Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601
मुंब्रा में पानी संकट: आमदार आव्हाड का जल आंदोलन बवाल मचा गया
SKShubham Koli
Sept 24, 2025 13:04:03
Thane, Maharashtra
Thane flash कळवा– मुंब्रा येथील पाणीपुरवठ्याच्या विरोधात स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पाणी पुरवठा कार्यालयात ठिय्या.. अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड पाहत आहेत अधिकाऱ्यांची वाट. मुंब्रा येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्थानिक नागरिक हजर.. काही वेळापूर्वी भाजपचे आमदार आणि स्थानिक नागरिकांसोबत कळवा प्रभाग समितीचे बाहेर हंडा मोर्चा करण्यात आला... *आमदार जितेंद्र आव्हाड byte pointer* *ऑन पाणी प्रश्न* कळवा, मुंब्र्यात पाण्याची बोबाबोंब, गेली अनेक दिवस पाण्याची टिपूसही नाही स्थानिक नागरिकांचा महापालिकेत शिरकाव स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील आक्रमक दासऱ्यापर्यंत पाणी आले नाही तर ठाणे महापालिकेत रावणाचे दहन करू आव्हाड यांनी दिला पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा *ऑन धाराशिव, मराठवाडा* पूर येऊन चार दिवस झाले... तुम्ही मुंबईत फिरतायत... जागच्या जागी जायला पाहिजे ना सरकार कशासाठी आहे. ठाण्यामध्ये सरकारमधल्या असलेली लोक मोर्चा काढत आहे. कशाला नाटकं करता... सरकार तुमचा आहे ना मुख्यमंत्र्यांना सांगा ना... ठाण्याच्या पाणी संदर्भात एक बैठक बोलवा ताबडतोब तुम्ही मूर्ख समजता का लोकांना.. जी मेट्रो 29 – 27 पर्यंत सुरू होणार नाही त्याची ट्रायल रन वर तुम्ही नाटकं करतात.. निवडणूक आले की तुम्ही नाटकं करतात... तुम्ही एक नारळ घ्या आणि कुठेतरी सांगा इथे धरण बांधणार आहोत. आणि फोडून टाका तिथे नारळ.. *ऑन सदा सरवणकर निधी* ते नशीबवान आहेत. नगरसेवकांना पाच कोटी मिळतात. सदा सरवणकर हे आमदार होते. नगरसेवकांचे मी काहींचे प्रस्ताव बघितले आहे.त्यांना 40 कोटी मिळतात. कोणाला 90 कोटी रुपये पाहिजे... तेही नगरसेवकांना आम्ही आमदार भीखा मागतोय भीखा... आम्हाला आमचं घर बांधायचं नाही. लोकांसाठीच मागत असतो. यांच्याकडे 5000 चा वॉल घेण्यासाठी पैसे नाहीत. स्मार्ट सिटी चा नावाखाली रस्ते चे खोटी बिल काढून बारा – बारा हजार रुपयाचे कोटी रुपये बिल काढून ते रस्ते बनवले आहेत. कम्पलेट आले आहे. आमच्याकडे देखील. *ऑन टेलिव्हिजन इमारती* याच्यावर बंदी आली पाहिजे... मी हाय कोर्टात जाणार आहे. तुम्ही जर पाणी देऊ शकत नाही. ट्राफिक तीन तीन तासापासून तुम्ही हलू शकत नाही. तुम्ही नवीन इमारतीच्या ओसी बंद करा... सीसी बंद करा परमिशन बंद करा.. *ऑन पाणी ,क्लस्टर* जोपर्यंत ठाण्यातली पाणी व्यवस्था सुधरत नाही. तोपर्यंत लोकांना आणतात कशाला. त्याच्यात क्लस्टरची नाटकं... क्लस्टर करा...क्लस्टर करा... क्लस्टर करा... यांचा एक बिल्डर आणणार त्यांना एक 60 एकर जमीन देणार आणि त्याच्याकडून करोडो रुपये.. क्लस्टरच्या एक सर्वेसाठी किती रुपये लागतात... या क्लस्टरच्या सर्वे करणाऱ्या काम जातं कुठल्या एजन्सीला फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचा खैर आहे क्लस्टर होणार काहीच नाही. *ऑन धाराशिव मदत दाढी फोटो संजय राऊत* आठ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे.. या पैशाने शेतकऱ्यांचा काय होणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांची मस्करी करतात का ? तुम्ही टीव्हीवर बघितलं उभी पिकं शेतकऱ्यांची झोपली अर्धी ते वाहून गेली.. तुम्ही शेतकऱ्यांची टिंगल मस्करी करतात....