Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

लोणंद यात्रा में भक्तों की भारी भीड़, म्हस्कोबानाथ की यात्रा रोशनियों से जगमग

TTTUSHAR TAPASE
Nov 13, 2025 04:06:06
Satara, Maharashtra
सातारा: लोणंद येथील श्री म्हस्कोबानाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गुलालाची उधळण करीत, झांज आणि ढोल ताशाच्या गजरात श्री नाथाचा छबीन्हा काढण्यात आला. या छबीन्यात गुलाला नाहून निघालेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. खेमावती नदीच्या तीरावर असलेले श्री म्हस्कोबानाथ आणि माता जोगेश्वरी देवीचे मंदिर आकर्षक फुलांच्या माळांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं होतं. यात्रेनिमित्त भाविकांनी नाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीलेली पाहायला मिळाली. या यात्रेदरम्यान भाकनुक करून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. लोणंदची ही पारंपरिक यात्रा असून श्री म्हस्कोबानथ यात्रेसाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
140
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 13, 2025 05:47:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतील राष्ट्रवादी एकजूट,जत मध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आघाडी.. नगरपरिषदेसाठी एकत्रित लढण्यात येणार असल्याचा जाहीर केला आहे.त्याचबरोबर नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्याच बरोबर या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचेही माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या या आघाडीमध्ये बसपा देखील असा सामील झाली आहे. बाईट - विलासराव जगताप - माजी आमदार - राष्ट्रवादी अजित पवार पक्ष . बाईट - सुरेश शिंदे - नेते,राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व नगराध्यक्ष उमेदवार नगरपरिषद - जत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 13, 2025 05:33:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कांद्याला भाव मिळेना; शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला रोटाव्हेटर कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अAnchOR: खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि काढणीनंतर कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या उभ्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. केकत जळगाव येथील शेतकरी धनंजय अजिनाथ थोरे यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी ४० हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता; मात्र, बाजारात कांद्याला केवळ पाच रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने त्यांचा धीर सुटला. त्यानंतर त्यांनी उभ्या एक एकर कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला. शेतीचा वाढलेला खर्च, खते, मजुरी आणि त्या तुलनेत मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकऱ्याने जगायचं कसं?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप पीक उद्ध्वस्त झाले. आता कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संकटात आले आहेत.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 13, 2025 05:30:34
Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या दर्शनानंतर अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा केला जातोय.. उत्तराखंड येथील एक कुटुंळ साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते.. 10 वर्षीय मुलाला जन्मापासूनच एका डोळ्याने दिसत नव्हते, द्वारकामाईत दर्शन केल्यानंतर हा चमत्कार झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र साईबाबा संस्थानने या कथित चमत्काराला थारा देऊ नये असं म्हटलंय.. सत्यशोधनासाठी आम्ही साईबांबाचे भक्त असलेले पाच नेत्रहीन व्यक्ती पुरवतो.. त्यांना चमत्काराने दृष्टी आल्यास आम्ही जनतेतुन गोळा केलेले एकवीस लाखाचे बक्षीस देऊ आणि आमची चळवळ बंद करु असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी दिलंय..
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 13, 2025 05:23:16
Nashik, Maharashtra:सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या उद्घाटनांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहे... तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते नाशिक दौऱ्यावर येणार आहे... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य असा रामकालपट तयारण्यात येणार आहे आणि त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असणार आहे... त्यानंतर रामकुंड परिसराची पाहणी करून त्र्यंबक रोड येथे नव्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दाद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे... यानंतर त्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी जाहीर सभा ठक्कर मैदान परिसरात पार पडणार आहे.... सभा मंडपाच्या स्टेज जवळ शंख वाजवणाऱ्या साधूंच रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे कुंभ नगरी मध्ये असं स्वागत असं असे देखील या रांगोळी लिहिला गेलाय...या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 13, 2025 05:22:44
Yavatmal, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा यवतमाळचे माजी विधान परिषद सदस्य आमदार संदीप बाजोरिया यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नुकतेच प्रवेश घेतलेल्या नेत्यांवर तोंडसूख घेतले, ह्या संस्थानिकांना माझ्या भरवश्यावर पद आणि पैसा मिळाला. मात्र ते गद्दार निघाले असा आरोप बाजोरिया यांनी केला. यवतमाळ मध्ये काँग्रेसचा आमदार निवडून आला मात्र शहर भयमुक्त, गुन्हेगारी मुक्त, कचरामुक्त होऊ शकले नाहीं. अजूनही लोकांना पिण्याचे पाणी नियमित मिळत नाहीं, शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील काही संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संदीप बाजोरिया यांनी केला.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 05:17:21
Navi Mumbai, Maharashtra:मुंबई महानगर पालिकेची वॉर्ड निहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधुंकडून निवडणुकीची रणनीती सुरु झी आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागवली इच्छुकांची यादी. मनसेच्या काल झालेल्या बैठकीत मुंबईतील इच्छुकांची यादी मागवण्यात आली आहे... जे पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांची यादी विभागअध्यक्षांनी देण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. मनसेकडून मुंबई स्वतःच्या प्रभागातील 2017 महापालिका निवडणुकिची आकडेवारी देखील मागवण्यात आली आहे. या आकडेवारीवरून मनसेकडून A+,A,B,C असे प्रभाग केले जाणार यानंतर युतीच्या चर्चेत मनसेकडून जागांची मागणी केली जाणार सूत्रांची माहिती. मनोज कुळकर्णी
56
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 13, 2025 04:32:49
28
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 13, 2025 04:32:33
Jalna, Maharashtra:जालना : आतापर्यंत फक्त 2 लाख 25 हजार अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदत, अँकर : जुलै ते सप्टेंबरच्या 6 लाख 29 हजार 651 अतिवृष्टीबाधितांसाठी 431 कोटी 81 लाख रुपये मंजूर झाले आहेत.48 तासांत सर्व याद्या अपलोडचा दावा 30 ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केला होता. मात्र, 3 आठवडे उलटूनही 3 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्याच याद्या अपलोड झाल्या असून त्यापैकी 2 लाख 25 हजार 9शेतकऱ्यांना 139 कोटी 80 लाख रुपये मिळाले, तर उर्वरित 1 लाख 14 हजार 862 शेतकऱ्यांचे 76 कोटी 49लाख रुपये ई-केवायसी नसल्यामुळे अडकले आहे. दुसरीकडे रब्बीत हेक्टरी 10 हजारांची घोषणा असतानाही 5 हजार रुपये खात्यात जमा केले जात असल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.
64
comment0
Report
Advertisement
Back to top