Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201
खोपोली- कर्जत रेल्वे मार्ग पर ट्रेन ने बैल को टक्कर मारी: बैल की मौत, यातायात briefly बाधित फिर सामान्य
PPPRAFULLA PAWAR
Nov 11, 2025 14:54:46
Chendhare, Alibag, Maharashtra
खोपोली- कर्जत रेल्वे मार्ग पर ट्रेन ने बैल को टक्कर मारी. बैल मृत्युमुखी हो गया. यातायात कुछ समय के लिए बाधित रहा. मृत बैल को किनारे किया गया, उसके बाद यातायात सुचारू हो गया.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Nov 11, 2025 16:00:36
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाच्या प्रवर्तेपदावरून हटवल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले, “हकालपट्टी किंवा उचल बांगडी हे शब्दप्रयोग चुकीचे आहेत, कारण पक्षाकडून कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही. मी अजितदादा पवार यांचा कार्यकर्ता आहे आणि हेच माझ्यासाठी प्रवक्तेपदापेक्षा मोठं पद आहे.” तर मला प्रवक्तेपद गमावल्याचं दुःख नाही. भारतीय संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्याचा मी पूर्ण वापर करणार असल्याचंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकरी, सर्वसामान्य आणि राज्यहिताचे प्रश्न मांडत राहणार असून, “पक्षाची निष्ठा कायम ठेवत लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहीन,” असंही त्यांनी नमूद केलं.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 11, 2025 15:45:30
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 14:00:14
0
comment0
Report
Nov 11, 2025 13:34:56
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 11, 2025 13:23:38
Thane, Maharashtra:मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात बुधवारी निर्णयाची शक्यता, न्यायालयात महत्त्वाचे पुरावे सादर मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणातील सुनावणीत आज अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा झाला. तपास अधिकारी शिरसाट यांनी न्यायालयासमोर सांगितले की, महापालिका अभियंत्यांनी सदर ट्रॅकचे काम करण्यास पत्र दिले होते आणि हा ट्रॅक १९७२ पासून अस्तित्वात आहे. तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ट्रेन उशिरा आली होती हे नमूद केलेले नाही, तसेच रिपोर्ट तयार करणारे अधिकारी चौकशीसाठी हजर झाले नाहीत. पंचनाम्यात कोणतीही बॅग सापडली नसल्याचेही त्यांनी सांगितले. न्यायाधीश जी. टी. पवार यांनी सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांना आणि बचाव पक्षाला अनेक प्रश्न विचारले. त्यांनी विचारले की, “घटना कशी घडली ते स्पष्ट सांगा,” तसेच “तुमच्या सोयीने माप घ्यायला हवं का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आरोपींचे वकील बलदेव राजपूत यांनी म्हटले की, “घटना अभियंत्यांच्या चुकीमुळे घडलीली नाही. अहवालानुसार पायदानावर उभे राहिल्यास ३० सें.मी. बॅग बाहेर येते, परंतु घटनास्थळी बॅग आढळली नाही.” राजपूत यांनी पुढे सांगितले की, अपघातानंतरही त्याच पटरीवरून सुमारे २०० गाड्या गेल्या आणि कोणतीही अडचण आली नाही. त्यांनी न्यायालयात रेल्वे कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेजही सादर केला. तपास अधिकारी शिरसाट यांनी सांगितले की, “ट्रॅकवर वेल्डिंग न केल्यामुळे रेल्वेला जर्क बसला आणि अपघात झाला.” न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान घटना घडलेल्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आणि VJTI च्या अहवालाची प्रत सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, न्यायालयाने स्पष्ट केले की गर्दी नियंत्रणाचे काम महाराष्ट्र पोलिस नव्हे तर RPF (रेल्वे पोलिस दल) यांचे आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आणि अहवाल बुधवारी न्यायालयासमोर सादर करण्यात येणार असून, त्या दिवशी या अंतरिम जामीन अर्जावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे。
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 11, 2025 13:10:51
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत 115 जागांसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक यामध्ये स्त्रियांसाठी एकूण 58 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती साठी 5 जागा असून त्यातील महिला साठी 3, तर अनुसूचित जमाती साठी देखील 5 जागा आरक्षित असून यातील 3 जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गा साठी एकूण 31 जागा असून त्यातील स्त्रियांसाठी 16 जागा आरक्षित आहे, त्यांचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 74 जागा असून त्यातील 37 जागा महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीबाबत १७ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तर, १७ ते २४ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. त्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रभारी आयुक्त डॉ. हिंदूराणी जाखड यांनी सांगितले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 11, 2025 13:08:16