मंत्रालयात बसून आज तुम्हाला वेळ मिळतोय पिक बघायला जायला... कसाही असो ओमराजे निंबाळकर पाण्यामध्ये पोहोत पोहोच लोकांना मदत करत होता. कौतुक करायला पाहिजे अशा धाडसी खासदारांचं यांना काही दिसत नाही ओला दुष्काळ काही.... त्यांना मंत्रालयात सगळं सुख सुख दिसतं. आता गावागावात आता ओलं आहे. ते त्यांना कळतच नाही. *ऑन शरद पवार दौरा पूर परिस्थिती* शरद पवार साहेब यांची तुलना होऊ शकत नाही... पवार साहेबांची कुठे तुम्ही तुलना करता... हेलिकॉप्टर कुठेतरी चुकून भरकटलं आणि ते चार दिवस त्याच ठिकाणी राहिले. तिथे गारपीट झाली त्यामुळे तिथे हेलिकॉप्टर तिथे गारपीट झाली त्यासाठी ते तिथे गेले नव्हते. ते कुठेतरी दूर चालले होते. आणि त्यांनी वर्ण गारपीट बघितल्यानंतर ते तिथे चार दिवस त्याच ठिकाणी एरियात राहून संपूर्ण पाहणी केली... ते पवार साहेब आहेत हो... *ऑन दाढी फोटो संजय राऊत* कोणाचेही फोटो लावा आणि तुम्ही मदत करा... फोटो कोणाच्याही लावा आम्हाला काय करायचं गोरगरीब लोकांची टिंगल तुम्ही करू नका.... आठ हजार रुपये हेक्टरी *ऑन कुंभमेळावा* कुंभ मेळावाला 14000 कोटी रुपये आणि गोरगरिबांसाठी दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी शेतकरी तुमचा कामाचाच नाही.... *ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठाउपनगर अभियंता ,विनोद पवार byte pointer* *ऑन कळवा, मुंब्रा, दिवा पाणीपुरवठा आंदोलन* कळवा ,मुंब्रा ,दिव्यामध्ये मुख्यता एमआयडीसी कडून पाणीपुरवठा होतो. मध्यंतरांच्या काळामध्ये एमआयडीसी काढून पाणीपुरवठा मध्ये ब्रेक डाऊन झाल्यामुळे १८–१९ तारखेला 24 तासाचा शट डाऊन झाला. त्यानंतर ते 36 तास चालला... आमदार जितेंद्र आव्हाड जे काही तक्रारी दिल्या होत्या त्यात करायचं निवारण करण्यासाठी काही काम हाती घेतली होती. त्या काम करण्यासाठी वेळ झाला त्यामुळे मुंब्रा मधल्या पाणीपुरवठा डिस्टर्ब झाला होता. आता रविवारपासून पाणीपुरवठाची परिस्थिती पूर्वपदवर आली आहे. कळव्यामध्ये सुद्धा आम्ही बॉल च काम केलेले आहेत. कळव्यामध्ये जलवाहिनी जे जिर्ण झाल्या होत्या त्यासाठी शासनाच्या प्रस्ताव मध्ये हे सगळे काम देखील पूर्ण होतील. कळवातील छत्रपती शिवाजी महाराज येथे पाण्याची टाकी आहे.जलकुंभ याचं बांधकाम पूर्ण झाले असून तिथे एक लाईन टाकतायची आहे. पावसामुळे ती लाईन टाकता येत नाही. आधुनिक पद्धतीने काम करून. *नवरात्र नंतर हे काम करून कळव्यातील लोकांचं पाणीपुरवठाची समस्या च निवारण होईल.* शट डाऊन मुळे ही कळवा –मुंब्रा मधील परिस्थिती उद्भवली आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. मुंब्रा मधील उंच भागात जे राहतात त्यांची समस्या देखील येतात काही दिवसात दूर होईल. मुंब्रा मध्ये एक पंप आहे सुमनताई नावाचा त्या पंपाचं देखील आज ट्रायल रन होईल... मुसळधार पाऊस असल्याने जे काही आपल्याला विविध संस्थांकडून जे काही पाणीपुरवठा आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाणीपुरवठा देता येणार नाही. ठाण्यात सगळ्या ठिकाणी पाणी देण्याच्या प्रयत्न करतोय... दर पंधरा दिवसातून आम्ही ज्या ज्या ठिकाणी लिकेज होत आहे त्या ठिकाणी आम्ही लिकेज शोधण्याचा प्रयत्न करतोय... अशाप्रकारे ठाणे महानगरपालिका नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे... अनावश्यक पाण्याचा वापर टाळला पाहिजे. पाण्याची देखील बचत केली पाहिजे. कळवा –मुंब्रा –दिवा मिळून १३५ एमेले लिटर एमआयडीसी कडून पाणीपुरवठा होत आहे. कॉन्ट्रॅक्टरची कुठलीही बिलं थकली गेलेली नाही. त्यामुळे कुठलेही पाणीपुरवठा कमी करण्यात आलेला नाही. हे शट डाऊन झाल्यामुळे हे काही तक्रारी आलेले आहेत. ठाणे महानगरपालिका बिल थकवत नाही कुठल्याही संस्थेचे आणि पाणीपुरवठा कमी केलेला नाही.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Sept 24, 2025 17:22:59
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 24, 2025 17:22:45
