Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक चुनाव प्रचार का आख़िरी दिन: फडणवीस-शिंदे समेत तीनों प्रमुख नेता सभाएं करेंगे
YKYOGESH KHARE
Dec 01, 2025 02:45:55
Nashik, Maharashtra
- नगरपरिषद निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस - प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यात घेणार सभा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिन्नर आणि पिंपळगाव मध्ये तर एकनाथ शिंदे घेणार त्र्यंबकेश्वर मध्ये सभा - तर दुसरीकडे अजित पवार यांचे देखील नाशिक जिल्ह्यात भगूर, पिंपळगाव आणि ओझर या नगरपरिषदांसाठी होणार तीन सभा - नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महायुतीमध्येच काटे की टक्कर - भगूर, सिन्नर, त्रंबकेश्वर, येवला,नांदगाव या ठिकाणी माहिती मधले तीन पक्षांमध्ये सुरू आहे काटे टक्कर - प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील दिग्गज नेते नाशिक मध्ये घेणार सभा
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 01, 2025 02:51:17
Kolhapur, Maharashtra:त Tet पेपर प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड मधून नव्याने तिघा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. नव्याने निष्पन्न झालेले आरोपी TET Pepar फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी महेश गायकवाड यांचे साथीदार आहेत. आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली असून कऱ्हाड मधील आरोपींना अटक केल्यानंतर ही संख्या 22 वर पोहोचणार आहे. इतकच नाही तर परराज्यातील आरोपींच्या शोधात देखील कोल्हापूर पोलीस आहे. त्या त्या आरोपींना अटक केल्यानंतर ती संख्या कुठेपर्यंत पोहोचेल हे आत्ताच सांगता येणार नाही. पण या प्रकरणात अटक करण्यात येणाऱ्या आरोपींची संख्या पाहता TET पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसून येत आहे.
68
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 01, 2025 02:51:04
87
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 01, 2025 02:48:29
Dhule, Maharashtra:धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा दिवसागणित कमी होत आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. विशेष म्हणजे आता तापमानाचा पारा हा 7 अंश सेल्सिअस कडून पाच अंश सेल्सिअस कडे वाटचाल करीत आहे. वाढत्या थंडीचा कडाका हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहेत. रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तर अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झालेली है. जिल्ह्यातील थंडीचा प्रवास हा शीतलहरीकडे होत आहे. उत्तर भारतामध्ये गार वाऱ्यांचा परिणाम हा धुळे जिल्ह्यातही दिसून येत आहे
153
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 01, 2025 02:47:37
Bhandara, Maharashtra:भंडारा नगर परिषद निवडणणीक वाद! पाच अधिकारी–कर्मचारी पोस्टल बॅलेटविना मतदानापासून वंचित Anchor :- २ डिसेंबरला होणाऱ्या भंडारा नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक यंत्रणेतील गंभीर अनियमितता समोर आली आहे. भंडारा येथील वास्तव्यास असून तुमसर तालुक्यात सेवेत असलेल्या पाच अधिकारी–कर्मचाऱ्यांना नियमानुसार मिळायला हवे असलेले टपाल मतपत्रिका (Postal Ballot) उपलब्ध नाही, असे आरोप समोर आले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कथित मनमानीमुळे हे अधिकारी–कर्मचारी मतदानाचा मूलभूत हक्क गमावणार आहेत, ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. निवडणूक नियमावलीनुसार, आपल्या मूळ मतदारसंघाबाहेर ड्युटीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी परिशिष्ट-१ (Annexure-1) भरल्यानंतर पोस्टल बॅलेट मिळणे बंधनकारक आहे. तथापि, पीडित अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भंडारा नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांनी वेळेवर कायदेशीर प्रक्रिया केली नाही. या निष्काळजीपणामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदानापासून वंचित अधिकारी–कर्मचारी संजय जांभुळकर – नायब तहसीलदार, भंडारा लिलाधर गेडाम – अधिकारी शशिकांत वसू – कर्मचारी भारती बोन्द्रे – कर्मचारी श्यामसुंदर सेलोकर – कर्मचारी हे सर्व अधिकारी भंडारा येथील नोंदणीकृत मतदार असून, तुमसरमध्ये ड्युटीवर असल्यामुळे त्यांना पोस्टल बॅलेट मिळणे बंधनकारक होते.