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झालय. महानगरपालिकेत 38 प्रवर्गातील विविध प्रवर्गातील एकूण 151 जागांपैकी 76 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. महानगरपालिकेत एकूण 151जागांपैकी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी 30जागा राखीव आहेत. त्यापैकी 15 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. अनुसूचित जमातीसाठी एकूण 12जागा राखीव आहेत. त्यापैकी 6 जागा महिलांना राखीव झाल्या. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 जागा राखीव आहेत. त्यापैकी 20 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. उर्वरित 69 सर्वसाधारण मतदारसंघातील जागांपैकी 36 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 11, 2025 12:58:32
Ambernath, Maharashtra:उल्लासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर! उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची आरक्षण सोडत आज पार पडली. या वेळी उल्हासनगरमधील इच्छुक उमेदवार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 20 प्रभाग असून, त्यामधून 78 नगरसेवक निवडून येणार आहेत. यापैकी दोन प्रभागात तीन नगरसेवक, तर उर्वरित प्रभागांत चार नगरसेवकांची निवड होणार आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत सर्व प्रभागांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले. या अंतर्गत – सर्वसाधारण जागा : 43 त्यापैकी 20 सर्वसाधारण महिला जागा मागासवर्गीय जागा : 21 त्यापैकी 11 महिला जागा अनुसूचित जाती जागा : 13 त्यापैकी 7 महिला जागा अनुसूचित जमाती : 1 जागा (महिला राखीव) अशा प्रकारे, आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत एकूण 78 नगरसेवकांची निवड होणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 11, 2025 12:46:14
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Nov 11, 2025 12:45:31
Thane, Maharashtra:भिवंडी महानगरपालिकेची अनाधिकृत बांधकामे धडक कारवाई... कासार अली रोडवरील कोमल पाडा येथे केली कारवाई.. भिवंडी महानगरपालिके कडून अनाधिकृत बांधकामांवर कारवाईच सत्र सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर विभाग समिती क्रमांक ५ अधिकारी सय्यद चिवणे, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे आणि त्यांच्या पथकाने आज कासार अली रोडवरील कोमल पाडा आणि घर क्रमांक ३५७ येथे बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध तोडफोड मोहिम राबवली. कडक सुरक्षेत महानगरपालिका प्रशासनाने हातोड्याने अनेक बेकायदेशीर बांधकामे पाडली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या सूत्रांनुसार, सध्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये अंदाजे ३६ इमारती आहेत ज्यांवर पुढील कारवाई प्रलंबित आहे. निरीक्षक हनुमान म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पथक पाडण्याच्या कारवाईदरम्यान उपस्थित होते. विभाग अधिकारी म्हणाले, "शहरातील बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची ही मोहीम आता वेगाने सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली जाईल."
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 11, 2025 12:24:34
Nanded, Maharashtra:रेल्वेमध्ये पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या एका युवकाचा खूण केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी नांदेडमध्ये घडली. उमरी ते धर्माबाद मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेमध्ये हा थरार घडला. या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत आतिश हायबते याचा एका प्रवश्याशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. समोरील व्यक्तीने आतिषच्या पोटात चाकू खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या आतिषचा मृत्यू झाला. खूण करणाऱ्या आरोपीचा प्रवश्यानी व्हिडीओ केलाय. आरोपी खूण करून पसार झाला. रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केलीये.
0
comment0
Report
Advertisement
Back to top