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गणेशोत्सव आणि नवरात्राचे वाटोळ करून टाकलाय - हिंदू समाजाने खेळणं म्हणजे हांडगेपणा,बुळगेपणा आणि नपुंसकत्वपणा - संभाजी भिडे. अँकर - गणेशोत्सव आणि नवरात्रीचे वाटोळ करून टाकलंय,दांडिया हा बेकार असून हिंदू समाजाने नवरात्रीमध्ये दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा,बुळगेपणा आणि नपुंसकत्वपणा निर्माण करणारे असल्याचे विधान शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे, छत्रपती शिवाजी त्यांनी शपथ घेतलेला दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता,असे देखील भिडे गुरुजी म्हणाले,ते सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित दुर्गामाता दौड प्रसंगी बोलत होते. साउंड बाईट - संभाजी भिडे गुरुजी - संस्थापक अध्यक्ष शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 24, 2025 17:01:13
2
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 24, 2025 17:00:36
Mumbai, Maharashtra:अँकर -- नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने फक्त मुंबईचे किंवा महाराष्ट्रात नाही तर देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे याच नवरात्र मध्ये नवरात्र मध्ये रामलीला सुद्धा अजित केल्या जात असते मालाड मध्ये गेल्या 44 वर्षांपासून रामलीला प्रचार समिती रामलीला महोत्सव साजरा करत असतात. गेल्या 44 वर्षापासून उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील राम मानस मंच ही रामलीला मुंबईत मालाड मध्ये सादर करीत असतात फक्त मालाडच नाही तर गोरेगाव अंधेरी येथील नागरिक याला प्रतिसाद देतात.ही राम लीला सादर करणारे उद्योग पती राजेश रस्तोगी आहेत.ते स्वतः यात विविध भूमिका सादर करतात.परंपरागत राम लीला यासह आधुनिक तंत्रज्ञाना यात वापरले जाते. Byte -- रमण जी जिंदाल,आयोजक मराठी byte  Byte -- हनुमान गडोदिया खजिनदार हिंदी byte  मनोज कुळकर्णी  Feed send TVU ४३ Slug -- Malad Raamleela 
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 24, 2025 16:46:49
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोड नंतर पोलीस दलाकडून शहरातील चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात संशयतांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील एकही आरोपी शहराबाहेर जाणार नाही यासाठी पोलीस दल तैनात झालं आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्या लोकांचे मोबाईल तपासून तोडफोडीचे व्हिडिओ आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. या दगडफेकीच्या घटनेनंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलासोबतच शेजारील असलेल्या धुळे जळगाव आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस दल मागविण्यात आले आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. एका आदिवासी तरुणाच्या कोणाच्या घटनेनंतर शहरात मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला येऊ शकला मिळाल्या त्यात अनेक गाड्यांचे तोडफोड करण्यात आली आहे. हिंसक जवाच्या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. शांतता प्रिय आदिवासी समाजाच्या प्रतिमेला या हिंसक आंदोलनामुळे तळा गेला आहे. बाईट श्रावण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 24, 2025 16:31:29
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- शेवगाव अतिवृष्टी केस स्टडी फीड 2C Anc- अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे जिल्ह्यातील 755 गावातील 3 लाख 23 हजार शेतकरी या अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून 2 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अनेक कुटुंबावर आभाळ कोसळला आहे सर्वात जास्त हानी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात झाली आहे शेवगाव तालुक्यातील वरुड गावात सबंध गावात पाणी शिरल्याने घरातही काही राहिलं नाही आणि शेतातही काही राहिलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व्हीओ:- हे आहे शेवगाव तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार लोक वस्ती असलेलं वरुड गाव गावात सतत दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतात कमरे एवढं तर घरात गुडघ्या एवढं पाणी साचलं होतं कालपासून पावसाने उघडीप दिली आहे घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान अजूनही पाहायला मिळत आहे पाऊस उघडला असला तरी ग्रामस्थ शेतकरी अतिवृष्टीच्या या धक्क्यातून सावरले नाहीत बाईट:- आसराबाई खराडे, महिला, वरूर व्हीओ:- गावाच्या परिसरात असलेली आठ ते दहा हजार हेक्टर शेती आणि शेतीतील पीक या मुसळधार पावसामुळे पूर्णतः नष्ट झाले आहेत पाऊस उघडून पूर्ण एक दिवस उलटून गेला आहे तरी शेतामध्ये अडीच फुटापर्यंत पाणी आहे या भागातील ऊस कापूस कांदा तुर सोयाबीन हे पीक पूर्ण पणे नष्ट झाला आहे अगदी हातात तोंडाशी आलेला घास फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे 121:- गणेश वावरे,शेतकरी, वरूर व्हीओ:- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या भागाचा दौरा केला आहे ज्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्या भागातील सरसकट पंचनामे करून दिवाळीच्या आधी मदत देणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितला आहे बाईट:- दत्तात्रय भरणे,कृषिमंत्री एफ व्हीओ:- जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे लाखो रुपयांचं हातात तोंडाशी आलेलं पीक उध्वस्त झाल आहे घर उध्वस्त झाले शेती उध्वस्त झाली आहे अशात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदत सर्व नुकसान भरून काढू शकत नाही मात्र मिळणाऱ्या मदतीची रक्कम तरी वेळेत मिळते का हेच पाहणं महत्त्वाचं आहे लैलेश बारगजे झी 24 तास अहिल्यानगर
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 24, 2025 15:30:28
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2409ZT_GAD_REMEDY_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:--रानटी हत्तींच्या त्रासावर ट्रॅक्विलाइज उपाययोजनेची चाचपणी, कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील,  गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची माहिती अँकर:--गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील असून हत्तींच्या हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना tranquilise करून वळविण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत देहरादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती  गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली आहे. जयस्वाल यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, पिपरटोला-धुडेशिवणी, दिभणा या गावांतील हत्तींमुळे झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली गेली. चुरचुरा येथील १० सप्टेंबर रोजीच्या हत्ती हल्ल्यात मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना जयस्वाल यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांना एकूण २५ लाख रुपयांची मदत जाहीर असून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. बाईट १) एड. आशीष जयस्वाल, सहपालकमंत्री, गडचिरोली आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 24, 2025 14:49:16
Kolhapur, Maharashtra:तिसऱ्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे श्रीतारा स्वरुपात सजले रुप Anc :- करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात आज तिसऱ्या माळेला देवी दशमहाविद्यांपैकी श्रीतारा रूपात सजली आहे. दारिद्र्य, नैराश्य आणि संकटांचा नाश करून भक्तांना संसारसागरातून तारून नेणारी दिव्य शक्ती म्हणून श्री तारा रूपाची पूजा केली जाते. श्री तारा ही नीलसरस्वती म्हणूनही परिचित असून पूजेमध्ये हातात खड्ग, नीलकमळ, कात्री आणि खप्पर धारण केलेले तिचे स्वरूप दाखवण्यात आले होते. समुद्रमंथनात भगवान शंकरांचे रक्षण, रावणवधासाठी प्रभू रामांना सहाय्य आणि भक्तांना संकटातून मुक्त करणारे तिचे अनेक पुराणप्रसंग मानले जातात. आजची पूजा श्रीपूजक रामप्रसाद ठाणेकर, सचिन ठाणेकर, अमित देशपांडे आणि निखिल शानभाग यांनी बांधली. भाविकांच्या कल्याणासाठी आई अंबाबाईचे हे तारारूप दर्शन अविस्मरणीय ठरले.
