Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
तलाव में भराव से होमियोपैथी कॉलेज पर विरोध, पिंपळगांव में ग्रामवासियों का प्रदर्शन
PNPratap Naik1
Dec 08, 2025 08:35:26
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या पिंपळगाव मध्ये शासकीय होमिओपैथी महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. पण गावच्या तलावामध्ये भराव टाकून होमिओपॅथी महाविद्यालय उभारण्यास गावकऱ्यांनी विरोध केलाय. आज गावातील अनेक ग्रामस्थ एकत्र येत तलावा काठी सुरू असलेल्या होत कामाला विरोध केला. होमिओपॅथी महाविद्यालयास आमचा विरोध नाही पण तलावामध्ये भराव टाकून काम करण्यास आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 08, 2025 11:05:14
Nagpur, Maharashtra:नागपूर - कृष्णा खोपडे, आमदार, भाजपा (बाईट +121) (तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक.... तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी... लक्षवेधी ही लावली.... भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांचा 121 ) - तुकाराम मुंढे कोविडच्या काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले, त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गौरप्रकार केले - एखाद्या साइटवर ते गेले तर मीडियाला माहीत होता मात्र संबंधित अधिकारी घरी झोपून राहत होता - तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटीचे अधिकार दिले नव्हते - त्यांनी बिल्डर आणि विस कोटी रुपयांच्या चेकवर स्वतः सही केली आणि बिल्डरच्या घशात टाकले त्यावेळी महापौर असलेले संदीप जोशी आणि भाजप गट नेते संदीप जाधव यांनी बँकेच्या पुराव्या सहित सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता आणि एफ आय आर दाखल झाला - स्मार्ट सिटीत महिला अधिकारी होते त्यांनी सही करण्यास मनाई केली, त्यावेळी मुंडे यांच्या त्यांनी त्या महिला अधिकाऱ्यांना टॉर्चर केलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या आईएएस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती - परंतु त्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि देशमुख गृहमंत्री होते त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नाही - माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागितली - त्यांना अधिकार नसतानाही पाच वर्षे त्या पदावर दाखवण्यात आलं, परंतु तसं असतानाही ते आदेश रद्द करण्याचे मागणी आम्ही केली - आम्ही या विरोधात लक्षवेधी दाखल केलेली आहे मुंडे यांनी करोना काळात कोविडच्या काळात नागपूरचा कसा सत्यानाश केला - आता आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांना ताबडतोब डिसमिस करावा आणि त्यांची चौकशी मुख्य सचिवाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी केली आहे
85
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 08, 2025 10:52:49
71
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 08, 2025 10:10:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sanghli पत्तील के सांगली के वसंतदादा पाटील शासकीय अस्पतालातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे. निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरी मिळावी तसेच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार वारसा हक्क भरती निर्णय असूनदेखील रुग्णालयाच्या प्रशासनाकडून तो डावलण्यात येत असल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू झाले असून प्रसंगी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, अशा इशाराही महेंद्र चंडाळे यांनी दिला.
145
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 08, 2025 10:02:13
Yavatmal, Maharashtra:२०१७ मध्ये राज्य सरकारने 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने' अंतर्गत शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहे. मी आयकरदाता नाही, तपासणीत आढळल्यास कर्जमाफी मिळालेली रक्कम परत केली जाईल, असे या हमीपत्राचे स्वरूप आहे. कर्जमाफी न मिळाल्याने ५० शेतकरी सरकारविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणात २ मे २०२४ रोजी निकाल लागला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह सहकार विभागाला दिल्या होत्या. अर्ज छाननीत यवतमाळ जिल्ह्यातील आठ शेतकरी पात्र ठरले. यात उमाकांत दरणे व त्यांच्या कुटुंबातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या याच योजनेत हजारो शेतकरी अद्यापही वंचित असल्याने त्यांच्या कर्जाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकरी हा कर्जातच जगत आहे आणि कर्जातच मरत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकरी उमाकांत धरणे यांनी दिली.
