Back
RTओ भ्रष्टाचार पर сенсаशनल फटकारे: खरमाटे-भुयार समेत चार अधिकारी आरोपी
AKAMAR KANE
Mar 26, 2026 06:01:31
Nagpur, Maharashtra
नागपूर -
विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते -
On आरटीओ भ्रष्टाचार -
- आरटीओ मध्ये कसा रॅकेट चालवलं जातं आणि रॅकेट चालवणारे कोण आहेत याचा भंडाफोड करण्यासाठी आजची प्रेस आहे
- खरमाटे नावाचे एक गृहस्थ आहेत ते आता कुठेही सर्विस वर नाही, बदल्यांचे पूर्ण रॅकेट चालवणारा परिवहन विभागातील हा व्यक्ती होता
- याबरोबर भुयार नावाचे एक अधिकारी आहेत, ते सध्या अकोल्याला आहेत, त्यांच्या बरोबर सस्पेंड झालेला योगेश नागरे आणि खैरनार हे दोन व्यक्ती आहेत, हे चार मंडळी पूर्ण महाराष्ट्रातून वसुली करतात
- विदर्भातून 64 मुलं आरटीओ मध्ये लागली होती पण या चौकडीला वाटलं की हे सर्व आमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे
- पवन पोटदुखे नावाचे आरटीओ इन्स्पेक्टर चंद्रपूर मध्ये होते त्यांनी सगळा पाठपुरावा केला, पण या खैरनार आणि भुयार ते फक्त नागपुरात बसतात वसुलीसाठी
- ही दोन्ही सस्पेंड झालेले लोक पूर्ण रॅकेट चालवतात, बदल्यांमध्ये पूर्ण सक्रिय असतात वसुलीमध्ये खैरनार नावाचा माणूस हा पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकतो
- ओव्हरलोड गाड्या चालू देतात, सर्व वसुलीसाठी योगेश नावाचा माणूस नागपुरात बसवला आहे खरमाटे नावाच्या व्यक्तीने, खरमाटे सर्वांना धमकावतो
- एसीबी मध्ये एक अधिकारी आहेत ते, पंधरा दिवसापूर्वी कोणीतरी रोडवर ट्रक चालवला आणि पोटदुखेने पैशाची मागणी केली असा खोटा रिपोर्ट दिला
- विदर्भातील सर्व अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा काम हे करत आहेत, खुटा ट्रॅप लावण्यात आला कारण खरमाटे ची अवैध वसुली यांनी बंद केली, त्याला जे कंट्रोल होता आणि विदर्भातील मुलांचे प्रमोशन त्याला नको होतं
- बनावट एफआयआर तयार करण्यात आला, तो धमकवतोय त्याचे फोन रेकॉर्ड आणि क्लिप आहेत की माझा जर ऐकणार नसेल तर मी तुम्हाला नेस्तनाबूत करेल
- मंत्र्यांपर्यंत हे काही जात नाही, सरनाईकांपर्यंत हे सगळी वसुली जात नाही पण आरटीओ ची ही सिस्टम हायजॅक करण्याचं काम खरमाटे करतो
- आमची सत्ता होती तेव्हा या खरमाटे चे नाव आल होता, त्यापूर्वी याचा नाव आला होता, भुयार याची अकोल्यात बदली झाली तरीही पूर्ण विदर्भ हँडल करतो
- अँटी करप्शन चा ॲडिशनल एसपी एक एसीबी मध्ये आहे, तो दहा वर्षापासून इथे बसला आहे, सर्व आरटीओ इन्स्पектор ची बैठक राजू नागरे, भुयर आणि खैरनार ने घेतली
- या प्रकरणाचे सर्वकष चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, आयुक्त यांना सांगणार आहे, मी लक्षवेधी लावली होती पण चर्चेला आली नाही, विदर्भात ज्या दिवशी खरमाटे दिसायला आणि भुयार याचा बंदोबस्त मी विदर्भातच करेल
On रेती माफिया,गोवंश वाहतूक,आरटीओ संबंध -
- आज रामनवमीचा दिवस आहे, सगळ्याच गोवंश पकडणाऱ्यांना दर्शन देत नाही पण याचंतर धंदा सुरू होऊन रॅकेट आहे रेती असेल किंवा गोवंश असेल
- माझ्या मतदारसंघातील सावलीमध्ये स्वतःच गोवंश तस्करी करतो आणि गोवंश रक्षकाचा कामही करतो, मला बोलता येत नाही,ते अंगावर येतात, चोरी ते चोरी वरून शिरजोरी, भावना दुखावल्या जातात आम्ही काही म्हटलं तर
- गडचिरोलीतील एक टीम चांगलं काम करताय, हे सगळं रॅकेट आरटीओच्या म्हणण्यापेक्षा यामध्ये आता मी जो विषय काढला हा एक अवैध बसवली चा अधिकार क्षेत्रातील बाहेरची लोकं करतात
On सातारा एसपी नीलम गोर्हे -
- ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेना फुटली त्यावेळी उपाध्यक्ष होते उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय किंवा सूचना हे कुठल्याही सरकार पाडत असते
- जो अधिवेशनापुरता नेमतो त्याचा पाळत नाही मात्र हे (गोर्हे) निवडून आलेले आहेत, अध्यक्ष असू दे किंवा उपाध्यक्ष त्यांनी दिलेल्या निर्देश पटवून हे पहिल्यांदाच होते आहे आणि हे पहिल्यांदाच घडते आहे
*On नरहरी झिरवळ* -
- जे नको आहे ते टारगेट होत आहेत, प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायचे, स्पर्धा खूप आहे, एक मंत्राची विकेट गेली की दुसरा टपूनच आहे, त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईन येत आहे अशा मध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे
- झिरवळांची जागा खाली करून घेण्यासाठी एक माजी मंत्री आहे अशी चर्चा सुरू आहे, जर पेन ड्राईव्ह समोर आला तर त्या ठिकाणी किमान तीन मंत्र्यांच्या विकेट पडतील अशा गंभीर स्वरूपाच्या आहेत त्यात व्हिडिओ क्लिप आहेत
