Back
मुंबई रेलवे हादसा मामले में बुधवार को संभावित निर्णय; अदालत में अहम साक्ष्य पेश
SKShubham Koli
Nov 11, 2025 13:23:38
Thane, Maharashtra
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात बुधवारी निर्णयाची शक्यता, न्यायालयात महत्त्वाचे पुरावे सादर
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणातील सुनावणीत आज अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा झाला. तपास अधिकारी शिरसाट यांनी न्यायालयासमोर सांगितले की, महापालिका अभियंत्यांनी सदर ट्रॅकचे काम करण्यास पत्र दिले होते आणि हा ट्रॅक १९७२ पासून अस्तित्वात आहे.
तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ट्रेन उशिरा आली होती हे नमूद केलेले नाही, तसेच रिपोर्ट तयार करणारे अधिकारी चौकशीसाठी हजर झाले नाहीत. पंचनाम्यात कोणतीही बॅग सापडली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यायाधीश जी. टी. पवार यांनी सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांना आणि बचाव पक्षाला अनेक प्रश्न विचारले. त्यांनी विचारले की, “घटना कशी घडली ते स्पष्ट सांगा,” तसेच “तुमच्या सोयीने माप घ्यायला हवं का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आरोपींचे वकील बलदेव राजपूत यांनी म्हटले की, “घटना अभियंत्यांच्या चुकीमुळे घडलीली नाही. अहवालानुसार पायदानावर उभे राहिल्यास ३० सें.मी. बॅग बाहेर येते, परंतु घटनास्थळी बॅग आढळली नाही.”
राजपूत यांनी पुढे सांगितले की, अपघातानंतरही त्याच पटरीवरून सुमारे २०० गाड्या गेल्या आणि कोणतीही अडचण आली नाही. त्यांनी न्यायालयात रेल्वे कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेजही सादर केला.
तपास अधिकारी शिरसाट यांनी सांगितले की, “ट्रॅकवर वेल्डिंग न केल्यामुळे रेल्वेला जर्क बसला आणि अपघात झाला.”
न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान घटना घडलेल्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आणि VJTI च्या अहवालाची प्रत सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, न्यायालयाने स्पष्ट केले की गर्दी नियंत्रणाचे काम महाराष्ट्र पोलिस नव्हे तर RPF (रेल्वे पोलिस दल) यांचे आहे.
या प्रकरणातील सर्व पुरावे आणि अहवाल बुधवारी न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असून, त्या दिवशी या अंतरिम जामीन अर्जावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 11, 2025 14:54:46Chendhare, Alibag, Maharashtra:खोपोली- कर्जत रेल्वे मार्ग पर ट्रेन ने बैल को टक्कर मारी. बैल मृत्युमुखी हो गया. यातायात कुछ समय के लिए बाधित रहा. मृत बैल को किनारे किया गया, उसके बाद यातायात सुचारू हो गया.
0
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 14:18:270
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 14:00:140
Report
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 11, 2025 13:10:510
Report
AKAMAR KANE
FollowNov 11, 2025 13:08:160
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 11, 2025 12:58:320
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 11, 2025 12:46:140
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 11, 2025 12:45:310
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 11, 2025 12:24:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 11, 2025 12:19:280
Report
SNSWATI NAIK
FollowNov 11, 2025 12:12:270
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 11, 2025 12:11:390
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 12:08:270
Report