Back
महाराष्ट्र में ओबीसी आरक्षण बचाने के लिए दसरा मेळावा गरम
JMJAVED MULANI
Oct 05, 2025 11:58:06
Baramati, Maharashtra
purandar, jejurI_
* ओबीसी नेते लक्ष्मण हाके भाषण पॉइंटर जेजुरी दसरा मेळावा *
आज मंचावर अनेक समाजातील लोक आहेत.
हा जगन्नाथ जोरात आहे, हा रथ जो माणूस ओढल त्या दिवशी जे आडवे येथील ते चाकाखाली जातील जे दोन वाढतील ते पुण्यवान ठरतील
हा बहुजनांचा दसरा मेळावा होतोय, संख्या कमी आहे पण जबाबदार माणसं आहेत.
जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत आराध्य दैवत आहे.
आमच्या जेजुरीच्या खंडेरायाला सुद्धा शेकडो करोड रुपये आले पाहिजेत पण हे कधी शक्य तुम्ही जेव्हा राज्यसभेत असाल तेव्हा.
जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या नसानसात आहे.
महाराष्ट्रात तुमच्या आमच्या लाखांच्या जत्रा भरतात. बहुजनांची जत्रा जोपर्यंत शिवाजी पार्क वरती आझाद मैदानावरती भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कोणी मोजणार नाही
काल परवा मनोज जरांगे म्हणाला आम्ही मोजत नाही तुम्ही ज्या दिवशी आम्हाला मोजाल ना त्या दिवशी तुम्ही वाहून जाल
रयतेच्या राजाला शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटले गेले. त्या शब्दाचा आदर किती मोठा आहे. ज्या राजासाठी अठरापगड जातीच्या लोकांनी कुर्बानी दिली.
आता तो इतिहासाच्या पानावर तुम्हाला पाहायला मिळणार नाही.
बिरोबा खंडोबा म्हसोबा हे कोण आहेत ?
महाराष्ट्रातील लोकांना माझा सांगना हे आपला इतिहास खूप मोठा आहे.
जेजुरी मधील होळकरांच्या इस्टेट चिंचेचा बन कुठे आहे ?
नेहमी माझ्यावर आरोप केला जातो लक्ष्मण हाके पवार कुटुंबावर टीका करतो, होळकरांच्या संस्थांच्या सर्व जमिनी व वतनांच्या जमिनी फक्त शरद पवारांचे मानसपुत्र विजय路 कोलतेंच्या संस्थेने हडप केलेत
ज्या ज्या माणसाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं ज्यांची तळी तुम्ही आम्ही नेहमी उचलली त्या माणसाने तुमच्या जमिनी लाटल्या तुमचे हक्क लाटले त्या माणसाने तुमचं आज रोजी ओबीसीचा आरक्षण संपवलं
1993 ला आरक्षण मिळालं 2004 ला आरक्षण गेल, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून विधानसभेचा मंत्री पदाचा राजीनामा स्वर्गीय आनंदराव देवकाते यांनी दिला, एकदाचा मुख्यमंत्री होतोय तिथे सुशील कुमार शिंदे निवडून आले मग सुशील कुमार शिंदे यांची खासदारकीची जागा रिकामी झाली. चार महिन्य LOC विरोधात
एका जीआर वर अनेक कुणबींची सर्टिफिकेट काढली गेली.
काल परवा फडणवीस यांच्या सरकारने जो जीआर काढला तो जार अधिकृत कुणबीकरण द्वारे मराठा समाजाचे ओबीसीतील समावेशाचे पत्र आहे हा काळा कायदा काळा जीआर आहे
ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राज्यातील अठरापगड जाती ठामपणे उभ्या राहिल्या, फडणवीस यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे त्याच पक्षाच्या सत्तेमध्ये येऊन त्यांना एवढं लीन व्हावं लागलं लोटांगण काढावं लागलं की त्यांनी जीआर काढला, मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये आरक्षणाच्या समावेशाला एक प्रेम पत्र देवेंद्र फडणवीस यांच्यासहिने चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून आज रोजी ओबीसीचा आरक्षण संपल आहे
काहीजण म्हणतात कसं संपल आरक्षण ? आजही मिळतोय बंजारा ला मिळतोय याला मिळतोय मग त्यांनाही मला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनेक सरदारांनी जीवाची कुर्बानी दिली, ते सर्व क्षत्रिय होते, मग त्यांच्या वारसदारांना दाखला काढायचं म्हटलं तर हिंदू धनगर हिंदू नाभिक, हिंदू महादेव कोळी, जिथे आमची जात ची वेळ आली त्यावेळी तिथे हिंदूंच्या पुढे जात लिहायची. मग तुमची जात लिहायची वेळ आली की हिंदू मराठा....