- चाकणकरांनी पाय धुतले तर त्यांना आपण काढून टाकलं पण त्यापेक्षाही विचित्र अशा या क्लिप त्या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत, सोयीचे जेवढे आहेत तेवढेच त्या पेन ड्राईव्ह मधून काढून सुरू आहे पण मोठ्या माशांना वाचवण्यासाठी हे पूर्णतः क्लिप येत नाही
- अशोक खरात प्रकरणात आहेत तो त्या शासकीय वस्तीगृहातील हा प्रकार आहे शासकीय वस्तीगृहाचा वापर त्याने त्यासाठी केला आहे आणि हे खरं असेल तर हे वाईट आहे त्या पदावर राहून अशा पद्धतीने वागणं हे आता त्याची विकेट काढतात की त्याला पुन्हा टीम मध्ये ठेवतात याचे उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील
On मुख्यमंत्री खुर्ची खरात संबंध -
- मी एवढेच सांगेल की खरात हा तंत्र-मंत्र करायचा आणि जो माणूस नकोय त्या खुर्चीवर त्याच्यासाठी काही मंडळी जायची बदला घेण्यासाठी, तू आमचे हे करून दे आणि त्या बंदोबस्त करून देतो, आमचा विरोधक आहे तरच होऊ शकते, मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी तंत्र-मंत्र करायचा प्रयत्न केला असेल, अधिकृत माहिती माझ्याकडे कुठेही नाही
On मुंढवा जमीन अहवाल -
- हे प्रकरण पूर्णतः गोलमाल आहे, चौकशी अहवाल चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवाल हे बोगस आहे चोर सोडून संन्याशाला फाशी
- मोठा अधिकारी काम करतो त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला सस्पेंड केल्या जातात, लहान माशांवर कारवाई होताना दिसते मात्र मोठे मासे बिनधास्तपणे वावरत आहेत हा चौकशीचा फार्स आहे
- जे मालक थे त्यांच्यावर कुठलेच कारवाई होत नसेल तर दुर्दैव आहे
On ठाकरे शिवसेना अंतर्गत वाद -
- मी माहिती घेतली नाही वाद झाल्याची, पण त्यामध्ये मला माहिती नाही, म्हणून मी काही बोलणार नाही
- काँग्रेसने समर्थन दिलं म्हणजे आमच्याकडे काही संख्याबळ आहे? आमच्या भरोशावर शरद पवार निवडून येणार होते? पवार साहेबांना शिवसेना आणि आमची गरज होती त्यामुळे ते तयार झाले म्हणून आम्ही तयार झालो, त्यांची तयारी नसते तर आमची तयारी नसती
- आमचे नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे आम्ही तयारी केली आणि पवारांना मदत केली
On भिडे गुरुजी वादग्रस्त विधान -
- याचा अर्थ म्हणजे भिडे गुरुंना माहित आहे की खरात कडे कोणकोण पाठीमागे आहेत, पुरावे संपवण्यासाठी भातखळकरांना मी सांगतो बदलाेपूरचा एन्काऊंटर केला तुमच्या आरएसएसच्या माणसाला वाचवण्यासाठी केला
- इथे देखील काही लोकांना वाचवण्यासाठी खरा त्याचा एन्काऊंटर करायला अशी भीती वाटते उद्या खरातांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण कायद्यानुसार झाली पाहिजे पुरावे नष्ट करून जर त्यांच्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न होत असतील
- सरकार मधील काही लोक आहेत त्यासाठी घरातला मारून टाका अशी भिडे गुरुजी ची इच्छा असेल
On पेट्रोल टंचाई -
- शॉर्टेज तर आहे, एलपीजीचा डिझेल पेट्रोलचा ही आहे आणि कुठेही लपून राहिलं नाही, अनेक ठिकाणी उद्योगांना आहे त्याची जवळ पोहोचत आहे जेवढे काम सुरू आहेत इरिगेशन रस्त्यांची त्यामध्ये देखील पुरवठा करताना अडचणी येत आहेत हे म्हणणे म्हणजे जनतेला मूर्ख बनवणे आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 26, 2026 07:16:210
Report
AKAMAR KANE
FollowMar 26, 2026 07:03:27250
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 26, 2026 06:48:30929
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 06:48:15892
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 06:45:44921
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 26, 2026 06:19:251093
Report
KPKAILAS PURI
FollowMar 26, 2026 06:16:41915
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 26, 2026 06:02:21980
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 26, 2026 05:46:51941
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 26, 2026 05:46:23971
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 26, 2026 05:18:121094
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 26, 2026 05:02:40970
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 26, 2026 04:48:071010
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 26, 2026 04:47:55923
Report