119
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 02:47:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 'एमबीबीएस'च्या जागा २०० वरून २५० पर्यंत वाढविण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती अधिष्ठाता यांनी दिली. याशिवाय 'पीजी'च्या जागाही वाढणार असून, त्या दृष्टीने रुग्णालयात पाहणीसाठी निरीक्षक येत आहेत. विद्यार्थ्यांना घाटीत 'एमबीबीएस'च्या २०० जागा आहेत. घाटी रुग्णालयात काही वर्षात सोयी-सुविधांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे 'एमबीबीएस'च्या ५० जागा वाढविण्यासाठी घाटी रुग्णालयाकडून हलचाली सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून वाढीव ५० प्रवेशाची संधी उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जीवरसायनशास्त्र विषयाच्या पीजीच्या सध्या २ जागा आहेत. या जागा २ वरून १७करण्यासाठी निरीक्षकांनी पाहणी केल्याची माहिती प्रशासनाने दिली...
146
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 01, 2025 02:46:25
Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यातील रांझणी शिवारात अकरा एकर क्षेत्रात ऊस जळून खाक झाला. तिन शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यां तिन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे. तळोदा तालुक्यातील रांझणी गावालगत शिवारात तीन शेतकऱ्यांचा कापणीला आलेला अकरा एकर ऊस जळून झाक झाल्याची घटना घडली. सुमारे अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात माथेफिरूने ऊस जाळून पसार झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्यातील रांझणी येथील भटु गोविंद भंवर यांचे 4 एकर क्षेत्रात, गणेश सुरेश मढवी यांचे 4 एकर क्षेत्रात तर प्रतापपूर येथील तुंबा ईशी यांचे तीन एकर क्षेत्रातील रांझणी शिवारात शेतातील ऊस शनिवारी रात्री सात वाजे च्या सुमारास ऊस जळाल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने ऊस जाळून खाक झाले आहे. या सुलतानी संकटामुळे शेतकऱ्याचे हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
143
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 02:31:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट शिक्के व खोट्या स्वाक्षऱ्या वापरून ५४ एकर ३० गुंठे जमिनीच्या व्यवहारासाठी बनावट शासकीय आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या नायब तहसीलदारांकडून एक संशयास्पद आदेश व्हॉट्सअॅपवर तपासणीसाठी आल्यानंतर ही फसवणूक समोर आली. बनावट या आदेशावर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व शासकीय शिक्के वापरले होते. ब्रिजवाडी येथील सर्व्हे क्र. १ गट क्रं. ३० मधील ५४ एकर ३० गुंठे मधील जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणात हा बनावट आदेश तयार करण्यात आल्याचा संशय आहे.
132
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 01, 2025 02:31:33
Jalna, Maharashtra:जालना : भोकरदनमध्ये दोन वॉर्डातील निवडणूक लांबली, 20 डिसेंबरला होणार मतदान भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 1 मधील अ आणि प्रभाग 9 मधील ब वॉर्डातील निवडणूक स्थगित झाली आहे. या दोन्ही ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. ज्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले होते, त्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारीांनी अपील दाखल केलेल्या उमेदवारांना आपले नामनिर्भरपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारीांनी 26 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर केलेली चिन्ह वाटपची कार्यवाही नियमबाह्य ठरते, असा ठपका ठेवून निवडणूक आयोगाने भोकरदन नगर परिषद निवडणुकीतील दोन वाडाँची निवडणूक पुढे ढकलली आहे.
154
comment0
Report
Advertisement
Back to top