ओबीसी म्हणजे मागासवर्ग....
मागास म्हणून आम्ही जर त्या जमातीत असो, जरांगे पाटील म्हणतो आम्ही मागास झालो आमची पोर रस्त्यावर आलो.
आमच्या संविधानाचं तत्व हे आहे आरक्षण हे गरिबी हटाव चा प्रोग्राम नाही आरक्षण हे प्रतिध्वसाठी दिल आहे.
भटक्या विमुक्तच पोरग बँकेत कर्ज मागायला गेले तर बँक तारण मागते, आड मेडी आणि बारा फूट हे तारण होतं.
आज पर्यंत गावाकडे आलुता बलुता महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानपरिषदेत गेला नाही.
आजही देशाच्या लोकसभेत धनगराचा एकही खासदार जाऊ शकला नाही.
राष्ट्रपती भवन हे होळकरांच्या जागेवर आहे.देशाची संसद वाट बघत आहे मल्हारराव होळकर यांचा एखादा वारस निवडून देशाच्या संसदेत कधी येतेय.
देवेंद्र फडणवीस मला एक सांगा जरांगे याचा सांगण्यावरून तुम्ही मराठ्यांना ओबीसीत सामील केलं एकही माईचा लाल तुम्ही त्यांना आमदार केलं तुम्ही त्यांना खासदार केलं मंत्रीपदावर पोहोचवलं. या सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही, फक्त भुजबळ साहेब बोलत आहेत
अजित पवार उगाच तुमचं मी नाव घेत नाही तुमच्याकडे तिजोरीच्या चावी आहेत तुम्ही महाज्योतीला पैसे देत नाहीत, मंगेश ससाने आम्ही गिरगावच्या समुद्रात उड्या टाकल्या तुम्ही आमचा ऐकलं नाही. आपल्या जातीच्या sर्डीच्या पोरांना मात्र त्यांच्या खात्यावर दहा लाख रुपये जमा केले, ओबीसीच्या पोरांनी चार-पाच आंदोलन केले समुद्रात उड्या मारल्या पण महा जातीवादी अजित पवारांनी ओबीसी पोरांच्या स्कॉलरशिपला पैसे दिले नाहीत
पुण्याच्या सिम्बॉसिस कॉलेज शेजारी अजित पवाराने सारथीची इमारत एखाद्या मोठ्याने स्टेटस शोभा केली, पण महाजोतेच्या इमारतीला 1000 स्क्वेअर फुट च ऑफिस सुद्धा अजित पवार याने दिलं नाही
हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी 20 महामंडळ जाहीर झाली. आज ही बलुतेदारांच्या महामंडळांना अध्यक्ष मिळाला नाही बजेट मिळायचं लांब
60 लाख करोड च्या आसपास महाराष्ट्राचं आजचं बजेट आहे. साठ टक्के लोकांच्या सामाजिक न्याय हक्काचे योजना साठी किती तरतूद पाहिजे. दरवर्षी फेब्रुवाऱ्या महिन्यात राज्यात बजेट सादर होतं त्या बजेटमध्ये 18 पगड जातीच्या नावावर ज्याने काम केलं त्याने एक टाक्याच्या पुढे तरतूद केली नाही. ते देखील आश्रम शाळेच्या अनुदानात आहेत.