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 24, 2025 14:49:03
3
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 24, 2025 14:33:29
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- शंभुराज देसाई अतिवृष्टी दौरा फीड 2C ANC- मी देवदर्शनासाठी आलेलो नाही, मला देवाधिकांचा किती आशीर्वाद आहे याची चिंता रोहित पवारांना करण्याची गरज नाही...मी राज्याचा मंत्री आहे आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संपूर्ण राज्यभर फिरण्याचे आदेश दिलेत असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय... पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे आज कर्जत तालुक्यात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते...मात्र त्यांच्या या दौऱ्याबाबत रोहित पवारांनी एक्स पोस्ट केली ज्यात त्यांनी देसाई यांना उपरोधिक टोला लगावला होता मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचा आज दीड तासाचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा आहे... या पार्श्वभूमीवर देसाई साहेब कामात काम आणि हरिनामाचाही योग साधण्याची संधी आहे...माझ्या मतदारसंघातील देवस्थानात जाऊन दर्शन घ्या! असं रोहित पवारांनी म्हंटल होत...यावर शंभूराज देसाई यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे...तुमच्या सरकारच्या काळात कसे अतिवृष्टीच्या काळात कसे रेडकार्पेट दौरे झाले त्यावर आम्हाला बोलायला लावू नका असा इशाराच शंभूराज देसाई यांनी दिलाय. बाईट- शंभूराज देसाई, मंत्री शिवसेना शिंदे गट Anc- राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी दौरा केला...यावेळी त्यांनी नुकसान बाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं म्हंटलय...महायुतीच सर्व मंत्रिमंडळ आज आणि उद्या फिल्डवर आहे एकही मंत्री मुंबईत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये एकही शेतकरी वंचित राहणार नाही असं देसाई म्हणाले. बाईट:- शंभूराज देसाई, मंत्री शिवसेना शिंदे गट
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 24, 2025 14:33:10
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2409ZT_CHP_UREA_STOCK ( single file sent on 2C)   टायटल - चंद्रपूरात युरिया खत उपलब्ध, ७००० मेट्रिक टन खताचे आवंटन, शेतकऱ्यांना दिलासा,आज रेल्वे स्टेशनवर उतरले ४३३० मेट्रिक टन युरिया खत, खत पुरवठ्यात कुठलाही विलंब सहन केला जाणार नाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम निर्देश अँकर :- चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या युरिया खताच्या टंचाईवर अखेर उपाययोजना करण्यात आली आहे. आज चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर आलेल्या युरिया खताच्या आगमनावेळी पाहणी करण्यात आली. जिल्ह्यासाठी तब्बल ७००० मेट्रिक टन खताचे आवंटन निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी ४३३० मेट्रिक टन युरिया खत आजपर्यंत उतरले आहे. महाराष्ट्राच्या जीएसडीपीमध्ये चंद्रपूरचे योगदान महत्त्वाचे असल्याने, खत पुरवठा हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, यात कुठलाही विलंब किंवा सबब चालणार नाही असे स्पष्ट निर्देश कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी ठामपणे उभा आहे, असा विश्वासही यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बाईट १) सुधीर मुनगंटीवार , आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 24, 2025 14:22:20
