेश राणेंनी जे त्यांच्या पाकिस्तानच्या अब्बाला जमलं नाही, ते या नवीन आलेल्या लोकप्रतिनिधींना काय जमणार. आमच्या हिंदू राष्ट्रातील प्रत्येक इंच जमीन ही हिंदूंची आहे, हिंदूंची राहणार. हे हिरवे करणारे कधी भगवे होऊन जातील, हे त्यांनाही कळणार नाही. अशा प्रकारे आवाज देण्यासाठी हे पाकिस्तान किंवा इस्लामाबाद नाही. त्यांची जिभ जास्त वळवळत असेल, तर अशा सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात लढणं आमच्यासारख्या हिंदुत्ववादी नेत्यांचं काम आहे. गाजवाय हिंद अंतर्गत आपल्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनविण्याचे हे मनसुबे असून अशा प्रकारे वक्तव्य दिली जात आहेत. अश्या पद्धतीने वक्तव्य केल्यास आरे ला कारे करणे आम्हालाही येत. आमच्या हिंदू भूमी कडे बघणारे प्रत्येक डोळे त्याची काळजी कशी घ्यावी हे आम्हाला माहिती आहे. सरकार आपलं काम करत आहे. जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येण्याबाबत दुरूस्ती विधेयक येण्याची शक्यताबाबत सकारात्मक गोष्ट आहे. अजून काही कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळते. या विधेयकामुळे अनेक कार्यकर्त्यांना सभागृहात जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांचा आभार मानतो. नितेश राणे, मंत्री
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Jan 23, 2026 12:38:10
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी गटबाजीचे प्रदर्शन करण्याचे टाळून पालकमंत्री संजय राठोड यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे दोन्ही शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. दाते कॉलेज चौकात शिवसेनेने बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पोलीस भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांच्या वितरणाचा कार्यक्रम घेतला होता. दरम्यान शिवसेना उबाठा चे संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड व जिल्हाप्रमुख किशोर इंगळे शिवसैनिकांसमवेत त्या ठिकाणी पोहोचले. थोड्याच वेळात पालकमंत्री संजय राठोड व शिवसेना पदाधिकारी देखील तेथे पोहोचले. दोन्ही शिवसेना समोरासमोर आल्या. तेव्हा पालकमंत्री संजय राठोड यांनी समन्वय साधत एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी साधलेला संवाद चर्चेचा विषय ठरला.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 23, 2026 12:36:57
Ambernath, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हेमंत चतुरे मारहाण प्रकरण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी म्हसकर याला अटक बंटी म्हसकर हे भाजप नगरसेविका हेमांगी म्हसकर यांचे पती बंटी म्हसकर याला कल्याण न्यायालयात हजर झाले असता न्यायालयाने 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे . बंटी म्हसकर हे भाजपच्या नगरसेविका हेमांगी म्हसकर यांचे पती आहेत, हेमंत चतुरे हे एका सोसायटीत पूजेला गेले असताना बंटी म्हसकर आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हेमंत चतुरे यांना मारहाण केली होती ,या यामध्ये मारहाणीचा सीसीटीव्ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 23, 2026 12:33:11
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Jan 23, 2026 12:17:20
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिलां संताप व्यक्त करीत आहेत. या योजनेत यवतमाळ जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य केली होती. ई-केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 60 टक्क्याहून अधिक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली. अनेकांची ई केवायसी चुकीची झाली परिणामी 1500 रुपयांचा हप्ता शेकडो महिलांचा लाभ खात्यात जमा झालाच नाही. महिलांना नियमित हप्ता मिळत नाही. मग आमच्या हक्काचे पैसे गेले तरी कुठे असा संतप्त सवाल यवतमाळच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित केला आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 23, 2026 12:01:12
Baramati, Maharashtra:दौंड शहर में हृदय पिळवटून टाकणारी घटना, 4 वर्ष के बच्चे को रोड रोलर ने चिरड दिया. दौंड शहरातील जनता कॉलनी भागातील सेंट सेबिस्टियन हाईस्कूल के पीछे के सड़क का डामरीकरण शुरू होने के समय सड़क पर रोड रोलर के नीचे आकर आर्यन जाधव नामक चार वर्षीय बच्चे की चिरडकर दुर्दैवी मृत्यु हो गई. आर्यन की माँ डामरीकरण के काम पर मजदूर के रूप में काम कर रही थीं; रोड रोलर चालक का रोलर चलाने की गति तेज़ थी, जल्दी काम खत्म करने की चाह में उनके नीचे आकर आर्यन जाधव की मृत्यु हो गई। चालक पळकर चला गया. निर्माण विभाग ने सड़क यातायात के लिए बिना सड़क बंद किए डामरीकरण शुरू किया; सार्वजनिक निर्माण विभाग ने सड़क यातायात के लिए पूर्णत: बंद करना, सूचना बोर्ड लगाना, बाधाएं उठाना सुरक्षा उपाय करना आदि उपया नहीं किए. आर्यन जाधव के निधन के बाद भी संबंधित वहाँ अधिकारी और ठेकेदार के सुपरवायजर मौके पर नहीं पहुँचे; प्रशासनिक अव्यवस्था के कारण मजदूरों वाले एक दंपति को अपने बच्चे की मौत झेलनी पड़ी.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 23, 2026 12:00:58
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता अद्यापही अनेक महिलांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी आज सलग तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही हप्ता मिळालेला नसल्याची तक्रार करत महिलांनी महिला व बालविकास अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. “निवडणुकीपूर्वी आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी होतो आता नाही का? निवडणुकीपूर्वी नियमित लाभ मिळत होता, मात्र निवडणुका संपल्यानंतर आम्हाला वाऱ्यावर सोडण्यात आले का?”असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला.लाडकी बहीण या योजनेचे नोव्हेंबर व डिसेंबर चे थकीत हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत,अशी ठाम आणि जोरदार मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. बाईट: रुक्मिणी दोतोंडे,लाडकी बहिणी योजना लाभार्थी बाईट:मनीषा राऊत,लाडकी बहिणी योजना लाभार्थी बाईट:आरती जाधव,लाडकी बहिणी योजना लाभार्थी
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 23, 2026 11:49:50
Shirur, Maharashtra:पुणे लोणीकंद येथे एस.टी. बसवर अ‍हल्ला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पुणे लोणीकंद येथे भररस्त्यात एस.टी. बस अडवून तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर कट मारल्याच्या रागातून MH-12 SX-4491 या टेम्पो वरील चालक आनंद विनोद पवार (वय १९, रा. लोणीकंद) याने एस.टी. बसला टेम्पो आडवा लावून बस अडवली. त्यानंतर एस.टी. बसच्या उजव्या बाजूचा आरसा हाताने तोडला. एवढ्यावर न थांबता टेम्पोमधून लोखंडी पाईप काढून बसच्या समोरील काचेवर मारून काच फोडली. तसेच रस्त्याच्या कडेला असलेला दगड उचलून काचेवर मारून ती पूर्णपणे फोडण्यात आली. या घटनेत तक्रारदाराच्या हातातील मोबाईलही फोडण्यात आला असून एस.टी. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत
0
comment0
Report
Advertisement
Back to top