मी जॉब पवारांवरती टीका केली, भूखंड माफिया कोण आहे सांगायची गरज नाही. रयत शिक्षण संस्था जा कर्मवीर भाऊराव पाटलांनी घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी काम केलं त्या संस्थेचा बायलॉग असा होता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असेल तो या संस्थेचा अध्यक्ष असेल असा होता तुमच्या बारामतीच्या पवाराने त्या बायलॉगमध्ये खडाखोर केली. तर त्याचे हयात अध्यक्ष कोण झाले शरद पवार.*
सांगा now... (फक्त भाषणाचा भाग आहे)
पवार पाटील देशमुख मंडळींनी मत मागायची वेळ आली की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र.
तुम्ही मायक्रो आणि मेजर आहात 50 60% तुम्ही आहात. बाबासाहेबांनी क्लास निर्माण केले जातीची संघटना निर्माण केली नाही.
सुप्रिया ताई सुळे उत्कृष्ट संसद पटू पण मी त्यांना निकृष्ट संसद पटू म्हणतो. शरद पवार साहेबांच्या घरात जन्माला आले आणि सोन्याचा चमचा घेऊन खासदार झाल्या आणि आमच्या येड्या गबाळ्यांनी मतदान केलं
सुप्रिया सुळेंनी आरक्षणाबद्दल अक्कल पाजळली, आदल्या दिवशी बोलल्या आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित दादा दुसऱ्या दिवशी बोलला, आरक्षण आर्थिक निकषावर द्यावं
मुख्यमंत्री महोदय आम्ही बहुजनाने तुम्हाला खूप मोठ्या जबाबदारANे तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलं, मुख्यमंत्री महोदय अजूनही आमचा तुमच्यावर विश्वास आहे. इथून पुढे हे वाक्य मी परत उच्चारणार नाही, जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून तुम्ही ओबीसींची मसलत बुडवली तुम्ही ओबीसींचा आरक्षण संपवलं
कुळातल्या एका माणसाचं सर्जिकल असलं तर आख्या कोणाला सर्फिकेट जायचं का.
काय चाललंय? आंधळ जळतोय आणि कुत्र पीठ खातय
मुख्यमंत्री महोदय एवढा जबाबदार बेसुमार घटनाविरोधी ओबीसीच आरक्षण संपवणारा जी जार तुम्ही काढाल असं भीषण अपेक्षित नव्हतं, आम्ही तुमच्या मागे आहोत याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आमचा आरक्षण संपवावं
उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होईल बघा. प्रत्येकाने कुणबी सर्टिफिकेट काढले आहे. उद्या येणारी निवडणूक मूळ ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी
कुणबी विरुद्ध बोगस कुणबी
आणि खरा ओबीसी चौथ्या पाचव्या क्रमांकाला राहणार. म्हणजे ओबीसीचा आरक्षण आज रोजी संपल आहे.
पश्चिम महाराष्ट्रात धनगर आणि माळी समाजाने जर फक्त ठरवलं गावातल्या बलुत्याला आलूत्याला खंडोबाच्या साक्षीने सांगतो छत्रपती राजेंच्या संकल्पनेतील महाराष्ट्रात तयार व्हायला वेळ लागणार नाही
दहा टक्के लोकसंख्येला जर सरकार एवढं घाबरत असेल तर तुम्ही 50 ते 60 टक्के आहात एसटी बांधव 20 टक्के आहेत, झाले किती 80 टक्के. 80 टक्के एकत्र झाल्यावर तुम्ही म्हणाल हे कसं शक्य ? पवार साहेब सुप्रिया ताई अजित दादा रोहित पवार सुनेत्रा वहिनी योगेंद्र पवार पार्थ पवार जय पवार तुम्ही जन्म कशाला घेतला मत द्यायला आणि ह्याने जन्म कशाला व wine कारखाना
महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी पवार कुटुंबियाकडे आहे, तुमच्या आमच्यावरती दारिद्र्य येण्याचं कारण कोण असेल तर ते पावर कुटुंबीय. ते कधीही सत्तेच्या बाहेर राहू शकत नाहीत.