155
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 08, 2025 10:01:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सोबत लढणार - 30 जागांची केली मागणी. सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने रणशिंग फुंकले आहे. महापालिका निवडणुक्यात महायुतीत सोबत लढण्याची भूमिका जाहीर करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 30 जागांची मागणी केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जागांची मागणी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारी मागणी अर्ज आज पासून देण्यात येणार असल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळेंनी स्पष्ट केला आहे. तसेच तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून उमेदवाराची चाचपणी करून उमेदवारी देण्याची भूमिका घेण्यात येईल,त्याच बरोबर निवडणुकीत जागांच्या बाबतीतला अंतिम निर्णय अजित पवार घेतली, असे स्पष्ट करत देखील महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा,विश्वास देखील व्यक्त झाला आहे.
154
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 08, 2025 09:47:37
149
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 09:23:12
Pune, Maharashtra:अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर अहिल्यानगरच्या किन्ही गावातील नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर तालुक्यातील किन्ही गावातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई खोडदे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठवडा उलटूनही वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. गावात बिबट्याचा वावर असल्याचे वारंवार सांगूनही वनविभाग करावाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान वनविभागाकडून बिबट्या असल्याबाबत ग्रामस्थांनाच पुरावे मागितले जातात, याबाबत अहिल्यानागरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना विचारले असता सध्या AI च्या माध्यमातून फेक व्हिडीओ बनवले जातात त्यामुळे आम्हाला बिबट्या आहे की नाही याची खात्री करूनच कारवाई करता येते असं म्हंटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान भागूबाई खोडदे यांच्या दशक्रियाच्या पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली याबाबत उपवनसंरक्षक यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं.
170
comment0
Report
SKShubham Koli
Dec 08, 2025 09:20:18
Thane, Maharashtra:ठाण्यात 100 वर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड बसण्याची शक्यता? r राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी मनोरुग्नालयाला दिली भेट.. नाशिक मधील तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा ताजा असतानाच आता ठाण्यातील 125 वर्षे जुन्या असणाऱ्या मनोरुग्र्णालयाच्या आवारातील तब्बल 100 वर्ष जुनी वृक्ष कत्तल करण्यात येणार असल्याचं समजलं जातंय बंगलोरच्या धरतीवर सुसज्ज असं मनोरुग्र्णालय ठाण्यात उभारण्यात येणार असल्याने व नवीन रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करिता महानगरपालिका व एमएमआरडीए च्या माध्यमातून ही वृक्षतोडी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज मनोरुगृनालयातील आवारास भेट दिली व पाहणी देखील केली आहे.. या ठिकाणी अनेक असे हेरिटेज झाड आहेत त्याची कत्तल व्हायला नको ठाण्यातला हे एकमेव भाग आहे.. हिवाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड हा मुद्दा अधिवेशनामध्ये देखील उचलून धरणार आहेत सामान्य नागरिकांनी देखील पुढे यायला हवं असे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रधान म्हणाले आहेत तसेच वृक्षांची कत्तल करू नये याकरिता रुग्णालय प्रशासनाला त्यांनी निवेदन देखील दिले आहे.. मनोरुग्णालयातील आवारातील कोणती झाडे नेमकी कत्तल केली जाणार आहेत व कोणती झाडे वाचवली जाणार आहेत याबाबत सर्व माहिती ही महापालिका व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे..
169
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 08, 2025 09:19:03
Pune, Maharashtra:अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४३८१ नावे समाविष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे... तसेच या संदर्भात लेखी हरकतही नोंदवली आहे...ही सर्व नावे श्रीगोंदाच्या मांडवगण जिल्हा परिषद गटातील असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे... मात्र महापालिका प्रशासन सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून जर या नावांबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, तर भविष्यात न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले आहे.
97
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 08, 2025 09:15:29
Shirur, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर अधिवेशनात माध्यमांशी बोलताना बिबट्याच्या किंवा वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत असं म्हटलंय तर शासनाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो परंतू हा निर्णय लवकरात लवकर व्हावा असं मृत शिवन्या बोंबे आणि रोहन बोंबे च्या वडीलांनी म्हटलंय आमच्या पोटचा गोळा गेलाय सरकारी नोकरी ने ही पोकळीक भरून येणार नाही असं म्हणत यापूर्वी हि अनेक घटनांमध्ये शासनाने सरकारी नोकरीची आश्वासने दिली पण अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाही या ठिकाणी हि तसं व्हायला नको असं म्हणत तातडीने हा निर्णय घेऊन याची अंमलबजावणी करावी पिंपरखेड येथील पिडीत नातेवाईकांनी म्हटलंय...
152
comment0
Report
Advertisement
Back to top