Back
Zigzag land scam row: Jains, Brahmins unite; HND trustees and Goshele developer under fire
PNPratap Naik1
Oct 27, 2025 08:47:35
Kolhapur, Maharashtra
On जैन समाज जमीन व्यवहार रद्द
जमिनीचा व्यवहार रद्द झाला असं म्हणता येणार नाही, ज्यांनी ती जमीन खरेदी केली आहे त्या गोखले डेव्हलपरनी HND ट्रस्टीना पत्र मेल केला आहे. आम्हाला व्यवहार रद्द करायचा आहे म्हणून.
यावर HND ट्रस्टीची काय भूमिका आहे ? हे अद्याप गुलदस्तात आहे. त्यामुळे आमची भूमिका अशी आहे.. ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द व्हायला हवे.
कागदोपत्री HND बोर्डिंगचे नाव लागायला पाहिजे ही आमची भूमिका.. तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही..
गोखले डेव्हलपरनी आम्हाला तो व्यवहार रद्द करायचा अशी भूमिका मांडली आहे, पण आता ट्रस्टीनी पुढे येऊन हा व्यवहार रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही ट्रस्टमध्ये केलेले गैर व्यवहार बाहेर काडणार आहे. केलेला भ्रष्टाचार आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार.
ऑन मोहोळ सहभाग
मोहोळ साहेब सुरुवातीला म्हणत होते, माझा त्या व्यवहारशी संबंध नाही, बिल्डराची संबंध नाही.. पण काल रात्री त्यांनी मला जैन बोर्डिंगच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पुढाकार घेऊन गोखले बिल्डरची संपर्क साधला अस सांगितले
मोहळ यांनी माझ्या शब्दाला मान देऊन हा व्यवहार रद्द केल्याचं सांगितले आहे..
ऑन मोहळ यांना भाजपा पाठीशी घालत आहे का
भाजपचे बाकीचे लोक काय म्हणतात याच्याशी मला देणे घेणे नाही.. पण या बोर्डिंगमध्ये जवळपास 250 विद्यार्थी शिकत होते. त्या विद्यार्थ्यांना एक जून पासून तिथून बाहेर काढले होते.. आमचा लढा या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता.
ते विद्यार्थी जोपर्यंत बोर्डिंग मध्ये परत येत नाहीत तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही.
यामध्ये काय राजकारण आहे याच्याशी आमचे देणे घेणे नाही, मुळात त्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार करूच देणार नव्हतो..
साडेतीन एकर जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा आहे हे आम्हाला माहीत.. त्यामध्ये हजार , दीड हजार कोटीचा ढपला पाडला जाणार हे आम्हाला माहीत होतं.
पहिला टप्पा गोखलेंचे नाव काढून त्यावर HND चे नाव प्रस्थापित करणे.. ते झाल्यानंतर ज्या पडद्याआड आणि पडद्याच्या समोर घटना घडल्या आहेत त्या आम्ही सोडणार नाही.. त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत..
ऑन ब्राह्मण समाज जैन समाज एकत्र भूमिका
हा सामाजिक प्रश्न आहे , त्यामुळे कोणी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, गोखले आहेत म्हणून ब्राह्मण समाजाचे शिष्ट मंडळ भेटायला येणार असेल तर ते गैर आहे
गोखले असो किंवा आणखी कोणी असो ते पैसा कमवायचे म्हणूनच ते यामध्ये आले होते..
आंदोलनाचे श्रेय माजी विद्यार्थी यांचे
On व्यवहार पैसे परत द्या
धर्मदाय आयुक्तकांकडे जी सुनावणी झाली त्यामध्ये पुनर्विचार याचिकेमध्ये धर्मदाय आयुक्तांना एक गोष्ट लक्षात आली.. विक्रीचे व्यवहार करत असताना काही गोष्टी समोर आल्या नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं..
त्यामुळेच त्यानी सहाय्यक धर्मादायक आयुक्तांना आदेश दिला. प्रत्यक्षात तिथे मंदिर आहे का बघा असं सांगितलं.. ट्रस्टीचे बॅलन्स सीट तपासा.. ही संस्था आर्थिक डबघाईला आली आहे का ? हे बघा.. जमीन विकायची वेळ आली आहे का ? हे बघा असं सांगत पुढचा निर्णय घेईल अशी भूमिका घेतली..
जमीन विक्रीचे पैसे धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाशिवाय विल्हेवाट लावू नये असं धर्मदाय आयुक्तांनी आदेश दिले आहेत..
ऑन कर्नाटक भाजप नेते जोल्ले सहभाग
HND ट्रस्ट जमिनीवर वीरेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीने 50 कोटीचे तारण कर्ज दिले होते. आणि बुलढाणा अर्बन बँकेने 20 कोटी तारण कर्ज दिले होते.
या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला, या दोन्ही संस्था चालकांशी आम्ही संपर्क केला आणि त्यांना इशारा दिला.. देवाला गहाण ठेवून तुम्ही कर्ज देणार असाल तर तुमच्याकडे बघून घ्यावा लागेल असं सांगितलं..
ते दोघेही वेळीच सावध झाले आणि त्यांनी मॉर्गेज कर्ज रद्द केले.
