Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर: अजित पवार की NCP AB फॉर्म वितरित करना शुरू किया, 40 उम्मीदवार आज
AKAMAR KANE
Dec 29, 2025 07:04:36
kolhapur, Maharashtra
नागपुर महापालिकेसाठी NCP अजित पवार पक्षाकडून AB फॉर्मचे वाटप करण्यात येतय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात AB फॉर्मच्या वाटपाला सुरुवात. सुमारे 40 राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक उमेदवारांना आज उमेदवारी देण्यात येणार असल्याची शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांची माहिती. दरम्यान वंचित सोबत चर्चा सुरू असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 29, 2025 08:52:34
kolhapur, Maharashtra:नागपूरातील प्रभाग 15 मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार नाराजी उफाळून आली आहे.. प्रभाग 15 मधील दोन महिला जागांवरील उमेदवारीवरून ही नाराजी उफाळून आली असून पक्षात गेल्या काही महिन्यांत प्रवेश करणाऱ्यांना श्रेष्ठींनी जर उमेदवारी दिली, तर आम्ही पक्षाचा काम करणार नाही अशी टोकची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.. विशेष म्हणजे प्रभाग 15 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खाजगी निवास असलेला प्रभाग असून मुख्यमंत्री स्वतः त्या प्रभागाचे मतदार आहेत... सध्या हे सर्व कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा जवळ गोळा झाले आहे..आणि जर पक्षश्रेष्ठींनी पक्षात अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेस मधून प्रवेश करणाऱ्याांना उमेदवारी देण्याचा निर्णय बदलला नाही, तर आम्ही या निवडणुकीत काम करणार नाही असा निर्वाणीचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे... त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 29, 2025 08:52:14
Akola, Maharashtra:आगामी महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.अकोला महापालिका करिता दोन्ही पक्षांची आघाडी निश्चित झाली आहे. एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी ( श. प ) च्या युतीने आघाडी घेतली असून काँग्रेस 80 पैकी 55 जागेवर आपले उमेदवार देणार आहे तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही 25 जागांवर लढणार आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष उबाठा , काँग्रेस सोबत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे. राजकीय वर्तुळात या लढतीकडे राजकीय मुकाबल्याच्या रूपात पाहिले जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून आज आणि उद्या महायुती आणि इतर पक्षाची आघाडी युती स्पष्ट होणार आहे..
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 29, 2025 08:34:30
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 29, 2025 08:19:40
Mumbai, Maharashtra:दहिसर २ नंबर वॉर्डमधून भाजपचे उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्ज दाखल झाल्याने २ नंबर वॉर्डमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना तेजस्वी घोसाळकर यांनी विकासकामांना केंद्रस्थानी ठेवून ही निवडणूक लढवत असल्याचं स्पष्ट केलं. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्न सोडवणं हेच आपलं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, मुंबईतून भाजपकडून सर्वात पहिला उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मला देण्यात आली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षाने दिलेल्या विश्वासाचं सोनं करून दाखवेन, असा ठाम विश्वासही घोसाळकर यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 29, 2025 08:19:14
Pimpri-Chinchwad, Maharashtra:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आनंद व्यक्त केलाय. लवकरच दोन्ही काँग्रेसचे जागावाटप जाहीर होईल अस सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला जागा दिल्या जाण्याची शक्यता बहल यांनी व्यक्त केली आहे. मात्र योगेश बहन यांच्यात वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा शीलवंत धर या उमेदवारीसाठी अडून बसल्या असून त्यांनी हट्ट सोडावा, त्या आमदारकी लढल्या आहेत त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा असं म्हणत बहल यांनी युती झाली असली तरी अजूनही काही ठिकाणचा संघर्ष सुरूच असल्याचं स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या घोषणेनंतर शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 29, 2025 08:17:26
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार शहर पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी, मनसेने ठाकरेंच्या सेनेचा हात सोडला बहुजन सोबत केली आघाडी ठाकरे यांची शिवसेना स्वबळावर लढणार.. चिन्हाच्या मुद्द्यावरून ठाकरेंची सेना स्वबळावर लढण्याची केली घोषणा अँकर... वसई विरार महानगरपालिकेमध्ये भाजपाचा वारू रोखण्यासाठी ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस एकत्र लढण्यासाठी दोन बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी आमच्यात सर्व आलबेल असल्याचा दावा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला होता.. मात्र तो दावा आता कुठेतरी फोल ठरला असून आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलं आहे.. या आघाडीमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शीटी या चिन्हावर सर्वांनी निवडणूक लढवू या असा आग्रह धरल्यामुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडून पालिकेच्या 29 प्रभागात 115 उमेदवार उभे करणार असल्यामुळे बहुजन सोबत जाण्याचा विचार करतो आहोत. पण याबाबत शेवटचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जाहीर करतील. असं सांगून ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या आरोप मनसेने खोडून काढले आहेत.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 29, 2025 08:06:37
Oros, Maharashtra:प्राथमिक शाळांच्या स्तरावर होणाऱ्या बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार या स्पर्धेत बदल होणं आवश्यक आहे. केवळ निधी खर्च करण्यासाठी आणि आम्हाला समाधानी करण्यासाठी आयोजन करू नये. या कार्यक्रमासाठी निधीची झालेली तरतूद आणि समोर होत असलेला कार्यक्रम याचा ताळमेळ आपल्या लक्षात येत नसल्याचे सांगत मंत्री नितेश राणे यांनी शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी तालुका स्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली व यात बदल व्हावेत असे देखील नितेश राणे यांनी सूचित केले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 29, 2025 08:04:03
Nashik, Maharashtra:युती संदर्भात आम्हीच संभ्रमात शिवसेना उपनेते अजय बोरस्ते\u2026\nमहायुतीची घोषणा होत नसताना मात्र शिवसेनेच्या वतीने उपनेते अजय बोरस्ते यांच्याकडून फॉर्म भरण्यात आलेला आहे... शक्ती प्रदर्शन करत नाशिकच्या पश्चिम विभागीय कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.... युतीची घोषणा होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांसह आम्ही देखील संभ्रमात असल्याचा अजय बरसते यांनी म्हटले तर आम्ही सगळ्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.... त्यामुळे सगळीकडेच शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतोय... मात्र महायुती बाबत कोण कोणाशी चर्चा करतय हे आम्हालाच माहिती नसल्याचं शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी म्हटलं... भाजपा सोबत युती झाली नाही तर आम्ही स्वतः 122 जागा लढवू नाहीतर राष्ट्रवादीला सोबत घेऊ कारण त्याच्या सोबत देखील आमची चर्चा सुरू आहे,आणि निवडणूक लढाऊ असे देखील आजही दुरस्त यांनी म्हटले.. या संदर्भात शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 29, 2025 07:30:53
0
comment0
Report
Advertisement
Back to top