अमित शाची सत्ता आली पवार साहेबांचं वटकन उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले अजित पवार अर्थमंत्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले अजित पवार अर्थमंत्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले अजित पवार अर्थमंत्री. निवडणुका संपल्या की भादरांचं कारखाना आजारी पडतात. लगेच 100 सव्वाशे 75 दीडशे कोटी रुपये. आणि तुमच्या आमच्या शिक्षणाच्या पोरांना पैसे मिळणार नाहीत*
अरविंद केजरीवॉल यांनी एमपीएससीच्या पोरांना आमदारकीची तिकीट दिली ती पोर मंत्री झाली*
पंजाब मध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट परिस्थिती होती, पंजाब मध्ये एका घराच्या बाहेर आमदारकी आणि खासदारकी कधी जात नव्हती, सगळ्या लोकांना पराभूत करून तो मान नावाचा मुख्यमंत्री त्यांनी तिथे दिला*
मल्हार चरणी खंडोबा चरणी आपण तळी उचलूया आणि अठरापगड जातीच्या एकीची हाग देऊया*
त्या उत्तर प्रदेश मध्ये चार वेळेला मुख्यमंत्री म्हणूनच काम त्यांनी केलं. खाली कर्नाटक मध्ये सिद्धरामय्या आहेत.
आपण सत्तेमध्ये जाऊ आपण युनिव्हर्सिटी उभा करू*
ओबीसीच्या नेतृत्वावरती अजिबात अविश्वास असं बोलायचं नाही. मुंडे भगिनी बंधू आमचे भुजबळ साहेब निश्चित बोलतील ते भूमिका घेत आलेत. आता वाद घालायची वेळ नाही*
मनोज जरांगे नावाचा खोचक माणूस आता म्हणतोय ज्या जातीचा माणूस बोलून त्याच्या जातीला टार्गेट करायचं, म्हणजे तुम्ही आजपर्यंत काय झक मारी केली हेच केलं ना*
2014 ला आम्ही बारामतीत उपोषण केलं नऊ दिवस आम्ही तिथे बसलो होतो बारामतीचा साधा नगरसेवक सुद्धा तिथे आला नाही. काल-परवा आमचा दीपक बोराडे एसटीच्या आरक्षणासाठी बसला तिथे आमदार खासदारांची रांग लागली, काय करायचं दिपकराव आम्ही तुमच्या पाठीशी आहे*
अब एसटीत फूट कशी पाडायचे, भुजबळ यांना कसे एकट पाडायचं हे करत आहात.
बाबासाहेब म्हणले होते हे संविधान जर योग्य माणसाच्या हातात गेला तर भारत देश नंदनवन होईल पण जर जातीवादी माणसाच्या हातात गेलं तर ओबीसी वरती दिन दलितावरती भिक मागायची वेळ येईल.
पुढच्या वर्षीच्या मेळावा दसऱ्याचा सभागृहात नाही चौकात पालखी मैदानावर आणि पालखी मैदानावरची जागा अपुरी पडणार स्क्रीन मागवावी लागणार*
हा ओबीसीचा लढा असा चालू राहील ठामपणे आपल्याला पुढे जायचं आहे*
महाराष्ट्र म्हणजे काय आम्ही सांगू, तुम्ही लय राज्यघटनाच्या जोरावर उड्या मारताना एक एक दिवस नाही जर तुमच्या कारखान्याचे धुराडे जमीन उद्ध्वस्त केले तर महाराष्ट्रात क्रांती काय असते आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या मतांचा अधिकार काय असतो हे येऊ घातलेल्या काळात सांगू
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 05, 2025 14:31:460
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 05, 2025 14:16:120
Report
KJKunal Jamdade
FollowOct 05, 2025 13:04:070
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:52:471
Report
ABATISH BHOIR
FollowOct 05, 2025 12:52:351
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 12:48:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 05, 2025 12:32:500
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 05, 2025 12:05:370
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 12:04:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 05, 2025 12:03:020
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:02:290
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:02:000
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 05, 2025 11:58:202
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 05, 2025 11:54:290
Report