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील अतिवृष्टी दौरा फीड 2C राधाकृष्ण विखे ऑन अतिवृष्टी दौरा Anc:- अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्रच जोरदार पावसाने हजेरी लावली. तर अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटी सदस्य पाऊस पडल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी एकत्रित पाहणी केली आहे. यावेळी सर्वांनाच दिलासा देण्याचे काम होईल असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या देखील त्यांनी यावेळी जाणून घेतले आहे. या संपूर्ण नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकार गंभीर असल्याचं विकी यांनी म्हटलं आहे. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी यात वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. बाईट :-राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे ऑन गुणरत्न सदावर्ते Anc देवीच्या कृपेने मराठा आरक्षणाचा जीआर लवकरच निघेल असं वक्तव्य विखे पाटलांनी केलं होतं. यावर विधीतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी रेणुका मातेचे दर्शनावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर मंत्री विखेंनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. सदावर्ते यांना अजून बराच अभ्यास करायचा असून त्यांनी बोलताना तारतम्य ठेवावे अशी समज विखे पाटलांनी गुणरत्न सदावर्ते यांना दिले आहे. तर त्यांना देवी पावत नाही यावर माझा दोष काय असं मिश्कील वक्तव्य देखील विखे पाटलांनी केला आहे. बाईट :-राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे ऑन संजय राऊत Anc: राज्यामध्ये दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता ठेवला नाही, यामागे मोदी-शहा आणि या सरकारचा लोकशाहीच्या विरोधात कट असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता, यावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे बोललेच पाहिजे जर ते संपादक म्हणून बोलले नाही तर त्यांना धोका होऊ शकतो असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे. बाईट :-राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 24, 2025 14:21:20
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील दगडपारवा येथे आयोजित बंजारा संवाद मेळाव्यात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बंजारा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.आरक्षण कृती समितीची बैठक घेऊन त्यामधून मार्ग काढावा अशी विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचं संजय राठोड म्हणाले.तसेच बंजारा समाजाचे म्हणणे त्यांनी ऐकून घ्यावे, अशीही विनंती केली जाईल. याशिवाय बंजारा कृती समितीच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली जाईल असल्याचेही ते बोलले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, "संपूर्ण बंजारा समाज एकाच श्रेणीत यावा अशी मागणी मी यापूर्वी केली आहे आणि आजही त्याच मागणीवर आम्ही ठाम आहोत." दरम्यान, नंदुरबारमध्ये झालेल्या आदिवासी बांधवांच्या तोडफोडीवर भाष्य करताना राठोड यांनी आवाहन केले की, "आदिवासी बांधवांनी संयम बाळगावा, कोणतीही तोडफोड किंवा विरोधी काम करू नये. त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही."समाज माध्यमांवर अतिवृष्टीग्रस्त भागांना न भेटता स्वागत स्वीकारल्याच्या टीकेवर उत्तर देताना राठोड म्हणाले की, "मी राजकीय कामासोबत सामाजिक कामही करत आहे." तसेच अतिवृष्टीग्रस्त भागात ग्रामस्थांनी शासनाकडून मिळालेल्या किट परत केल्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, ही चूक शासनाकडून नाही, तर एखाद्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्याकडून झाली असावी.बंजारा समाजाच्या मागण्यांवर उपाययोजना करण्यासाठी राठोड यांनी ठोस भूमिका घेतल्याने पुढील काळात या प्रश्नाला वेग येण्याची शक्यता आहे. Byte : संजय राठोड , मृद व जलसंधारण मंत्री.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 24, 2025 14:19:04
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर, गावात पूर आल्याचे सांगताना चिमुकल्या मुलीला सुद्धा आपले अश्रू अनावर ( WKT ) - सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर - जिल्ह्यातील अनेक गावं अक्षरशः पाण्याखाली - अनेक ग्रामस्थांना गावाबाहेरील शाळेचा निवारासाठी करावा लागतोय उपयोग - गावात पूर आल्याने महिला भगिनींनी शाळेतच मांडली चूल - गावात पूर आल्याचे सांगताना चिमुकल्या मुलीला सुद्धा आपले अश्रू अनावर याच सर्व परिस्थितीचा उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top