On आंदोलनाची पुढील दिशा
30 तारखेपर्यंत या प्रॉपर्टीवर HND चे नाव लागले नाही तर एक तारखेपासून आचार्य गुप्तनंद महाराज आमरण उपोषणाला बसणार आहेत..
त्यांनी आमरण उपोषण सुरू केले तर आम्ही ट्रस्टींच्या दारात जाऊन बसणार आहोत..
ऑन मोहोळ सहभाग
जोपर्यंत HND ट्रस्टचे नाव त्या प्रॉपर्टीला लागत नाही तोपर्यंत आमच्या मनातील शंका दूर होणार नाहीत.. कारण जे दिसते तेवढे सगळे सरळ नाही.
On जैन समाज टार्गेट
देशभरातील ६०० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शांतता प्रिय समाजाला कोणी दांडगावा करून लुटणार असतील तर गप्प बसायचं नाही असं ठरले आहे. ,
जो पक्ष देश आणि धर्मासाठी काम करतो असा दावा करतो, त्याच पक्षातील लोक त्रास देत असतील तर तथाकथित धनिक आहेत त्याने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.
On धनगेकर श्रेय विषय
धनगेकरांचा अगदी बरोबर आहे... सर्व पुणेकर जैन समुदायाच्या मागे राहिले. पुण्यामधील मोर्चात फक्त जैन धर्मीय नव्हते. इतर समाजाचा देखील मोठा सहभाग होता.
बे सहारा विद्यार्थ्यांसाठी पुणेकर एकवटले, पुणेकरांचे आम्ही ऋण विसरू शकत नाही.
On साखर हंगाम
वर्षाला आमच्या नावाने बोंब मारता... या वेळेला पावसाच्या नावाने बोंब मारा.. जे काय करायचं ते दहा तारखेपर्यंत करा. दहा तारखेनंतर आम्ही मैदानात आहोतच..
ऑन ऊस दर
जे आकडे मिळत आहेत ते whatsapp युनिव्हर्सिटीचे आहेत. जो पर्यंत साखर कारखाने दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत आम्ही अधिकृत भूमिका मांडणार नाही. साखर कारखान्यांनी आपली भूमिका जाहीर करावी,
On बच्चू कडू आंदोलन
मीही आज रात्री नागपूरच्या दिशेने निघत आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे.
ऑन बच्चूकडू मुख्यमंत्री चर्चा निमंत्रण
बच्चू कडूंनी आंदोलनाची घोषणा करून अनेक दिवस झाले , आता अचानक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवणं म्हणजे योग्य नाही
मुख्यमंत्र्यांनी नागपूर मध्ये बैठक बोलावली असती तर तिथल्या तिथे त्यांना सहभागी होत आला असतं.
एक तर दळणवळणाची साधने नाहीत शेतकरी नेत्यांना मुख्यमंत्र्यांसारखे चार्टर विमान नाहीत.. त्यामुळे बैठकीला कसं जाणार
On निंबाळकर क्लीन चिट
निंबाळकर यांनी खुलासा करण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनीच खुलासा केला याचं मला मोठ आश्चर्य वाटतं.
मुख्यमंत्री ठरवूनच आले होते का.. बहुतेक मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत असावेत. एखादा भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट देऊन टाकायचं.
मुळात मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे का हे जाहीर करावं.. राज्यात काय द्याच राज्य आहे का ? त्यांनी सांगावे.
वर्दीतला पोलिसवाला बलात्कार करत असेल गृहखाते काय करायला लागलाय हे दिसून येत.
पोलीस अधिकारी एका सरकारी कर्मचाऱ्यावर बलात्कार करतो.. एका डॉक्टरवर बलात्कार करतो. त्यामुळे कुठे आहे कायदा ? आणि सुव्यवस्था याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा.
शेतकऱ्याच्या मुली काय रस्त्यावर पडलेला नाहीत.. कोणीही तिच्यावर अत्याचार करावा.. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही.. अशा पद्धतीने पोलीस वागायला लागले तर त्यांच्या अंगावर असणाऱ्या वर्दीचा देखील आम्ही मुलाहजाब ठेवणार नाही.. आम्ही त्यांना ठोकून काढू.
ऑन मुख्यमंत्री सक्षम
पैसे दिल्यावर पोस्टिंग मिळतं हे अधिकाऱ्यांना कळाले आहे. त्यामुळे पैसे दिला विषय संपला या भूमिकेत अधिकारी दिसतात.. अशी मस्ती पोलीस अधिकाऱ्यांना येत असल्यास ते दर्शवते की याचा अपयश गृहमंत्र्यांचे आहे.
ऑन बाबासाहेब पाटील जावई लोन
पार्टी विथ डिफरन्स अशी शेकी भारतीय जनता पार्टी मिरवत होता.. आता रोज एका मंत्राच्या भानगडी बाहेर यायला लागले.. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा याचे उत्तर द्यावा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 27, 2025 13:06:500
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 27, 2025 13:00:560
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 27, 2025 12:45:450
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 27, 2025 12:33:480
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 27, 2025 12:19:501
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 27, 2025 12:19:331
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 27, 2025 12:18:090
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 27, 2025 12:14:200
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 27, 2025 12:12:510
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 27, 2025 12:10:190
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 27, 2025 12:09:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 27, 2025 12:05:550
Report
JMJAVED MULANI
FollowOct 27, 2025 11:42:230
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 27, 2025 11:30:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 27, 2025 11:16:040
Report
