Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक में पांच दिनों में तापमान 7.8°C गिरकर 10.3°C, ठंड फिर से बढ़ी
YKYOGESH KHARE
Nov 13, 2025 03:54:56
Nashik, Maharashtra
नाशिकमध्ये पाच दिवसांत तापमानात तब्बल ७.८अंशांची घसरण. शहराचे तापमान १८.२ वरून १०.३ अंशांवर घसरले – राज्यात थंडीतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. उत्तर दिशेहून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम. आज हंगामातील सर्वात कमी १०.३अंश सेल्सिअसची नोंद थंडीची लाट पुन्हा परतली, जिल्ह्यात गारव्याचा जोर वाढला. हवामान खात्याचा अंदाज – थंडी आणखी काही दिवस कायम राहणार. रात्रीच्या तापमानातील घटेमुळे शहरात गारठ्याची झळ जाणवू लागली.
88
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Nov 13, 2025 05:22:44
Yavatmal, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा यवतमाळचे माजी विधान परिषद सदस्य आमदार संदीप बाजोरिया यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नुकतेच प्रवेश घेतलेल्या नेत्यांवर तोंडसूख घेतले, ह्या संस्थानिकांना माझ्या भरवश्यावर पद आणि पैसा मिळाला. मात्र ते गद्दार निघाले असा आरोप बाजोरिया यांनी केला. यवतमाळ मध्ये काँग्रेसचा आमदार निवडून आला मात्र शहर भयमुक्त, गुन्हेगारी मुक्त, कचरामुक्त होऊ शकले नाहीं. अजूनही लोकांना पिण्याचे पाणी नियमित मिळत नाहीं, शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील काही संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संदीप बाजोरिया यांनी केला.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 05:17:21
Navi Mumbai, Maharashtra:मुंबई महानगर पालिकेची वॉर्ड निहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधुंकडून निवडणुकीची रणनीती सुरु झी आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागवली इच्छुकांची यादी. मनसेच्या काल झालेल्या बैठकीत मुंबईतील इच्छुकांची यादी मागवण्यात आली आहे... जे पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांची यादी विभागअध्यक्षांनी देण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. मनसेकडून मुंबई स्वतःच्या प्रभागातील 2017 महापालिका निवडणुकिची आकडेवारी देखील मागवण्यात आली आहे. या आकडेवारीवरून मनसेकडून A+,A,B,C असे प्रभाग केले जाणार यानंतर युतीच्या चर्चेत मनसेकडून जागांची मागणी केली जाणार सूत्रांची माहिती. मनोज कुळकर्णी
56
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 13, 2025 04:32:49
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 13, 2025 04:32:33
Jalna, Maharashtra:जालना : आतापर्यंत फक्त 2 लाख 25 हजार अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदत, अँकर : जुलै ते सप्टेंबरच्या 6 लाख 29 हजार 651 अतिवृष्टीबाधितांसाठी 431 कोटी 81 लाख रुपये मंजूर झाले आहेत.48 तासांत सर्व याद्या अपलोडचा दावा 30 ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केला होता. मात्र, 3 आठवडे उलटूनही 3 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्याच याद्या अपलोड झाल्या असून त्यापैकी 2 लाख 25 हजार 9शेतकऱ्यांना 139 कोटी 80 लाख रुपये मिळाले, तर उर्वरित 1 लाख 14 हजार 862 शेतकऱ्यांचे 76 कोटी 49लाख रुपये ई-केवायसी नसल्यामुळे अडकले आहे. दुसरीकडे रब्बीत हेक्टरी 10 हजारांची घोषणा असतानाही 5 हजार रुपये खात्यात जमा केले जात असल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 13, 2025 04:16:55
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्यांक उमेदवाराला धमकावले जात असल्याचा माजी आमदार रमेश कदम यांचा गंभीर आरोप - मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं जात आहे - अशी गुंडगिरी आम्ही चालू देणार नाही. आरेला कारे ने उत्तर देणार - माजी आमदार रमेश कदम यांचा मोहोळच्या स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप - ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे. - त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही अल्पसंख्यांक समाजासोबत राहणार - अल्पसंख्यांक समाजातील लोकांनी इतर कोणाचीही उमेदवारी घ्यायची नाही असे धमकावले जात आहे.
87
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 13, 2025 04:16:28
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत प्रतिहेक्टर ८,५०० इतकी मदत मंजूर केली होती. शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाने रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत २ लाख ९६ हजार ६१८ शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १०,००० या प्रमाणात मदत मंजूर करण्यात आली असून, एकूण २७५ कोटी ३० लाख ४३ हजार २०० रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. या मदतीपैकी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून,त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
67
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 13, 2025 04:06:36
Amravati, Maharashtra:केवळ 10 महिन्यात तब्बل 888 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या ऑक्टोबर महिन्यात 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच आकडेवारीत उघड झालं आहे. नैसर्गिक आपत्ती आणि पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणा शेतकरी आत्महत्येचे कारण ठरले आहे. बँका आणि खाजगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याने शेतकरी त्रस्त आहे. दरम्यान अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांतील धक्कादायक आणि चिंताजनक आकडेवारी समोर आली असून सर्वाधिक 316 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची माहिती आहे. अनेक शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत तर शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याने विदर्भात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येची आकडेवारी वाढल्याचे दिसून येत आहे.
58
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 13, 2025 04:06:06
Satara, Maharashtra:सातारा: लोणंद येथील श्री म्हस्कोबानाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गुलालाची उधळण करीत, झांज आणि ढोल ताशाच्या गजरात श्री नाथाचा छबीन्हा काढण्यात आला. या छबीन्यात गुलाला नाहून निघालेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. खेमावती नदीच्या तीरावर असलेले श्री म्हस्कोबानाथ आणि माता जोगेश्वरी देवीचे मंदिर आकर्षक फुलांच्या माळांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं होतं. यात्रेनिमित्त भाविकांनी नाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीलेली पाहायला मिळाली. या यात्रेदरम्यान भाकनुक करून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. लोणंदची ही पारंपरिक यात्रा असून श्री म्हस्कोबानथ यात्रेसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
71
comment0
Report
Advertisement
Back to top