Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

कोपरगांव में प्लॉट पैसे के विवाद पर युवक की हत्या, चार आरोपी गिरफ्तार

KJKunal Jamdade
Dec 11, 2025 07:16:04
Shirdi, Maharashtra
Kopargaon News Flash प्लॉटच्या पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या.. कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील धक्कादायक घटना... डाऊच खुर्द शिवारात प्लॉटच्या व्यवहारातील उसने पैसे मागितल्यावरून वाद चिघळला आणि ३५ वर्षीय असलम शहाबुद्दीन सय्यद याची मध्यरात्रीच्या सुमारास चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या... ४ आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल... मुनीर उर्फ मुन्ना शेख, परविन शेख, फिरोज शेख, साहिल शेख या चार आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात... भांडण सोडवायला गेलेल्या साक्षीदारांसह मयताच्या पत्नीवरही हल्ला... तरुणाला जखमी अवस्थेत शिर्डी सुपर हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेनं एकच खळबळ....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Dec 11, 2025 08:32:59
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 11, 2025 08:24:40
Chendhare, Alibag, Maharashtra:दक्षिण रायगड मध्ये शिवसेना आक्रमक.... महाड, पोलादपूरमधील शिवसैनिक संतप्त ...... चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शने.... चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन... अँकर - मंत्री भरत गोगावले यांचा कथित व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद दक्षिण रायगडमध्ये उमटले आहेत. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी गोगावले यांचा कथित व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे इथले शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूरमधील शिवसैनिकांनी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. विरोधक रडीचा डाव खेळत असून त्यांनी या सर्व प्रकाराची माफी मागावी अन्यथा अब्रु नुकसानीच्या कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 11, 2025 08:22:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेतील संजय शिरसाठ आणि राजेंद्र जंजाळ वादावर अखेर पडदा पडला असल्याचं कळतंय, राजेंद्र जंजाळ यांच्या साथ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूरात बैठक झाली या बैठकीत राजेंद्र जंजाळ यांनी संभाजीनगर शहरातील कार्यकर्त्यांच्या भावना एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकल्यााची सूत्रांची माहिती आहे, या बैठकीनंतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका कामावर लक्ष केंद्रित करा असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याचं कळतंय, आगामी महापालिका निवडणुका पक्षांसाठी महत्त्वाच्या आहे त्यामुळे कुठल्याही फुटीचा पक्षावर परिणाम होऊ नये असे सांगत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला, महत्त्वाचा म्हणजे संजय शिरसाठ यांनी शहर स्तरावर अनेक कमिट्या बनवल्या होत्या मात्र त्या कमिट्यांच्या वर एकनाथ शिंदे यांनी शहरातील आमदार खासदार आणि जिल्हाप्रमुख यांची एक कमिटी बनवली ही कमिटी सर्वाधिकार असलेली असेल या कमिटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाठ यांची एकाधिकारशाही मोडून काढल्याची ही चर्चा आहे मात्र या निमित्ताने अखेर शिवसेनेतील वाद संपुष्टात आला असे म्हणता येईल.. लवकरच नव्याने स्थापन केलेली कमिटी महापालिका इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरुवात करेल येत्या दोन ते तीन दिवसात इच्छुकांच्या मुलाखती ही सुरुवात होणार असल्याची माहिती मिळतेय...महत्वाचे म्हणजे या बैठकीत जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाठ आजूबाजूला बसल्याचे चित्र दिसले....
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 11, 2025 08:22:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - शिरळयाचे शिवरवाडी मध्ये बिबट्याचा एकावर हल्ला,घरात शिरलेल्या बिबट्याला दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर केलं जेरबंद. अँकर - सांगलीच्या शिरळा तालुक्यातील शिवरवाडी मध्ये एका बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.यामुळे गावामध्ये बिबट्या आल्याच्या बातमी कळताचं खळबळ उडाली. गावातील नात बेंद्रे या व्यक्तीवर या बिबट्याने आणला गेला होता बेंद्रे हे आपल्या बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये साहित्य आणण्यासाठी गेले असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला,त्यानंतर प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी घरात शिरलेल्या बिबट्याला पत्र लावून घर बंद केलं, यानंतर वन विभाग व सह्याद्री वॉरीयर रेस्क्यू टीमने दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केले आहे,मात्र बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 11, 2025 06:51:08
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 11, 2025 06:47:03
Nagpur, Maharashtra:नागपुर में शीतकालीन सत्र के दौरान विभिन्न संघटनाओं के मोर्चे विधानसभावर आकर धड़कते हैं। आयटक के नेतृत्व में आशा वर्कर, आंगनवाड़ी सेविका, ग्रामसेवक, अंशकालीन स्त्री परिचर कृती समिति और अन्य संघटनाओं के मोर्चेबाज, आंदोलनकारी महिलाएं रातभर सड़कों पर आंदोलन कर रहीं थीं। नागपुर में तापमान 9 डिग्री से कम हो चुका है। कल दोपहर से निकलकर ये मोर्चेबाज़ मांगें पूरी होने तक आंदोलन स्थल से नहीं हटने की बातें कर रहे हैं... ठंड से कांपते हुए रातभर सड़क पर ही ठहरकर अपना आंदोलन बनाए रखा है... सरकार की सुध नहीं लेने तक पीछे नहीं हटेंगे—यह उनकी भूमिका है। बाईट: आंदोलकांसोबत चौपाल केलाय
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 11, 2025 05:32:30
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांची दहशत पसरली असून दिवसाही शेतात काम करणं जिकриचं झालं आहे.. बिबट्यांचे वाढते हल्ले आणी वनविभागाकडे संसाधनांची कमतरता यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात.. पिंजऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे बिबट्या पकडण्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा वनविभागाला नविन दोनशे पिंजरे देण्यात आले आहेत त्यामुळे काहीसा दिलासा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाला असला तरी संसाधनांची आणी कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या यामुळे अनेकदा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.. त्यामुळे वनमंत्रीयांनी संसाधनांसह कर्मचाऱ्यांच्या अपू-या संख्येचे निरसन करणं गरजेचं आहे.. अहिल्यानगर जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या पिंजऱ्याजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी..
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 11, 2025 05:18:59
Satara, Maharashtra:सातारा: माण तालुक्यातील लोधवडे गावाजवळील पवार वस्ती परिसरात रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात जोरदार धडकेत पळशी येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिनंदन देवकुळे आणि सुनील देवकुळे अशी दोन मृतांची नावे आहेत. दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोराची धडक दिल्यामुळे दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाले यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मृत युवक हे पळशी गावातील असल्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 11, 2025 05:06:12
Washim, Maharashtra:राज्य परिवहन विभागाने२०१९पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) अनिवार्य केली आहे.यासाठी३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून,त्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एचएसआरपीसाठी २५ केंद्रे कार्यरत असूनही अनेक वाहनधारकांनी नोंदणीसाठी पुढाकार घेतलेला नाही. जिल्ह्यातील१,१२,१३४ पैकी फक्त ४१,५५१ वाहनांनी नोंदणी केली असून २५,१५५ वाहनांवर एचएसआरपी बसविण्यात आली आहे.अजूनही ७०,५८३ वाहनांची नोंदणी प्रलंबित आहे.परिवहन विभागाने वाहनधारकांना ३१डिसेंबरपूर्वी HSRP बसविणे बन्धनकारक असल्याची सूचना देत विलंब केल्यास नवीन वर्षात दंडात्मक कारवाई होणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top